(ही स्टोरी रोमँटिक नाही आहे , तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हाला वाचताना कसे वाटत आहे ,कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या किंवा आवडल्या नाही ,लिखाणात काही त्रुटी असतील तर या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण या मुळे मला माझ्या चुका कळतील तसेच मी कसे लिहिले आहे ते पण कळेल. खराब चांगली कशीही कमेंट करा पण प्रत्येक भागावर कमेंट नक्की करा . . .
. .
लिहायला खूप वेळ लागतो आणि तुम्ही काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर. वाईट वाटत 😣
. .
एक कमेंट करायला फक्त १० सेकंद लागतात ...
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
I hope you will do🙂😊
scammer
जगात किमान १० ते १५ लाख छोटे मोठे इंटरनेट scams रोज होतात.
....
भारतात दरवर्षी ३ ते ४ कोटी लोक सायबर स्कॅम मधे अडकले जातात...
पण त्या पैकी १० टक्के scams उघडकीस येतात, त्यात पण अर्धे तर कागदोपत्रीच असतात आणि बाकीचे scams ..... त्याचा तर पत्ताच लागत नाही .... पण हे स्कॅम करणारे नक्की असतात तरी कोण आणि हे लवकर पकडले का जात नाहीत ...
... .... ...
अशी काय शक्कल ते लढवतात ज्यानेकरून सायबर गुन्हे करणारे सहज कुणाला पण फसवून निरामय होतात ?
अनेक लोक आपली आयुष्याची जमापुंजी एका बटन दाबल्यामुळे घालवून बसतात, काही जणांची पर्सनल आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होत ... आणि नंतर आपल्या आयुष्याशी हाथ धुवून बसतात
... ...
'फक्त अशिक्षित किवा वृद्ध लोकच यात फसतात...नाही तर अशी लोक फसतात ज्यांना मोबाईल आणि संगणकीय ज्ञान नाही' .... असा जर तुमचा गैरसमज असेल तर मात्र तुम्ही सपशेल खोटं ठरणार आहात ...
कारण ४ कोटी गुन्ह्यांपैकी ३ कोटी लोक तरुण वर्गातले ज्यांना नवीन तंत्रज्ञान परफेक्ट (असे समजणारे) हाताळता येतात ...
.
.
हे तर खूप कॉमन गुन्हे आहेत .. पण या पेक्षा काही वेगळं ,भयानक आणि मोठ असा काही स्कॅम होऊ शकतो का ज्याने जगातल्या सर्व लोकांवर याचा विचित्र परिणाम होईल ?
.
तर उत्तर आहे - हो
... ... ... .. . .. . .. .. .. .. ..
.. .. ... ... ... .. .... .... .... ... ... ....
अशीच काही गोष्ट आहे सर्वात मोठ्या हॅकर ची ....
..
"अनिश सुभेदार"
..
सायबर दुनियेतला मोस्ट वॉन्टेड...
ज्याच्या मागे फक्त भारतातले पोलिस नाही तर अख्या जगभरातले पोलिस च त्याच्या मागे होती . . . कारण कामच असे काही केलें होते की जे सर्वच जण हादरून गेले होते ...
पण तो खऱ्या अर्थाने गुन्हेगार होता का नाही ? . . . . . . . .
to be continued . . . .
©️
Tip : पाहिले चार भाग लहान आहेत पण मी नंतर सर्व भाग हे मोठे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏻🙏🏻
( हि गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे . . . कुठली घटना जर तुम्हाला मिळतीजुळती वाटत असेल तर तो निवळ योगायोग समजावा 😊)
. . . . . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
( मिस्टर रजनीश आपल्या अातल्या खोलीत बसून एका जुन्या बटन असलेल्या मोबाईल वर बोलत होता,असा मोबाईल ज्या वर साधे इंटरनेट चालन सुध्धा अवघड च )
"मी सिनियर इन्स्पेक्टर अक्षय शेलार बोलत आहे, "
"हा बोला साहेब...तुम्ही मला का फोन केलात?"
"तुम्हीं ताबडतोब उद्या बँक मधे जाऊन तुमचं अकाउंट बंद करून द्या...तुमच्या अकाउंट ला खूप मोठा धोका आहे"
रजनीश (गालातल्या गालात हसत) "तुमचा काहीं तरी घोळ झाला आहे साहेब .... मी साधा माणूस माझ्या खिशात कधी ५०० पेक्षा जास्त पैसे नसतात ... तर माझ्या अकाउंट ला काय धोका असणार ... आणि काय फायदा त्याचा.. तुम्ही बहुतेक चुकीच्या नंबर वर फोन केला आहे .. "
अक्षय एक लांब श्वास घेऊन,"कोड एस सेव्हन ओ एफ झीरो ... आता तरी कळलं असेल "
मिस्टर रजनीश आपल्या बेड वरून उठून आपल्या दीर्घ आवाजत "बर, पुढच्या details पाठवून द्या काम होऊन जाईल आणि हो माझ रिझर्व्हेशन करून ठेवा मी उद्याच निघेल ... "
एवढं बोलून मिस्टर रजनीश फोन ठेऊन देतो ...
थोड्या वेळा नंतर इन्स्पेक्टर अक्षय कडून मिस्टर रजनीश ला एक मेसेज येतो
"कोड एफ-8-4-7-9 _ _ _ _ _
मिस्टर रजनीश आपल्या खोली मधे जाऊन आपल कपाट उघडून त्यातली एक काळया रंगाची सुटकेस बाहेर काढतो ... त्यातून एक आर्धा फाटलेला कागद(डॉक्युमेंट) आणि एक नवीन सिम बाहेर काढून परत ती सुटकेस मधे ठेऊन देतो आणि त्याच कपाटमध्ये असलेल्या लॉकर मधून एक नवीन मोबाईल काढतो ....
मिस्टर रजनीश परत आपल्या बेड वर बसून जुन्या फोन मधले सिम तोडून देऊन फोन स्विच ऑफ करून देतो ... आणि नवीन फोन चालू करत त्यात एक नवीन सिम टाकून .... इन्स्पेक्टर अक्षय यांना एक मेसेज करतो "एम-वाय-1-5-9"
मिस्टर रजनीश चल बीचल अवस्थेत स्वतः च्या खोलीत चकरा मारत होता ..
मिस्टर रजनीश ला इन्स्पेक्टर अक्षय च्याच नंबर वरून फोन येतो ...
मिस्टर रजनीश गरबडीत फोन उचलून,"हॅलो काम झाल का ?"
रजनीश सुटकेचा श्वास घेत,"thanks चला एकदाचे टेन्शन गेलं पण आता पुढचा प्लॅन काय आहे ?"
इन्स्पेक्टर आता समोरून काहीच बोलत नाहीत ....
"हॅलो,...हॅलो इन्स्पेक्टर. ...हॅलो तुम्हाला आवाज येत आहे का?"
फोन वर मोठ्याने हसण्याचा आवाज येतो ...
"हा..हा..हा .. तू मला पूर्ण बोलूच दिलं नाहीस "
रजनीश (चिडून):"कोण बोलतंय ... "
"मी म्हणत होतो की congrats मीस्टर ,you lost everything"
रजनीश रागात ,"कोण आहेस तू ... तुला माहीत नाही तू कुणाशी पंगा घेतला आहे ते....तुला ते सोडणार नाहीत..."
"ते सोड रे ,मी माझ बघून घेईल...तुझ काय,त्याचा विचार कर"
तेव्हड्यात रजनीश च्या खोलीचं दार कुणीतरी जोरजोरात वाजवत
"तुझे सगळे पाप आठवून घे. परत वेळ नाही मिळणार तुला...हा..हा..हा.."
रजनीश ला आता घाम फुटला होता , कारण आता त्याच काही खरं नव्हतं...
....... ..... ...... ...... ..... ..... ..... ....
(जर तुम्हाला या स्टोरी मधे इंटरेस्ट असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा ... तुमची एक समीक्षा माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे...😊)