निरोप दहावीचा घेताना... Vikas Jarhad द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निरोप दहावीचा घेताना...

निरोप असा दहावीचा घेता ! ! ' नि रोप घेणे ' या शब्दांमध्येच कारुण्य भरलेले आहे . मग तो नवविवाहितेने माहेरघराचा निरोप घेणे असो , एखाद्या नोकरीचा किंवा शहराचा किंवा सहलीच्या गटाचा असो किंवा अगदी जगाचा निरोप घेणं असो ! हावी हे शालान्त वर्ष- शाळेतले शेवटचे वर्ष , काही शाळांमध्ये ११ वी आणि १२ वीचे वर्ग हे जोडून त्याच आवारात असले , तरी दहावी हे शाळेला निरोप देण्याचे वर्ष असते . त्यानंतर त्याच आवरात यायचे असले तरी कनिष्ठ महाविद्यालयाचा माहोल वेगळाच असतो . दहावीसाठीचा निरोप समारंभ ' हा तर मिरवण्याचा , मोठे झाल्याच्या जाणिवेचा , ताटातुटीच्या दुःखाचा , विलक्षण हुरहुर दाटण्याचा एक उत्कट प्रसंग असतो . या समारंभाच्या आठवणींमुळे म्हातारपणीसुद्धा अगदी गहिवरून येते . पण ... पण यावर्षी दहावीचे सर्व विद्यार्थी या समारंभाला मुकले करोनाच्या महासाथीमुळे असलेल्या संचार बंधनामुळे हा हृद्य कार्यक्रम शाळेत होऊ शकला नाही . प्रत्यक्ष नाही आणि अप्रत्यक्ष किंवा दूरस्थही नाही . एकूणच गेले वर्षभर शाळा - महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन- दूरस्थ पद्धतीने चालू होते . अनेक अडचणींवर मात करत सर्वांनी हे वर्षभर कष्टाने साधले . याबरोबर एकाग्रता , उत्साह , पिलाटी , निच हे मनोगुण जोपाराच्या मानी जातीन प्रयत्न केला . शिवाय करोनामुळे निर्माण झालेला ताण , भीती , चिंता , उदासीनता अशा त्रासदायक भावना थोपवल्या . दहावी आणि बारावीवाबतही हेच घडले . सहामाही आणि पूर्वपरीक्षा दूरस्थ पद्धतीने पार पडल्या . या परीक्षांमध्ये चढते गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे प्रयत्नशील राहिले ... आणि आता ? दहावीच्या अंतिम परीक्षाच रह झाल्या आणि बारावीच्या पुढे ढकलल्या आहेत , करोना काळामध्ये अथक आणि वेगळ्या प्रकारच्या वातावरणातल्या कष्टांच्या आधारे परीक्षेच्या ताणलेल्या धनुष्याला बाण जोडून नेम धरलेला असताना अचानक लक्ष्यच नाहीसे झाले काय करणार ? ... गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष शाळेत जाण्याची संधी जेमतेम ४-८ दिवस मिळाली . त्यामुळे निरोप समारंभ ' तर हुकला आणि आता परीक्षाही नाही , अशी दहावीची अवस्था झाली आहे . अपेक्षाभंगामुळे अस्वस्थता भरून राहिली आहे . विशेषतः दहावीची परीक्षा रद्द होण्याबाबत या सर्वांच्या प्रतिक्रिया काय आहेत ? त्यांची मनःस्थिती कशी आहे याचे सर्वेक्षण व्हायला हवे . कारण शालेय इतिहासात असे प्रथमच घडले आहे . भारतामध्ये या घटनेचे परिणाम दीर्घकालीन असू शकतील . त्यातही महाराष्ट्रापुरता विचार केला तर ग्रामीण भागातील , आर्थिक - सामाजिक दुर्बल गटातील , सतत उत्तम गुण मिळवणारे आणि जेमतेम उत्तीर्ण होणारे यांच्या मनःस्वास्थाचे चित्र काहीसे वेगवेगळे असू शकते . कारण विद्यार्थी आणि पालक यांनी दहावीच्या एकेका गुणासाठी केलेल्या झटापटीमध्ये खूप तफावत असणार . काही जिवाच्या कराराने एका नव्हे तर अर्ध्यागुणासाठी आटोकाट प्रयत्न करतात ; तर काहींना वाटते , की ' ठीक आहे ; दहावीच्या परीक्षेची गुणपत्रिका म्हणजेच सर्व काही असे नाही . पुणे शहरातील दहावीच्या काही विद्यार्थी आणि पालक यांच्याशी लामा प्रतिक्रियातून नेमकेपणाने अनेका गोष्टी सामान्या आल्या . प्रथम प्रचंड धक्का बसला । ' परीक्षांचे दिनांक पुढे जातील असा अंदाज होता , पण रद्द होतील अशी कल्पनासुद्धा मनाला शिवली नाही . त्यामुळे विद्यार्थ्यांची रडारड , संतापणे , सुत्न होणे , ' आपल्या हातात काहीच नाही ' या विचाराने हताश होणे , ' थोडे आधी का नाही सांगितले ' असा काकुळतीचा प्रश्न , अशा स्वाभाविक प्रतिक्रिया उमटल्या .महाविद्यालयाच्या काळात मी केवळ अभ्यास केला नाही, तर अनेक स्पर्धा गाजवल्या. नाट्य स्पर्धेसाठी नाटक बसतांना महिनोन्महिने घालवले. नाटक कोणते करायचे ? नाटकाची निवड ही मोठ्या वादविवादाने होत असे. मग भूमिका कोणी करायचा ? एखाद्या स्त्री पात्राला तयार करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जायचे. अशा महा प्रत्यययासाने नाटक वर राहायचे आणि मग त्याचा प्रयोग रंगायचा. आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा यांच्या वेळाही बोलणारा विद्यार्थी एखाद-दुसरा असायचा; पण त्याला टिकू देणारे आम्ही सर्वजण होतो. मग बक्षिसे मिळाली की आनंदाचा जल्लोष सोडायचा असे हे मोहरलेले दिवस आता संपले आहेत. महाविद्यालयात जागवले क्षण मला आठवतात. जेथे अनेक कार्यक्रम जन्मास आले ती कॅन्टीन आठवते. आता हळूहळू वैयक्तिक जबाबदारीची जाणीव होऊ लागली आहे. पंधरा वर्षे एकमेकांच्या साथीने महाविद्यालय विद्यालयाची वाटचाल केलेल्या दोस्तांच्या वाटा आता वेगवेगळ्या होणार होत्या. आकांत ध्यानात आला आणि सुरुवातीच्या नकारात्मक भावनांचा उद्रेक कमी होऊ लागला . लहानांना- अगदी दहावीतल्यांनासुद्धा - करोनाची लागण झाल्याचे कळल्यावर प्रकर्षाने जाणवले की प्रत्यक्ष परीक्षेसाठी जाणे - येणे , दीर्घकाळ एकत्र बसणे , हे करोनाची लाटच नव्हे , तर त्सुनामीसाठी निमंत्रण ठरेल ! आणि हे सर्व १५-१६ लक्ष विद्यार्थी , पालक , पर्यवेक्षक आणि परीक्षा यंत्रणेतील हजारोजण यांचा विचार केल्यावर मनोमन पटले . विचारांनी भावनांवर मात केल्यावर काहीशी समजूत पटली . शिवाय दूरस्थ परीक्षेबाबतही अनंत अडचणी आहेत . आता खूप काही मोलाचे गमावल्याची हळहळ वाटत आहे . विद्यार्थ्यांना गुणपत्रिका , शालान्त परीक्षेच्या निकालावर आधारलेले प्रमाणपत्र हे मिळणारच नाहीत ! ही गौरवास्पद कागदपत्रे आयुष्यभर मिरवायची असतात , ती आता नाहीतच ; ही कल्पना खूप दुःखदायक आहे . दहावीचा निकाल साजरा करताना कौतुक , पेढेवाटप , पारितोषिके , भेटवस्तू , पार्टी , शाळेच्या फलकावर झळकणारे नाव हे काही काही नाही . ही स्वप्ने विरून गेली . या १५-१६ वर्षांच्या मुलामुलींचा केवढा हिरमोड आहे हा ! पण काय करायचे ?