कादंबरी - प्रेमाची जादू - अंतिम भाग - ३६ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू - अंतिम भाग - ३६ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

अंतिम भाग –

भाग-३६ वा

------------------------------------------------------------------------------------

गेल्या रविवारी यशने माळीकाकंना बोलवून घेत म्हटले –

तुम्ही लगेच नारयणकाकांच्या घरी जा आणि त्यांना सोबतच इथे घेऊन या, त्यांच्याशी मला आज

जग्गुच्या संदर्भात बोलायचे आहे –सांगायचे आहे आणि विचारयचे सुद्धा आहे.

हे ऐकून माळीकाका म्हणाले- हे बाकी बेस्ट सुचलाय बघा तुम्हाला .

कारण आपल्या ऑफिस मध्ये –ग्यारेज मध्ये सगळ्यांच्यासमोर नारायणकाकांची झाडाझडती घेणे “

बरोबर दिसले नसते ..त्यांचा अपमान केल्यासारखे झाले असते .

त्यापेक्षा ..इथं बोलवून तुम्ही पार फैलावर घेऊन विचारले तरी ..कुणाला काही समजायचे नाही .

आणि नारायानकाकांना पण कळले पाहिजे की-

त्याच्या जावयाचे प्रताप लोकांनी येऊन तुमच्यासमोर सांगितले आहेत .

माळीकाका म्हणाले- यशमालक –

तो दिवटा जग्गू असेल या वेळी ,तर ,त्याला पण घेऊन चला असे म्हणू का नारायणकाकंना ?

एकाच वेळी दोघांना सुनावता येईल.

यशला ही सुचना योग्य वाटली म्हणून तो म्हणाला –

तो असायला तर पाहिजे ..दिवसाच्या वेळी..घरात ,

आणि असला तर घेऊन या त्याला पण ..

माळीकाका लगेच मोहिमेवर रवाना झाले.

यश हॉलमध्ये येऊन बसला ..रविवार सकाळ ..

सगळेच मेंबर चहा-नाश्ता साठी येऊन बसले होते.

सगळ्यांच्या समोर आजींनी यशला म्हटले –

अरे त्या मधुराला फोन लावून बोलावून घे , लगेच ये म्हणावे ..तिच्या बाबांचा काल फोन येऊन

गेला ,तुझ्या आजोबांशी बोलत होते ..ते देखील खूप महत्वाचे ..

तोच निरोप द्यायचा आहे तिला .

हे ऐकून अंजलीवहिनी म्हणाल्या ..

आजोबा – काय बोलणे झाले ..? आम्हाला कळू द्याल का ?

यावर आजोबा हसले ..म्हणाले- त्या मधुराला येउद्या ..तिला तुमच्यासमोर बसवून तिच्या बाबांचा

काय निरोप आहे” हे सांगतो ..मग तर झाले ?

आजी म्हणाल्या – हे पहा ..मंडळी – आमचे सिक्रेट –बिक्रेत असे काही नसते ..त्यामुळे सगळ्यांच्या

समोर खुलेपणाने आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतो.

यशचे आई-बाबा म्हणाले –

यशच्या आज्जी – तुम्ही दोघे काही तरी स्पेशल प्लान ठरवून तो अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहात ,

हे गेल्या काही दिवसापासून सगळ्यांना जाणवले आहे ,आणि समजले आहे..

त्यामुळे सगळ्यांच्या समोर आम्ही दोघे ..आज आनंदाने जाहीर करतो आहोत ..की ..तुमच्या ..

यश आणि मधुरा “एकत्र येवो” या योजनेला आमचा पूर्ण पाठींबा जाहीर करीत आहोत.

या बाबतीत तुमच्या कल्पना आणि सूचना आमची ग्रुप लीडर म्हणून ..सुचवलेल्या – अंजलीला देत जाणे,

आम्ही सगळे त्या प्रमाणे करू.

एकूण ..मधुरा या घरात येणार आहे “ यावर आज सहमतीने ..आणि ठामपणाने शिक्कामोर्तब “करण्यात

आले आहे . यश अर्थातच मनोमन खुश होऊन गेला .

त्याने लगेच मधुराला फोन लावला ..रिंग वाजताच त्याने म्हटले..

मधुरा - आजीशी बोल ..

आजीनि म्हटले – यशला बोलू न देता .मीच बोलते आहे, नाराज नको होऊ बाई.

मधुरा लाजत म्हणाली – काय आजी ..सकाळी सकाळी माझीच फिरकी घेताय तुम्ही तर ,

बोला , काय म्हणता ?

आजी बोलू लागल्या –

काल तुझ्या बाबांचा आणि आईचा रात्री फोन आला होता ..दोघे ही खूप वेळ त्यांच्या मनातले

बोलून मन मोकळे करीत होते .

म्हणाले – आमच्या दोन मुली ..यांनाच आम्ही आमचा मुलगे “मानले.

आणि त्यांच्यात जीव गुंतवला ..आता एकीची काळजी मिटली ..दुसरीची काळजी ..!

यावर आमचे बोलणे झाले..

यशच्या आजोबांनी त्यांना एक उपाय सुचवला ..तो ऐकूनच तुझे आई-बाबा खुश झालेत.

मधुरा म्हणाली- हो का ..मला पण सांगा की.काय बोलणे झाले तुमच्यात ?

आजी म्हणाल्या – त्यासाठी तुला लगेच आमच्या घरी यावे लागेल..पंधरा मिनिटात ये..

तू आल्यवर ,सगळ्यांच्या समोर मी हा निरोप सांगेन .असे कबुल केल्यामुळे .

ऐकण्यासाठी सगळे थांबले आहेत ..अगदी यश सुद्धा आतुर होऊन बसलाय ..

पटकन ..धावत –पळत ये मधुरा ...!

आनंदाने मन भरून आलेली मधुरा लगेच निघाली ..तिच्या यशच्या घरी ..

*********

*****

रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे ..नारायणकाका घरातच होते .घाई नसल्यामुळे आरामशीर चालू होते.

समोरच त्यांच्या लेकीचे घर ..या वेळी कधी नव्हे तो ..जीवाला घोर लावणारा ..त्यांचा दिवटा जावाई

जग्गू घरी होता .. इन मीन तीन माणसे ..पण जग्गू घरात असतांना शांतता कशी राहणार ?

सकाळी –सकाळी ..माय-लेकात वादा-वादी सुरु झाली होती ..

जग्गुची बायको- नारायणकाकांची लेक ..कोपर्यात बसून ऐकत होती ..

अलीकडे जग्गुचे वागणे भयानक झाले होते ..आईवर –बायकोवर हात टाकायला तो आता कचरत नव्हता .

गरीब आई-आणि त्यापेक्षा भित्री बायको ..असे असल्यामुळे जग्गुला मोकळे रान मिळाले होते.

गेल्या काही महिन्यापासून जग्गुने स्वतःची एक स्वतंत्र अशी टोळी करून ..दादागिरी करण्यास सुरुवात

केली होती ..त्यामुळे ..त्याच्या भागातील आधीच्या टोळीचे माथे भडकून गेले होते ..रस्त्यात गाठून

एकमेकाच्या धंद्यात नाक खुपसणे सुरु झाले ..त्यामुळे ..सगळ्या एरियात ..टेन्शन सुरु झाले होते.

नारयणकाकांच्या दृष्टीने आजून एक लफडे जग्गुने त्यांच्या मागे लावले होते.

नारायणकाका अशा विचारात असतांना ..दारात उभ्या असलेल्या ..जुन्या मित्राला ..यशकडील

माळीकाकांना पाहून ..त्यांना कल्पना आलीच.. यशच्या कानावर सगळ्या गोष्टी गेल्या आहेत.

त्यासाठीच आज त्यांनी आपल्याला बोलावले असणार ..हे नक्की..

माळीकाकानी यशचा निरोप दिला .आणि सोबतच चलू या असे म्हटले..

काही न बोलता ..नारायणकाका तयार होते ..म्हणाले ..

जग्गुला सांगून पाहतो ..आला तर बरेच होईल ..

नारायण काका त्यांच्या दारातच असतील ..

तो समोरून दहा –बारा मोटार सायकली येऊन थांबल्या ..जग्गुच्या आणि त्यांच्या घरा समोर.

त्यावर आलेले लोक पाहून ..माळीकाका आणि नारायान्काकांना कळाले ..

बापरे ..ही तर बड्यादादाची टोळी आहे ..जग्गुला जाब विचारायला आलेली असावीत.

म्हणजे ..आता इथे मोठा राडा होणार ..

आलेल्या लोकांना पाहून .जग्गुच्या पंटर ने डायरेक्ट पोलिसांना फोन करून सांगितले ..

तोपर्यंत ..आलेल्या टोळक्यांने .. जग्गुला घेरले होते .. त्याला मारहाण करीत धमक्या देणे

सुरु झाले ..

ही मारामारी पाहून ..जग्गुची आई .नारायणकाकांची बहिण..पळत आली ..पाया पडत म्हणाली.

नका रे मारू पोराला ..सोडा त्याला ..

पण.बेभान झालेल्या त्या गुंडांनी जग्गुच्या आईला धक्के देत बाजूला ढकलून दिले ..जग्गुची आई

भेलकांडत कोपर्यातल्या मोठ्या दगडावर आपटली ..डोके फुटले तिचे ..रक्त वाहू लागले ..

जग्गू अधिकच चेकाळून गेला ..त्याने एक दोघांना चांगलेच तुडवले ..पण.आलेले गुंड संख्येने

जास्त होते ..तशात जग्गुची बायको ..तिच्या अंगात कुठून अवसान आले होते कुणास ठाऊक ?

ती जग्गुच्या समोर उभी राहत ..मारणाऱ्या गुंडांना म्हणाली ..

नका मारू माझ्या नवर्याला ..या पुढे तो तुमच्यात येणार नाही..आता सोडा त्याला..

पण सुडाने पेटलेले गुंड त्या बिचारीचे थोडेच ऐकणार ..त्यांनी तिला बाजूला ढकलून देत म्हटले.

तू फक्त जग्गुची बायको असतीस ना तर, तुझी आज काही खैर नव्हती .

पण.आमच्या बड्या दादाने आम्हाला दम दिलाय ..

जग्गुची बायको ..आपल्या नारयणकाकाची लेक आहे ..आपुन तिला सिस्टर मानतो ..

तिला धक्का लागला तर ..याद राखा ..!

राडा पहायला जमलेले शेकडो लोक हा सगळा प्रकार पहात होते ..ऐकत होते ..

जग्गुल्ला बेदम मारहाण करून निघतांना म्हणाले..

जग्गू ..आज पहिला धडा दिलाय ..यातून शिकलास तर बरी गत हाय तुझी.

तुझ्या बायकोमुळे आज वाचलास ..इथून पुढे सुधार्लास तर जिंदा राहशील ..नाय तर

तू अन तुझं नशीब..

सडकून मार खाऊन जग्गू घरासमोर पडून विव्हळत होता , नारायणकाकाच्या मदतीला

सगळे लोक धावत आले .. जग्गुच्या आईच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती..

जग्गुची बायको ..सगळा प्रकार पाहून भीतीने थरथरत होती... तिला मोठाच धक्का बसला होता.

आणि काका-काकुना भीती वाटत होती .की..आपली लेक आता पोटुशी “आहे ..आणि या झालेल्या

राड्याचाधक्का सहन न होऊन पोरीला त्रास झाला तर ?

माळी-काकांनी यशला लगेच फोन केला होता..त्यामुळे काही वेळातच यशसोबत मधुराला आलेलीपाहून

त्यांना आनंद झाला . जग्गुच्या आईला आणि बायकोला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाताना मधुराचे

सोबत असणे खूप परिणाम करणारे ठरणार होते.

यशने नारायान्काकांना –काकूंना धीर दिला , सर्व काही ठीक होईल म्हणत ..मधुराची ओळख जग्गुच्या

आईशी..बायकोशी करून देत म्हटले ..ही तुमच्या सोबत येईल हॉस्पिटलला .तिथल्या डॉक्टरशी बोलेल

तुम्ही फक्त उपचार घायचे ..बाकी कशाची काळजी नका करू.

यश म्हाणाला ..माळी-काका तुम्ही मधुरासोबत या मोठ्या गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये जा.

इथे पोलीस आलेत ,ते आम्ही बघून घेतो..इकडची काळजी तुम्ही नका करू..

समोर जमलेल्या लोकांनी सगळा प्रकार सांगून टाकीत म्हटले ..जग्गुचा यात काही दोष नाही..

त्याला येऊन मारहाण केलीय.. तुम्ही त्या लोकांवर कारवाई करा ..

बेदाम मार बसल्यामुळे ..जग्गुल्ला येते अनेक महिने ..घरात पडून राहावे लागणार होते..

त्याला धडा शिकवण्याचा उद्देस्श या राड्या मागे होता.

जास्त कटकटी न होता ..यशच्या लक्ष देण्यामुळे ..पोलीस कारवाई बरीच सौम्य झाली आहे..

हे जाग्गुला जाणवले.

त्यांने सगळ्यांच्या समोर यशच्या समोर हात जोडीत म्हटले..

लोकांना त्रास जग्गू आज इथे संपला , तुमच्या मुळे आता नवा जग्गू बरा होऊन तुमच्या

समोर येईल.

यश साहेब – नारायणमामा सारख्या देवमाणसाची पुण्याई आज मला समजली , बड्या दादाने

म्हणूनच आज माझा काटा नाही काढला. उलट बड्या दादाने ..त्याच्या सिस्टरचे कुंकू शाबूत राखले.

आत्ता पर्यंत जे झाले ते झाले.. लोकांचे नुकसान जमेल तसे मी भरून देईल,.

यापुढे मी नीट वागेन..फक्त माझ्यावर विश्वास ठेवा.

यश म्हणाला – जग्गू तूच विचार कर.. ज्या गोष्टींनी तुला मरणाच्या दारात नेऊन सोडले होते ..

तिथून तुला परत आणणारी तुझी साधी –भोळी बायको ..याच नारायणकाकांची लेक आहे.

सांभाळ आता ..तू..तिला .तू बाप होणार आहेस लवकरच .

**********************************************************

३.

*************

यश इकडचे सगळे आटोपून घरी निघाला होता.. मध्येच मधुराचा फोन आला ..

हॉस्पिटल मध्ये दोघींची सगळी व्यवस्था लावली आहे ..काळजीचे कारण नाहीये. मी आणि माळीकाका

घरीच निघालो आहोत.. तू पण उशीर न लावता ये .

घरी सारेजण मोठ्याच काळजीत होते.. एखादे संकट यावे अशी ही घटना नारायानकाकांच्या घरी

घडली होती.. यश स्वतः तिथे गेल्याने सर्व व्यवस्थित निभावले गेले ..

एक मोठा प्रोब्लेम सोल्व्ह झाला ..सुटकेचा निश्वास सर्वांनी सोडला होता.

आजी म्हणाल्या ..

बघा ..मधुरा आपल्या यशसाठी किती परफेक्ट आहे .. कठीण प्रसंगी सुद्धा न डगमगता ,

ती यशच्या बरोबरीने सामोरी गेली ..धीटपणाने मार्ग काढला या प्रसंगातून.

सगळे म्हणाले – आहो आजीबाई ..पुरे झाले ना तुमचे पटवून देणे , आम्हाला कधी पासूनचे

पटले आहे..

हे बघा आता दोघे आलेत ..पटकन सांगून टाका ..मधुराच्या आई-बाबांचा निरोप..

यश आणि मधुराला .. मधोमध बसवीत ..आजी म्हणाल्या..

मधुराचे बाबा म्हणाले ..

आता महिन्यावर अक्षय तृतीया आली आहे ..साडे तीन मुहूर्त पैकी एक ..मुहूर्त ..

याच दिवशी ..यश आणि मधुराचा नोंदणी पद्धतीने विवाह व्हावा “ अशी यशच्या आजी-आजोबांची

डिमांड आणि इच्छा ,आणि आज्ञा प्रमाण मानून ..आम्ही आमची संमती आनंदाने देतो आहोत.

चौधरीकाकांच्याकडे आठ दिवस अगोदर आम्ही मुक्कामास येत आहोत.

बाकीच्या गोष्टी ..तिकडे आल्यावर होतीलच.

अंजली वाहिनी म्हणाल्या –

बाप रे .आजी-आजोबा ..तुम्ही जणू ठरवूनच आला होता ..की ..तुमच्या सोबत इथे आलेली

मधुरा “आता तिच्या गावी परत जाणारच नाहीये.

आजोबा म्हणाले..

यस अंजली .. आम्ही जे ठरवतो ..ते पूर्ण करतो..

मधुराच्या आई-बाबांची पण ही इच्छा होतीच ..कारण.. यशचे बाबा आणि मधुराचे बाबा दोघे

बालमित्र ..आता ही मैत्री नव्या नात्याची होणार .

यशची आई म्हणाली –

हो ना .. यशचे बाबा खूप खुश झालेत ..मित्र- कन्या ..त्यांच्या घरची सुनबाई होणार.

सुधीरभाऊ म्हणाले..

अंजलीला मधुरा इतकी आवडली ..म्हणजे ही मुलगी खासच असणार ..त्यात आमच्या गावकडची ,

मग तर काय पहायचे..

मधुरा सगळ्यांचे बोलणे मनात साठवून घेत होती .. अंधुकसे स्वप्न ..खरे होते की नाही ?

अशी भीती आज पार पळून गेली होती...

यशच्या मनावर तिच्या प्रेमाने खरेच जादू केली ..

ठरल्या प्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर .. मधुरा यशच्या घरात ..गृहलक्ष्मी म्हणून ..

प्रवेश करती झाली..

********************************************************************************

समाप्त ---

भाग- अंतिम - ३६ वा .

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

9850177342

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------