My mind became yours! ..... books and stories free download online pdf in Marathi

माझे मन तुझे झाले!.....

या गोष्टीतील सर्व पात्र काल्पनिक आहेत.ही कथा कोणालाही ठेस पोहोचवण्यासाठी नाही म्हणून ती फक्त कथाच आहे. तर, मला प्रेम करायला अजुन जमलेच नाही. मी आणि माझं मन आम्ही दोघेही प्रेम करायला खूप खूप घाबरतं होतो. आधी मला कळतच नव्हत की तिच प्रेम कसं मिळवायचं आहे . नंतर,आम्ही सगळे सहलीला गेलो होतो.तेव्हा, ती म्हणजे साक्षीने मला म्हटले की आता आपण नेहमी सोबत राहूयात का ? तेवढ्यात तीला तिच्या आईचा फोन येतो आणि तेव्हा तीची आई म्हणते की साक्षी तुझ्यासोबत कोणी आहे का ? साक्षी म्हणते, नाही का गं.मी एकटीच आहे.त्यावर तिची आई म्हणते, आपल्या शेजारी राहणाऱ्या काकांचा मुलगा देखील तिकडे आला आहे.तु त्याच्या सोबतच राहा आणि त्याच्या बरोबर माघारी ये.(आणि मग तीने मला सगळं काही सांगितलं.) (आणि तेव्हा मला वाटलं की मला खूप त्रास होणार.पण नंतर तसं न होता मला तिच्यावर प्रेम व्हायला लागलं होतं.) आतापर्यंत मी मुलींसोबत बोलायला खूपच घाबरत होतो.परंतु, मला काय झाले कोणास ठाऊक मी तिच्या सोबत तासनतास गप्पा मारायला लागलो.आणि काय माझही तिच्यावर खुप प्रेम वाढतच गेलं.सहलीला गेल्यापासून ते सहलीवरून येईपर्यंत आम्ही दोघेही बोलत असायचो. आता, एका वर्षानंतर आम्ही आमच्या सर्व शिक्षकांसह पुन्हा एकदा सहलीला निघालो होतो.मागच्या वर्षी आम्ही सिंधुदुर्गला भेट दिली आणि आता यावर्षी आम्हाला महाबळेश्वरला जाणार होतो. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडविक पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. हे आम्हाला माहीत नव्हते म्हणून आम्ही या ठिकाणाला भेट देण्यासाठी निघालो होतो. त्यानंतर, महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. हे आम्हाला आमच्या सर्व शिक्षकांनी सांगितले व आम्ही सगळे सहलीला निघालो. आमच्या सर्व शिक्षकांनी सांगितले की खुप छान परिसर आहे तुम्ही पण शक्यतो सर्व काही सुरळीत पार पाडण्यासाठी आमच्या सोबत या.साक्षी आणि मी खूपच खुश होतो.तेवढ्यात मला तिच्या मैत्रिणीने विचारले की सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला आहे.तर येथे खूप काही शिकायला मिळालं आहे.पण मला काय वाटतं की येथे थंडी वाजते काय कारण असावे असे तुला वाटत? मी तिला म्हणालो,की अगं बाई!तुला काय मी वेडा वाटलो का काय?येथे खूप उंचावर असलेल्या या ठिकाणी थंडी वाजणारी ना ! ( मला वाटलं की आता आपण येथे तिला PURPOSE करावं म्हणून मी तिला एका ठिकाणी बसवून घेतले.) आम्ही दोघे थोडावेळ गप्पा मारल्या आणि मी तिला माझ्या मनातले प्रेम व्यक्त करायला लागलो तेवढ्यात तीला तिच्या मैत्रिणीने विचारले की तू काय करतेस इथे चल लवकर माझ्यासोबत फिरायला.(तीची मैत्रिण तीला घेेेेऊन गेेेेेेेेली.मी मनातुन खूप दुःखावलो गेलो.) आम्ही सहल खूप आनंदात साजरा केली.मला एक संधी भेटेल या विचाराने मी वेडा झालो होतो.आणि ही संधी मला मिळाली नाही.म्हणुन माझ्या मनात विचार आला की खुप प्रेम मी तिच्यावर केले पण ते शक्य नसेलही कदाचित तुम्हाला कळेल की नाही हे मला माहीत नाही पण मी मात्र माझं मन तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही मला सहन होत नाही.आणि अश्या प्रकारे माझे मन तुझे झाले !..............

इतर रसदार पर्याय