तू ही रे माझा मितवा - 33 Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू ही रे माझा मितवा - 33

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_३३

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

डेटासीसच्या हॅपनिंग कॅफेटेरियात जिथे मुलं कॉफीसाठी कमी आणि एक से एक सुंदर मुली बघत टाईमपास करायला यायचे तिथे एका हातात कॉफीमग आणि डोकं मोबाईलच्या मिटिंग शेड्युलरमध्ये अश्या पोझिशनमध्ये कबीर होता, तर तो नजरेच्या टप्प्यात येईल अश्या ठिकाणी बसण्यासाठी काही मुली धडपडत होत्या.

“Prasanna we have to address some of the client side issues in the next meeting, so please mail me all the details, you got it?”

हे बोलतांना त्याने वर ही पाहिलं नव्हतं.

“कॅब यार…चिल! वो क्या है ना ये कॅफेटेरिया है,यहा काम की बात नही करते,प्लीज.”

प्रसन्नाने त्याच्या हातातून मोबाईल काढून बाजूला ठेवला.

“ओके तो दुसरी बात करते है,कंपनी बजेट पढा क्या तुने,what you think about the market share of our company in this fiscal ?”

त्याने सिगरेट पेटवत प्रसन्नाला कुतूहलाने विचारलं.

“कॅब , इतना सुंदर लडकीया है, वो देख ना तू. क्या issue and market की बाते करते हो.”

प्रसन्नाने त्याच्या हातून सिगरेट काढून घेतली.

“इतना सुंदर लडकीया? वाह क्या हिंदी है प्रसन्ना.”

“हा तो कनडा में बात करता हु, समज आयेगी क्या बोल?”

“ननगे कन्नडा गोत्तू,स्वल्प,स्वल्प.”

“स्वल्प,स्वल्प...हा मालूम इतनाही सिखा है . Kabir we started our career at the same time ,see I got married, having kid ,settled nicely in life n see yourself. I don’t know what you want from life?”

“Bro, सेटलडाऊन का कोई कॉम्पिटिशन चल रहा है क्या?”

“ये बात नही,वो पल्लवी,ज्योतिका कितना हॉट है. कितना लाईक देती तुझे.तू सिर्फ काम की बात करता है.देख यहा पे भी लडकीया कैसे देखती तुझे. ये सब मुझसे तेरे साथ सेटिंग करवा दो,डेट के लिये मनाओ करके बाते करते है,कितना लकी है तू.”

“प्रसन्ना यार छोड ना कितने काम है,कॉफी खतम करो और चलो I want all details before tomorrow’s morning meeting. sari?

“सरी,लेकीन वो ज्योतिका को क्या बोलू?”

“tell her that…...I said….” पुढे वाकून त्याच्या कानात सिक्रेट सांगितल्याप्रमाणे तो म्हणाला.

“Yes ….”
कबीर त्या मुलींशी डेट करायला हो म्हणणार कदाचित हा विचार करून प्रसन्ना खुशीत आला.

“I said- कोडिंग पे ध्यान दो.बहोत विक है.”

प्रसन्नाचा क्षणात उतरलेला चेहरा बघून त्याला हसू आवरलं नाही,आईचा फोन येत असल्याने त्याने हसू कसबसं आवरतं घेतलं.

“येस मॉम”

“कबीर ऐक, तुला पुढच्या विकमध्ये सुट्टी घ्यायची आहे, so be prepared.”

“का? असं अचानक? तुम्ही सगळे ठीक आहात ना?”
तो काळजीत पडला.

“आम्ही ठीक आहोत रे पण एक महत्वाचं काम आहे.”
त्या शक्य तेवढं नॉर्मल वाटेल असं बोलायचा प्रयत्न करत होत्या.

“मॉम,प्लीजच ! मावशीच ऐकून काही मुलीवैगरे बघायचा प्लान केला असेल तर सॉरी ,मला वेळ नाहीये.” तो वैतागला.

“अरे ऐकून तर घे,पुण्यात नाहीये काम.मी तुला प्रॉमिस केलंय ना की तू म्हटल्याशिवाय लग्नाचा विषय काढणार नाही मग झालं तर. मुली बघायचा काही प्लान वैगरे नाहीये.ते मागे आपलं डिस्कशन झालं होतं ना की आपल्या NGOतर्फे काही रिमोट प्लेसच्या शाळांना त्यांच्या डिजिटल सेटअप साठी मदत करायचीय ,तेच काम आहे.सो तू पुढच्या आठवड्यात सुट्टी घे.”

“मॉम,मागे म्हणजे वर्षापूर्वी म्हटलं होतं तू. आता मध्येच काय? आणि असं लगेच काम होतं का?हार्डवेअरसाठी कोटेशन मागवावे लागतील,स्टडी करावा लागेल,मग पुढचं काम.”

“अरे ते सगळं झालंय.तू फक्त ते कम्प्युटर,इथरनेट काय काय असतं ती पूर्ण सिस्टीम बसवून दे.”

त्या त्याला कन्विन्स करायचा पूर्ण प्रयत्न करत होत्या.

“मॉम मी हार्डवेयरच्या दुकानात कामाला आहे का ग ? आपला विषय वेगळा होता मी तुला सर्वे करून देणार होतो.”

“अरे हो बरोबर.आठवलं तेच तेच. सर्वे करायला ये.अर्जंट.”
कबीरची इकडे येण्यासाठी मनधरणी करणं सोप्प नाहीये हे त्यांना कळून चुकलं होतं.

“मॉम कोटेशन वैगरे झालंय म्हटलीस ना,मग आता कसला सर्व्हे? तुझं काही फिक्स दिसत नाहीये.मला अजिबात तिकडे बोलावू नकोस,डेडलाईन आहे गं.”

तो चिडून बोलला.

“अरे बाळा,मेन एरियाचा सर्व्हे झालाय,पण काही दुर्गम भागातल्या शाळा आहे तिथल्या लोकांनी मदत मगितलीय.हे काम तुझी जबाबदारी होती कबीर,तू प्रॉमिस केलं होतं.आता तुझ्या कामाची डेडलाईनला मरू दे, नेहमीचच आहे तुझं काम.आईसाठी एवढं ही करू शकत नाही ना? यायचं नसेल तर आई म्हणू नकोस मला.काय उपयोग आहे मुलगा सॉफ्टवेयर इंजिनिअर असून.”

कबीर ऐकत नाहीये हे पाहून त्यांनी शेवटचं ठेवणीतलं हत्यार काढलं.

“मॉम! काय आहे हे? इतका ड्रामा? इतका इमोशनल अत्याचार? बरं ठीक आहे,चिडू नकोस..बोल कुठे जायचंय?”

“That’s like my boy.तुला सगळे डीटेल्स,बुकिंग मनीष पाठवेल,तुला काही करायचं नाहीये फक्त पोहचायचं आहे.”

त्यांचा उत्साह एकदम दुणावला.

“मॉम,I could smell something fishy going over there.”

फोन ठेवता ठेवता त्याने शंका बोलून दाखवलीच,तो अजूनही साशंक होता.

“हा कॅफेटेरिया में बैठे है तो स्मेल आ रही होगी.”

प्रसन्ना त्याला चिडवायला मध्येच बोलला.

“चल ठेवतो”

त्याने फोन ठेवला आणि दीर्घ श्वास घेत जरावेळ शांत बसला.

“ज्योतिकाके साथ डेटिंग के बारे में सोच रहा है ना कॅब?”

त्याला पुन्हा चिडवत प्रसन्ना म्हणाला.

“हा वही सोच रहा हु, भाभी को कैसे बताऊ के हॉट लडकीया तुझसे डेटिंग सेटिंग की बाते करने आती है.”

कबीर उठून पुढे जाता जाता म्हणाला.

“ब्रो, मै तो मजाक कर रहा था..सुन ना.”

त्याच्या मागे प्रसन्ना पळतच ऑफिसकडे निघाला.

खरतर सगळी सेटिंग झाली होती, ती ही कबीरच्या नकळत.

************************************

आज TSMची टीम तापोळासाईटवर जायला निघाली होती. प्रोजेक्टचा शेवटचा आठवडा सगळे एन्जॉय करणार होते. कामासोबतच एन्जॉयमेंटचे खूप सारे प्लान्स ठरले होते.पूर्ण टीम खुशीत होती.

“ये ऋतू झोपू नको. बाहेर बघ ना किती सुंदर वातावरण आहे,एन्जॉय द जर्नी यार.कम ऑन.”

तिच्या खांद्यावर डोकं टेकून झोपलेल्या ऋतूला तिने सरळ बसवलं.

“आय हेट जर्नी.”

ऋतू पुन्हा तिच्या खांद्यावर डोकं टेकून झोपली.

“हो माहितीय,राहू दे.बरं गप्पा तर मारशील, की ते ही नाही?”

“हो गं बोलतेय ना. ये मोना,सहा महिने कसे निघून गेले कळलंच नाही ग?”

“हम्म, मोना होती ना सोबत म्हणून कळलं नाही त,इतकं सिम्पल आहे.” ती हसत म्हणाली.

“हो ग बाबा, ते तर आहेच I am very greatful,फ्रेन्डशिपच्या बाबतीत मी खूप लकी आहे,thank you for being there.”

“बस.. बस हे वोट ऑफ थंक्स नंतर द्या, तूर्तास आमच्या आग्रहाखातर,आमच्यासोबत हा टॅटू तुम्ही काढला तेवढंच समाधान आहे आम्हाला पण तू तेव्हा ही सांगितलं नाहीस हा छोटुसा किंगफिशरचा टॅटूच का निवडला ते?”

तिला जरा चिडवत मोना म्हणाली.

“मोने एकतर तुझा आग्रह होता,फ्रेन्डशिपची निशाणी अँड ऑल म्हणून काढलाय आणि ही डिझाईन छान वाटली म्हणून निवडली, काही विशेष कारण नाहीये.”

ती गाल फुगवत म्हणाली.

“अरे मी मजाक करतेय बाबा.छान दिसतोय टॅटू. विशेषतः त्याच्या आत असलेला तो K शेप..येस K फॉर किंगफिशर मला समजलंच नाही”

मोना तिला चिडवायची एक ही संधी सोडत नव्हती.

“K नाहीये तो मोना ,नीट बघ R आहे .”

“ओह्ह असंय का? अरे हे K आणि R अल्फाबेट अगदी मेड फोर इच अदर आहेत,K मध्ये R आहे आणि R मध्ये K आहे.”
ती साळसूद चेहरा करत म्हणाली.

“You are impossible mona,don’t talk to me”
ती आता खरच चिडली होती.

“ओके,चिडू नकोस गं! आता थोडेच दिवस सोबत आहोत.”
ती तिचे गाल ओढत म्हणाली.

“गप्प बस नाहीतर रडेन मी आता.मोना ऐक ना इंटर्नशिप घेण्याविषयी अजूनही कन्फ्युजन आहे.एका वर्षाचा प्रश्न आहे.बाबा हो म्हटलेय पण आई आणि ताई तयार नाहीये.”

“तुला काय वाटतंय,तुझं मन काय म्हणतंय?” मोनाने नेमका प्रश्न विचारला.

“ते एवढं महत्वाचं नाहीये. करियर महत्वाचं आहे.”

ती अडखळत म्हणाली.

“किती लपवाछपवी करशील गं करियरच्या नावाखाली ! सरळ मान्य कर ना की पळतेय तू स्वतःपासून.सतत बिझी ठेवायचा प्रयत्न करतेयस , हो ना? पुन्हा नवीन लोकं,नवीन काम म्हणजे त्यात जुळवून घेतांना इतर गोष्टींचा,इतर लोकांचा,काही खास लोकांचा विसर पडावा.”

गाडीत इतर लोक देखील आहे ह्याचा विचार करून मोना जरा दबक्या आवाजात पण चिडून बोलली.

“असं नाहीये.” ती नजरेला नजर देण्याचं टाळत होती.

“पळत रहा मग आयुष्यभर! मान्यच करू नको की ज्याच्यावर प्रेम करतेय तो आयुष्यात हवाय म्हणून.मला तर वेद जास्त समंजस आणि योग्य वाटतोय.मूव्ह ऑन झाला,नव्या रिलेशनशिपमध्ये सेटल होतोय,नॉवेलचं ड्रीमसुद्धा पर्स्यू केलं.वाईट त्यालाही वाटलं असेलच ना? दुखावला तर तो ही आहेच.ब्रेकअपने कुणाला आनंद तर होत नाही पण एक सांगू का तुला , दुःख असं जास्त दिवस कुरवाळत बसलं ना की त्या दुःखामधला चार्म निघून जातो मग ते निव्वळ रडगाणं होतं.त्या दुःखाला पण ग्रेसफुली दुःख म्हणून राहू दे की का त्याचं रडगाणं करतेय.प्लीज मूव्ह ऑन ऋतू. ”

“तुला कुणी सांगितलं मला कुणीतरी आयुष्यात हवंय अँड ऑल? कुणावरच प्रेम नाही करत मी समजलं ना,काहीही बोलू नको."

"माझ्याशी खोटं बोल,पण स्वतःशी नको बोलू.."

"सॉरी मला काहीही ऐकू येत नाहीये.”

तिने कानात हेडफोन टाकले.मागे डोकं टेकून ती शांततेत गाणी ऐकत बसली.

‘लडकी,you are impossible.”

मोना वैतागून म्हटली आणि तिच्या एका कानातून हेडफोन काढत स्वतःच्या कानात टाकला.

ऋतू डोळे मिटून बसली होती.तिला हसू आलं,तिच्याकडे बघत ओठातल्या ओठात पुटपुटली-‘बघतेच आता तो समोर आल्यावर कसं मान्य करत नाही ते.we are all set baby & very excited to meet Mr.Khadus K. ”

ती ही शांततेत मागे टेकून बसली.
मोहितचा आवाज, आवाज न राहता फिलिंग्स बनून कानात उतरत होता-

“तेरी मेरी मिट जानी है दूरिया
बेगानी है दूरिया....हट जानी है दूरिया
फना हो सभी दूरिया,
ये दूरिया..!!

ऋतूच्या डोळ्यात पाणी तर मोनाच्या चेहऱ्यावर हसू होतं—

******************

महाबळेश्वरपासून गाडी वळली.
आजूबाजूला गर्द झाडी,जणू हिरव्या रंगाने त्याचं शेडकार्ड पसरवून ठेवलं होतं ,जंगलातला संमिश्र हिरवट,गोडसर सुगंध, कमालीचा शांत,एकाकी रस्ता.दाट जंगलानंतर एका बाजूला दरी, वातावरणात कमालीची थंडी. रिसोर्ट जवळ आलं तसं त्याच्या मागच्या बाजूला दिसणारया अथांग शांत पाण्याने सर्वांचं चित्त वेधून घेतलं.
ऋतूला त्या जागेचा ऑराचं खूप पॉझिटिव्ह वाटला,मनातून खूप आनंद होत असतांनाही उगाच डोळे भरून येत होते.

तापोळा,जणू काश्मीरची सावली !

ते रिसोर्ट म्हणजे जंगलात,जलाशयाच्याकडेला वसलेलं गोड स्वप्न वाटावं इतकं सुंदर होतं.

पूर्ण टीम आनंदात होती.सर्वांना त्यांच्या रुमच्या चाव्या देण्यात आल्या.
इतक्यावेळ शांत असलेलं वातावरण गजबजून गेलं.त्यांची व्यवस्था करतांना रिसोर्टच्या टीमची चांगलीच गडबड उडाली.

ऋतू आणि मोना रूमकडे गेल्या.ऋतूला मिळालेल्या रुमच्या मागच्या बाल्कनीतून बरीचशी दाट झाडी आणि अथांग पाण्याचा अगदी थोडासा नजरा दिसत होता.ती जरा हिरमुसली पण तिने बघितलं की शेजारची रूम शेवटच्या टोकाला तिला असल्याने L शेप बाल्कनी होती.
ती मनाशी काहीतरी विचार करून बाहेर आली.तिला समोर रिशी दिसला त्याला पाहून ती अगदी लहान मुलीसारखी पळतच त्याच्याकडे गेली.

“रिशी,stop stop stop..”

“अरे बच्चा हळू,काय झालं?”

रीशीला ती धडकणार तसं त्याने तिला सावरलं.

“Rishi please please मॅनेजरला रिक्वेस्ट कर ना, मला ती कॉर्नरची रूम हवीय.रिशी त्या रूमच्या दोन्ही बाजूने दूरपर्यंत पसरलेलं पाणी दिसतं यार. खूप क्युट view आहे,खूप खूप क्युट. सात दिवस अमेझिंग सनसेट बघायला मिळेल त्या साईडने प्लीज प्लीज प्लीज.”

स्वतः अगदी क्युटसा चेहरा करत म्हणाली.रीशीला हसू आलं.तो तिला घेऊन मॅनेजरकडे गेला आणि तिची इच्छा सांगून ,त्याला रिक्वेस्ट केली.तो सरळ नाही म्हटला.

“अरे भाई,कर की ऍडजस्ट . एक रूम तर स्वॅप करायचीय ४४ to ४५ त्यात काय एवढं? ”

रिशी जरा चिडून बोलला.

“सर तुमच्या टीमची लोकं असती तर नक्की केलं असतं पण ते दुसरे कस्टमर आहे. सकाळीच चेकइन करून बाहेर गेलेय,ते आल्यावर मी तुम्हाला सांगतो तुम्ही बोलून बघा.ते हो म्हटले तर काहीच प्रोब्लेम नाही.आम्हाला डायरेक्ट नाही विचारता येणार त्यांना.”

“बरं ते आल्यावर सांग मला”

त्याचं म्हणणं पटल्याने रिशी जरा शांत झाला.

रिशीने माघार घेतल्यासारखी वाटल्याने ऋतू नाराज झाली.

शेजारी असलेल्या काजलकडे मग तिने मोर्चा वळवला.

“काजल तू सांग ना रीशीला , मला पाहिजे ती रूम यार.”
ती जवळपास पाय आपटत म्हणाली.

“रिशी सहा महिन्यात पहिल्यांदा एवढं खुश बघितलंय हिला. पहिल्यांदाच हट्ट करून तुझ्या बच्चाने काही मागितलंय.ते काही नाही ती रूम तिला मिळवून दे.”

काजलने फर्मान सोडलं.

“बच्चे रूम के लिये इतना रोना? अरे त्या व्यक्तीला येऊ तर दे मग बोलतो.”

रिशी तिला समजावत होता.

“ठीक आहे.” ती नाईलाजाने एवढासा चेहरा करत म्हणाली.

“चला फ्रेश व्हा,लंच घ्या ,जरा रेस्ट करा. टीम मिटींगला भेटू,स्ट्रॅटेजी डिस्कस करायचीय.”

तिच्या डोक्यावर टपली मारून तो निघून गेला.

***************

“मित्रा,दोन वाटरबॉटल आणि चहा पाठव रूममध्ये.” ऑर्डर सांगून तो रूमकडे निघाला.

“सर,एक मिनिट”
मॅनेजरने त्याला थांबवलं.

‘सर एक रिक्वेस्ट होती, आमच्या ऍड एजन्सीच्या लोकांनी चेक इन केलं आहे थोड्यावेळापूर्वी,त्या सरांना तुम्हाला काही विचायचं होतं.मी बोलावतो त्यांना, एक मिनिट, जाऊ नका.”
तो घाईघाईने बोलून निघून गेला.

“अरे पण का? काय झालं? कमाल आहे राव.”

तो गोंधळला होता.तिथेच जरावेळ रेंगाळला.सकाळी तो आला तेव्हा शांतात होती,आता सगळीकडे गडबड,गोंधळ चालू होता.शुटींगची देखील लगबग दिसत होती.

“Hello” पाठीमागून आवाज आला तसा तो वळला.

“Hello”
जरा कन्फ्युज स्वरातच तो म्हणाला. एका अनोळखी व्यक्तीसोबत मॅनेजर परतला होता.

“I am rishi,मला तुम्हाला भेटायचं होतं,rather एक रिक्वेस्ट करायची होती.”

“बोला .”त्याला काहीच कळत नव्हतं.

“Actually, if you don’t mind रूम स्वॅप करायची होती.तुमची ४५ आम्हाला हवी होती तुम्ही ४४ ला शिफ्ट झालात तर it will be great help.”

“But Why?”

त्याला खरतर खूप राग येत होता पण शक्य तितक्या शांततेत तो बोलायचा प्रयत्न करत होता.

“तिथून सनसेट खूप क्युट दिसेल असं यांच्या मॅडम म्हणत होत्या.”
मॅनेजर चोंबडेपणा करत मधेच बोलला.

‘क्युट सनसेट’ ह्या एका वाक्यामुळे तो जरासा हळवा झाला खरा पण त्यालाही ती रूम तेवढीच आवडली होती आणि कदाचित सकाळी त्या रूममधून दिसणारा नजरा पाहूनच तो इथे थांबून काम करायला तयार झाला होता.

“एक मिनिट मी तिलाच पाठवतो ती सांगेल तुम्हाला व्यवस्थित.”

रीशी कामात असल्याने त्याने ऋतूला फोन लावला.

“बच्चा,ते रूम नंबर ४५ आलेत लगेच कॅफेमध्ये ये आणि बोलून घे.मला मिटिंग सेटअप करायचीय.लवकर ये.”

त्याच्याकडे वळून रिशी म्हणाला-
“एक/दोन मिनिट थांबा फक्त, प्लीज! ती येतेय.”

त्याला थांबायला सांगून कामात असल्याने रिशी स्वतः निघून गेला.

“काय मूर्खपणा चालवलाय यार,कुठल्या बच्चाला भेटायचं आता?”

मॅनेजरकडे रागाने बघत तो म्हणाला.

मॅनेजर ‘सॉरी सर’ एवढच बोलला.

“वैताग आहे राव! बरं,त्या टेबलवर एक चहा पाठव.”

तो रागात बोलला, त्यातल्या त्यात एक शांत जागा पाहून तिथे बसला.

रीशीचा फोन आल्याबरोबर ऋतूने बेडवर लोळत पडलेल्या मोनाला दोन फटके मारून उठवलं, सोबत घेतलं आणि ती कॅफेकडे आली.

“ये बाई जाऊ दे ना,एवढं काय सनसेट अँड ऑल, रूमचं काय असतं एवढं? झोपायचं,फ्रेश व्हायचं,चेंज करायचं इतकं सिंपल काम आहे.त्याचं काय कौतुक.”

मोनाला जरा झोपायचं होतं त्यात ऋतू तिला ओढून घेऊन आली होती.

“तुला नाही समजणार गप्प बस.आपण त्याला रिक्वेस्ट तर करून बघू, मला एकटीला कन्विन्स करता येणार नाही म्हणून तुला सोबत घेतलंय ना मोना.बाजूच्या रूममध्येच तर शिफ्ट करायचंय त्याला एवढं काय.”

त्या रिसेप्शनकडे आल्या,मॅनेजरने तिला एक टेबल दाखवला.तिथे तो पाठमोरा बसला होता.

मोनाला तसं ओढत ती तिकडे गेली.पाठमोऱ्या असलेल्या त्याला तिने आवाज दिला.

“Excuse Me!”

तो आवाज ऐकून सगळं थांबलं.

statue ! एकदम statue!

मन वारंवार ज्याच्या शोधात असतं,हा तोच आवाज.
हृदयात खोल खोल दडवून ठेवलेला.

त्याच्या हृदयाचे ठोके वाढले.

तिच अनामिक ओढ,तिच हुरहूर!

तो मागे वळला.

समोर ती.

त्याच्यासाठी त्याचं सर्वस्व असलेली,सोबत नसूनही अध्याहृतपणे सतत सोबत असलेली आणि आता,आता तर प्रत्यक्षात समोर उभी होती.

स्वप्न की भास?

हो त्याची ऋजा!

स्तब्ध,statue !

अगदी तशीच, जसं तो तिला सोडून गेला होता.

‘ऋजा!’

ओठातून एक अस्फुट शब्द आणि डोळ्यांवर विश्वास नाही.
तो धडपडत उभा राहिला.

#त्याच्यासमोर ती-

हे स्वप्न नाहीये,

समोर माझी ऋजा आहे.

तोच जरा जरा गोंधळलेला,जरा जरा बावरलेला चेहरा.

डोळ्यात तेच निरागस भाव पण त्यात हुरहूर का जाणवतेय? गालांवर खोडकर हसू होतं ना तुझ्या आता ही बेचैनी का जाणवतेय?

खूप काही दडवून ठेवलं होतं डोळ्यात, नजरेला नजर न तू भिडवली होती ना मी, मग आता कुठेतरी अनामिक कनेक्शनचा फील का येतोय?

आता समोर काहीच दिसत नाहीये कदाचित तुझ्याशिवाय काही बघायचंच नाहीये.

त्या संध्याकाळी माझ्या बोटात गुंफलेली तुझी बोटं,माझ्या खांद्यावर शांतपणे विसावलेली तू, तो कोरा,निनावी,हलका स्पर्श अजूनही मला जाणवतोय .

कारण हे स्वप्न नाहीये!

हे जे बोलके डोळे आहेत ना ऋजा तुझे, जे आता माझ्याकडे एकटक बघताय ते माझ्या एकाकी क्षणांचे सोबती आहेत.

तुझ्या डोळ्यातल्या काजळात मिसळून माझ्या कितीतरी कातरवेळा ,काजळवेळा झाल्या आहे.

तू नसतांनाही ह्या डोळ्यांची त्यांची जादू आसपास होती माझ्या.

प्लीज,प्लीज नजर हटवू नकोस.मला डोळ्यांनी एकदा श्वास घेऊ दे. माझ्या जगण्याचं कारण आहे हे डोळे.

कारण हे स्वप्न नाहीये.

तू स्तब्ध उभी आहेस समोर,तुझे हे ओठ एक शब्द देखील बोलणार नाही कदाचित पण तुझ्या नकळत त्या ओठांवर मी माझं आयुष्य विसरून आलो होतो ते आज तुझ्या ओठांवरच्या ह्या हलक्या हलक्या लिपस्टिक ने किती कलरफुल झालंय.

ऋजा ,त्या बंदिशमधले शब्द आजही तुझा सहवास मागतात,
ती संध्याकाळ अजूनही मला स्वतः येऊन भेटते,तुझा पत्ता विचारते.
सांग मी कसा देऊ?

तू कुण्या दुसऱ्याची पहाट आहेस हे कसं समजावून सांगू?

जागा हो कबीर!

हे स्वप्न नाहीये,नक्कीच नाहीये!

#क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review