शिवाजी महाराज अध्यात्मिक वृत्तीचे होते. अध्यात्माचे अधिष्ठान त्यांच्या राज्यात महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाले होते. तरीसुद्धा परकीयाकडून मंदिरे लुटली जात होती .मंदिरे पाडली जात होती. पूजा बंदी होती .उत्सव बंदी होती .अशा अनेक घटना या काळात घडत होत्या त्याचा शिवाजीमहाराजांच्या मनावर खूपच परिणाम होत होता. स्वराज्याचे परकीय शत्रू म्हणजे इराणी, पठाण , मुस्लिम , इंग्रज होते. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात प्रवेश करणाऱ्या मावळ्यांच्या रूपात पक्के गुप्तहेर खाते तयार केले होते. याचा अर्थ औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांचे असंख्य गुप्तहेर होते. त्यामुळे तिकडची माहिती इकडे महाराष्ट्रात लगेच कळत होती.
राजांनी सैनिकांमध्ये, मावळ्यामध्ये समानतेचे तत्व ठेवले होते. त्यांच्याशी जिवाभावाची मैत्री निर्माण केली होती. त्यामुळे एकोपा वाढायला मदत झाली होती. स्वतः शिवाजी महाराज मावळ्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत त्यांनी आणलेल्या भाकरी आणि भाजीची चव घेत होते. त्यामुळे मावळ्यांना समजत होते की आपला राजा हा आपल्या स्वतःचा आहे. आपल्या प्रमाणे जगतो...
आपल्याप्रमाणेच खातो
अनेक गोष्टी करतो.
आपल्याप्रमाणेच विचार करतो.
या गोष्टीमुळे मावळे आणि शिवाजी महाराज यांच्यामधील अंतर खूपच कमी झाले होते . त्यांच्यामध्ये मैत्री वाढत होती. ती मैत्री अधिकच दृढ होत होती. अशाप्रकारे एका शिक्षकाच्या रूपात प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिवाजी महाराज प्रत्येकाला प्रात्यक्षिका सहित स्वराज्य प्रशिक्षण देत होते. त्यामुळे आयत्या वेळेस त्यांचा रणांगणावर गडबड गोंधळ उडत नव्हता.
शिवाजीमहाराज साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरून स्वराज्याचा विस्तार करीत होते आणि शत्रूचे मनोधैर्य कमी करीत होते. आदिलशहा जनतेला क्रूर शिक्षा द्यायचा.
डोळे फोडणे.
मालमत्ता जाळणे ..
दंड बसवणे.
शेती जाळणे
कुटुंबासह तोफेच्या तोंडी देणे.
हत्तीच्या पायाखाली किंवा घोड्याच्या टापा खाली चिरडून मारणे.
अशा प्रकारच्या क्रुर शिक्षा तो देत होता. त्या शिक्षा खरोखरच भयंकर होत्या.
शिवाजी महाराजांचे अनेक नातलग स्वराज्याच्या विरोधात उभे होते. तरी पण अत्यंत नियोजनपूर्वक शिवाजी महाराजांनी स्वराज्य शून्यातून निर्माण केले
आदिलशहा जुलूम जबरदस्ती करणारा होता.
मात्र शिवाजीराजांकडे स्वराज्याचे तत्वज्ञान होते. शिवाजीराजांनी मावळ्यांना ध्येयवाद शिकवला. मग मात्र एकदा शिकवलेला ध्येयवाद मावळे कधीच विसरले नाहीत. शिवाजी महाराज काही काळी प्रसंगी कल्पक बुद्धी वापरत .ते शत्रूला स्वतःच्या जाळ्यात अलगद अडकवत.
राजांनी शेतकरी, सामान्य माणूस या सर्वांना स्वराज्याच्या सेवेत सामावून घेतले होते. शेतकरी, सामान्य माणूस ,गरीब माणूस या सर्वांना विनाअट स्वराज्याच्या कार्यात शिवाजीराजांनी सामावून घेतले होते.. इतका दिलदारपणा त्यांच्याकडे नक्कीच होता. शिवाजी महाराजांचा दिल दर्या होता.
शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा एक भाऊ होता. त्याचे नाव शरीफजी...
हे नाव ऐकायला थोडे वेगळे वाटते. आदिलशहाच्या बाजूने शहाजीराजे आणि शरीफजी एका लढाईत लढत होते .त्यामध्ये शहाजी राजांचा भाऊ शरीफजी ठार झाला. त्या लढाईनंतर आदिलशहाने शहाजीराजांना 'सरलष्कर' अशी पदवी बहाल केली. शहाजीराजे खूपच पराक्रमी होते.
मावळे बोलताना शिवाजीराजांना ' राजे ' असे हाक मारत . तो ' ' राजे ' नावाचा शब्द मावळ्यांना शक्ती देणारा होता. त्या शब्दातूनच मावळ्यांना जाणीव व्हायची. आपला पण एक राजा आहे. शिवाजी महाराजांच्या राजेपणाच्या रूपाने रयतेला जगण्याचे उदात्त कारण मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज वाचन, युद्धकला ,घोडेस्वारी व लेखन करायला शिकले होते. रायरेश्वराच्या देवळात शिवरायांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तो काळ सोळाशे पंचेचाळीसचा आहे...
शिवाजी राजांचे मावळे गनिमी कावा शिकत होते.
म्हणजे ते नक्की काय शिकत होते .हे पाहिल्यावर आपल्याला समजते की शिवाजी महाराजांचे मावळे तलवार चालवणे दांडपट्टा फिरवणे घोडेस्वारी, शस्त्रविद्या अशा प्रकारचे शिक्षण घेत होते. आजच्या भाषेत याला ट्रेनिंग म्हणतात. अशा प्रकारचे ट्रेनिंग सर्व मावळ्यांना विनामूल्य दिले जात होते. हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. कारण आजकाल अनेक कोर्सेस आहेत. त्या प्रत्येक कोर्सला विद्यार्थ्यांना फी द्यावी लागते. मात्र या ठिकाणी शिवाजी महाराज प्रत्येकाला मोफत शिक्षण देत होते. हल्ली सैन्यात जायचे असेल अथवा पोलीस भरतीमध्ये जायचे असेल तर अनेक क्लासेस निघाले आहेत. त्या क्लासेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फी भरावी लागते. त्यांना शिक्षण दिले जाते. थोडक्यात आज-काल पैसे भरून ट्रेनिंग मिळते.
शिवाजी राजांच्या काळात बेरोजगारी नव्हती. कारण लोकांना कामच नव्हते. ते माती, शेती, जंगलातली कामे करायची. एवढेच त्यांना माहीत होते. त्यामुळे प्रथमच सैन्यामध्ये भरती व्हायला . मावळे म्हणून भरती व्हायला स्वेच्छेने अनेक तरुण येत होते. शस्त्रविद्या शिकून स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राण अर्पण तयार करायला सिद्ध होते. जसजशी स्वराज्याची सीमा वाढत राहिली. तसतसे शिवाजीराजांना शत्रूची लूट किंवा महसूल मिळत राहिला.
त्या आधारे विविध रकमेत शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना सैनिकांना पगार द्यायला सुरुवात केली. याचाच अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांचे साम्राज्य वाढत होते . स्वराज्यामध्ये पैशाचा ओघ यायला सुरुवात झाली होती. हे महाराष्ट्रातील मावळ्यांना नवीन होते. नोकरी देणारा राजा. आपला मराठी राजा आहे .त्या मराठी राजाच्या हाताखाली काम करायचे. तर अजिबात भिती नव्हती. उलट उत्साहच होता. मोठ्या संख्येने तरुण मावळे बनायला येत होते. थोडक्यात महाराजांनी एक राष्ट्र संघटना निर्माण केली होती. त्या कार्याला महाराष्ट्रातील बहुतेक जणांनी डोक्यावर उचलून घेतले होते. त्यामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक जण आतुर होता. मावळा बनायला तयार होता..
त्यावेळचा तरुण किंवा वयस्कर माणूस सुद्धा तत्पर होता. स्वराज्याच्या सैनिक भरती मध्ये वयाची अट नव्हती. शिक्षणाची अट नव्हती. शारीरिक पात्रतेची अट खास नव्हती. फक्त होते... स्वराज्यासाठीचे झपाटलेपण...
त्यासाठी अनेकांना पगार सुद्धा नको होता. त्यांना पगाराची अपेक्षा सुद्धा नव्हती. मात्र शिवाजीराजांनी स्वतःहून त्यांना पगार दिला होता.
त्या वेळच्या तरुणी सुद्धा स्वराज्यासाठी लढायला तयार होत्या. परंतु त्यांच्या अडीअडचणी वाढू नयेत म्हणून त्यांना मावळा बनण्यास इच्छा असून सुद्धा मावळा शिक्षण जमणारे नव्हते. कारण शत्रु इतका भयंकर होता की स्त्री किंवा महिला दिसली की शत्रु सरळ त्यांच्यावर बलात्कार करायला कमी करीत नव्हता. अनेकांच्या आया-बहिणी ,मुली यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. त्यामुळे स्त्रियांची जोखीम नको म्हणून त्यांना मावळा बनण्यास संधी मिळत नव्हती. तरीही काही स्त्रिया या ना त्या कारणाने स्वराज्याला मदत करणाऱ्या होत्या. त्या गुप्तपणे स्वराज्याला सहाय्य करत होत्या. त्यांची संख्या अगदीच कमी होती.तरी ते स्वराज्याच्या हिताचे होते.... अनेक बेरोजगार लोकांना राजांनी स्वराज्य निर्माण करून रोजगार पुरवला होता.
असा महान राजा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता. बेरोजगार हातांना काम आणि गरिबांना शेतकऱ्यांना सुद्धा कामे देऊन त्यांचं जीवन स्थिरस्थावर करणारा मराठी राजामाणूस बनण्याचा सन्मान छत्रपतींना मिळाला होता.लाखो बेरोजगार लोकांना स्वराज्याच्या निमित्ताने काम मिळाले होते. अनेक प्रकारच्या नोकऱ्या त्यावेळी निर्माण झाल्या होत्या. होन चलनाच्या रोख स्वरूपात नोकरी करणाऱ्यांना पगार मिळत होता. होन स्वराज्याचे स्वदेशी चलन होते. स्वराज्याच्या नोकराच्या हाती सोन्याचे होन मुद्रेचे असलेले चलन खणखणत होते. लाखो लोकांना हवी तशी कामे मिळत होते. बारा बलुतेदारांच्या हातांना काम मिळत होते. ज्यांना युद्ध करायचे होते. त्यांना युद्धाची प्रशिक्षण मिळत होते. ज्या हातांना पोट भरायचे होत. त्याला पोट भरण्यासाठी रोजगार मिळत होता. प्रत्येकाच्या कलेला सन्मान होता .प्रत्येकाच्या कलेचं चीज होत होते. एवढे प्रचंड सामर्थ्य स्वराज्यात निर्माण केले होते. लाखोचा व्यवहार रायगडावर बाजारात होत होता. रायगडावरची बाजारपेठ फुलून जात होती. जिथे स्वराज्याची घडामोड होत होती तिथेच माणसांना जगण्याची उमेद निर्माण करून दिली जात होती. त्यामुळेच स्वराज्यात राहण्यासाठी अनेकांची धडपड चालली होती.
मावळ्यांच्या सोबत जर स्त्रियांना मावळा बनण्याची संधी मिळाली असती तर स्वराज्यावर अनेक संकटे वाढली असती. कारण आक्रमण करणार हे परकीय होते. फक्त संपत्तीसाठी आणि स्त्रीसाठी परकीय लढत होते. धर्मांतर करण्यासाठी ते आग्रही होते. अनेक गुणवंत स्त्रियांना बाटवून त्यांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली होती . त्यांच्यावर जुलूम करीत जनानखान्यात बसवले होते. त्या मार्फत ते धर्माचा प्रसार करीत होते. मुसलमान हे परकीय होते . त्यानी इकडे येताना सोबत काही आणले नव्हते. त्यांच्या स्त्रिया मुले भारतीय भूमीतले धर्मांतरीत केलेले होते.
या सर्व अन्यायाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना एकत्रित करीत होते. अनेक प्रकारे रयतेला स्वराज्य शिकवीत होते. त्या गोष्टीला हळूहळू यश येत होते.
स्वतःची जात ,
स्वतःचा धर्म,
स्वतःचे कुटुंब,
स्वतःची भूमी,
स्वतःचे घर
स्वतःचा गाव
याबाबत रयतेमध्ये जागृती होत होती. त्याचे प्रणेते शिवाजी महाराज होते.
शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कामगिरीमुळे हे घडत होते. त्याचा फायदा हळूहळू सर्वांना दिसत होता. स्वराज्याची शिकवणूक जनमानसात रुजत होती. अनेक गोष्टींचे नेतृत्व करण्यासाठी माणसे स्वतःहून पुढे येत होती. माणसांना आता शिकायची ओढ लागली होती. तरुणांना शिकण्यासाठी संधी उपलब्ध झाली होती. त्या तरुणाची आणि मावळ्याची इच्छा या द्वारे शिवाजी महाराज त्यांना शस्त्रविद्या शिकवत व प्रशिक्षण देऊन पूर्ण मावळ्यात रूपांतर करीत होते.
वेडात दौडले वीर मराठी सात. याची महती काव्यातून खूप वेळा बहुतेकांनी ऐकलेली आहे.
बहलोलखानाला पकडण्यासाठी राजांनी प्रतापराव गुजर यांना पत्र पाठवले. त्यावर लिहिले होते . बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तुम्ही तुमची तोंडें दाखवू नका .ते वाक्य प्रतापराव गुजर यांच्या जिव्हारी लागले होते. मग बहलोल खानाचा शोध सुरू झाला. शेवटी खानाचा सुगावा लागला. त्याप्रमाणे प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत असलेले सहा मावळे असे एकूण सात वीर दौडत बहलोल खानावर चालून येऊ लागले. परंतु खानाच्या सेने पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. मात्र प्रताप राव गुजरांनी चांगले काम केले होते. प्रतापराव गुजर यांना सरसेनापतीची पदवी महाराजांनी दिली होती.
.
प्रतापराव गुजर यांचे खरे नाव प्रतापराव नव्हते.
त्यांचे खरे नाव होते कुडतोजी गुजर... परंतु स्वराज्यासाठी लढायचे या एकाच चिकाटीने ते स्वराज्याला सामील झाले होते. कुडतोजी गुजर यांना शिवाजी महाराजांनी प्रतापराव ही पदवी बहाल केली होती. त्यामुळे पुढे कुडतोजी गुजर हे प्रतापराव गुजर असे नाव लावत. जेव्हा राजांनी प्रथम कुडतोजी गुजर यांना स्वराज्याचा विचार सांगितला तेव्हा त्या विचाराने कुडतोजी गुजर एकदम प्रेरित झाले. स्वराज्याच्या कामासाठी तयार झाले.
शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी हे तामिळनाडू तंजावर येथे जहागीरदार होते .मात्र त्या दोघांचे मतभेद होते. एकदा चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला राजांनी जिंकून घेतला .नंतर कर्नाटकात अनेक किल्ले जिंकत गेले. दोघांची भेट झाली. परंतु त्यांनी शिवाजी महाराजां वर हल्ला केला. परंतु आपल्याच सावत्र भावावर काय कारवाई करणार .... त्यामुळे शिवाजी महाराज रायगडावर परत आले
हिरोजी इंदुलकर राजांचे बांधकाम प्रमुख होते. ते रायगड किल्ला डागडुजी करण्याचे काम करत होते शिवराज्याभिषेकाच्या वेळी इंदुलकरांनी रायगडावर नवीन रस्ते,
देवळे ...
मनोरे...
इमारती...
तळी..
चौक ...
बांधण्याची कामे केली होते .त्यावेळी खुश होऊन राजांनी हिरोजी इंदलकरांना विचारले.
इंदलकर तुमचे नाव कुठच्या ठिकाणी लिहायला तुम्हाला आवडेल.
तेव्हा हिरोजी इंदुलकर शिवाजीराजांना म्हणाले.
शिवाजी राजे माझे नाव जर तुम्हाला स्मृती म्हणून जतन व्हावे असे वाटत असेल .तर ते एका पायरीवर लिहावे.
हिरोजी इंदुलकर महाराजांच्या सदैव तप्तर सेवेस हजर आहे. या अर्थाची ओळ त्यांनी लिहिली.
रायगडावर हिरोजी इंदुलकरांनी एका पायरीवर शिलालेखात स्वतःचे नाव लिहून ठेवले आहे .
सेवेठायी तत्पर....
स्वतःसोबत इतरांचेही नाव मोठे करण्याचा मनाचा मोठेपणा शिवाजी महाराजांकडे निश्चित होता. स्वतः सोबत आपल्या सहकाऱ्यांचे नाव इतिहासात अमर करण्याची इच्छा शिवाजी महाराजांकडे होती. हे काम फक्त इतरांना जगण्याची व शिकवण्याची इच्छा असलेला एक मोठा अवलिया करू शकत होता. त्याचेच नाव म्हणजे शिवाजी महाराज..
खरंच शिवाजी महाराज एक अवलीया राजा होते. शिवाजी महाराज हे असे अवलिया होते की ते आपल्या सहकाऱ्यांच्या जीवावर जगणारे नव्हते .तर आपल्या सहकाऱ्यांना यशामध्ये सहभागी करणारे होते. लोकांनी स्वतः राजां सोबत त्यांच्या सहकाऱ्यांची नावे सुद्धा घ्यावीत अशी राजांची नेहमीच इच्छा होती. स्वराज्यासाठी महाराजांनी खूप मेहनत घेतली होती. ही गोष्ट खरी असली तरी त्या मेहनती मध्ये इतरांचाही वाटा होता . तो वाटा ज्याच्या-त्याच्या प्रमाणे सहकाऱ्यांना मिळावा याबाबत शिवाजी महाराज नेहमीच दक्ष होते. याचे कारण ते दिलदार शिक्षक होते. प्रामाणिक प्रशिक्षक होते. सच्चा मित्र होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये अतिशय हुशार आणि धूर्त माणसे होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आता राजसत्ता बनत चालली होती. शिवाजी राजे महाराज सत्तेचे धुरंधर होते. मात्र राजसत्तेला ग्रहण लागावे म्हणून अनेक गद्दार टपून राहिले होते.
खंडोजी खोपडे हे असे एक नाव आहे .ज्याच्यावर राजांनी खूप उपकार केले. तोच खंडोजी खोपडे खानाला जाऊन मिळाला. त्याने राजांविरुद्ध हाती तलवार घेतली . पन्हाळगडच्या वेळी अफजलखानाच्या मुलाला फाजलखानाला वाट दाखवणारा हाच खंडोजी खोपडे होता..... स्वराज्याचा गद्दार.... खंडोजी खोपडे प्रमाणे यांच्याविरोधात अनेक सरदार होते.
खंडोजी खोपडे हा कान्होजीचा मित्र होता. कान्होजीला वाटत होते की खंडोजी खोपडे पुन्हा स्वराज्यी यावा परंतु... खंडोजी उलट्या काळजाचा माणूस होता .कान्होजी जेधेनी त्याला म्हटले.
तुझी आणि शिवाजीं राजांची रूजवात घालून देतो. शिवाजीराजे तुला माफ करतील...
ठीक आहे. तु तसा प्रयत्न कर. बोल ... मी शिवाजी राजांना भेटेल .... नक्कीच.
कान्होजींनी शिवाजीराजांची आणि खोपडीची भेट घालून दिली..... मात्र... खंडोजी खोपडेच्या मनात दुसरेच होते.
खंडोजी खोपडे त्याच्या स्वभावाप्रमाणे कान्होजीच्या विरुद्ध गरळ ओकली. मात्र खंडोजी खोपडेने कितीही गरळ ओकली. छत्रपती राजांना त्याने सांगितले . कान्होजी जेधे हे मोठे गद्दार आहेत. त्याच्या पासून सावधान रहा नाहीतर तुम्ही फसाल...
खंडोजी खोपडेने कान्होजीच्या दोस्ती मध्ये गद्दारी केली होती. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी ओळखली शिवाजी महाराजांनी तेथल्या तेथे खंडोजी खोपडेचे दोन्ही हात कलम करून टाकण्याचे आदेश दिले. लगोलग शिपायाने त्या आदेशाची अंमलबजावणी केली. खंडोजी खोपडे आता थोटा झाला होता. तेव्हा तू काहीतरी उलट बोलला हे बघून शिपायांने खंडोजी खोपडेवर तलवार उगारली होती. परंतु शिपायाला शिवाजी महाराजांनी आदेश दिले .
थांबा मी जेवढे सांगितले तेवढेच करा...
याला आपल्या दवाखान्यात घेऊन जा आणि तिथे याचा उपचार करा .त्याच्या हाताची जखम बरी करा. त्याला मरू देऊ नका. त्याला आयुष्यभर समजले पाहिजे की आपले हात कशासाठी कापलेले आहेत. त्याला तसाच ठेवा तुरूंगात खितपत .थोटक्या हाता सहित... इतरांना सुद्धा त्यामुळे जरब बसेल... कान्होजींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी राजांना घाबरत घाबरत विचारले.
राजे तुम्ही असे कां केलेत.
तेव्हा राजे म्हणाले. कान्होजी जेधे तुम्ही ज्या विश्वासाने खंडोजी खोपडेला आमच्याकडे परत आणलेत. त्याच विश्वासाच्या जोरावर खंडोजी खोपडे तुमची बदनामी करत होता. माझ्या सहकाऱ्याची बदनामी माझ्यासमोर केलेली. तीही खोटी मला चालणार नाही .म्हणून मी त्याला शिक्षा दिली आहे . कान्होजी काहीच बोलले नाही .राजाने केलेली कृती बरोबर आहे .योग्य आहे हे त्यांना पटले होते...
राजांचे कुलदैवत तुकाईदेवी होती आणि तुकाईचे देऊळ तुळजापूरला होतं ....म्हणजेच तुळजाई... तुळजाभवानी माता... आई भवानी....
तुळजापुरला शाहिस्तेखानाने धुमाकूळ घातला होता .त्यावेळी देवी रक्षणासाठी तिथल्या सरदाराने खूपच चलाखी केली .जेव्हा शाहिस्तेखान तुळजापुरला आला. तेव्हा कदम सरदारांनी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या जागी दुसरीची मूर्ती ठेवली आणि देवीचे रक्षण केले. खानाने नकली मूर्तीची नासधूस केली .मात्र खरी मूर्ती वाचली होती .कदम सरदाराने ती वाचवली होती. शाहिस्तेखानाने मुद्दाम तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शिरून मूर्तीचा विध्वंस केला होता. तो शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी. मात्र शिवाजी महाराज नेहमीच दक्ष राहत .त्यांनी आधीच तसा संदेश कदम सरदारांना देऊन ठेवला होता. शाहिस्तेखान इकडे येऊन मुद्दाम देवीच्या मंदिराचा विध्वंस करेल .त्यामुळे सावध रहा. त्याप्रमाणेच कदम सरदारांनी सावध होऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.
शिवाजी महाराज आध्यात्मिक होते. तो अध्यात्माचा वारसा त्यांना मां साहेबांकडून मिळाला होता. शिवाजी महाराज जगदंब जगदंब असे पुटपुटत . जगदंबा देवीवर त्यांची खूप श्रद्धा होती...
अध्यात्माची प्रेरणा त्यांना जगदंबेमुळेच मिळाली. जगदंबेच्या कृपेने त्यांनी सर्व मनोरथ पूर्ण केले. अशी त्यांची धारणा होती. छत्रपती शिवाजी महाराज निष्ठेने वागले. त्यांनी अपार श्रमे घेतली .त्या श्रमांचे सार्थक झाले होते. राजांचे अंगरक्षक दल नेहमीच सतर्क होते. ती राजांचे नेहमीच रक्षण करीत. राजे शूरवीरांचा नेहमीच सन्मान करीत. त्याना सहसा प्रशंसा आवडत नसे.त्यांचा सत्यावर त्यांचा विश्वास होता. राजांचा स्वभाव मन मोकळा होता. त्यांचे अंतकरण नेहमीच श्रद्धायुक्त असायचे. मात्र कधी कधी राजे संतापत...
फिरंगोजी नरसाळे यांना शिवाजी महाराजांनी जेव्हा शिक्षा दिली तेव्हा सर्वजण अस्वस्थ झाले. फिरंगोजी नरसाळे यांना मासाहेबांनी भोपाळगडचा किल्लेदार बनवला होता. परंतु त्याच भूपाळगडावर दिलेरखाना सोबत युवराज संभाजी राजांनी चढाई केली. तेव्हा संभाजीराजांच्या प्रेमाखातर फिरंगोजी नरसाळ्यांनी भूपाळगड त्यांच्या ताब्यात दिला. त्या कृतीने शिवाजी महाराज रागावले होते. त्यांनी फिरंगोजी नरसाळे यांना अटक करण्याचे आदेश दिले . त्यांना जेरबंद करून त्याला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फर्मावली.
फिरंगोजी नरसाळ्याने महाराजांच्या मागे धावत जाऊन क्षमा मागितली . शिवाजी राजे यांच्या डोळ्यात अश्रू होते. तरी ते कठोर मनाने म्हणाले...
फिरंगोजी चुकीला माफी नाही. तुम्ही ज्यांच्या नोकरीत आहात. त्या शिवाजी महाराजांचे आदेश पाळण्याच्या ऐवजी तुम्ही संभाजीराजांचे आदेश पाळलेत आणि गड जमीन दोस्त केलात. हे तुमच्या संभाजी प्रेमामुळे झालेलं आहे. पण स्वराज्य मध्ये तिला महत्त्व आहे. शिस्त प्रथम असते. नंतर प्रेम असतं. तुम्ही चुकी केलीत. हुंदके देणाऱ्या फिरंगोजीला छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते. तेव्हा बघणाऱ्या सगळ्यांच्याच मनाचा थरकाप झाला होता.
महाराज क्षमा करा फिरंगोजी नरसाळा पुन्हा म्हणाला तेव्हा गर्रकन वळून शिवाजी महाराज त्यांना म्हणाले फिरंगोजी तुम्ही राजशिष्टाचारात ढिलाई दिलीत. त्यापेक्षा तुम्ही देशद्रोह केलात. त्याचा दाखला सर्वांना मिळावा म्हणून तुमची मुलाहिजा न राहता. तुम्हाला ही शिक्षा देत आहे असे बोलून ते गर्ककन भराभर चालत त्यांच्या खोलीत गेले...
परंतु दुसर्या दिवशी शिवाजीराजांनी फिरंगोजी नरसाळ्याची शिक्षा रद्द केली. फिरंगोजी नरसाळ्याची यामध्ये चुकी नव्हती. राजांच्या मुलाची म्हणजेच संभाजी महाराजांची होती. छत्रपतींचा मुलगा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज असेच तो समजत होता. त्यात त्यांची काही चूक नव्हती. फिरंगोजी नरसाळ्यांना शिवाजी महाराजांच्या रूपात देव दिसला .त्याचे प्राण वाचले होते. सगळ्यांनीच निश्वास सोडला होता. असे अनेक गुंते शिवाजीराजांनी शिक्षकी भूमिका घेऊन सोडवलेले होते.. शिवाजींचे गुप्तहेर खाते व नजरबाज शिवाजी महाराजांच्या सगळ्या भूमिका आणि बातम्या देत होते .
संभाजीराजेपण दिलेरखानाला जाऊन मिळाले होते.ते दिलेरखानच्या आश्रयाला गेले तसे थोड्या महिन्यांनी ते परत संभाजी महाराज पुन्हा स्वराज्यात परत आले.
हे ऐकून शिवाजी महाराजांना समाधान वाटले. एका नामुष्कीतून वाचल्याचा आनंद सर्वाना झाला... युवराज संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी पुन्हा सुधारण्याची संधी दिली होती.
मात्र येसूबाईंनी स्वतःच्या मुलाच्या लग्नात युवराजांना बोलावलं नाही आणि युवराज संभाजी येणार नाहीत याची काळजी घेण्यास त्यांनी अनाजीला सांगितले होते. सोयराबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. संभाजी महाराज आणि सोयराबाई मध्ये खटके उडत होते. संभाजी महाराजांची सोयराबाई ही सावत्र आई होती. संभाजी महाराजांची अशी धारणा होती की संभाजी महाराजांवर अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री नजर ठेवून आहेत. पुढे जाऊन एकदा ते शिवाजी महाराजांना म्हणाले सुद्धा होते. आम्ही दिलेरखानला जाऊन मिळलो. याचं कारण आमच्या महालात आम्ही नजरकैद झालो होतो. हे ऐकूण शिवाजी महाराज सुद्धा दचकले होते. सोयराबाईंचा मुलगा राजाराम महाराज संभाजी महाराजांचा सावत्र भाऊ होता.
राजाराम महाराजांचे लग्न झालं आणि लगेच एक बातमी आली. आलमगीर औरंगजेब दक्षिणेत येतोय.
शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याला आता बळ प्राप्त झालं होतं .इतकी वर्ष शिवाजी महाराज दक्षिणेत येण्याची औरंगजेबाची वाट बघत होते. तो क्षण आता जवळ आला होता. औरंगजेब दक्षिणेच्या मैदानात उतरणार होता. शिवाजी महाराज हळूच पुटपुटले.
हे श्रींचे राज्य आहे ....हे निर्माण करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आणि आता श्री ची इच्छा पूर्ण व्हायची वेळ आली आहे...
महाराष्ट्रात औरंग्याची कबर बांधली गेली तर...
औरंगजेबाचा पराजय एवढाच हेतू नसून त्यामागे दिल्ली तख्त उलटपालट करून स्वराज्याचं हिंदवी स्वराज्य पूर्ण भारतामध्ये साकार करण्याची संधी मिळणार होती.