Sri Sukta - 4 - Falshruti books and stories free download online pdf in Marathi

श्री सुक्त - 4 - फलश्रुती

"श्रीसुक्त"
"फलश्रुती"
पद्मानने पद्मऊरू पद्माक्षी पद्मसम्भवे | तन्मेभजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ।।१।।
अर्थ:-हे कमलनायने,कमल वदने,कमलस्वरूप,कमलावर बसलेल्या लक्ष्मी माते,मला ऐश्वर्य,सुख दे.
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने | धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे ।।२।।
"अर्थ:- तू मला,गजधन,अश्वधन,गोधन,संपत्ती,असे विविध प्रकारचे ऐश्वर्य प्रदान कर,आणि
माझे मनोरथ पूर्ण कर.
पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि | विश्वप्रिये विष्णु्मनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ।।३।।
अर्थ:-हे महालक्ष्मी, तू कमलासना,कमल नेत्री असून,या जगतावर तुझी माया आहे.तुझी चरण कमले मी भक्ती भावाने पूजीन.

पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम् | प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे ।।४।।
अर्थ:-हे जगन्माते,तू माझ्या वंशात,मुले,
नातवंडे,धन,अन्न, हत्ती,घोडे रथ इत्यादी
विपुल वैभव देऊन सुखी कर व मला
भरपूर आयुष्य दे.

धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः | धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु ते।।५।।|
अर्थ:--अग्नी,वायू,सूर्य,अष्टवसु,इंद्,बृहस्पती
वरुण या सर्व देवता, धन,धान्य समृद्धी
देणाऱ्या असल्याने,त्यांचे शक्ती सामर्थ्य
तू मला सदैव मिळवून दे.

वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा | सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ।।६।।
सदैव लक्ष्मीच्या सान्निध्यात राहणाऱ्या
गरुडराजा ,मी यज्ञात तयार केलेला सोमरस तू प्राशन कर,त्याच प्रमाणे
यज्ञ समारंभ चालविणाऱ्या ऋत्विजांनी
मला,समृद्धी,सुख,स्थैर्यासाठी सोमरस
प्रसाद द्यावा.

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः | भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ।।७।।
अर्थ:-पूर्व पुण्याई असलेल्या भक्तांनी श्रीसूक्ताचा सदैव पाठ करावा.या पठनाने व लक्ष्मीच्या आराधनेने,भक्ताला क्रोध,मत्सर,लोभ,
दुर्बुद्धी हे अवगुण कधीही निर्माण होत नाही.

सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे | भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ।।८।।
हे कमलवासींनी महालक्ष्मी माते,तू शुभ्र

वस्त्रधारी आहेस,तुझ्या हाती,सुंदर कमळ, गंध व पुष्प माळांनी तू विष्णूला
अति प्रिय आहेस.तू भक्तांचे मनोगत जाणतेस, त्रिलोकाला ऐश्वर्य संपन्न बनवतेस,म्हणून सहा ऐश्वर्य असलेल्या लक्ष्मी माते
माझ्यावर कृपा करून माझ्या घरी निरंतर राहा.

विष्णुपत्नीं क्षमादेवीं माधवीं माधवप्रियाम् | लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ।।९।।
अर्थ:-हे विष्णुपत्नी,महालक्ष्मी तू क्षमाशील आहेस आणि विष्णूला प्रियही
आहेस,तू स्वतः च स्वयं प्रकाशी तुला माझे शताधिक नमस्कार.

महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि | तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।।१०।।
अर्थ:-त्या सुप्रसिद्ध महालक्ष्मीच्या प्रभावाची आम्हाला जाणीव आहे.त्या विष्णुपत्नीचेआम्ही निरंतर ध्यान करतो.
महालक्ष्मीने आम्हाला सुबुद्धी द्यावी.

आनंद:कर्दम:श्रीद:चिक्लित इति विश्रुता: ।
ऋषयश्च श्रीय: पुत्रा:श्रीर्देवीर्देवता माता:।।११।।
अर्थ:-आनंद,कर्दम, श्रीद,चिक्लित हे
लक्ष्मीचे सुपुत्र प्रसिद्ध आहेत,ते या श्रीसूक्ताचे प्रथम उदगाते व ऋषी आहेत.
या ऋषींनी श्री लक्ष्मीसह माझ्यावर
सदैव प्रसन्न असावे.

ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदमृत्यव:।
भयशोकामानास्तापा नश्यन्तु मम् सर्वदा ।।१२।।
अर्थ:-कर्ज,रोग,दारिद्रय, पाप, अपमृत्यु,भीती,शोक,मानसिक पीडा
या महालक्ष्मीच्या कृपेने दूर जावोत.

श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते | धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।।१३।।
अर्थ:--हे लक्ष्मी माते,मी तुझी उपासना
नेहमी करीत आहे.म्हणून मला विपुल धन,विजय,आरोग्य,ऐश्वार्य,सुपुत्र,
सदगुणी संतती,व मित्र व दीर्घ आयुष्य
दे अशी माझी नम्र प्रार्थना.
श्री सुक्त शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी म्हणावे.समई लावलेली असावी,सुरुवात करतांना मंगळवार
किंवा शुक्रवार असावा.पुष्कळ वेळेस घरात पैसे भरपूर येतात परंतु पैशाला
पैसा लागत नाही,किंवा खूप परिश्रम
करून म्हणावे तसे उत्पन्न येत नाही.
नोकरीत पगार वाढत नाही.अशी अनेक
कारणे आहेत.आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी असे प्रत्येकाला वाटते,त्या साठी नित्य साधना आवश्यक आहे.प्रत्येकाच्या घरात श्री लक्ष्मीची मूर्ती
असते,संकल्प सोडून लक्ष्मीला श्री सुक्ताचा अभिषेक करावा.सोळा आवर्तने
करावे.मनो कामाना पूर्ण होतात.
भगवान विष्णू श्री शंकराची पूजा करीत
असतांना त्यांना बिल्ब पत्र कमी पडले, देवी भवती लक्ष्मीने आपल्या तपश्चर्येने बिल्ब वृक्ष निर्माण केला.बिल्ब फल लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे.बिल्ब फलाला लक्ष्मी फल असे म्हणतात.बिल्ब
फल तिजोरीत ठेवतात.
"
"धनलक्ष्मी स्तोत्र"
धनलक्ष्मी स्तोत्र


नमः सर्व स्वरूपे च नमो कल्याणदायिके । महासम्पत्प्रदे देवि धनदायै नमोऽस्तुते॥
महाभोगप्रदे देवि महाकामप्रपूरिते । सुखमोक्षप्रदे देवि धनदायै नमोऽस्तुते॥
ब्रह्मरूपे सदानन्दे सच्चिदानन्दरूपिणी । धृतसिद्धिप्रदे देवि धनदायै नमोऽस्तुते॥
उद्यत्सूर्यप्रकाशाभे उद्यदादित्यमण्डले । शिवतत्वप्रदे देवि धनदायै नमोऽस्तुते॥
शिवरूपे शिवानन्दे कारणानन्दविग्रहे । विश्वसंहाररूपे च धनदायै नमोऽस्तुते॥
पञ्चतत्वस्वरूपे च पञ्चाचारसदारते । साधकाभीष्टदे देवि धनदायै नमोऽस्तुते॥श्रीं ॐ॥
ॐ श्री ललिता महात्रिपुरसुन्दरी पराभट्टारिका ।
समेताय श्री चन्द्रमौळीश्वर परब्रह्मणे नमः॥जय जय शङ्कर हर हर शङ्कर॥
हे स्तोत्र नित्य म्हणावं.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED