उडता उजेड - 1 Ajay Shelke द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

उडता उजेड - 1

प्रस्तावना
ही एक घडीत घटनेवर आधारीत कथा असून कथेचे विवरण हेे मनोरंनासाठी केलेले आहे. तरी कथेतील पात्राची नावे ही घडित व्यक्तीच्या नावावर बदलेली आहे. कोणाच्या भावना, जाती, धर्म, मानसिकतेला धक्का देण्याच्या किंवा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. तरी कथेतील गाव व जागा ही कथेसाठी बदलेली आहे. बऱ्याच विवरणा अनुसार ही एक अंधश्रध्दा आहे. तरी अंधश्रद्धेला बढावा देण्याच्या कोणताही हेतू या कथेत नाही. कथा ही मनोरंजनासाठी वाचावी अशी अपेक्षा व इच्छा आहे.
तरी या कथेचे फक्त दोन भाग आहेत."रातीची लाईट असल्यामुळं जावं लागत बगा रातीच रानात दार धरायला तस एवढं काय भ्या नाय तासाभरात यातो माघारी फकस्त कांद्यासणी पाणी लागत" सदा पारावर बसून फोनवर बोलत होता. शेजारी अण्णा आणि बाळ्या बसला होता. "बर ठिवतू फोन जेवलो आत्ताच जरा झोपतो रातीला उठाव लागत काळजी घ्या आण उन्हाळ्यात या गावाकड निवांत दोन महीन पोराला गावच वार लागल जरा". "आर बास की ठेवतोय म्हनला आन बसलाय फाट फोडत ठेव पाहवण्यासणी बील यल" अण्णा सदाला बोलत होते. "बर ठेवतो घ्या काळजी राम राम" एकदाचा सदाने फोन ठेवला. "आर काय कळत का नाय तुला खुळ्या २० मिंट बोलत व्हयर फोन वर पाहवणा काय मन्हल आला फोन मजी बसतो बाता हाणत कव्हर बी" बाळ्या जरा रागात सदाला तंबाखू चोळत बोलत होता. "तुझ्या सारखा नाय पावणा दिलदार हाय तो मोठ्या मनाचा तुझ्यावानी नाय चिकाट भोकुर दी हिकड तंबाखू" सदा उलटून बोलला. "आर काय तुमची भान्न बारक्या लेकरांवाणी चाललय" आत्ता अण्णा दोघांना बोलत होते. "अय अण्णा बस गप लका तुला काय दिवस भर लेकाच्या जीवावर बसून हायस जवा बघावं तवा हायच हित पाराला ती पोरग तुझ जातय रोज तलाठ्यांच्या हाता खाली कामाला आन तू ह्या की बसला, अय बाळ्या दिकी लाका तंबाखू" सदा अण्णाला बोलता झाला. "धर ए सांडशील बग, व्हय की नाय तर बसलच रोज पत्त्या खेळत तिकड हात भट्टीवर दारू पीत लागला सांगायला तुझ्या लेकाच्या बुडाखाली अंधार हाय आत्ता सुधारलं तुझ पोर" बाळ्या सदाच्या बाजूने बोलत होता. तेवढ्यात मोटासायकल वर हाऱ्या आला "आर हित काय बसला ह्यात त्या पाटलाच्या पोराला उजेड दिसला की रानात चला बोलाना झालंय ते आन आवाज बी आयकला त्यानं उजेडाचा चला लवकर". "खर आलोच अय रूपे मी पाटलाकड जातो तू आन पोर झोपा रातीला दार करून येल मी" सदा ओरडत बायकोला बोलून हाऱ्याच्या गाडीवर बसला. " अय तू य तुझी गाडी घेऊन अण्णा जा घरी नायतर तुला धरल उजेड जा" हऱ्या अण्णाला आणि बाळ्याला बोलत गाडीची किक मारत होता. "हा जा तुमि म्या यतो" बाळ्या चप्पल घालत बोलत होता.
आत्ता सदा आणि हरी दोघे गाडीवरून पाटलाच्या घरी जात होते. "व्हयर कसं काय दिसल त्याला आन काय करत होत रानात?" सदा हरीला विचारत होता. "मला काय माहीत नाय लका मी गेलतो खत आणाय तालुक्याला आत्ता यता यात मच्या घावला वाटतं पळत हुता त्याला ईचारल तर त्यानं सांगितल तसा घरी गेलो खत टेकली आणि तुमच्याकड आलो बग". "आर आजुन हितच तुमी मी घरला जाऊन गाडी घेऊन आलो लका" हरी आणि सदाच्या गाडीला ओव्हरटेक करत बाळ्या बोलत होता. "तुझ्याकडं बुलेट हाय आमची चालती हिच मेहेरबानी हाय" हरी ने उत्तरं दिलं आणि ते पाटलाच्या घरा जवळ आले, बरीच गर्दी झाली होती रात्रीचे ११ वाजत होते. गाडी लाऊन ३ घे गर्दीतून वाट काढत पुढे आले. "तात्या ते उजेड बोलत होता की मला मारलं मी सोडणार नाय कुनसणीबी, अख्खा गाव जाळीन तवाच दम घीन" पाटलाचा मुलगा बोलत होता. "आर तुझा बा जित्ता हाय अजून गप गार हू कांते आग पाणी आन आधी गेली देवा जवळ पाणी आन पोरग बिथरल हाय" पाटील पोराला अवरात बायकोला आवाज देत होता. "देवा बोलत होते मी नको जाऊ तरी बोलला मोटार बंद करून येतो आणि काय झालं देवा देवा देवा माज लेकरू ग काय झालं आस्त मजी काय केलं आस्त म्या" पाटलाची बायको रडत रडत पाणी आणत बोलत होती. "पाटील जाऊन बघू चला समदी मिळून आज काय ते सोक्षमोक्ष लाऊन टाकू लय झालं हाय हे परकरण मायला ४ बारी झालं ह्या महिन्यात आधी ते मचाल्याच पोर, मग ते शिंद्याच. म्हातारं, सुंदरा म्हातारी, आन ते सुक्या आन आता हे चला जाऊ मी तर बोलतो" देशमुखचा मुलगा मोठ्या तोरात बोलत होता. "गप लका त्यो सुक्या रात भर इहरीत बसला आन सकाळी घवला सोप हाय वय" बाळ्या बोलत होता. "आर ते एकट होत आत्ता आपण समदी जाऊ की" देशमुख बोलत होता. "आज नग आज गेलो तरी काय घावणार नाय कारण आज ते येऊन गेलं हाय उद्या नाय तर परवा जा समदी मिळून" एक म्हातारं बोलत होत. "हा बरोबर हाय तू बी बघतला होता ना र दादा उजेड तुला काय बोलला का?" पाटील त्या म्हाताऱ्याला बोलत होते. "नाय र पाटील बास मला दिसला होता तो पण लांब होता मी रातच दार धरीत होतो आणि जस सरळ झालो तसा मला लांबून दिसला माझ्या कड येताना तरी हितून मारुतीच्या देवळा जवळ जवळ असल ती उजेड तसा मी धोतर वर धरून पळालो बग पण माज कुत्र मेलं की सकाळी गेलो तर ते मेल होत" दादाचं बोलून होत होत की पाटलाची बायको रडत रडत बोलू लागली "बया काय झालं असत आज माझ्या गोळ्याला तर काय केलं असत मी काय काय केलं हाय ह्याच्या साठी आन काय झालं असत आज"
"बर आज सर्वांनी नीट झोपा रातीच जाऊ नका रानात पाच दिसनी अमावस हाय रानात जाऊ नका आन राती गावात फिरू नका घरात रहा आन देवाच जवळ असू द्या उगीच याप नको डोक्याला चला आत्ता घरला जवा समदी लय रात झाली उद्या दुपारी समदी पारावरया ठरू तिथं जावा आत्ता लवकर बाराच्या आत घरी" दादा सर्वांना सांगत होते. "म्या म्हणलं लय काय झालं हाय, काय नाय एवढं" हरी बोलत होता. "नाय आर झालं असल अण्णाला इचारू अण्णा आन ही दादा दोघच राहिली हायत लय म्हातारी गावात अण्णा बग कवा अमवसच्या आदल्या दिवशी, अमवस दिवशी आन पुढल्या दिशी येत नाही पारा ला घरीच बसत बाळ्या बोलत होता. "हा बर ईचारू बर सदा जाऊ नग आत्ता तू दाऱ्याला अव" हरी बोलत होता. "नाय आर जावं लागलं दोन दिस झालं पाणी नाही पिकाला आज जातो उद्या पासून नाय जात". "आर जाऊदी जीव मोठा का पीक, जाऊदी नग जाऊ" बाळ्या पण सदाला बोलत होता. बर ऐका मग तुम्ही दोघं चला माझ्या संग १० मिनटात होईल एकच तुकडा भिजवायच हाय चला की सोबत होएल तेवढी आन अवरल भी" सदा बोलला. "बर चल मेलो तर मेलो दोस्ता साठी काय पण" बोलत सगळे सदाच्या शेतात निघाले.
सदाच्या शेतात तिघे पोहचताच हाऱ्याने दारूच्या तीन क्वार्टर काढल्या आणि ते बघून सदा लगेच बोलला "तरीच म्हणल आज हाऱ्या कसा रातचा रानात आला बघ काय घेऊन आला हाय हो फुकणीचा". "आर हाऱ्या आत्ता नग कार्यक्रम असला काय बी दार धरू आन लवकर घरला जाऊ गावात बघतोय काय झालं हाय ते आन तुला नको ते सुचतंय व्हयर" बाळ्या जरा त्रागात हरीला बोलत होता. "आयो मी तालुक्यातून तुमच्यासाठी आणली आन तुम्ही मलाच टोचाय लागला बरहाय बाबा ज्याच करावं भलं ते म्हणत घी कुदळ खोर आन हु म्होर काय र बाबा" हरी रागात बोलला. "आर अस नाय र पण" "बर राहू दे आत्ता आणली हाय तर लावू घापकान दार धरू आन जाऊ चल ए घी लवकर" सदा ने बाळ्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. "बर चल तू म्हणतो तर लावू बर आधी सांग कोणता तुकडा भिजव्याचा हाय नायतर भिनली डोक्यात तर दुसराच भिजव्याचो" बाळ्या बोलला. तोक तो वरला कांद्याचा आन पहिल दार मोडलकी खाली जरा पाणी येऊ दे मटकी हाय त्यात तिला लागलं पण लय नको सोडू" सदाने बोट दाखवत बोलत होता."अय धर तुझी बाटली ही माझी आन अय सदा धर तुझी आन पाणी बास का बग" बाटली पुढे देत हरी बोलला. "राहू दी हाय ते लावा घाप करून आन हाला घरला" सदा घाईत बोलला आणि तिघांनी आपली आपली बॉटल तोंडाला लावली. "आर ए एवढी का घाई करतो एका दमात करतो का खाली मायला ते काय र वण डाऊन करतो का काय" हरी बाळ्याला अडवत बोलला. "आर मग काय रात बघ वर असल्या वाऱ्या कावदनाच आलोय रानात मायला ते पटलाच पोर घावल त्यात आवरून घरला जाऊ महून घापकरण संपवली" बाळ्या बोलला. तो पर्यंत सदाने एका दमात अख्खी अर्धा लिटर ची बाटली मोकळी केली आणि तोंड वाकड करत दोघांना बोलला "झालं का नाय माझी केली मोकळी मी". "आर काय माणूस हाय तुम्ही दोघं आईची कवा नाय मिळाल्यावानी एका दमात मोकळी केली लका" हरी दोघांना किर्मुसत बोलला. "अय बर तू लाव दमानी मी मोटार चालू करतो तवर बाळ्या तू खाली रहा मी मोटार लाऊन दार लावत येतो तू खालचं बग तेवढं हे काय येत नाही असाच हळू हळू लावल हे दोन वाजवलं रातच हे" सदा घाई करत बाळ्याला बोलत होता.
बरं बोलून बाळ्याने राहिलेली दारू तोंडाला लावली आणि सदा मोटार चालू करण्यासाठी निघाला. इकडे बाळ्याने दार नीट बांधून पाणी येण्याची वाट बघत बसला आणि हरी गाड्यांच्या जवळच्या असलेल्या झाडाच्या बुंध्याला टेकून बिडी पिऊ लागला. बिडी पिताच त्याला दारू चडली आणि तो तसाच नशेत डोकं ठेऊन डोळे बंद करून बसला. इकडे सदा ने मोटार चालू करून दार धरत तो बाळ्याच्या जवळ आला आणि दार धरून दोघे बिडी पित गाडी जवळ आले आत्ता पर्यंत सर्वांना दारू चांगलीच चडली होती. पण गाडी जवळ हरी दिसत नव्हता त्या मुळे दोघे थोडे बीचकले आणि बॅटरी लाऊन पाहू लागले तर त्यांना हरी झाडाच्या बुंध्याशी बसलेला दिसला. सदा जवळ जाऊन त्याला उठवणार तोच हरी ओरडत उठला वर शेतात असलेली चीर शांतता भगं झाली. हरीच्या ओरडण्यामुळे बाळ्या आणि सदा दोघे घाबरले आणि त्या मुळे सदा पडला आणि ते पाहताच हरी हसू लागला. "मगं फाटली का सदा तुझी ढुंगणावर पडला ते बी लय जोरात" हसत हसत तो सदाला उठाऊ लागला. ते पाहून सदा शिव्या देत उठला आणि बोलला "अकल हाय का तुला हा ह्या कूट काय समजत नाय बारका हाय वय तू" सदा रागात बोलला तोच आवाज आला तो ही बाजूच्या गवतातून "पडला तू लय झ्याक पण" आधी सदा आणि हरीला वाटल की बाळ्या बोलत आहे पण इकडे मागे तर कोणीच नव्हत. आत्ता मात्र दोघांना भीती वाटली व ते बाळ्याला आवाज देऊ लागले. मात्र ना मागे एक गाडी ना बाळ्या आत्ता मात्र सदा आणि हरी खूप घाबरले आणि बाळ्याचा शोध घेऊ लागले मात्र परत आवाज आला "बाळ्या तर गेला आत्ता राहिले तुम्ही ते ही एकटे" आत्ता मात्र ह्याची दारू चांगलीच उतरली आणि दोघे भानावर आले आणि गाडी कडे पळाले. गाडीवर बसून गाडी चालू करणार तोच गाडीच्या मागच्या चाकात हवा नाही समजले आणि दोघे राम राम राम बोलू लागले "सदा आपण मरणार आज कुट फसलो आपण देवा" हरी रडत बोलू लागला. "आर व्हय की बाळ्या कुट गेला बाबा मी म्हणतो चल पळत जाऊ पांडूच्या वस्तीवर नायतर मेलो आपण" अस बोलून सदा गाडी सोडून पळू लागला आणि हरी त्याच्या मागे आत्ता दोघे जीव मुठीत घेऊन पळू लागले आणि हरी ने मागे वळून पाहताच त्याला एका कांदिलाच्या आकाराचा उडता उजेड दिसला आणि तो सदाला बोलला "आर माघ बग सदा काय हाय आर आज तर मेलो आपण उजेड हाय उजेड आर देवा राम वाचीव रे" तस सदाने मागे बघतच त्याला सुद्धा उजेड दिसला आणि तो ही फक्त हऱ्या पळ पळ करत पळू लागला. दोघे धावत पळत पांडूच्या घरा जवळ आले आणि ओरडू लागले.
पांडू दार उघडं उघड पांडू दार उघडं आवाज ऐकून त्याने दार उघडल आणि ह्या दोघांना पाहताच त्याची झोप उडाली.....


क्रमशः