आर्या... 4 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आर्या... 4

चाळीत राधा आजी सगळ्यांना मदत करे . पण राधा आजीचे आणि आर्यांचे वेगळेच नाते होते .... आर्याने मनोमन ठरवले काही ही जाहले तरी, राधा आजी आपल्या सोबतच राहणार ..... अंजली ने चाळी कडे गाडी वळवली . चाळीत येताच सगळे आर्या कडे वेगळ्या नजरेने पाहू लागले .पण पुढे येऊन तू कशी आहेस, हे मात्र कोणीच विचारायला आले नाही . राधा आजी गाडीतून खाली उतरल्या . त्याच्या मागोमाग आर्या ही उतरली .... राधा आजी ना काही कळेना ...एवढ्यात आर्याने राधा आजीचा हात हातात घेतला . आणि म्हणली, आजी मी सगळ गव्म्व्ल्य, पण आता माझी हक्काची आई मला गम्वय्ची नाही ..... आह्मी सगळे आता तुमच्या सोबतच राहणार ....नाही म्हणून अह्म्ला पोरके करू नका .... आर्यांचे बोलणे ऐकून राधा आजी अश्रू आवरेना ..... मुलगा सोडून गेला ...म्हणून देवाला दोष देत होते .पण ....आता हक्काची मुलगी मिळाली .....मी ही नाही राहू शकत तुमच्याशिवाय .... आर्याने राधा आजी ना मिठी मारली .. नंतर तीघीनी मिळून आजी च सामान गोळा केले . आणि गाडी मध्ये टाकले .आर्याने ही घरी जाऊन तिची मुलींची काही कपडे ....तिचे दागिने, काही पैसे घेतले ...आणि ती निघाली ....त्या घरातून निघतांना आर्यांच्या डोळ्यात पाणी ....आणि मनात विश्वासघाता ची जाणीव ..... पण आता मागे वळून पहायचे नाही ....ती ने मोठ्या निर्धाराने डोळे पुसले .
आर्या सामान घेऊन गाडीत येऊन बसली . आणि गाडी धावू लागली भरधाव ...... अंजलीने आर्यांच्या नवीन घराजवळ येऊन गाडी थांबवली .
आर्या, आर्वी, रेवा आणि राधा आजी सगळे गाडीतून उतरले .....आणि आपल्या नवीन घराकडे आशेने पाहत होत्या . सगळे जण त्या बंद असलेल्या घरात दार उघडून आत आले ....घर आतून खूप सुंदर होते ....आजूबाजूचा परिसर ही खूप सुंदर होता . आर्या ला रूम खूप आवडली ....अंजलीच्या सांगण्यावरून मालकांनी रूम सूध्हा स्वच्छ करून ठेवली होती ....नवीन घरात आल्यावर सगळ्याच खूप बरे वाटले होते .....रेवा तर ई कडे तिकडे नुसती उड्या मारत होती .....तिचा हसरा चेहरा पाहून अर्याला खूप बरं वाटल .राधा आजी ना ही खूप दिवसानी माणसात आल्यासारखे वाटले .... आर्याने येताना सगळ्यां साठी थोडेसे खायला आणले होते . तिने राधा आजींना आणि अंजली ला देऊ केले ...पण अंजली ला खूप उशीर झल्यामूले ती घरी निघून गेली .....आर्याने मग राधा आजी आणि रेवा ला दिले ...मग अर्विला दूध पाजून तिने ही थोडेसे खाऊन घेतले ....आणि गोळ्या घेतल्या .... पोटभर जेऊन सगळे जणानी दुपारची झौप घेतली . राधा आजी आणि रेवा आणि आर्वी झौप्लेत हे पाहून आर्या पर्स घेऊन बाहेर पडली . कारण घरात काहीच सामान नव्हते ..राधा आजी ने येताना त्याची काही भांडी, ग्यास वैगेरे आणले होते ..त्यात काम चालेल म्हणून, आर्या ने दुकानात जाऊन थोडासा किराणा आणला ...पुढे सोनाराच्या दुकानात जाऊन तिने तिची सोन्याची अंगठी मोडली ...आणि रेवाच्या नावावर तिने थोडेसे पैसे ठेवलेले ते ही काढून आणले . आता पुढे कसे होणार ह्याच टेन्शन आर्या ला होतेच ....पण अमन पासून दूर ह्या घरात स्व्त्रंत्र रहायला आलो ह्याचा आनंद ही तिला होताच . ती पैसे आणि सामान घेऊन घरी आली . मुली अजून ही झौप्ल्या होत्या . पण राधा आजी नी मात्र बरोबर आणलेले थोडेसे सामान घरात व्यव्स्तीथ मांडले. त्या नीट नेटके पणा नी घर अजूनच सुंदर दिसू लागले . आर्यांनी आणलेले सामान पाहून ...राधा आजी म्हणल्या, काय ...अगं? आर्या जातांना मला उठ्वय्चे तरी ....आणि बरं जाहाले सामान घेऊ न आलीस ....मस्त पैकी संध्याकाळी वरण भात बनवू .....रेवाला ही फार आवडतो .... राधा आजी नी घरची जबाबदारी घेतली होती ....त्या रोज नवीन नवीन पधर्थ बनवून सगळ्यांना खायला घालत ....रेवा ला रोज गोष्टी सांगत, आर्वी ला आंघोळ घालत ....आता अर्यला मुलीच टेन्शन नव्हते ...ती ने आता परत कामावर जायचे ठरवले ....पण रेवाला शाळेत घालण्याचा तिने निर्णय घेतला ... कितीही काहीही जाहले, तरी मुलाचे शिक्षण हे चांगले च जाहले पहिजे असा, तिचा आग्रह होता .तिने उरलेल्या पैशातून रेवाचे जवळच्या शाळेत अड्ड्मिस्स न केले ....छोटीशी रेवा आता शाळेत जायला लागली ..घरी येऊन अभ्यास करू लागली ... शाळेत प्रत्येक गोष्टीत ती भाग घेऊ लागली ... घरी येताना बक्षिसे आणू लागली ....खरंच रेवाचे हे कौतुक बघताना आर्यला बरे वाटले . आता आर्यांचा नऊ महिना चालु जाहला होता .राधा आजी नी आर्याला सुट्टी घेऊन घरी रहायला सांगितला . आर्याने ही त्याचे ऐकले आणि सुट्टी घेतली ...आता तिला तिच्या तिसऱ्या बाळाची चाहूल लागत होती ...आता आर्वी ही वर्षाची होऊन गेल्यामुळे पाऊले टाकू लागली होती ..रेवाचा छोटासा हात धरून घरभर चालु लागली होती . घरात पैशाचे छोटे छोटे प्रॉब्लेम चालु होते ....पण राधा आजी तिच्या पेन्शन मधून ते सॉल्व करत होत्या .शेवटी आर्या शिवाय त्याच तरी कोण होत ..... आर्यांचे आणि तिच्या दोन मुलीच त्या ऐत्क्या प्रेमानी करत होत्या, की .....त्या च्या शिवाय त्या तिघिंच पान सूध्हा हलत नसे .
जाहाले ....त्या दिवशी आर्यांच्या अचानक पोटात दुखू लागले ...तिला दवाखान्यात णेह्ण्यात आले ... तिने काही वेळ कळा दिल्या आणि मग डॉक्टरानी संगितले ...मुलगा जाहला . दोन मुलीनं तर मुलगा झल्यामूले सगळ्यांना फार आनंद जाहला .. अर्याची नॉर्मल डिलिव्हरी झल्यामूले ...तिला तीन दिवसानी घरी सोडण्यात आले ....घरी आल्यावर सूध्हा अंजली चांगली तयारी केली होती .राधा आजी सगळ घरातले काम करत होत्या ...त्या मुळे आर्या भरपूर आराम करू शकत होती ....पण तिच्या समोर च टेन्शन मात्र वाढले होते .आता अजून एक खाणारे तोंड वाढले होते .पैसे घरात पुरत नव्हते .मुलाच्या संगोपनात कसलीच कमी नको ...हे तीच पहिल्या पासूनच ध्येय ....पण दुसरी नोकरी बघणे ...पण शक्य नव्हते .... आणि नोकरी सांभाळून दुसरी नोकरी करणे ...ही तितकेसे शक्य नव्हते ....तिला काय करावे तेच समजेना ..... अचानक तिच्या लक्षात आले .. आपण जर घरगुती जेवणाचे डब्बे चालु केले तर .... तिने लगेच ही कल्पना राधा आजी ना सांगितली ...राधा आजी ना ही कल्पना फार आवडली .
तिने लगेच एक बोर्ड बनवून घेतला, आणि घराच्या बाहेर लावला ...येथे घरगुती जेवणाचे डब्बे बनवून मिळतील .... पहिला महिनाभर तर तिथे कोणी फिरकल सूध्हा नव्हते ...पण महीनाभराने एक माणूस जेवणाच्या डब्ब्याचि चौकशी करण्यासाठी आला . अर्याला खूप आनंद जाहला. आणि तिथे अर्याला एका डब्ब्याचि ऑर्डर मिळाली .पाहिली एक मिळाली, मग दुसरी मिळाली, मग तिसरी .....अस करता करता दहा डब्ब्याचि ऑर्डर तिला मिळाली .आता आर्यांचा कामाचा भार फार वाढला होता . ऑफीस मधले काम, घरी आल्यावर घरचे काम ...डब्ब्याचे काम ...ह्या सगळ्या गोष्टी मुळे तिचे मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले ...राधा आजी च्या ही हे लक्षात येऊ लागले होते ...त्यानी ही तिला समजावले ...मुलांकडे लक्ष दे ......काम तर होतच राहत ....पण, मुलांना आईची गरज असते ....शिवाय मुलाचे आई आणि वडील तर तूच आहे .
आर्या ला ही हे सगळ कळत होत ...पण तिची ही खूप ओढाताण होत होती .