याच्या उलट एक घटना शिवाजीराजांच्या नातलगा बाबत घडली. शिवाजीराजांचे नातलग बजाजी निंबाळकर होते. बजाजी निंबाळकर हे सईबाईचे सख्खे भाऊ होते . शिवाजी महाराजांचे सख्खे मेहुणे होते. महाराणी सईबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या.....
मात्र बजाजी निंबाळकर हे हिंदू नव्हते. ते मुसलमान होते. जन्माने नाही. जबरदस्तीने झालेले मुसलमान. बजाजी निंबाळकर यांचे धर्मांतर झाले होते. त्यामुळे त्यांच्या घराण्याला कलंक लागला होता. तो कलंक काढण्याचे काम शिवाजी महाराजांनी ठरवले . त्या मध्ये सुद्धा एक प्रकारची कला राजांनी वापरली होती. दुसऱ्यांचे मन वळवणे.... जिजाबाई महाराजांचे मन वळवणे आणि त्यांची परवानगी घेणे. बजाजीचे शुद्धीकरण करायचे आहे ही गोष्ट फक्त राजांनी आधी स्वतःजवळ गुप्त ठेवली होती. त्या गोष्टीची बाहेर कुठे वाच्यता केली नव्हती.
मां साहेबांना ती गोष्ट सांगण्यासाठी त्यांनी वातावरण निर्मिती केली पवित्र अशा मंदिराच्या ठिकाणी देव दर्शनाच्या वेळी ती गोष्ट घडवून आणली. बजाजीचे शुद्धीकरण होण्यासाठी शिवाजीराजांनी जिजाबाईंची भेट घडवली . मांसाहेब जिजाआईंचा काय विचार आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे होते. ज्यावेळी बजाजींचा भेटीचा निरोप शिवाजी महाराजांना आला .त्यावेळी शिवाजी महाराजांनी मांसाहेबाना न सांगता . देव दर्शनाच्या वेळी कुणाला कल्पना न देता बजाजीला बोलावले. मंदिरातली पूजा आटोपल्यावर महाराजांनी मासाहेबांना सेवका करवी कळवले.
बजाजी भेटीला आला आहे.
बजाजी कुठे आहे मां साहेबांनी शिवाजींना विचारले. त्यावेळी मासाहेबांचा अंदाज घेत शिवाजी महाराज म्हणाले .मांसाहेब बजाजी खाली पायथ्याशी उभा आहे. तुमची वाट बघतो आहे...
मांसाहेब हलकेच हसल्या. परंतु चेहऱ्यावर काहीच न दाखवता त्या शिवाजी महाराजांना म्हणाल्या.
त्यांला थांबायला सांगा .आम्हाला भेटायचे आहे.
ते ऐकताच शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. त्याक्षणीच शिवाजी महाराजांच्या मनातले काम झाले होते. पूजा आटोपून जिजाआई खाली पायथ्यापाशी आल्या .
तिथे मुसलमान वेशातला बजाजी उभा होता.
दाढी वाढलेली,
अंगात मुसलमानी पद्धतीचा अंगरखा.
डोक्यावर मुसलमानी पद्धतीचा टोप...
बजाजीचे हे रूप बघून शिवाजी महाराजांच्या आणि मासाहेबांच्या मनात खूप कळवळून आलं. शिवाजी महाराजांच्या मनातील भावना ओळखून मां साहेब म्हणाल्या.
शिवबा बजाजीला स्वराज्यात घे... त्या बरोबर शिवाजी महाराज आनंदले... राजांनी आनंदाने जिजाआईं कडे पाहिले.
मात्र त्यांचा तो आनंद जास्त काळ टिकला नाही. जिजाई शिवाजी महाराजांच्या जवळ येत म्हणाल्या शिवबा... तुला मी चांगलं ओळखते. बजाजीला स्वराज्यात घेण्यासाठी तू ही युक्ती वापरलीस ना.
तूच त्याला बोलावलेस ना आणि मला सांगितलं नाहीस .तुला ही गोष्ट माहीत होती की बजाजी येणार आहे..
होय मांसाहेब ... बजाजी येणार आहे हे मला माहीत होतं परंतु...
जाऊ दे शिवबा.. तू एक चांगलं काम करतो आहेस. असे म्हणून हसत हसत मांसाहेब मंदिराच्या पायऱ्या उतरू लागल्या. त्यांच्या मागोमाग हळू हळू सर्वजण आनंदाने मंदिराच्या पायऱ्यावरून खाली येऊ लागले. शिवाजी महाराजांच्या या गुणाकडे सर्वजण आदराने बघत होते. शिवाजी महाराजांसारखा गुणवंत राजा मिळाला म्हणून सगळ्यांना खूपच आनंद झाला होता. शिवाजी राजे मनातून खूपच आनंदी झाले होते .
परंतु ते वरून तसे दाखवत नव्हते. बजाजी एकदा स्वराज्यात आला की त्याला स्वराज्याच्या बाराखडीची भाषा चांगल्या प्रकारे शिकवून एक उत्तम योद्धा बनवण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधला होता. बजाजीला उत्तम प्रशिक्षण देऊन एक प्रकारचा उत्तम मावळा बनवून बजाजीला त्याचे झालेले मागचे कर्म विसरायला लावायचे. बजाजीला प्रशिक्षण देण्याची गरज होती .महाराजांनी ते मनाशी आधीच ठरवले होते. बजाजीचे समुपदेशन करून त्याच्या मनातून मुसलमानी विचार घालवून देण्यासाठी बजाजीला खूप मोठी ट्रेनिंग द्यावी लागणार आहे .हे त्यांनी ओळखले होते.. इतकी वर्षे बजाजी मुसलमानी लोकांमध्ये राहिला होता.
त्याच्या मनातले मळभ दूर करून त्याला हिंदू धर्माचे पुन्हा बाळकडू पाजावे लागतील हे त्यांनी ओळखले होते. बजाजीची एक मुसलमान बायको होती. ती मुसलमान बायको मरण पावली होती. बजाजीच्या हिंदू बायकोने बजाजी ने मुसलमान धर्मांतर केल्यामुळे स्वतःहून मृत्यूला कवटाळले होते. समाजात बजाजीची छी थू झाली होती. ती छी थू ची अवहेलना नष्ट करून बजाजीला समाजात पुन्हा सन्मान मिळायला हवा. तरच बजाजी सारखी माणसे पुन्हा हिंदू धर्मात येतील. यासाठी बजाजीचे खूप मोठे समुपदेशन करावे लागणार होते. त्याबाबत शिवाजी महाराजांची तयारी झाली होती. शिवाजी महाराजांच्या मनात असंख्य विचार येत होते. बजाजी बाबत पुढे काय करता येईल. यावर त्यांचे मन आडाखे बांधू लागले होते. बजाजी त्यांचा सख्खा मेव्हणा असल्यामुळे तो पुन्हा जर मुसलमान झाला तर अनर्थ ठरणार होता. शिवाजी महाराजांच्या घराण्याची पत पुन्हा खाली आली असती. म्हणून उत्तम समुपदेशन करून त्याच्या मनातून पूर्ण मुसलमानी विचार काढून टाकण्यासाठी राजांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती.
मात्र राजांचे अर्धे काम झाले होते. बजाजी स्वतःहून त्यांना भेटायला आला होता. याचा अर्थ तो हिंदू धर्मात येऊन शुद्धीकरण करण्यास तयार होता. मात्र बजाजी हिंदू धर्मात यावा यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक प्रयत्न केले होते. बजाजीला अनेक निरोप यापूर्वी दिले होते. त्या मेहनतीचे फळ त्यांना दिसत होते... बजाजी जरी मुसलमानी लोकांच्या गराड्यात होता. तरी शिवाजी महाराजांच्या मावळ्यां करवी निरोप जाऊन त्याला हिंदू धर्माची शिकवण मिळत होती.
हे ऑनलाईन शिक्षणाचे धडे शिवाजी महाराजांनी त्यांच्या दुतां मार्फत, मावळ्याकरवी फार पूर्वीच बजाजीला देण्याची सुरुवात केली होती . त्यामुळेच तर बजाजचे मनपरिवर्तन घडले होते... बजाजीचे शिक्षण चालूच होते. ते अजिबात बंद पडले नव्हते. शिवाजी महाराज त्याची ऑनलाइन पद्धतीने हिंदू धर्माबद्दल उजळणी घेत होते. स्वराज्याच्या मावळ्यां करवी बजाजीला अधून मधून हिंदवी स्वराज्याचे पाढे पाठ करण्याचे धडे मिळत होते. महाराजांच्या तर्फे त्याची ऑनलाइन शिकवणी चालू होती...
शिवाजीराजांचा मेहुणा बजाजी हिंदू धर्मात पुन्हा येणार अशी चर्चा शास्त्रीय पंडिता मध्ये सुरू झाली. सर्व मंडळी आश्चर्याने राज्यांच्या या कृतीकडे बघत होती. हिंदू माणसे धर्मांतर करून मुसलमान बनवली जात होती .मात्र मुसलमान बनलेला माणूस पुन्हा हिंदू बनणार होता .याबाबत सर्वांना खूपच मोठे नवल वाटत होते. हे अघटित छत्रपती शिवाजी महाराज बनवणार होते. त्यासाठी शिवाजी महाराजांना शास्त्रीपंडितांनीचे सुद्धा समुपदेशन करणे भाग पडणार होते. त्या तयारीला शिवाजी महाराज लागले होते. त्यांनी पहिले पाऊल टाकले होते.
शास्त्रीपंडितांनी चर्चा करून शिवाजी महाराजांनी तो गुंता सोडवला होता.
सभेच्या शामियाना मध्ये शिवाजीराजे उच्च आसनावर बसले होते. सभेमध्ये बजाजीला बघून सर्वांना आश्चर्य वाटत होते. त्याच वेळी शास्त्रीपंडित यामध्ये कुजबुज झाली. त्यांनी नाराजीचा सूर लावला ....
बजाजी मुसलमान झालेले आहेत. त्यांनी धर्म बदलला आहे. त्या माणसाला पुन्हा हिंदू धर्मात घेणं योग्य नाही.
त्यांची उत्तरे ऐकून बजाजी चपापला. आपण उगीच इथे आलो असे त्याला वाटू लागले .त्याने शिवाजी महाराजांकडे पाहिले .शिवाजी महाराज एकदम शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. ते निर्मळ स्मितहास्य करीत शास्त्रीपंडीताना म्हणाले .
धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याची आमची इच्छा नाही. पण परिस्थिती आता पूर्वीसारखी झाली नाही. जर आपण बजाजीला हिंदू धर्म घेतले नाही तर असे अनेक बजाजी यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात दिसतील. परंतु आपण बजाजींना हिंदू धर्मात पुन्हा घेतले तर अनेक मराठी लोक जे धर्मांतरीत झाले आहेत. त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. हिंदू धर्माच्या धर्मांतराला आळा बसेल. नवीन पायंडा पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ती नवनिर्माणाची संधी स्वराज्याने आपल्याला दिली आहे. त्या संधीचा फायदा घेऊन आपण महाराष्ट्राच्या धर्मांतरित जनतेचे सोने केले पाहिजे. त्यांचे हे वैचारिक चालणारे भाषण बघून शास्त्री पंडित सुद्धा नरमले. शास्त्रीपंडितांनी बजाजीच्या शुद्धीकरणाला सहमती दर्शवली. ते ऐकून जिजाआईंच्या चेहर्यावर हलकेच समाधानाची लकेर उमटली. बजाजीचे शुद्धीकरण समारंभपूर्वक करण्यात आले. त्यामध्ये ग्रहशांती, होम आणि बजाजीचे प्रायश्चित विधी करून त्याचे हिंदू धर्मात स्वागत करण्यात आले. तो मोठा क्षण शिवाजी महाराजे एक महान शिक्षक ,एक मोठा प्रशिक्षक आणि एक प्रचंड विचारांचा समुपदेशक या दृष्टीने समोर आणीत होते. तो नेमका क्षण शिवाजीराजांनी पकडला होता आणि एक नवीनच पायंडा स्वराज्य मध्ये सुरु झाला होता त्या पायंडयाची प्रथम पायरी बजाजी होता. मुसलमानी राज्य धर्मांतरित झालेल्या बजाजी आता महाराजांच्या प्रेरणेने स्वराज्यरक्षक झाला होता... मात्र त्याचं श्रेय शिवाजीराजांनी शास्त्री पंडीतांना दिलं होतं.
कुठे काय करायचे ...
कुठे कसे वागायचे...
कुणाला कोणते श्रेय द्यायचे...
कधी द्यायचे...
किती प्रमाणात द्यायचे ...
कसे बोलायचे....
कसे एखाद्याला समजवायचे...
कसे गैरसमज दूर करायचे...
कोणते शब्द... कोणत्या वेळी बोलायचे...
याची जाण शिवाजी महाराजांना होती. ते उत्तम प्रशिक्षक आणि शिक्षण असल्यामुळेच त्यांच्यामध्ये अधिक जाणतेपणाने विचार करण्याची सवय अधिक खोलवर रुतली होती. त्यांच्या शिक्षक आणि प्रशिक्षक गुणामुळे नवनवीन गोष्टींची सुरुवात व्हायला झाली होती.
बजाजी हिंदू झाले याचा सर्वात मोठा आनंद शिवाजी महाराज, मांसाहेब आणि बजाजीची बहिण सईबाईंना झाला होता. आपला मुसलमान झालेला भाऊ पुन्हा हिंदू धर्मात आला हे बघून कोणत्या बहीणीला आनंद वाटणार नाही. ज्यामुळे मान खाली घालावी लागत होती. ती मान आता ताठ उंच झाली होती.
सईबाईंनी शिवाजी महाराजांच्या पाया पडून त्यांचे खूप मोठे आभार मानले होते.
सईबाई राजांना म्हणाल्या.
राजे तुम्ही माझ्या मनातले कसे ओळखलेत.
शिवाजी महाराज म्हणाले. तुम्ही आमच्या अर्धांगिनी आहात .तुमच्या मनातले आम्ही ओळखणार नाही.
तर कोणाच्या मनातले ओळखणार ....
यावर सईबाई फक्त समाधान पूर्वक हसल्या.
हा प्रसंग वाचताना वाचकांच्या मनात सुद्धा खूपच दाटून येईल.
त्यांचे मन भरून येईल.
हृदय गहिवरून येईल.
अभिमानाचे अश्रू बाहेर पडतील .
जसे माझे झाले तसे.
तसे झाले तर शिवाजी महाराजांच्या कृतीचे समर्थन उस्फूर्तपणे पूर्ण होईल.
शिवाजी राजांच्या निर्णयाने अनेक मावळ्यांची छाती अभिमानाने भरून गेली . काही मावळे हा कार्यक्रम बघून , हि बातमी ऐकून. आनंदाने स्फुंदत रडू लागले. ते बघून बजाजीला सुद्धा अश्रू अनावर झाले .
शिवाजी महाराज एकावर एक उत्तम आणि एका पेक्षा एक चांगले निर्णय घेत होते .ते बघून शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता आणि विचार किती अफाट आहेत याची प्रत्येकाला खात्री होत होती. बजाजीचे शुद्धीकरण करणाऱ्या शास्त्री पंडितांना सुद्धा शिवाजी महाराजांच्या या निर्णयामुळे एक वेगळाच अनुभव मिळाला .
अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांच्यामध्ये जास्त न शिरता राजांनी एक नवीन पायंडा पाडला. याबद्दल त्यांनी स्वराज्याची वेगळ्या प्रकारची ओळख केली होती. अन ती ओळख निर्माण करण्यास शास्त्री पंडितांचा हातभार लागला होता.... मात्र या गोष्टीने काही पंडित नाराज झाले होते एवढे मात्र खरे .परंतु राजांनी त्याकडे दुर्लक्ष केले .नवीन गोष्टी करताना जुन्या गोष्टी किरकिर करणारच .याबाबत त्यांना माहित होते.
बजाजीच्या शुद्धीकरण कार्यक्रमानंतर आणखी थोड्या दिवसांनी जे घडलं त्या घटनेने सर्वजण हादरले. अगदी जिजाई सुद्धा...
शिवाजीराजांनी बजाजीच्या मुलाला महादजीला आपली मुलगी सखु दिली होती.
बजाजीचा मुलगा महादजी.
सईबाई आणि शिवाजीराजे या दोघा उभयतांची लाडकी मुलगी सखूचे लग्न त्यांनी महादजीशी लावण्याचं ठरवलं होतं. ही गोष्ट जेव्हा जिजाईंना कळली. तेव्हा जिजाईना सुद्धा थोडा फार धक्का बसला होता. त्याबद्दल जिजाईंनी शिवाजी राजांना विचारले.
तेव्हा शिवाजी महाराज जिजाईंना वंदन करून म्हणाले...
जिजाई मांसाहेब बजाजीच्या घरामध्ये आपली सखु गेली . तर त्याबद्दल समाजामध्ये चांगला संदेश जाईल. कारण नुसतं बजाजीला हिंदू धर्मात घेऊन चालणार नाही.
त्याला हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. त्याच्याशी जे लोकं बोलत नाहीत .
त्याला जवळ घेत नाहीत.
सध्या त्याच्याशी फटकून वागतात.
त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की...
शिवाजी महाराजांचे शुद्धीकरण कार्य म्हणजे नुसता स्वार्थनाही. तर शुद्ध हिंदुत्व आहे...
शिवाजी राजांकडे मांसाहेब बघतच राहिल्या.
सईबाईंना तर हुंदकाच फुटला.
जवळच उभा राहून ऐकत असलेल्या बजाजीच्या सर्वांगातून एक आनंदाची लकेर उमटली.
बजाजीचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. बजाजीचा आनंद गगनात मावत नव्हता.
ही बातमी साऱ्या स्वराज्यात पसरली आणि स्वराज्यात शिवाजी महाराजांचं नाव चांगल्या विचारांच्या मोठ्या माणसासाठी घेतले जाऊ लागले. अभिमानाच्या विचारावर आधारित केलेली उत्तम कृती. अशी चर्चा रयतेत सुरू झाली..... रयतेमध्ये ही कुजबुज वाढत होती. बजाजीच्या शुद्धीकरणाची कुजबुज वाढत वाढत ती महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत पोहचली. बादशहाच्या कानामध्ये जाऊन थांबली... बादशहाने कान टवकारले. त्याचे डोळे चिंतेने ग्रासले. शिवाजी राजांच्या उदारमतवादाला त्याने मनातुनच सलाम केला.
त्याच वेळी तो दात-ओठ खात होता.
शिवाजीराजांनी केलेल्या नव्या प्रथेने मागच्या सर्व अंधश्रद्धांचा विश्वविक्रम मोडला होता.
स्वराज्याचा मार्ग अधिक आधुनिक झाला होता.
सर्व जनतेमध्ये विचार पोचला होता.
महाराष्ट्राभर शिवाजीचे राज्य येईल.... जनता सुखी होईल...
जय जय शिवाजी.... जय जय शिवाजी... जय जय शिवाजी.
प्रत्येकाच्या मनात गजर वाजत होता. त्या गजराचा ध्वनी महाराष्ट्रभर गुंजत होता. रायगडावर भगवा ध्वज डौलाने डोलू लागला होता...