तू ही रे माझा मितवा - 27 Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू ही रे माझा मितवा - 27

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_27

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

नवीन कामाचा पहिला दिवस!

आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा काहीतरी हटके काम करायची नवी उमेद तिच्यात जागत होती.तिला आवडणारा सॉलिड टीलकलरचा फॉर्मल पेन्सिल वनपीस तिला खुलून दिसत तर होताच पण चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वाससुद्धा तिच्या अटायरचाच भाग झाला होता. दाट केसांची ट्विसटेड पोनीटेल आणि जरासा मेकअप आणि डोळ्यातलं काजळ.आरश्यात स्वतःला पाहून तिने आनंदात डोळे मिचकावले तिला जणू पुन्हा जुनी ऋतू सापडली पण क्षणभरच!
पुन्हा स्वतःला आरशात निरखून बघतांना जणू मागून गलका झाल्यासारखे आवाज येत होते-
चंचल,बालिश,सेल्फिश...! चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा मावळला.पापण्याच्या कडा पुन्हा ओलावल्या.
ती तशीच उभी होती मग पुन्हा एका आवाजाने जणू आतून हाक दिली-
‘ हे असे रडवेले डोळे नाही छान दिसत, ते नॉटि आईज ते जास्त सुट करतात.’

‘कबीर’ ती ओठातल्या ओठात पुटपुटली आणि शून्यात बघत तशीच उभी राहिली.

“Darling you are looking too fab but it doesn’t mean की तू स्वतःलाच बघत राहणार,ते काम करायला ऑफिसमध्ये चिक्कार बॉईज आहेत.निघायचं?

मोना हसत म्हणाली तसं ऋतू ओशाळली.सावरासावर करत म्हणाली-

‘अरे नाही,फिलिंग बीट नर्व्हस...सो..”

“don’t worry, we will rock this project.निघायचं?” ऋतूच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली.

तिच्या त्या आश्वासक बोलण्याने तिला जरा हिंमत वाटली.
मोनाचा मनमोकळा,बोलका,कुणालाही पटकन आपलसं करणारा हा स्वभाव ऋतूला खूप आवडला होता.
*********

TSM Triangle ह्या मेन ऑफिसमध्ये त्या अगदी वेळेत पोहचल्या.ऑफिसच्या आत प्रवेश करताच व्यवहारी जगातून एकदम वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखं तिला वाटलं.तसं मुंबई ऑफिसच्या हटके इंटेरियरविषयी बऱ्याच चर्चा तिने तिच्या ऑफिसला ऐकल्या होत्या पण प्रत्यक्ष तिथे उभं असण्याचा फिलच वेगळा होता.
सगळ्या पारंपारिक ऑफिसच्या कल्पनांना छेद देणारं हे ऑफिस होतं.
रिसेप्शनला डेस्क म्हणून लांब, भला मोठा unfinished rustic wooden log होता ,त्यावर आकर्षक फोन्टमध्ये लिहलेलं -
“Log In here”
लक्ष वेधून घेत होतं.त्याच्या मागच्या भागात संपूर्ण हिरवगार अशी vertical garden wall.
ते “ever relaxing’ रिसेप्शन पाहूनच तिचं नवीन ऑफिस जॉईन करायचं टेन्शन थोडावेळ गायबच झालं.रिसेप्शनिस्टने तिला एक नंबर दिला व HR सेक्शनला पाठवलं.मोनासोबत होतीच तिला हे सरावाचं होतं. तिकडे काही पेपर्सवर सही करून तिने महत्वाच्या formalities पूर्ण केल्या.आयडी कार्ड,क्लाऊडचे लॉगीन पासवर्ड घेतले,आता सहा महिने तिची हीच ओळख असणार होती.
प्रोजेक्टची ओरिएनटेशन मिटिंग तासाभराने होती.लहान मुलाच्या उत्सुकतेने तिची नजर त्या ऑफिसमधल्या नाविन्यपूर्ण इंटेरियरवर फिरत होती.
“मोना तुझं क्युबिकल कुठे आहे?” तिला आता तिच्या कामाच्या ठिकाणी जायची उत्सुकता होती.

“क्युबिकल?” मोनाला हसू आलं.

“का काय झालं?”

“चल मी कुठे बसते ते दाखवते.”

त्या जिन्याने वर गेल्या,जिन्याच्या साईडला देखील उंच व्हर्टिकल गार्डन होते.त्यामुळे एखादी झाडाझुडपांनी वेढलेली टेकडी चढून जात आहोत असंच तिला वाटलं.
त्या वर आल्या,ऋतू डोळे विस्फारून बघत राहिली. समोर ऑफिस वाटावं असं काहीच नव्हतं. पूर्ण फ्लोअरवर जागोजागी कोवर्किंग टेबल्स होते,तिथे काही लोकं काम करत होते.एका कॉर्नरला चक्क hammocks बांधलेले होते. तर त्याच्या पुढे काही अंतरावर वरून लटकणाऱ्या निम्बस २००० आणि फायरबोल्ट ब्रूमवर बसायची जागा केलेली होती.तिला hoggward school ची आठवण झाली,विशेष म्हणजे एक मुलगी त्यावर आरामात बसून काही लिहित होती.काही ठिकाणी standing working stations होते.वर सिलिंग मधून जागोजागी clouds सोडलेले होते आणि ते काही नावं दाखवून टीमटिमत होते.

“हे सगळं काय आहे?” ऋतूने आश्चर्याने विचारलं.

“डार्लिंग धिस इज क्रिनेट our “क्रिएटिव्ह प्लॅनेट” इथे कुणाचीच वर्किंगप्लेस फिक्स नाहीये.once you kept your belongings in the locker down stairs you are free to move anywhere here and everything is on cloud so use your ID password and work anywhere.
ते समोर दोन कुल हट सारखं केबिन दिसतंय ना ते senior creative head and assistant creative head चे केबिन आहे. बाकी सिनिअर,ज्युनिअर कॉपीराईटर,रिसर्च अनलिस्ट,ट्रेनी ऑल ओव्हर द फ्लोर दिसतील तुला आणि क्रिनेटच्या बॅकसाईडला आमच्या एडिटिंग रूम्स आणि सोल ऑफ क्रिनेट म्हणजे कॉन्फेरन्स हॉल तो सगळ्यात शेवटी.”

तिने एकदमात सगळी माहिती सांगितली.

“Waaaw...its amazing by the way why this clouds are blinking with different names and colors? ”

“Ohh this is very new & interesting concept in advertising agencies all over the world now a days, whenever any of our brands , advertisements or campaigns are trending on social media then it start blinking with its names. Isn’t it cool?”

“yes it is .” ती विस्मयाने म्हणाली.

“हो पण सगळ्यात cool आहे ते नॅप कॅबिनेट,ते सिटिंग ब्रूम्सच्या मागे कॅप्सूल सारखं स्ट्रक्चर दिसतंय का? त्या आहे नॅप कॅबिनेट,there you can actually take power nap of 16 min.”

“Amazing yaar, too cool” एकंदरीत हे सगळं नवीन वातावरण तिला खूप आवडलं होतं.

“चलो मिटिंग अटेंड करायचीय ना?”

“Yes, let’s go” ऋतू उत्साहाने म्हणाली.

मोनाने तिच्या काही कलीग्सशी ऋतूची ओळख करून दिली,काही मुलं तर ऋतूला पाहूनच उगाच मोनाशी बोलायला येत होते, ओळख करून देत होते.त्यांना थोडक्यात कटवून मोना ऋतूला घेऊन कोन्फेरेंस हॉलकडे निघाली.कॉन्फरन्स हॉलदेखील अगदी अनोख्या पद्धतीने डिझाईन करण्यात आला होता.बैठ्या अम्फीथियेटरचा फील येत होता.काही टीम मेम्बर्स येऊन बसले होते,मिटींगला अजून दहा मिनिट बाकी होते.शेजारी बसता येईल
अशी जागा बघून दोघीही तिथे जाऊन बसल्या.बऱ्याच नजरा ऋतूकडे वळल्या.
बसल्यावर मोना ऋतूच्या कानात हळूच म्हणाली.

“बरं झालं वेळेत मिटिंगला आलो नाहीतर लेटकमर्ससाठी मिकाच्या म्हणजे आपली ह्या प्रोजेक्टची हेड, तिच्या शिक्षा अफलातून असतात.दोन दिवसांपूर्वी एकाला ऑफिसमधल्या प्रत्येक व्यक्तीला गुडमॉर्निंग म्हणून त्यांची साईन घ्यायला सांगितलेली, साईन घेता घेता गुडमॉर्निंगची आफ्टरनून झालेली.” हसू दाबत मोना म्हणाली.

“काय सांगतेस? How funny..mika means Panjabi guy? ऋतूने हसत हसत विचारलं.

“नाही गं, मिका म्हणजे मिनल कांबळेचा शॉर्टफॉर्म.डायनॅमिक पर्सनॅलिटी !तिच्याकडे पाहिल्यावरच पॉझिटिव्ह व्हाईब्झ येतात.एक्ससिलेंट लीडर. Very inspiring. ‘बॉस असावा तर मिकासारखा’ ही फ्रेजच बनली आहे तिच्यासाठी. ”

मिकाबद्दल ऐकून ऋतूला तिच्याविषयी एक उत्सुकता जागृत झाली .
मिटींग काही मिनिटांत सुरु होणार तसं सपूर्ण टीम हजर झाली,नाही म्हणायला ज्याचं लक्ष जाईल तो चोरट्या नजरेने एकदा ऋतूकडे नक्की बघून घेत होता.
जरावेळाने बरोबर ठरलेल्या वेळेला मिका आली.
मध्यम उंची आणि बांधा,निमगोरा रंग,बॉयकट,फॉर्मल शर्ट आणि पेन्सिल स्कर्ट.किंचित निळी झाक असलेल्या लेन्सेस.
मोनाने सांगितल्याप्रमाणे पाहिल्याबरोबर इम्प्रेशन पडावं असं तिचं व्यक्तिमत्व होतं. तिने मिटिंग सुरु केली.प्रोजेक्टचे बेसिक डिटेल्स दिले,क्लायंट requirement सांगितली आतापर्यंत प्रोजेक्टवर किती काम झालंय याची माहिती दिली.
ती म्हणाली-

“Koyna agro, tourism & research centre is our dream project and first government major project & we have to set up this as a brand, So guys we got brilliant ideas from our super talented copywriters. We have selected 5/6 of them and had tremendous brain storming over that ideas, then we have finalized some ideas ,presented to the client in yesterday’s meeting and got approval for one brilliant idea. Today we all will listen the concept behind it, will discuss all the aspects of that idea, so we have our brilliant writer with us- Rishi, now rishi will lead the meeting.”

सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. तो समोर आला. तो उंच,बऱ्यापैकी तब्येतीचा,लांब केसांची मागे पोनी,सावळासा ३३/३४ वर्षाचा सिनिअर कॉपीरायटरपैकी एक होता.
त्याने त्याचं प्रेझेंटेशन सुरु केलं.--

“To dream the impossible dream.
To right the unrightable wrong
To reach the unreachable stars
this is my quest to follow that stars.
No matter how hopeless no matter how far…!

एक क्लासिक ब्रॉडवे प्लेचा पार्ट त्याचा प्रेझेंटेशनमध्ये सुरु झाला.--त्याने बोलायला सुरुवात केली-

"सो गाईझ ह्या नाटकाच्या पार्टवरून,ह्या सॉंग वरून एव्हाना तुम्ही ओळखलच असेलच मी कुणाबद्दल बोलतोय Yes anybody?”

“Sir Don Quixote.”

पुढच्या बाजूला बसलेली एक मुलगी जरा ओरडून म्हणाली.

‘डॉन कीहोत्ये’ नाव ऐकल्याबरोबर पुढे बसलेले काही मेम्बर्स हसले.

‘जिने उत्तर दिलं ना ती काजल, ती ऋषीची गर्लफ्रेंड आहे.’
मोना हळूच ऋतूच्या कानात बोलली.

“Yes, सर 'डॉन कीहोत्ये-द लॉर्ड ऑफ ला मांचा' पण डॉन कीहोत्ये नाव ऐकल्यावर तुम्हाला हसू का आलं? कारण डॉन कीहोत्ये आणि त्याचा सोबती सांचो पांझा म्हणजे वेडेपणाचं मूर्तिमंत उदाहरण..”
ऋषी बोलतांना थांबला,पुढचे काही लोकं सोडले तर सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.

त्याने ते हेरलं-

‘एक मिनिट मागे बसलेल्या काही चेहऱ्यांवर who the hell is डॉन कीहोत्ये किंवा why the hell here is don Quixote असे भाव दिसताय...So let me explain-

‘डॉन कीहोत्ये’ सर्वांटीझ नावाच्या रायटरचं अजरामर पात्र, डॉन कीहोत्ये आणि त्याचा सोबती सांचो पांझा हे विलक्षण ध्येयाने झपाटलेले यात्रिक आहे. यांची यात्रा किंवा प्रवास म्हणूया तो खूप वेगळा आहे अगदी out of the world.डॉन कीहोत्ये बेसिकली प्रवास करतो ते जगातून वाईटच्या नयनाटासाठी,तर ह्या डॉनचा प्रवास म्हणजे विनोदी कथा, हसवायला,करमणूक करायला सांगितलेल्या गोष्टी,जसं की सर्वात फेमस असलेली त्याची windmill सोबतची लढाई.तो असं कुठल्याही काल्पनिक शत्रू सोबत लढतो,त्यांना हरवतो. अश्या गोष्टी लहान मुलांना करमणुकीसाठी सांगितल्या जातात पण ह्या सर्व उपहासावरची धूळ जर झटकली तर लक्षात येईल की डॉनला एका अद्भुत प्रवासाचं,साहसाचं वेड होतं,तहान होती,प्रवासातून, शोधातून काहीतरी इम्पोसीबल ड्रीम पूर्ण होईल ही अशा होती.
डॉन प्रत्येकवेळी हरतो पण तरी पुढच्या मोहिमेसाठी सांचोला धीर देतांना म्हणतो-“There is remedy for everything except death.’ आणि हा आत्मविश्वास त्याला त्याच्या प्रवासातून गवसतो.
If you see broadway play of Don Quixote there is very inspirational song named “impossible dream”
जे तुम्ही सुरुवातीला ऐकलं आणि ही सगळी स्टोरी सांगायचा उद्देश म्हणजे त्यातली एक लाईन म्हणजे आपल्या प्रोजेक्टची थीम असणार आहे आणि त्या आयडियावर आपल्याला काम करायचंय –ती म्हणजे
“This is my quest to follow the stars….”

हा प्रोजेक्ट टुरिझम,अग्रो टुरिझम आणि रिसर्च असा आहे सो भटकंती,शोध,प्रवास...हे शब्द आपल्याला फक्त विरंगुळा म्हणून बघायचे नाहीये तर प्रत्येक प्रवास एक quest असावा, एक कधीच न भागणारी तहान,स्वप्न दाखवणारा प्रवास,जरावेळ स्थिरावून पुन्हा पुन्हा नवी ओढ लावणारा...no matter how hopeless…पण ती क्वेस्ट जागृत ठेवायचीय. boredam,रुटीन लाईफच्या कधीही नामोहरम न होणाऱ्या शत्रूला हरवता आलं पाहिजे,जग वास्तव आहे तसं बघण्यापेक्षा त्याला larger than life बघता आलं पाहिजे,स्टुपीडिटी करता यायला हवी,थोडा वेळ का होईना प्रवाश्याला बिनधास्त डॉन कीहोत्ये बनता आलं पाहिजे.
का आपल्याकडे tourism,trip,travel ह्या गोष्टींना एकाच फ्रेममधून पाहिलं जातं?
कुठल्याही फेमस spot आठवा तिथल्या क्लिशे गोष्टी अनुभवण्यातच लोकांना ट्रीप पूर्ण झाल्याचं समाधान असतं.
लग्न मुहुर्तांच्या महिन्यांनतर तर प्रत्येक स्पॉटवर लाल चुडिया न सिंदूर आणि शोर्टस घातलेल्या swagवाल्या नववधू आणि तिच्यामागे कामेरा घेऊन फिरणारा नवरा...क्लिशे!
रेसोर्टवर स्विमिंग,कॅरम,चेस,अंताक्षरी टाइप्स खेळ खेळणाऱ्या फामिलीज..क्लिशे!
ह्या टुरिझम प्लेसेसकडे पर्यायाने निसर्गाकडे देण्यासारखं आणि आपल्याकडे घेण्यासारखं खूप काही आहे पण आपण निवडतो ते फक्त क्लिशे.
कॉपी लिहण्या अगोदर आपल्या प्रोजेक्ट साईटला आम्ही काही दिवस राहून आलो.काही रेफरन्स बुक्स वाचले,साहित्य वाचलं आणि एक लक्षात आलं की आपण पर्यटन ही संकल्पनाच वेगळ्या लेव्हलवर नेऊ शकतो.का नेहमी तीच tag line ?
‘निसर्गाच्या कुशीत,निसर्ग साद घालतो,मायेच्या हिरव्या पदरात & all का? नको ना तेच ते! त्यापुढे जाऊया की जरा.
रिसर्च दरम्यान वाचलेलं एक example देतो -रातवापक्षी’ मिन्स ‘नाईटजारबर्ड’ हा ज्या पद्धतीने आवाज काढतो त्याच्या कित्येक कथा,कल्पना आहेत चितमपल्ली यांनी खास लिहलेला रेफरन्स म्हणजे
‘जे प्रेमिक भेटू शकले नाही त्यांचे सोल म्हणजे हा रातवा पक्षी आणि ते एकमेकांना रात्रभर साद घालत असतात.’
आपल्याला प्रोजेक्टजवळ अश्या जागा निवडता येतील जिथे असे रेफरन्स घेऊन love points बनवता येतील,तिथल्या कितीतरी आदिवासी स्थानिक लोकांना पक्षांचे उभेहूब आवाज काढता येतात,त्यांना टिकाऊ नैसर्गिक रंग बनवायचं ज्ञान आहे.
त्यांची संस्कृती वेगळी आहे त्यावर रिसर्च करणासाठी रिसर्चसला प्रोमोट करता येईल.त्यांच्या लोककथा विलक्षण आहे. रीडर्स,रायटर्ससाठी रीडिंग रायटिंग points बनवता येतील अजूनही बरंच काही फक्त हवी आहे ती ‘इटर्नल इनर क्वेस्ट’
So डॉन मधला हा ‘यात्रिक’ आपण एजन्सीवाल्यांनी समजून घ्यायचाय तर आपल्या सर्वसामान्य touristला tourismची ‘क्वेस्ट’ समजावून सांगायचीय.
‘ट्राव्हल क्वेस्ट’ हा समान धागा घेऊन तीन लेव्हलवर स्क्रिप्ट असणार आहे State, National & International tourist. त्यावर मिटिंग इनलाइन आहेत.
ह्या ट्राव्हल क्वेस्टवर अगोदर रिसर्च,अनाल्य्सीस होतील, क्लायंटला पहिला ड्राफ्ट प्रेसेंट होईल मग नेक्स्ट स्टेप...धिस इज अ ट्राव्हल क्वेस्ट.thanks guyz.”

आपली शेवटची स्लाईड दाखवून झाल्यावर त्याने प्रतिसादासाठी सर्वांकडे पहिले.टाळ्यांच्या कडकडाट झाला.त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.

“what a lovely idea rishi….a travel quest, eternal travel quest ,guys let’s start our work with this quest.
गाईज हा आपला व्हिजनरी प्रोजेक्ट आहे. हे मॉडेल जर popular झालं तर next tourism projects आपलेच असतील.वेळ कमी आहे so start it from this very moment got it? And one more thing let me introduce our new team member as a temporary resource all the way from Pune branch, Miss Rutuja.”

अचानकपणे नाव पुकारल्या गेल्याने ऋतू जरा भांबावून गेली आणि जरा घाबरतच उभी राहिली.
सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.बऱ्याचवेळापासून तिला बघायला कसरत करणाऱ्या काही नजरा पटकन तिच्याकडे वळल्या. तिने सर्वांना हसून प्रतिसाद दिला.

“For first three months Rutuja will join rishi’s team n will support them in post idea research, then she will help service department. ”

तिने मान डोलावली. क्लायंट सर्विसमधल्या काहींनी आनंदाने डोळे मिचकावले.

मिटिंगनंतर मिनल ऋतुजाला पर्सनली भेटली आणि नवीन कामासाठी शुभेच्छा दिल्या,तिचं प्रपोझल युनिक होतं हे देखील सांगायला ती विसरली नाही.ऋतूची वेगवेगळ्या टीम हेड्सशी ओळख करून दिली.तिला मघापासून आलेलं दडपण जरा दूर झालं.मोनासोबत कंपनीच्या अजून काही इंटरेस्टिंग सेक्शनची ओळख करून झाल्यावर तिने ऋषीच्या टीमसोबत कामाचं स्वरूप समजावून घेतलं,स्वतःसाठी जरा वर चढून खिडकीजवळ मचानासारखी जागा होती,ती तिने निवडली...असंच!
बाहेर आपल्याच विश्वात धावत असलेलं शहर आणि मनात तितक्याच वेगाने धावत असलेले विचार....मन धावतयं,धावतयं पण पोहचायचं कुठंच नाहीये...प्रवास ...फक्त प्रवास!

आजच्या प्रझेन्टेशनने एक प्रवास आयुष्यात काय देऊ शकतो आणि आयुष्य कुठे नेऊ शकतो याचा वेगळाच आयाम ,एक वेगळा विचार तिने अनुभवला होता आणि तिच्या मनात 'तो' प्रवास रुंजी घालायला लागला.त्याच्यासोबत अनुभवलेली आयुष्य सुंदर ,स्थिर असावं असं वाटणारी क्वेस्ट ,प्रेमाच्याही पलीकडे आयुष्याला गरजेची असणारी 'सोबत'.....पण पण...तिने सावरलं स्वतःला--

बऱ्याच वेळा पाऊलं फक्त चालतात काही वाटा कुठेच जात नाही.

***********
क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.