लग्नाची बोलणी (भाग 1) लेखक सुमित हजारे द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नाची बोलणी (भाग 1)

आज विश्वनाथाचे माई आबा गावावरून येणार या आनंदात विश्वनाथच्या घरी सकाळपासूनच माई आबांच्या स्वागताची लगबग तयारी सुरू होती विश्वनाथला तर इतका आनंद झाला की मी काय करू नि काय नाय असे त्याला झालं होतं कारण पहिल्यांदाच माई आबा दहा वर्षांनी मुंबईला येणार होते पोरांकडे तिथे घरी विश्वनाथाची लहान बहिण रमाची तर माई आबा येणार या आनंदात त्यांच्या आवडीचा पदार्थांचा घाट घातला होता माई आबा घरी आले तर त्यांच्यासाठी काय करू नि काय नाय असे तिला वाटत होते रमा इतकी खुश होती की त्या नादात ती विसरलीच की दादाने बाजारात जाऊन मटण आणायला सांगितलं होतं आबांना आवडते म्हणून ती तशीच ताडकन बाजारात जाऊन मटण घेऊन आली तिकडे माई आबा पण खुप आनंदित होते इतक्या वर्षानंतर पोरांची भेट होणार होती माईने तर विश्वनाथला आवडतात म्हणून पहाटे लवकरच ऊठून त्याच्या आवडीचे मोतीचूरचे लाडू बनवून डब्यात भरून ठेवले होते जेणेकरून विश्वनाथला मायेने आपल्या हातून लाडू भरवता येईल आबांनी तर लागलीच माईला सांगितले अगं माई कुठे आहेस तू आवरल का तुझ चल पटापट आवर आपल्याला निघाला हव उशीर होईल जायला सामान सर्व बँगेत भरल आहे ना ते तपासून पहा काय राहिलतर नाही ना त्यावरून माईनी आतून आवाज दिला अहो इतकी घाई कशाला करता आहे तुम्ही मी सगळं सामान बँगेत भरलेल आहे दोनदा तपासून झालं आहे माझ तुम्ही काय काळजी करू नका तसं नाय ग आपली एसटी सुटून जाईल आपल्या एसटीचे वेळ झाली आहे म्हणून म्हणतोय मी त्यावरून माई म्हणाल्या अहो आपल्या एसटीचे वेळ काय एक वाजता आणि आता किती वाजले आहेत घड्याळात दहा वाजले आहे अहो मग इतकी घाई कशाला करता आहेत अजून तीन तास आहेत तोपर्यंत बाकीचे माझ काम आवरून घेते नि मी मग तयार होते मग आपण निघुयात तितक्यात आभा म्हणाले अग माई ठाव आहे ना तुला आपल्या वाड्यापासून एसटी स्टँडला जायला अर्धा तास लागतो म्हणून त्यावर माई चिडल्या (वरच्या स्वरात) अहो माहिती आहे मला तुम्ही शांत बसा बघू घाई करू नका आपण वेळेवर पोहोचू एचटी स्टँड वर झाल तर मग मि शांत बसतो काही बोलणार नाय तुला होऊ दे तुझ्या मनासारख आबा शांत राहिले पोरांना भेटण्याचा ओढीने आबांचा जीव कासावीस झाला होता कधी एकदा पोरांना भेटतो असं त्यांच झाल होत त्यामुळेच त्यांचा लवकर निघण्याचा खटाटोप चालला होता थोड्यावेळाने माई तिथे आल्या आणि आबांना म्हणाल्या निघायचं का आता आपण हो हो निघूया आपण आबा म्हणाले तसे ते दोघे एसटीला जाण्याकरिता पायी निघाले दुपारची साडे बाराची वेळ झाली होती त्या दोघांनी हळू हळू चालत कसबस एसटी स्टँड गाठल आणि समोरच मुंबईला जाणारी त्यांची एसटी उभी होती एसटी सुटण्याची वेळही झाली होती माई आबांनी जीव मुठीत धरून कशीबशी ती एसटी पकडली आणि आपापल्या जागेवर जाऊन बसले काही वेळा करिता ही एसटी सुटते की काय आणि आपण इथेच राहतो की काय असे माई आबांना वाटु लागले आणि माई आबांनी सुटकेचा निःश्वास सोडला व थोड्यावेळाने त्यांचा मुंबईचा दिशेने प्रवास सुरू झाला आबा माईला बोलले बघितला हा उशिरा निघण्याचा परिणाम आहे कानी कपाळी ओरडून बोलत होतो लवकर निघा म्हणून पण माझ कोण ऐकत माई रागावून बोलल्या तुम्ही शांत बसता का जरा एसटी भेटली आहे ना आता हो हो बसतो शांत (खालच्या स्वरात) आबा माईला म्हणाले तिकडे रमा रुसून बसली होती माई आबा केव्हा येणार म्हणून तिने दादाला विचारले अरे दादा माई आबा अजून का नाही आलेत ऐवाना ते आले पहिजे होते त्यावर विश्वनाथनी हास्य स्मित करत रमेच्या प्रश्नाचे उत्तर दिले अग रमे तु चिंता करू नको माई आबा येथीलच इतक्यात त्यांची एसटी येण्याची वेळ झाली आहे मी एसटी स्टँड ला जातो आणि माई आबांना घरी घेऊन येतो मग तर झालं ना हो चालेल लवकर जा आणि माई आबांना घरी घेऊनच ये विश्वनाथ ठीक आहे चल मी निघतो मला उशीर होईल आता तू माई आबांनाच्या स्वागताची तयारी करायला घे मि माई आबांना घेऊन येतो घरी विश्वनाथ रमेला म्हणाला आणि तो माई आबांना आणायला एसटी स्टँड ला गेला तिथे गेल्यावर विश्वनाथला माई आबा दिसले आणि त्याचा आनंद काहीसा द्विगुणीत झाला