A cup without love tea and that - 02. books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०२.










तर मंडळी आज आपली "ती" घरी येणार..... मग काय तिच्या गृहप्रवेशाची सगळी तयारी केलीय तिच्या मामाने.....😜 डेकोरेशन्स बघून तर तुम्ही दंग होणार म्हणजे होणारच अशी ती सगळी perfection हिच्या मामाने केलेली.....💓💓🤩




तर मग कुठेही न वेळ दवडता आपण लगेच जाऊया आपल्या "ती" कडे.... हॉस्पिटल मध्ये......

आई : "अरे मेरी बेबी डॉल.....😘😘 जीभ दाखवणार का....😂 अहो बघा कसली क्यूट दिसतीये.... कशी बघतिये......🤩"




बाबांनी बघितलं तर ते तिच्यात हरवून गेलेत....💓💓🤩 इतकी ही गोंडस पिल्लू.....😘 त्यांनी वेळ न घालवता तिला कुशीत घेतलं आणि त्यांना वेळेचं भानच नव्हत.....🤩🤩

बाबांचा फोन वाजत होता तरीही त्यांना भान नव्हतं इतके ते "ती" च्यात हरवले..... खरंय ना ही लहान पिल्लं असतातच इतकी क्यूट की बस.....😌😌 निसर्गाचं कौतुक वाटतं कधी - कधी..... इतकी सुंदर रचना तो करतो.....💓😘🤩

बाबांनी फोन बघितला तो मामाचा होता......

मामा : "काय भाऊजी झालेत का लेकीचे लाड....😜🤭 येऊ का कार घेऊन🤭🤭 आमच्या लेकीच्या आगमनाची सगळी तयारी केली आहे मी.....😍😍"

बाबा : "हो ना साहेब या की राव.... आणि लेक आहेच इतकी गोंडस म्हटलं की लाड तर येणारच ना....😅😉"

आई : "हा दादा पण ना.....🤭🤭"

बाबा : "चला राणी सरकार आपल्या मातोश्री ही आल्या असतील..... वाट बघत असतील सगळे आपल्या पिल्लुची.... घ्या आमच्या पिल्लूला..... आम्ही येतोय सामान घेऊन.... तुमचे भाऊसाहेब येतीलच गाडी घेऊन बघा....😅😅 त्यांनाच जास्त घाई झालीय....🤩🤭🤭"

आई - बाबा दोघे बाहेर हॉस्पिटलच्या फॉर्मालिटीज पूर्ण करून बाहेर आले तर मामाने कार समोरच उभी केली होती.... उतरून त्यांनी पिल्लुला घेतलं आणि बहिणीला बसायला सांगून "ती" ला आईच्या कुशीत ठेवलं..... आणि मग त्यांच्या शेजारी बाबा बसले आणि सवारी चली फिर घर की ओर.....😉😍💓😘

घराच्या दिशेने गप्पा मारत त्यांची सवारी निघाली.....🏘️🚗 गाडीत गाणं लागलं तेही तितकंच क्यूट.....😍


चंदा है तू, मेरा सूरज है तू
ओ मेरी आँखों का तारा है तू
चंदा है तू, मेरा सूरज है तू
ओ मेरी आँखों का तारा है तू
जीती हूँ मैं बस तुझे देखकर इस टूटे दिल का सहारा है तू चंदा है तू, मेरा सूरज है तू
ओ मेरी आँखों का तारा है तू
तू खेले खेल कई, मेरा खिलोना है तू
तू खेले खेल कई, मेरा खिलोना है तू
जिससे बँधी हर आशा मेरी मेरा वो सपना सलोना है तू
नन्हां सा है, कितना सुंदर है तू छोटा सा है,
कितना प्यारा है तू
चंदा है तू, मेरा सूरज है तू


मामा : "खरंय ताई आपली परी आपल्यासाठी चंद्रचं आहे....🤩🤩"

आई : "हो ना दादू..... बघ ना कशी क्यूट हसते ही...."

बाबा : "तुमच्या वरच गेली आहे राणी सरकार ती.....😍😍"

असाच त्यांचा प्रवास सुरू असतो.... आणि अचानक मामा गाडीचे ब्रेक मारतो.... बघतो तर रस्त्यावर कुणीतरी जखमी पडलेलं त्याला दिसतं..... तो लगेच बाहेर येतो.... बघतो तर त्या व्यक्तीला खूप जखम झालेली असते..... तो लगेच एक गाडी बोलावून घेतो आणि त्या व्यक्तीला हॉस्पिटल घेऊन जायला सांगून गाडीत येऊन बसतो......

आई : "दादा कोण होते रे ते....🙄🙄"

मामा : "माहीत नाही ताई पण, त्यांना कुणीतरी सहेतूने जखमी केलं अस वाटत होतं... समजेलच...🤨 मी राजेशला पाठवलं आहे सोबत...."

आई : "बापरे....😧😧😟"

बाबा : "घाबरु नको अग होईल सर्व ठीक...."

तिघे घरी येतात.....

आजी : "अरे वाह...... आमची पिल्लू आली वाटतं...... जया (आई) तू तर दिल खुश केलं बघ आमचं.....😍🤩 इतकी गोंडस लेक या घराला दिलीस.....😘😘"

जया : "म्हणजे आई तुम्हाला.....🙄🙄🙄😧😟"

आजी : "अग मला समजतंय तुला काय बोलायचं ते.... कस असतं ना मुली खरच घरचा खऱ्या अर्थानं उद्धार करणाऱ्या असतात आणि याची जाणीव मला तू काही दिवस हॉस्पिटलमध्ये असता झालीच बघ....😁 फक्त घरच नाही तर, सगळं त्या व्यवस्थित पार पाडून घरातल्या लोकांचीही काळजी घेतात....😘 खरच मला गुणी सून लाभली हे मला आजवर कसं समजल नाही यावर स्वतःचा राग येतोय..... आजवर तुझ्या विषयी मनात कुठेतरी वाईट भाव ठेऊनच होते...... पण, आज मला तू कळालीस......🤗🤗 सुखी रहा पोरी...... दुष्ट काढते..... या उभे रहा....😘😘"

जया : ".....आई...🥺🥺🥺🥺🥺"

आजी : "अग आज रडायचं नाही उत्सव करूया.....😉😘😘"

जया : ".....☺️☺️☺️☺️आई.....😘😘"

मामा : "ताई जसं तू तुझ्या चांगुलपणानं इथल्या लोकांना बांधून, सगळ्यांना घेऊन पुढे जात आहेस..... तशीच आपली ही पिल्लू सुद्धा बघ मोठी झाली की तुझीच झेरॉक्स कॉपी असेल..... अशीच इतकीच समजूतदार, दुसऱ्यांना आपल्या बोलण्यातून आपलं करणारी.....😘😘😘😘"

(संजय) बाबा : "लेक कुणाची मग...😎😎😎"

जया : "आपल्या दोघांची...😉😛😝😜🤪"

सगळे : "......😂😅🤣अरे....."

इकडे सगळे व्यस्त होते त्यांच्या लेकीच्या स्वागताचा उत्सव साजरा करण्यात...... तेवढ्यात....... राजेश त्या व्यक्तीला घेऊन घरी येतो.......

संजय : "या बसा..... 🙂"

सगळे हॉल मध्ये बसतात......🧐🧐 नेमकं काय घडलं, ही व्यक्ती आहे तरी कोण??? ही शंका प्रत्येकाच्या मनात होतीच.....

मामा : "आपल्यासोबत हे सर्व....??🙄🙄"

@@@ : "सांगते सर्व......😣😔😔😔😒"

सगळे : "....😕😕"

@@@ : "माझं नाव सुलोचना..... मी एक किन्नर आहे..... आज माझ्या बाबतीत जे काही घडलं ते आमच्या समुदायात नेहमीच घडतं..... एखाद्याने दुसऱ्याच्या एरियात घुसखोरी केली की हे घडतं..... पण, मी कुणाच्याही एरियात घुसखोरी केली नव्हती.... मी आमच्या ग्रुपची लीडर आहे..... काही दिवसांपूर्वी आमच्या ग्रुप मधून आम्ही एकाला बाहेर काढलं त्याचा राग म्हणून आज त्याने माझ्यावर एकटं बघून जीवघेणा हल्ला केला...... साहेब आपल्या सगळ्यांमुळे आज मी सुखरूप आहे..... आपले खूप मनापासून आभार.....☺️☺️🤗"

आजी : "पोरी आमची नात खूप भाग्यवान बघ तिच्या आगमना वेळी तुझा जीव वाचणे हा एक योगायोगच असेल.....☺️☺️🥰🥰"

सुलोचना : "अरे वाह..... बेबी झालीय... बघा ना आम्ही लोकांना लेकरं झालीत तर आशीर्वाद द्यायला घरी जातो.... आज तर या मुलीनेच माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करून मला नवीन आयुष्य देऊ केलं.... माझे आशीर्वाद नेहमी हिच्यावर असेच राहतील...... जेव्हा कधी तिला माझी गरज असेल मी नेहमीच तिच्या पाठीशी असेल.....☺️😘😘😘😘"

आजी नातीला सुलोचना जवळ देताच.... आपली पिल्लू हसायला लागते......☺️




सुलोचना : "ताई तुमची लेक मोठं नाव काढणार बघा..... खूप प्रगती आहे हिच्या नशिबी....☺️☺️"

सगळे : "....🤗🤗🤗🤗"

आता सगळे पिल्लूचं नाव ठेवायला जमतात.....🥳🥳🥳🥳🥳

बायकांच्या काही प्रक्रिया असतात या कार्यक्रमा वेळी.... आमच्याकडे, पाळण्यात आधी एक दगडासारखे वाटण साहित्य टाकलं जातं पाळण्यात.... त्यालाच राम घ्या, लक्ष्मण घ्या म्हणून आधी गोंजारत बसतात बायका नंतर मग बाळाला पाळण्यात टाकण्यात येतं.....☺️ नंतर मग पाच बायका त्या पाळण्याला हात लावून गाणी म्हणतात........


निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई


तर अस हे गाणं..... आता त्यावेळी मी लहान होते म्हणून जायचे अशा कार्यक्रमात...... तिथे व्हायचं असं की, मला तर गाणी येत नव्हती म्हणून मग बायकांचे बोल ऐकून मी आपलं काहीतरी गुणगुण करायचे..... ते असे.... ऐका हा.....😝😝


निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई.....
पालणा जोज त्याला झोप का ग येत नाई.....


आणि मग आईला विचारायचं...... "आई अग बाल्याला का झोप येत नाही.....🙄🙄??" आई माझ्यामागे डोकं खराब करून घेणाऱ्यापैकी नसल्याने आपली काम करत राहायची....😜

तर हा माझ्या बालपणीचा किस्सा......😉

तर आता इकडेही गाणी म्हणून झालीत आता नामकरण करण्यात येईल.....

आजी : "चला दीपक (मामा) साहेब ठेवा आपल्या लाडक्या लेकीच नाव....😉😘😘😁"

दीपक : "विषय का..... ठेवणार....म्हणजे.....💯💯"

त्यानी पिल्लुच्या कानात काही बोलून हसले......

जया : "काय ठेवलं नाव दादा तू...... सांग ना....😀😀"

सगळे : "लवकर सांगा....😄😄"

दीपक : "सांगतो..... सांगतो.......😄😄😄😄😄 हे बघा मला अस वाटतं ही आपल्यासाठी खूप भाग्यवान लाभेन..... आणि सगळे गुण हीच्यात आधीपासून आहेतच म्हणून मी ठरवलं हिला मी सुकन्या नाव द्यावं..... अगदीच सु कन्या आहे ही......☺️☺️☺️☺️☺️😘"

सगळे : "अरे किती मस्त......😘😘😘😘😘"

तर मंडळी अशा प्रकारे आपल्या सुकन्याचा नामकरण सोहळा पार पडला आहे..... तुम्हीही या सोबत....... सहभागी तर झालाच असाल आणि नक्कीच मजा आली असेलच.....😂

तर......... मी काय म्हणते जरी यातील पात्र मी बोलले होते की, ती एक व्यक्तिरेखा असेल पण, इथून पुढे मी ती कथा काल्पनिक रंगवू इच्छिते...... मला नेहमीच माझ्या लिखाणाला एक सत्याची जोड द्यायची असते आणि त्यासाठी काही प्रसंग असे असतील की ज्याचा खऱ्या आयुष्यात काहीही संबंध नसेलही... पण, माझ्या लिखाणामुळे वाचक ते खरं समजून, त्यांच्या कल्पनेचे पुल बांधतील..... अस होऊ नये..... त्यामुळेच इथून पुढे वाचकांनी व्यक्तिरेखा ही काल्पनिक मानून माझ्या कथेचा आस्वाद घ्यावा आणि मला प्रामाणिक समिक्षेतून सूचना वजा शुभेच्छा द्याव्या हीच मनी नेहमी निःस्वार्थ इच्छा बाळगून, मी भेटते आपल्या सर्वांना पुढील भागात...... तोपर्यंत वाट बघा...... आणि खुश रहा अगदीच मी असते तशी....😂😂😂😂


@खुशी ढोके..🌹


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED