त्याची बायको वैशाली बनकर द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

त्याची बायको

"मी करेल त्याच्याशी लग्न"...........

असे शब्द कानी पडताच कार्यालयातील सगळ्यांच्या माना आपसुक च मागे वळल्या..
एक 23 वर्षाची मुलगी मोठ्या आत्मविश्वास आणि आनंदात नवऱ्या मुलाकडे (अभिराज ) कडे पाहत होती....अबोली रंगाचा घागरा त्यावर भरजरी गोल्डन कलर चे ब्लॉऊज आणि त्यावर खुलणारी ओढनी गोरया वर्णाची आणि नाकी डोळी रेखीव प्रणाली आपल्या लांब केसांची गजरा माळलेली वेणी झटक्याने पाठीवर टाकुन स्टेज कडे येऊ लागली.... 👩

अभी चे वडील : "तु करशील माझ्या मुलाशी लग्न"? 🤔

प्रणाली : "हो काका मी करेल"...😇

"बाबा म्हण गं पोरी.... आता सुनबाई होणार आहे ना तु माझी'"...... अभिराज च्या वडिलांचे बोलने ऐकुन प्रणाली ने छान हसून त्यांना नमस्कार केला...😌

( नवरया मुलीने लग्नानंतर विभक्त राहण्याची मागणी करत वेळेवर लग्नासाठी नकार दिला, वरपित्याने सुद्धा माझ्या मुलाचे लग्न यांचं मांडवात होईल असा हट्ट धरून अख्या मांडवात नटसम्राट मधील कुणी घर देता का घर प्रमाणे कुनी माझ्या मुलासाठी मुलगी देता का? म्हणून घोषणा केली अश्यात प्रणाली ने अभीसोबत लग्न करण्यास पुढाकार घेतला)

काही वेळातच अभी च्या 2 बहिणीनी तिला छान ब्रायडल लहंगा भरजरी दागिन्या नी छान तयार करून अभि च्या बाजूला बसवलं.. ती बाजूला बसताच सगळ्यांच्या लपून अभि ने तिचा हाथ पकडला आणि नेहमीप्रमाणे दोन्ही डोळे मिचकावत ओठांचा चम्बू केला ... त्याच्या या कृतीवर ती चांगलीच लाजली....आणि सर्वांच्या नकळत आपला हाथ सोडवुन घेण्याचा प्रयत्न करत त्याला सोड ना!!!! म्हणून विनवनी करत होती.... 😌

सोड ना.... असं काय करतोय सोड ना,.. अभि प्लीज सोड ना........ 🙈😌🙈

छपाक................🌊

एएए.....वेडबिड लागलंय का असं कोन उठवत??🤨😠...

प्रणाली आपल्या अंगावर टाकलेल्या पाण्याने खडबडून जागी झाली आणि रागातच बडबडत ईश्वरी ला म्हणाली.😢😡

"ओह्ह मगं कसे उठवायचे?? गेल्या 15 मि. पासून तुला उठवत आहे.... ओरडू ओरडू माझा घसा कोरडा पडला. मग शेवटी माझ्या कडे हा एकमेव उपाय राहिला होता. तुझ्या गोड स्वप्नातुन बाहेर काढन्याचा".... आणि काय गं 6 महिन्यापासून काल आलीये घरी .. व्हाट्सअप पण बंद करून ठेवलंय.. आणि आल्याबरोबर झोपा काय काढत बसलीये. मी इथे काल पासून मरतेय तुला भेटायला आणि तु त्या अभी चे स्वप्न बघत बसली.... ईश्वरीने तिला उशी मारत म्हटलं 😁

🤔"तुला कस कळलं मी त्या अभी च स्वप्न बघत होते म्हणून" ?

"येडे लहानपणी पासून फ्रेंड्स आहोत आपण.....तुझ्या चेहऱ्यावरून तुझ्या मनात काय सुरु असते ते सांगू शकते मी"🤗🤗

"आय रिअली सो मिस यु यार पण काय करू इथे आल कीं त्याची खुप आठवण यायची आणि आय नो मला असं बघुन तु जास्त दुःखी झाली असती म्हणून...सॉरी 😒 म्हणत प्रणालीने इशु च्या गालावर किस करत😘 टाईटली हग केल🤗🤗 तिचा आवाज बोलता बोलता जड झाला होता मीठी च्या आड ती स्वतः चे अश्रु पुसत होती... जे इशु ला जाणवलं

प्रनु च माइंड डायव्हर्ट करण्यासाठी तिने धक्का मारून स्वतः ला तिच्या मिठीतुन सोडवत आपला गाल पुसत खोटंस लाजत म्हणाली "इश्श !! तुझं आपल काहीतरीच कुठे पण सुरु होऊन जातेस कुणी बघितल तर काय समजेल"☺️🙈

तिच्या या वाक्यावर प्रनु खळखळुन हसायला लागली आणि पुन्हा इशु ला हग केल🤗..... ..

" चल जा उठ आणि लवकर तयार होऊन ये.. आज त्या माकडाच लग्न आहे ना आणि शादी में मटर पनीर हमारा इंतजार भी तो कर रहा हैं ना बालिके".. ईश्वरी ने तिची मिठी सोडवत फिल्मी स्टाईल मध्ये म्हटले. 🤓

"तुला मटर पनीर खाण्यासाठी त्याच च लग्न मिळाल का?... शिवानी च पण लग्न आहे आजच आपण तिच्या लग्नाला जाऊया ना "

"नाही मला त्याच्याच लग्नाला जायचंय.. एक्स च्या लग्नात त्याच्या च समोर बसून आस्वाद घेत खादाडन्यात जी मजा आहे ना ती दुसरीकडे नाही येणार... आणि माझा कोणता एक्स पण नाही आहे तर मी कुठे जाणार? म्हणून तुझ्या च एक्सच्या लग्नात जेवून समाधान मानू😒.... इशु खोटं खोटं नाराजी दाखवत म्हणाली 😒😒

प्रनु खोलीतला पसारा आवरत म्हणाली... "नाटकी कुठंली... आणि काय गं काय चालु आहे तुझं? काकु चा कॉल आला होता मला म्हणत होत्या तु बघायला येणाऱ्या प्रत्येक मुलाला पळवून लावते आयुष्यभर अशीच सिंगल राहशील का?

इशु : 'ऑ 🤭 तुला कुनी म्हटलं मी सिंगल आहे म्हणून? माझ्या सोबत माझा चार्जर आणि मोबाईल आहे आणि आम्ही तिघ खुप ख़ुश आहोत.🤗😁🤣

इशु चे बोलण ऐकुन प्रनु ने " कधी तर सिरीयस होत जा" म्हणत तिथलीच पिलो तिला फेकुन मारली.सगळ्या खोलीभर पिलो चा कॉटन उडत होता.. दोघीही एकमेकींना उशी मारून फेकत होत्या. आणि नेहमीप्रमाणे दोघींच्या कधीच न संपणाऱ्या मस्तीला सुरुवात झाली. 🤕🤯

"देवाआआआ !! काय या मुली..... इतक्या मोठ्या झाल्या तरी लहान मुलांसारख्या भांडतात.... प्रनु ची आई आत येत डोक्याला हाथ मारत म्हणाली.
"मी नाही हिनेच सुरुवात केली अगोदर" दोघी हि एकाच वेळेस म्हणाल्या त्या मुळे सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. 😁🤣

"बर प्रनु माझ ऐक... तुझे बाबा आणि मी कामानिमित्त बाहेर जातोय रात्र होईल यायला तर दोघी सोबतच रहा आणि हो स्वयंपाक करून घेशील मला यायला उशीर होशील " प्रणाली ची आई आपल्या साडीचा पदर नीट करत म्हणाली

" बर ठीक आहे... पण मी काय बनवू? खिचडी कीं पुलाव 🤔🤔 प्रणाली ने खोलीतील पसारा आवरत विचारलं.

"तु अगोदर बनवून तर ठेव नाव आपण आल्यावर ठरवू"😁😁. प्रनु च्या आई च ऐकुन इशु ने त्यांना हाय फाय दिला. 😂😁

" काय गं😒...जा तिकडे तुमच्या दोघींचं नेहमीच च आहे" म्हणत प्रनु चिडून आंघोळीला निघुन गेली.

दोघीना काळजी घेण्याच सांगत प्रनु ची आई सुद्धा प्रनु च्या वडिलांसोबत निघुन जाते......

इशुने कपाटातुन प्रनु साठी लग्नात जायला ड्रेस सिलेक्ट करून ठेवला..आणि प्रणाली च्या मोबाईलवर व्हाट्सअप इन्स्टॉल करून जुने मॅसेज बॅकअप करून घेतले.. आणि स्टेटस बघु लागली त्यामध्ये जास्त जणांनी स्टेटस ठेवुन शिवानी ला हैप्पी मॅरीड लाईफ म्हणून विश केले होते. इशु ला प्रनु च्या सगळ्यां फ्रेंड्स विषयी माहिती होत. पण शिवानी बद्दल काही आठवेना शेवटी तिने विचारलंच "प्रनु हि शिवानी कोन गं?

"इतक्यात विसरली का" ? प्रनुने ओले केस पुसत इशु ला म्हटलं.

इशु पुन्हा नख खात आठवायचा प्रयत्न करू लागली आणि अगदी पुढच्याच क्षणी जोरात ओरडत म्हणाली "ओह्ह...... आठवलं आठवल ते तु इंटर्नशिप ला दिल्ली ला गेली होती तेव्हा तिथल्या मॅनेजर च्या मागे लागली होती ती शिवानी का"? 🤔

"तुला यांचं गोष्टीवरून आठवली का ती"? प्रनु थोड रागात च म्हणाली. 😒🤦

इशु हसत म्हणते " अगं काय करणार तु सांगितल होते तेव्हा तर मला विश्वास च बसेना i mean कुनीं पैशा साठी इतक लालची कस असू शकत कीं 40 वर्षे वया च्या व्यक्ती ला सॉरी सॉरी काका ला स्वतः चा बॉयफ्रेंड बनवेल पण अश्या मुलींशी लग्न कोन करणार.. आय होप ती आता तरी सुधरली असेल"?

"अश्या मुलींशी? 🤔.. फोटो बघ मगं बोल पुढचं" प्रनु हसतच म्हणाली. आणि मोबाईल स्वतः कडे घेत ग्रुप फोटो मधील एका मुलीवर पॉईंट करून म्हटलं हि आहे शिवानी"

" कसली भारी आहे गं हि खूप सुंदर.. "ए पण मला ना हिला बघितल्या सारखं वाटतय कुठेतरी" इशु आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली

प्रनु : ना ती कधी नागपूरला आली ना तु कधी नागपूर च्या बाहेर गेली होती.. तर कशी बघशील? माझ्या च मोबाईल मध्ये फोटो बघितला असेल ना वेडे तु तिचा कधीतरी"

पण यावेळी इशु ने काहीच उत्तर दिले नाही ती त्याच फोटो चा विचार करत होती.. तिला सतत वाटायला लागलं कीं शिवानी ला तिने प्रत्यक्षात कुठेतरी बघितल आहे... तिने काही लिंक मिळेल म्हणून स्वतः चा मोबाईल शोधला.. पण तिचा मोबाईल तर ति घरीच विसरली होती ... स्वतः कडे बघितलं तर ती मिनि स्कर्ट आणि टि शर्ट घालूनच होती..... प्रनु आल्याचं कळताच ती तशीच स्कार्फ चेहऱ्यावर बांधून रात्री घातलेल्या ड्रेस वर आली होती...

प्रनु ची तयारी होताच ति तिला घेऊन घरी गेली.. आणि साधारण एका तासाने दोघीही इशु च्या स्कुटी ने अभी च्या लग्नात जायला निघाल्या....

फ्रंट मिरर मधून इशु ची नजर तिच्या मागे बसलेल्या प्रनु वर पडली, वरवर जरी ती हसत असंली तरी त्याच्या लग्नाच्या बातमीने ती आतुन खुप तुटलेली होती. कारण कुठे तरी तिला आशा होती अभी तिच्या आयुष्यात परत येण्याची.. पण आता सगळ्या आशा संपल्या होत्या.. अभी म्हणजे प्रनु च्या आयुष्यात आलेला पहिला आणि शेवटचा मुलगा. खुप प्रेम करायची ती अभि वर.. साध्या सालस प्रनु साठी अभी तिच संपूर्ण जग बनून गेला होता "पण तिचं साधं राहणीमान, आणि माणसाने एकाच व्यक्ती शी प्रामाणिक नाते निभवावे" हि प्रनु ची विचारसरनी मॉडर्न अभी ला मात्र जुनाट वाटायची. त्यावरून तो सतत तिला बोलत राहायचा...पण त्याच्या प्रेमात ती इतकी आंधळी झाली कीं स्वतः ची ओळख, किंमत सगळ विसरून गेली..... आणि काही महिन्यातच अभी तिला विसरून गेला , दुसऱ्या एका मुलींसाठी सोडून गेला तो तीला 😒

अचानक इशु ने करकचून ब्रेक मारला...आणि प्रनु च डोकं तिच्या पाठीवर आपटल.तिच्या विचारातून ती बाहेर आली...

"आई गं ! पाळण्यातुन पडली होती काय गं डोक्यावर"..... म्हणत प्रनु ने डोक चोळत तिच्या पाठीत धपाटा टाकला"..

"मला कस आठवेल मी लहान होती ना त्यावेळी सो ते तु नंतर आई ला विचारशील असं म्हणत इशु प्रनु च्या मागे जाऊन बसली आणि प्रनु चे हात हॅन्डल वर ठेवून चल म्हणाली...

प्रनु ने सुद्धा "अशक्य आहेस इशु तु " म्हणत गाडी पुन्हा स्टार्ट केली " इशु ने आपला मोबाईल काढला आणि कुणाला तरी मॅसेज करून रिप्लाय ची वाट बघु लागली...

साधारण दिड तासानंतर दोघी पण मंगल लॉन मध्ये पोहोचल्या... तिथे पोहोचल्यावर प्रनुची नजर काही पाहुण्यावर पडली. सगळ्यांच्या जवळ काही ना काही गिफ्ट होत. ती इशुला म्हणाली
"आपण तर काहीच नाही आणल गं"

ती अजूनही मोबाईल मध्ये च व्यस्त होती. तिने प्रनु कडे न बघताच म्हटलं
"मला वाटलं तु पिक्चर मधील गर्लफ्रेंड प्रमाणे त्याने तुला दिलेले सगळे गिफ्ट आणशील"

प्रनु : इशु 😒🙄

इशु ने मोबाईल पॉकेट मध्ये ठेवला आणि दोन्ही हातानी तिच्या हाताला पकडून आत मध्ये जात म्हटलं...
"बर सोड ना ते.. क्षितिजच्या च्या शॉप मध्ये लेटेस्ट डिझाईन आल्यात फ्रेम च्या तो निघतोय इथे यायला तर तु लवकर त्याला अभी आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचे फोटो व्हाट्सअप करून दे.... तो आणेल छानशी फ्रेम बनवून लगेच"..

प्रनु : "माझ्या कडे फोटो नाही आहे तिचा, मी बघितल नाही अजुन... तुझ्या कडे असेल तर पाठवून दे..

इशु : "मिच कुठे बघितलं तिला .. माझ्या कडे पण नाही".. बर जाऊ दे ना द्यायलाच पाहिजे का??

"वेडी आहेस का असं कुणी खाली हाथ येत का?. ते बघ समोर गिफ्ट शॉपिं आहे...अजुन वेळ आहे लग्न लागायला तर आपण काहीतरी घेऊन येऊ"..प्रनु समोरच्या शॉप कडे बघत म्हणाली..

इशु : "जाऊ दे ना.. बघु काही तरी इथे च"

प्रनु : "इथे? आत मध्ये तुझ्या सासर्याने दुकान उघडून ठेवलं का?

इशु : "जाऊ दे ना गं इतक्या पाहुण्यात कुणाचं लक्ष राहत दिल कीं नाही तर"..

"ते काही नाही चल गुपचूप" म्हणत प्रनु तिला ओढत घेऊन जात होती

इशुने तिच्या हाताला घट्ट पकडून म्हटलं : बर बर थांब...... ना तुझं ना माझ्, मटर पनीर चांगल झाले असेल तर बघु गिफ्टच..... ठीक आहे?🤔

प्रनु ने पुन्हा डोक्याला हाथ मारत म्हटले🤦 " बर.... माहिती आहे मला तु तस पण ऐकणार नाहीच आहे... चल आता आतमध्ये".😁

दोघी पण हॉल मध्ये आल्या आणि सगळ्यात मागे एका पिलर ( खांब ) च्या साईड ला टेबल जवळ बसून गेल्या... तेथील सगळ्या पिलर ला रंगीबेरंगी फुलांनी छान सजवलं होता ... प्रनु सजावट बघु लागली..काही वेळात लग्नाच्या विधीला सुरुवात झाली.. अभी खुप ख़ुश दिसत होता.. पण समोरच्या गर्द मुळे त्याच्या बायकोचा चेहरा काही दिसेना. काही तासाने लग्नाच्या सगळ्यां विधी सुद्धा आटोपल्या... पण दोघीही जागच्या हलल्या नाही.

"इशु चल ना.. त्या दोघाना शुभेच्छा देऊन येऊ"

"लग्न झाल फक्त कोणते तिर मारले शुभेच्छा दयायला"

"इशु"🙄🙄

"बर... रागावू नको, ....जाऊ थोडया वेळाने काय घाई आहे"..

"बर" मी येते तोपर्यंत वॉशरूम वरून"!!

"हो लवकर ये "

हम्म!!! म्हणत प्रनु आपली ओढणी सावरत निघुन गेली
खरतर तिला अभीच्या बायकोला बघायच होत.. कारण जो तो त्याच्या बायकोच्या सुंदरतेचे गुणगान करत होता"

(अभी सोबत असताना तो तिला सतत तु अशी राहत जा हे कपडे घालत जा अशी बहनजी सारखी का राहतेस म्हणून टोमणे मारायचा.. ती सगळ मुकाट्याने ऐकुन घ्यायची पण आता त्याच्यावर दुसरया कुणाचा अधिकार आहे आणि आपण त्याचा विचार करने बरोबर नाही म्हणून तिने मान झटकत चेहऱ्यावर पानी मारून डोक्यातील विचारांना विराम दिला. आणि परत इशुजवळ गेली तिथे येऊन बघितलं तर क्षितिज आला होता.

"ओये तु कधी आली"? क्षितिज ने प्रनु कडे बघत विचारल...

"23 वर्षा अगोदर" इशु ने मोबाईल मध्ये बघतच उत्तर दिले

"हा.. हा pj🤦😁... मी प्रणाली दिल्ली वरून कधी आली ते विचारलं तु जन्माला कधी आली ते नाही..🙄

"हे?? काय यार तुम्ही दोघे आल्यावर लगेच भांडायला लागले" प्रनु त्या दोघांना शान्त करत म्हणाली.

"ते याला समजायला हव ना आपला फ्रेंड् असून आपल्याला भेटण्याअगोदर सगळ्या ग्रुप ला भेटून आला..

"जाऊ दे ना इशु इतक्या साठी कशाला रागावते" ?

"बर तुला व्हॅलिडि कारण देते रागवण्याचं...याला जरा त्याच्या एन्जल बद्दल विचार ". इतक्या वेळ पासून चेहऱ्यावर कुठलेही भाव न ठेवता दोघींचे बोलने ऐकणारा क्षितिज एन्जलच नाव ऐकताच बोलायला लागला.

" ओये इशु...माझ्या बेबी ला काही म्हणायचं नाही.. प्रनु ऐकायची त्या अभी बद्दल काहीपण, पण मी.. मी माझ्या बेबी बद्दल काहीपण ऐकुन घेणार नाही".... शेवटच वाक्य बोलतांना तो थोडा लाजला.☺️😌

"च्यायला तुझ्या बेबी ची तर"....इशु रागात उठत क्षितिज कडे जात म्हणाली पण ती पुढे अजुन काही बोलेल या अगोदर च प्रनु ने तिच्या तोंडावर हाथ ठेवून तिला गप्प केल.. आणि हात ओढत जाग्यावर बसवलं..

"तुला माहित आहे तु दिल्ली ला गेल्यावर हि इशु एकदाहि घराबाहेर पडली नाही..सतत अभ्यास.....लेटर आल तिला मुंबई वरून इंटरव्हू साठी त्याची ट्रिट पण नाही दिली. मला भेटली पण नाही.. आणि मी गेलो एकदा घरी तर लगेच 5 मिनिटात हाकलून लावल.. आणि आता अजून मलाच बोलते. 😒😒 ( क्षितिज एखादया लहान बाळाप्रमाणे प्रणाली कडे इशु ची तक्रार करत होता ).

"एक मिनिट मी हाकलून लावल? ..... "कारण नाही सांगशील.. ... मी सांगते हं तुला प्रनु... 3 महिन्यानंतर घरी आला आणि हाल चाल विचारायचं सोडून सतत "माझी बेबी अशी माझी बेबी तशी" बेबी ला हे नाही आवडत बेबी ला ते नाही आवडत " याला समजावून सांगितलं कीं त्या fb च्या एन्जल प्रिया च्या मागे नको लागू पण ऐकणार कोन? तुला माहित आहे? स्कॉलरशिप चे 50 हजार त्याने त्याच्या बेबी वर खर्च केले फक्त 6 महिन्यात""

50 .हजार? 😲😱

नाही...50 नाही 70 हजार क्षित्या खाली मान घालून म्हणाला .. मागच्या आठवद्यात कॉल आला होता म्हणाली कीं "बाबु बहिणीच लग्न आहे आता आपण एक आठवडा नाही बोलु शकनार मी तुला खुप मिस करेल😒.. तुझा फोटो सुद्धा नाही बघता येणार असं काही देना कीं तु माझ्या सतत जवळ असल्याच मला जाणवेल"..

"म्हणून मग मी 10 दिवसाचे 10 ड्रेस, एक सोन्याची चेन आणि तिच्या त्या दिवशी च्या पार्लर च बिल पे केल "😌😇

"सत्यानाश होवो मेल्या तुझा.. तुझ्यामुळे आमचा गोव्याचा प्लॅन 4 वेळा कॅन्सल झाला..आम्हाला तर टपरी वरचा चहा पाजायला पण जिव जातो तुझा आणि तिच्यावर इतके खर्च केले" लुटतेय ती तुला वेड्या " इशु चिडत म्हणाली.😏

" नाही इशु !!! तु समजतेय माझी बेबी तशी नाही " मेरी वाली अलग हैं"..... क्षित्या थोड घाबरत लाजत पण फुल्ल कॉन्फिडन्स ने म्हणाला.😌🙈

"ह्याच बेबी पुरान ऐकता ऐकता तर मला अंगणवाडीत जावस वाटत आहे...आणि काही समजवायला गेलं कीं हे असं रडगाणं म्हणे "मेरी वाली अलग हैं " लेकिन कटता तो सबका एक जैसे जी हैं बेटा, तेरा भी कटेगा!!" तुझ्या त्या एन्जल प्रिया च्या नादात.. " इशु रागात दात ओठ खात म्हणाली.

क्षित्या काहीच न बोलता फक्त तिच निमूटपणे ऐकत राहिला प्रनु तिचा राग शांत करावा म्हणून काही बोलायला गेली. तर क्षित्या ने तिचा हाथ पकडून घाबरत रडकुंडीला येत हळु आवाजात म्हटले... नको.. अजुन तिच बोलण संपायच आहे. तु मध्ये टोकशील तर ती डबल सगळ सुरु करेल" समोरच्या टेबल वरील बॉटल मधील पानी संम्पवल्या वर इशुने पुन्हा बोलायला सुरुवात केली....

यावेळी तिने थोड हसतच म्हटले "आणि सगळ्यात मजेशीर काय आहे माहिती आहे प्रनु? ह्याने एकदा हि तिला बघितलं नाही आणि ना कधी भेटला"..

" कस भेटणार..दिल्ली ला असते ती. .. मी इतक्या दुर कस जाणार आणि मी तिला अजुन बघितल नाही हे कश्यावरुन म्हणतेस कॉल वर तर बोललो ना आमी आणि दोन दा व्हीडिओ कॉल केला होता"... तुला पाठवला होता न स्क्रीनशॉट". क्षित्या ने आत्मविश्वास दाखवत उत्तर दिले.

"स्क्रीनशॉट न? एक मिनिट" असं म्हणून इशु ने मोबाईल मधील क्षित्याच्या व्हिडीओ कॉल चे स्क्रीनशॉट प्रनु ला दाखवले.. एका फोटोत सगळीकडे काळोख होता दिसत होत तर फक्त त्या एन्जल प्रियाच्या हातातील ब्रेसलेट जे अंधार असल्यामुळे चमकत होत..

" हा तर माझं बोलून झाल्यावर तिला म्हटले, मी ss काढत आहे.. तेव्हा अचानकच लाईट गेली"😒😔.क्षितिज ने आपली बाजू सावरत उत्तर देत म्हटले .

" ओह्ह दिल्ली सारख्या मोठया लाईट गेली होती भरदिवसा" मोबाईल चा फ्लॅश सुद्धा ऑन करू शकली असती पण नाही जाऊ दे. आणि या फोटो बद्दल काय म्हनन आहे तुझं "..इशु ने दुसरा फोटो ओपन केला तर त्यामध्ये प्रिया चा पूर्ण चेहरा तर दिसत होता पण फेसपॅक लावलेला......

"हा.. ते.... क्षित्याच्या तोंडून शब्द च फुटेना...

आता तर प्रनु ला सुद्धा संशय येऊ लागला. थोडस काही झाल तरी ती खुप काळजी करायची... प्रनु, इशु, क्षितिज जवळपास एकाच वयाचे असले तरी ती त्या दोघांची भावंडा प्रमाणे काळजी घ्यायची, ती थोडी काळजीच्या सुरात च म्हणाली "क्षीतू आता तर मला हि संशय येत आहे नेहमी काय कारणे द्यायचे? आणि तु इतके पैसे कसे खर्च केले तिच्यावर? फ्रॉड सुद्धा असू शकतात ना.? बर तु ना फोन लाव तिला आत्ताच.

"अगं पण तिने मला सांगितले कीं ती स्वतःहुन मला कॉल करणार... तिच्या बहिणीच लग्न आहे. सगळे पाहुणे घरीच असतील तर रागवेल तिच्यावर कुणी... माझ्या बेबी ला प्रॉब्लेम क्रीऐट होईल....

"आता अजुन एकदा बेबी म्हटले ना तुझ्या कानाखाली 2/4 बेबी उमटवणार मी फोन लाव मुकाट्याने"

"इशुचा राग बघुन क्षित्या ने पुढे काहीच न बोलता फोन लावला.. पण तो सतत कट होता.

" इशु ने पुन्हा प्रनु कडे वळत म्हटलं तुला सांगितले ना मी याच्या एन्जल मध्ये नक्कीच काहीतरी झोल आहे"...

तेवढ्यात प्रनु ला स्टेज वर पुन्हा अभी दिसला. त्याच्या साईडलाच त्याची बायको होती...काही पाहुणे त्या दोघांच्या समोर उभे असल्यामुळे असल्यामुळे प्रनु ला तिचा चेहरा बघताच आला नाही..

प्रनु : इशु चल ना विश करून येऊ " याच्या बेबी च मग बघु काय करायचं तर निवांत"

".नाही तु जा आज काहीहि झाले तरी मी त्या एन्जलच भांड याच्या समोर फोडणारच".... 😐🤨

"अगं पण"....🤔

"तु जा ना प्रनु आणि चेहऱ्यावर १२ नको वाजवून जाऊ..हे घेऊन जा" म्हणत तिने छानसा प्रनुला बुके दिला..💐

" हा बुके कुठून आणलाय आणि कधी" प्रनु बुके कडे बघत म्हणाली.🤔

"तुच म्हणाली होती ना इथे पाहू... मग इथे च मिळाला😁 असे म्हणत इशु ने प्रनु ला पिलर कडे इशारा केला.. प्रनु ने बघितलं तर पिलर चा खालचा भाग जो अगोदर फुलांनी गजबजुन होता तिथे आता एक हि फुल नव्हतं..

इशु च्या या कृती ने प्रनु च्या चेहऱ्यावर वर आपसूक चा हसू उमटले.. आणि ती हसतच स्टेज कडे गेली. 😁

प्रनु जाताच इशु ने अगोदर चे तेच सिरीअसं एक्स्प्रेशन आणत क्षित्या ला रागीट लूक देत म्हटले "फोन लावतोय ना बेबी ला ".🤨

"हं... हो.. हो... लावतो ना.. लावतो मी फोन".. बिचारा क्षितिज प्रनु असल्याचा थोडा आधार होता.. पण आता तर ती पण गेली होती...😒

"विशिंग यु अ व्हेरी हैप्पी मॅरीड लाईफ अभी" अभी ने वळून बघितलं तर अबोली रंगाचा डिझायनर सलवार सुट आणि किंचित लाईट मेकअप हातात बुके असलेली प्रणाली त्याला अगदी आनंदाने विश करत होती .

"थँक्स.. रडायला तर नाही येत आहे ना ?? अभी तिच्या हातातील बुके घेत कुत्सितपने हसत म्हणाला?

नो.... तुझी वाईफ नाही दिसत आहे ? प्रनु ने सौम्य आवाजात त्याच्या साईड च्या खुर्ची वर नजर टाकत विचारलं

थोड पिनअप करतेय... येईलच... आणि ती आल्यावर ना तुझा आणि तुझ्या त्या बेस्टी इशुचा चेहरा बघण्यालायक असतील....मला म्हणाली होती ति, माझ्या प्रनु सारखी तुला दुसरी कुणी मिळने शक्यच नाही... बट यू नो व्हाट्? मला तुझ्यासारखी कधी पाहिजे पण नव्हती .. माझ्या वाईफ ला बघशील ना तर बघतच राहशील. तिच्या पायाची सर सुद्धा तुला येणार नाही ना दिसण्यात ना विचारात... ब्युटीफुल, बोल्ड, इंटेलिजन्ट, अट्रॅक्टीव पर्सनॅलिटी आणि तितकीच लॉयल सुद्धा आहे ती,तु दिल्ली वरून इथे माझं लग्न अटेंड करायला आलीस... . खुप रडायला येत असेल ना.. एक आय टि इंजिनियर तुझ्या हातातून निसटून गेला याचा. बघ मी किती समोर निघुन आलोय आणि तु घुसमळत माझ्या आठवनित रडत.. तिथे च आहेस इमोशनल फुल ...... आणि हे काय सलवार सुट.... आज हि "टिपिकल बेहनजी" बनून आली" अभी उपहास करत खुप गर्वाने तिच्याशी बोलत होता..

प्रनु मुकाट्याने खाली मान टाकून त्याच बोलन ऐकत होती तिला खुप वाईट वाटलं तेवढ्यात इशु तिथे आली तिने अभी चा सगळे बोलन ऐकलं होत...

"ओफ हो अभी!! आमचा सिनियर होता तु थोडी तर अक्कल ठेवायची ना.. मी ना अगदी बरोबर म्हणायची तुझ्या बद्दल तुला खरच ट्रेंटमेन्ट ची गरज आहे, किती ते गैरसमज..
आय नो वयोमनानुसार घडतं पण तरीही.. तु खुपच विसरभोळा होत चाललय.. हे पण विसरलास तुच दिली ना पत्रिका प्रनु च्या घरी आणून. मी गेटजवळ च होते .. तुच म्हटले होत आग्रह करत तिच्या आईला प्रनाली ला लग्नाला नक्की पाठवा.. म्हणून मग याव लागल...खर तर आमच्या दोघींचीही इच्छा नव्हती इथे येऊन तुझ तोंड पाहायची.. पण काय करणार यावं लागलं.. उगाच गैरसमज झाला असता तुला कीं प्रनु तुला कुणासोबत बघु नाही शकत म्हणून. मगं तुझा गैरसमज दुर करायला आम्हाला यावं लागल, हे दाखवायला कीं "तुझ्या असण्या नसण्याने तिला घंटा 🔔फरक पडत नाही😎🤠...आणि मला वाटत सध्यातरी ना तु प्रनु पेक्षा आपल्या वाइफ वर लक्ष ठेवाव... मि आताच बघितलं तिला लपून छपून लॉन च्या बॅक साईड ला एका माणसांसोबत लपून बोलताना.. तुच म्हटले ना तुझी वाईफ स्मार्ट इंटेलिजन्ट बोल्ड आणि हो लॉयल सुद्धा आहे म्हणून... आजकाल खुप रेअर आहेत असें लोक मिळन.. u should be careful & alert about her.....😁

इशु ने लॉयल या शब्दावर भर देत म्हटले तिचं बोलने पूर्ण व्हायच्या आत च पुढे काही न बोलता अभी धावतच बॅक साईड ला गेला.

त्याला असं पळताना बघुन इशुला जाम हसायला आल. ती हसतच म्हणाली 🤣
हे नवरे पण किती अजिब असतात .. बायको सुंदर असंली तरी टेन्शन घेतात नसली तरी टेन्शन घेतात.. 🤦😁🤣🤣

"इशु काय केल हे तु?🤔खोटं का सांगितले त्याला त्याच्या वाईफ बद्दल" प्रनु तिला आपल्याकडे वळवत म्हणाली.

"अगं मि अगदी खर बोलतेय.. तु गेल्यावर आम्ही क्षीतू च्या gf ला कॉल करत होतो.. पण लागेचना नंतर रिसिव्ह झाला तर आवाज कटत होता... म्हणून बॅक साईड ला गेलो तर तिथे दिसलें मला ते दोघ ... तिची पाठ माझ्याकडे असल्यामुळे चेहरा तर नाही बघितला पण तिच्या लुक वरून कुणीही सांगून शकत होत कीं ति नवरी आहे म्हणून आणि ह्या एरिया मध्ये हे एकच लग्न आहेत आजूबाजूचे सगळे हॉटेल लॉन खाली आहे मगं ति इथलीच नवरी आय मिन अभीचीच बायको असेल ना... पण तो माणूस कोन होता हे नाही समजलं ?

"अगं कुणी नातेवाईक किंवा फ्रेंड् असेल ना"?

"तु खरच भोळी आहे प्रनु "नातेवाईकाला कुणी असं लपून भेटत का? आणि फ्रेंड्स नव्हता तो... त्याच वय सुद्धा खुप जास्त होत कदाचित 40/42 च्या जवळपास.... आणि हाथ सुद्धा किती घट्ट पकडून ठेवला होता वागण सुद्धा विचित्र होत.. कुछ तों गडबड हैं प्रनु कुछ तों गडबड हैं..

" काहीच गडबड नाही आहे... तुला सगळ्यांत च गडबड वाटते इशु " तु क्षीतू च्या एन्जल ला पण अशीच म्हणते,

"अगं नाही खरच गडबड आहेत.आणि तुला माहिती आहे जेव्हा कॉल रिसिव्ह झाला होता ना तेव्हा या हॉल मध्ये वाजणारे सॉंग्स मला पलीकडुन ऐकु येत होते "🤔...

"मला काहीच नाही कळत आहे तुला काय म्हणायचंय" प्रनु कंटाळून म्हणाली.

इशु : अगं!! सध्या फक्त इतकं समजून घे कीं ती एन्जल प्रिया इथे च आहे..आणि जसे कीं, तिने म्हटले होते कीं तिच्या बहिणीच लग्न आहे...म्हणजे तिची बहिणी दुसरी कुणी नसून अभी ची वाइफ आहे" इशु प्रनु ला समजावंत म्हणाली

"व्वाव किती मस्त ना... अभी तर माझ्याच अपार्टमेंट मध्ये राहतो .....म्हणजे आता बेबीईईईई....

"आं"?

क्षितिज च बोलता बोलता लक्ष इशु कडे केल. जी बेबी म्हटल्यावर त्याला रागात बघत होती, इशु मारेल या धाकाने एका हाताने गाल अगोदर च झाकून घेऊन थोडं सावरत घेत बोलला".....आय मिन प्रि.. प्रिया येत जाईल ना तिच्या बहिणीला भेटायला माझ्या अपार्टमेंट मध्ये ...

प्रनु : "ते सगळ ठीक आहे... पण इतक्या लोकांमध्ये शोधायचं कस? हा जर शोधायला गेला तर नक्कीच कुण्या तरी मुलीचा मार खाणार"

"कॉल करून बघु पुन्हा तिला..... पण इथे तर नेटवर्क खुप खराब आहे"..चला बॅक साईड ला जाऊ..कॉल लागला तर ह्याच्या एन्जल ला हि तिथेच बोलावून घेऊ".इशु त्या दोघांकडे बघत म्हणाली.
तिघेही लॉन च्या बॅक साईड ला गेले.. क्षितिज च्या नंबर वरून केला कीं सतत बिझी येत होता कारण तिने त्याला ब्लॉक केल होत.. म्हणून इशु आपल्या मोबाईल वरून तिला कॉल करत होती...आणि व्हिवु चांगला मिळत असल्यामुळे क्षितिज ने प्रनु ला त्याचे काही फोटो क्लिक करायला सांगितले.. .

प्रनु त्याला सांगत होती आणि तों तशीच पोझ देत होता...

"मॅनेजर "🤔 प्रनु क्षितिज च्या मागे बघत अचानक म्हणाली.

"हि कुठली पोझ आहे" क्षितिज डोक्याला खाजवत म्हणाला🙄🤷‍♂️

"अरे 🤦.तुझ्या मागून आता एक कार गेली.ज्यात आमचे मॅनेजर होते.. पण ते इथे काय करताय.? 🤔🤔

तेवढ्यात इशु ने दोघांना आवाज दिला आणि म्हणाली " ती कॉल रिसिव्ह नाही करत आहे आणि आता मला खुप भुक पण लागली अगोदर जेवण करून घेऊ मगं बघु पुढचं" असं म्हणत तिघेहि आत हॉल मध्ये निघुन गेले..

इशु ने प्रनु कडे बघितलं तर ती थोडी टेन्शन मध्ये वाटली..
" काय गं कसला विचार करतेस "

"मी बॅक साईड ला आमच्या मॅनेजर ला बघितलं"

" व्हाईट फॉर्मल सूट मध्ये होते का"?

" हो पण तुला कस कळलं "?

"मला वाटते अभिच्या वाइफ ला भेटनारा तोच असेल".. कारण त्याच वय आणि तुझ्या मॅनेजर च वय सारखच आहे... पण त्याचे संबंध तर त्या शिवानी सोबत आहे ना मगं अभिच्या वाईफ ला भेटायला का आला ते पण लपून"

प्रनु : "म्हणजे तो फसवतोय शिवानी ला बिचारी'"..

इशु : हम्म... कदाचित.. 🤔..

(फोटो सेशन व्हायच होत अजुन तर ती एंजल येईल नक्की स्टेज वर म्हणून तिघेही डिश घेऊन जेवायला पुन्हा आपल्या अगोदर च्या जागे वर येऊन बसले.आणि स्टेज कडे नजर टाकली. अभी च्या ऑफिस चे कलीग नुकतेच आले होते ते सगळे जण त्याला विश करत असल्यामुळे स्टेज वर खुप जण होते .. प्रनु तर अभी असल्यामुळे स्टेज कडे बघतच नव्हती, इशु आणि क्षितिज खुप प्रयत्न करत होते. पण दोघे हि दिसेना...

शेवटी काही वेळाने सगळे जण निघुन गेले... आणि इशु ची नजर अभी आणि त्याच्या वाइफ वर पडली...

प्रनु च लक्ष इशु कडे गेलं तर तिने बघितलं कीं, इशु वारंवार उलट्या हाताने डोळे चोळून पापण्या उघडझाप करत स्टेज कडे बघत होती.. प्रनु तिच्या खांद्यावर स्पर्श करून तिला हलवत होती पण इशु अजुनहि स्टेज कडे च बघत होती... .

"जेवण तर कर मग बघ ना तिला" पण इशुने काहीच उत्तर दिले नाही. म्हणून प्रनु ने कंटाळून थोडं रागातच इशु ला विचारलं "इतकी सुंदर आहे का ती"

तर इशु ने तिची मान स्टेज कडे वळवली...... आणि एक एक शब्दावर भर देत म्हणाली " लॉयल वाईफ "

प्रनु सुद्धा तशीच आ वासून समोर बघत राहिली, तिने हातातली प्लेट टेबल वर ठेवुन दोन्ही हाथ गुडघ्यावर टेकवले आणि कोहणीपासून दुमडुन गालावर ठेवले

आणि म्हणाली "अभी ची बायको"😳😱

इशु : " अ हं गलत ..... मॅनेजर ची गर्लफ्रेंड"😳

क्षितिज : "अ हं. गलत..... बेबी'😵

इशु आणि प्रनु ने बघितलं तर क्षितिज सुद्धा दोन्ही हाथ गालावर ठेवुन स्टेज कडेच बघत बोलत होता.

प्रनु त्याच्या खांद्यावर एका साईड ने हाथ ठेवत म्हणाली म्हणजे "अभी ची बायको आणि मॅनेजर ची गर्लफ्रेंड तुझी बेबी होती"😁🤣🤣

"हो"😒😩 क्षितिज हळु आवाजात रडकुंडीला येत म्हणाला

......जिसे धुंडा गली गली,
वही दोस्त कीं शादी मे, भाभी बनकर मिली... 😭😭

"मेरी वाली अलग हैं" म्हणत दोघी पोट धरून हसायला लागल्या. 😁🤣🤣

इशु ने आपला गळा थोडा खाकरला. आणि म्हणाली
" अब मै भी हमारे प्यारे बदकिस्मत दुल्हे राजा के लिये उनकी वफादार सॉरी सॉरी लॉयल वाईफ कीं तारीफ मे प्रनु कीं तरफ सें कुछ लाईन्स कहना चाहुंगी ( क्षितिज आणि प्रणूकडे बघत) तो आप सब गौर फरमाईयेगा....

प्रनु आणि क्षितिज एकत्रच म्हणाले.. "इर्शाद. इर्शाद"....

इशु :
तो अर्ज किया हैं.....

मेरे साथ बिताये लम्हे
उसकी ख़ुशी के आखरी पल थे..

वाह वाह !!!!
कीं,...
मेरे साथ बिताये लम्हे
उसकी ख़ुशी के आखरी पल थे..
क्युकी मुझ सें बेवफाइ करके
उसने ऐसे लडकी सें शादी कीं,....
जिसके पहले सें हि 2/3 बॉयफ्रेंड थे..😁😁😝😝😝

3 नाही 4 " क्षितिज छोटा स तोंडं करत म्हणाला

"म्हणजे" इशु आणि प्रनुने चकित होऊन एकत्र च ओरडल्या 😵😲😱.

"माझ्या आधी ती निखिल ची गर्लफ्रेंड होती... त्याने च ओळख करून दिली होती.. मला वाटलं तुम्ही चिडवाल, हसाल माझ्यावर म्हणून ना.. नाही सांगितले 😒 " मीच पागल माझ्या स्कॉलरशिप चे पैसें तिच्या वर खर्च केले,. क्षितिज खाली मान घालून बोलला.

"डोन्ट वरी..... मी आहे ना.. डबल न पैसे वसूल करून देईल.. सोन्याच्या चेन सकट... अगोदर मला सांग मटर पनीर ची भाजी कशी झाली ते" इशु ने दोघांना घास भरून देताना विचारलं.

"भाजी तर छान च झाली" दोघे हि म्हणाले.

"मग आय थिंक गिफ्ट तर बनते" इशु घास घेत म्हणाली

"आता कुठून आणशील गिफ्ट जाऊ दे ना नाही देऊ? प्रनुने गुलाबजमून खात तिला म्हटलं .

"गिफ्ट द्यायचं नाही आहे डिअर आपल्याला मिळणार आहे" इशु ने स्टेज कडे बघत म्हटलं.

"म्हणजे"? क्षीतू आणि प्रनु आश्चर्याने तिच्या कडे बघु लागले.

"जस्ट वेट & वॉच".... यावेळेस आपला गोव्या चा प्लॅन कॅन्सल नाही होणार... असं म्हणते तिने एक मॅसेज टाईप केला आणि शिवानी कडे बघितलं..

फोन व्हायब्रेट झाल्यावर शिवानी नोटिफिकेशन बघितल्यावर घाबरतच इकडे तिकडे बघु लागली आणि तिची नजर समोर बसलेल्या त्या तिघांवर जाऊन स्थिरावली.

इशु ने पुन्हा तिला एक मॅसेज केला आणि तिला मोबाईल मध्ये बघण्याचा इशारा केला. मॅसेज बघितल्यावर शिवानी केविलवाणा चेहरा करत क्षितिज कडे बघत होती.. पन त्याने तोंडं वाकड केल 😏😏

"काही वेळातच गोव्या च्या तिन तिकीट आणि एका आठवड्या साठी हॉटेल बुकिंग नोटिफिकेशन आल...

दोघांनी नोटिफिकेशन कडे बघुन पुन्हा इशु कडे बघितलं.. आणि "जहाँपणाहं तुस्सी ग्रेट हो" म्हणत इशुला टाईटली हग केल..... तिघेहि अधून मधून स्टेज कडे बघत हसत मटर पनीर चा हसत आस्वाद घेत होते 😇😁😇.

समाप्त

वैशाली बनकर !!!!!!