तू ही रे माझा मितवा - 34 Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू ही रे माझा मितवा - 34

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_३४



{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

#तिच्यासमोर तो!

ती स्वतःपासून वेगळी होऊन स्वतःकडेच अनोळखी नजरेने बघतेय,अजूनही समोर कबीर आहे ,हे मन स्वीकारत नाहीये -

‘हे स्वप्नयं..हे खरं नाहीये!

“तू माझ्या डायरीच्या पानांत होतास कबीर,तू तिथेच असायला हवं होतं.तुझं हे असं अचानक समोर येणं मी जमेस धरलंच नव्हतं कधी. आता मी काय करू?
मी तुझ्या नकळत तुझ्यात स्वतःला मिसळून घेतलंय हे तुला कळलं तर?
मी तुझ्या माझ्या सोबतीच्या हरएक क्षणाला प्राणापलीकडे जपून जिवंत ठेवलंय हे तुला कळलं तर?
तू समोर आल्यावर तुला विचारण्यासारखे असंख्य प्रश्न होते कबीर, तू निघून गेलास त्या क्षणापासून ते आतापर्यंत मी घेतलेल्या उसन्या श्वासांची रोजनिशी डोळ्यांनी उलगडायची होती..पण आता काही काही आठवत नाहीये.
खूप साऱ्या इच्छा, आकांक्षा, मन्नत घेऊन गाभाऱ्यासमोर जायचं आणि त्या निर्गुणाचं दर्शन घेतांना काही काही आठवू नये अशी हालत झालीय.

ब्लॅंक,शून्य!

प्लीज ,प्लीज कबीर असं माझ्या नजरेला बांधू नकोस.
माझा तुझ्यापासून अलिप्त राहण्याचा निर्धार ढळून जाईल.
कसं ते माहित नाही पण तू माझ्या डोळ्यातून सरळ माझं मन वाचू शकतो माहितीय मला,म्हणून माझ्या नजरेला नजर भिडवू नकोस.

तुझ्या एक दोन दिवसांच्या भेटीने स्वतःला इतकं विस्कटून घेतलंय,आता पुन्हा विस्कटायला माझं माझ्यात काहीच नाही.

बघ ना,हे माझे डोळे तुला पाहताच क्षणी मलाच फितूर झालेत आणि तुला माझ्या मनाचा रस्ता दाखवतायेत. ह्या मोमेंटला जर हे डोळे भरून आले तर मी माफ करणार नाही त्यांना.

खर सांगू कबीर ह्या क्षणाला खूप भांडावंस वाटतंय तुझ्याशी कारण ‘तू आयुष्यभरासाठी हवी आहेस’ असं कुठल्यातरी mild क्षणांत बोलून गेलास आणि...आणि दूर निघून गेलास पण कुठल्या हक्काने भांडू रे तुझ्याशी?

इतक्या दिवसांनी समोर आला आहेस तू तुझ्याकडे एकटक पाहण्याचा गुन्हा का नकळत घडतोय?

हे तसेच थोडेसे विस्कटलेले मेसी टाइप केस,हा तुझ्या डोळ्यांचा हेझल रंग ह्याची दृष्ट कश्याने काढू?

ही माझ्या हृदयाची धडधड,
हे श्वासाचं वेगाने पळणं,
तुला पाहताच तुझ्यात विरघळून गेलेले डोळे,
थाऱ्यावर नसणारं माझं मन,
तू समोर असण्याचा आनंद,भीती,
हे माझं मोहरून जाणं,गोंधळून जाणं
हे सगळं ,सगळं का?
कारण...कारण

तुझ्या अस्तित्वाचा भाग झालाय तो ऋतू,
तुझ्या असण्याचं,नसण्याचं कारण झालाय तो.
वेडू तुझ्या ओठांवर कायमचं त्याचं गाणं लिहून गेलाय तो,अजूनही त्या संध्याकाळच्या त्या मोमेंटचा हिशोब कुठेय तुझ्याकडे.
तुझं चित्त तू जिथे सोडून आली आहेस,तू तुला ज्याच्याकडे विसरून आली आहेस,तो हाच !

ऐक ना स्पष्ट ऐकू येतंय..’सहेला रे’ ”

‘....कबीर.’

तिच्याही ओठातून अस्पष्ट आवाज.

एकमेकांच्या नकळत एकमेकांनां आयुष्य सोपवून बसलेले दोन वेडी लोकं!
स्वतःच्या काळजाला असं मूर्तिमंत समोर बघून आजूबाजूचं पूर्ण वातावरण शांत,रितं रितं झालेलं.कुठलाच आवाज कानापर्यंत पोहचत नव्हता फक्त हृदयाची धडधड तेवढी जिवंत असण्याची जाणीव करून देत होती.

कुणी आजूबाजूला असण्याची चाहूल नाही की डोक्यात कुठले विचार नाही. वाऱ्याने चेहऱ्यावर येणारे केस ही सावरण्याची शुद्ध तिला राहिली नव्हती.

ब्लॅक जिप्सी स्कर्ट,आकाशी कॅमिटोप, मानेखाली खांद्याजवळ, केस वाऱ्यावर हेलकावे खात असतांना मधूनच उठून दिसणारा छोटासा किंगफिशर टॅटू,डोळ्यात काजळ आणि त्याची संपूर्ण नजरबंदी!

तो तिच्या डायरीच्या पानांतून सरळ समोर उभा राहिलेला.व्हाईट हाफ स्लीव्स शर्ट,ग्रे जीन्स,तोच रुबाब,तोच दमदार प्रेझेंस.... तिचं अस्तित्व हळू हळू विरत जातंय.

ती शून्य! तो शून्य!

हे सगळं क्षणभरात पण त्यातही समोरच्याला डोळ्यात उतरवून घेण्याची,काळजात लपवण्याची वेडी धडपड.

“हेय,ऋजा..ऋतुजा....व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज. ”

कसबसं सावरत तो म्हणाला.

“Ya!!”
तिला त्याच्यासमोर उभं राहणंही कठीण होतं तिथे बोलायला शब्द सापडायची काय बिशाद.

“इथे सहज फिरायला?”
काय बोलावं,कसं व्यक्त व्हावं कसलाच ताळमेळ लागत नव्हता.

“नाही,माझी प्रोजेक्ट साईट आहे ही,टीमसोबत आलेय.”

“ओह्ह...आय सी.”

तिला काही सुचलं नाही तसं, ओळख करून देण्यासाठी ऋतूने मोनाकडे बघितलं ती ‘आ’वासून कबीरकडे बघत होती,अगदी एकटक.

तिने मोनाच्या हाताला हळूच चिमटा काढला.

“मिट माय बेस्टी अँड कलीग मोना..”

“हाय, कबीर ”
कबीर हलकेच हसून ओळख करून देत म्हणाला.

“आय हाय..” मोना हृदयावर हात ठेवत,जरा ब्लश होत म्हणाली,अजूनही त्याच्यावरून नजर हटत नव्हती.

“सॉरी..” तो जरा गोंधळला.

“I mean … hello,hi ” ती सारवासारव करत म्हणाली.

पुन्हा जीवघेणी शांतात,पुन्हा एकमेकांपासून नजर चोरणं.
ऋतूला त्याच्यासमोर सहजपणे उभं राहता येत नव्हतं.डोळे डबडबले होते,कुठल्या क्षणी ते दगा देतील याचीच तिला भीती होती.
“Actually मिटिंग इनलाइन आहेत आता,डिनरनंतर भेटूया?”

ती कसेबसे शब्द जुळवत म्हणाली.नेमकं काय बोलावं,किती बोलावं याबाबतीत तिचा प्रचंड गोंधळ उडाला होता.

“yup…cool! no problem,you carry on your work & What about room shifting?” त्याने जरासं हसत विचारलं.

“न..नाही, ठीक आहे see you , नंतर बोलूया.”

तिने त्याच्याकडे एकटक पाहणाऱ्या मोनाला जवळपास ओढत घाईघाईने निरोप घेतला.

**************

“ohh my god,he is ‘the’ Kabir?

रुममध्ये येईपर्यंत मोना ऋतूच्या भावना टिपायचा प्रयत्न करत होती.

“मोना काय चालूये?”

“तुझं काय चालूये? त्याचे डोळे बघितले का? Ohh my god तुला बघून काय फिलीन्ग्झ उतरल्या होत्या त्या डोळ्यात, मला कळलं ते तुला नाही कळत का? आणि मॅडम तुम्ही ? तुम्ही तर भान विसरून गेलेल्या,त्याचं काय?”

“मोना,उगाच काहीही अर्थ लाऊ नको.चल मिटिंग आहे,तयार हो.”

सारवासारव करत ती म्हणाली.
आवरता आवरता हातातली प्रत्येक गोष्ट खाली पडत होती.हातांना कंप जाणवत होता आणि मनात भावनांची असंख्य वादळं थैमान घालत होती,त्यांना कसबसं थोपवत ती मिटिंगसाठी तयार झाली.

************************

कबीर अजूनही कॅफेटेरियात बसून होता,त्याला आता पूर्ण खात्री होती की हे सगळं आईने मुद्दाम घडवून आणलेलं आहे.
तो चिडला आणि त्याने सरळ आईला फोन लावला.

“मॉम,तुला जरा पण अंदाज आहे,तू काय केलंय ते?”

“काय झालं?” त्या अगदी सहजपणे म्हणाल्या.

“मॉम,तुला माहित होतं ऋतूजा इथे असणार आहे म्हणून तू मला इथे पाठवलंस, हो ना?”

“कबीर प्लीज चिडू नको ,माझं ऐक जरा.”

“अजिबात नाही मॉम,मी उद्याच निघणार आहे इथून and that’s final.”

“कबीर ऐक ना बाळा प्लीज”

“अजिबात नाही,मॉम मी सांगितलं होतं ना तुला की ती एंगेज आहे.तुला का कळत नाहीये मॉम.मला त्रास होतो,मी इमोशनली विक पडतो तिला पाहिल्यावर.”
त्याला गहिवरून आलं.

“इतकं चिडायची गरज नाहीये कबीर,शांततेत ऐक.माझं एवढंच म्हणनं आहे की तुझ्या फिलिंग्ज एकदाच तिला सांग मग वाटलं तर निघून ये.”

“मॉम you are imposible .”

“ कबीर,मला जे योग्य वाटलं ते मी केलं,अजूनही तुला थांबायचं नसेल तर तसं सांग मी बोलते मनीषसोबत,तो अरेंज करेल सगळं.आमच्या NGOचं काम आम्ही बघून घेऊ. ”

“मॉम.. आता अजिबात तुझ्या इमोशनल ड्राम्याला फसणार नाहीये मी.मनीषला परतीची बुकिंग रेडी ठेवायला सांग,मी उद्या निघतोय at any cost.!!”

“कबीर,एकून तर घे...”

“बाय मॉम..”

त्याने चिडून फोन ठेवून दिला.

********************

“मोना, बच्चाला काय झालं अचानक ?मिटिंगमध्ये अजिबात लक्ष नव्हतं,काहीच रीस्पोंस नव्हता आज,रूम मिळाली नाही म्हणून नाराज झालीय का?

मिटिंग झाल्यावर,ऋतू पुढच्या क्ल्यायंटमिटला गेल्याने रीशीने वेळ साधून मोनाला एकटं गाठलं होतं.

“रिशी तू आज ह्या युनिवर्समधल्या सगळ्यात हंड्सम मुलाला बघितलं,हो ना?”

“हो गं,तुला कसं माहित?”

“That’s the spirit,कुठे बघितलं सांग बरं?”

“हे आता मिटिंगपूर्वी,तयार होतांना आरश्यात बघितलं होतं,का गं?” रिशी त्याच्या लांब केसातून हात फिरवत म्हणाला.

“so sweet n so funny , बरं मग सेकंड बेस्ट हंड्सम मुलाला तर बघितलं ना?”

“हो ,हे मात्र खरं,तो रूम नंबर ४५ ना?” तो हसत म्हणाला.

“बरोबर, इतकं सिंपल होतं ते. कोण आहे तो माहितीय का?”

“नाही बुवा.कुणी ओळखीचा निघाला का?” त्याने आश्चर्याने विचारलं.

“ये जो पागल,बेवकूफ बच्चा है ना,उस बच्चे की जान है वो.”
मोना हळूच डोळा मारत म्हणाली.

“काय सांगतेस? ऋतुजा तर कधी काही बोलली नाही?”
तो आश्चर्याने उडालाच.
“अरे तेच तुला आणि काजलला सांगायचं होतं केव्हापासून.
ऋतू मीटला गेलीय तेवढ्यात चान्स मारला.रिशी I need your help.”

“बोल ना.” तो अजूनही कबीरचाच विचार करत होता.

रीशीला कबीर आणि ऋतूच्या इमोशनल गुंत्याबद्दल थोडक्यात सांगून,त्याची काय काय मदत लागणार आहे हे तिने सांगितलं. ऋतूला कबीरसोबत इमॅजिन करूनच तो इतका खुश झाला होता की लागेल ती मदत करायला तो तयार होता.

*****************

प्रवास,दोन लागोपाठ मिटिंग आणि मन थाऱ्यावर नाही ह्या शारीरिक आणि मानसिक थकव्याने ती रुममध्ये येऊन जरा बेडवर पडली होती.
नाही म्हणायला रुममध्ये येतांना शेजारी असलेल्या कबीरच्या रूमकडे बघून तिला केवढं तरी रीलाक्स झाल्यासारखं वाटलं होतं.

“ऋतू लोळत पडू नको,तयार हो आपल्याला डिनरला जायचंय” मोना तयार होत होती.

“बस गं जरावेळ” मोनाचा हात ओढून तिने तिला बेडवर बसवलं.

चेहऱ्यावर थकव्यानंतर ही गोड गुलाबी हसू होतं.
मोनाने गेल्या सहा महिन्यात ऋतूला इतकं गोड हसलेलं कधी पाहिलं नव्हतं.अगोदर सतत डोळ्यात पाणी आणि नंतर उदासीन, कामात गर्क असलेला चेहरा अशीच ऋतू तिने पहिली होती.

“काय आज गालावर एकदम हसू वैगरे? काय प्रकार आहे.”
तिच्या केसांवरून हात फिरवत मोना म्हणाली.

“कुठे काय” ती गोरीमोरी झाली.

“ऋतू, are you sure ना तुझं कबीरवर प्रेम नाहीये?”
मोना कुठलाही प्रश्न अगदी सरळ विचारू शकते हे ऋतूला एव्हाना माहित होतं.

‘काय ग तेच तेच,नाही सांगितलय ना एकदा”
ती चिडून बोलली आणि दुसऱ्या कुशीवर वळली.

‘तसं नाही कन्फर्म केलं.चला म्हणजे माझा मार्ग मोकळा.”
तिला चिडवायला मोना म्हणाली.

“म्हणजे” ती लागलीच वळली.

“म्हणजे काय,म्हणजे मी पटवणार त्याला.जाम क्रश झालंय मला.अरे काय मुलगा आहे का काय बला आहे यार....अगं त्याला ३०२ नुसार अटक होईल,खल्लास करत हिंडतो तो.”

‘मोना गप्प बस.” आवाजात जरा जरा पझेसिव्हवाली फिलिंग.

“ओह्ह,त्रास होतोय का? लडकी समझ ना, ताजमहाल समोर उभं केलं तर आपण तारीफ करणार,१००% करणार.अरे काय ती अथलीट बॉडी,मसल्स, हाइट आणि डोळे? ओह्ह माय गॉड...ते ह्या जगातलेच नाहीये, आणि तो मेसी हेयर कट,कपाळावर येणारे फ्रीन्जेस..जरा जवळ जाऊन असे असे अजून मेसी करावे असं वाटतं.फिदा यार एकदम फिदा.”

तिला चिडवायला मोनाने तिचे केस जरा विस्कटले.

“मोने तू उठ ! जरावेळ शांत पडू दे मला.इतकं वाटत असेल तर जा की शेजारीच रूम आहे,विस्कटून ये त्याचे केस मला त्रास देऊ नको .”

ती पुन्हा दुसऱ्या कुशीवर वळली.

“ ओके बाबा, तुला त्रास होत असेल तर नाही बोलत.”

मोना उठली आणि डिनरसाठी म्हणून तयारी करायला लागली,ऋतूला ऐकू येईल इतपत गुणगुणत ती तयारी करत होती.

“मेरी खुली खुली लटो को सुलझाये, तू अपनी उंगलीयो से, मै तो हु इसी ख्वाईश में.”

***************************
एजेन्सीच्या लोकांनी पूर्ण रिसोर्ट गजबजून गेलं होतं.
दुपारी ऋतू भेटल्यानंतर पूर्णपणे कामात,मिटींग्समध्येच बिझी होती,तर आईने मुद्दाम इथे पाठवल्याचा राग,ऋजाला समोर पाहून इतके दिवस मनात दडवून ठेवलेला गोंधळ पुन्हा चेहऱ्यावर दिसायला लागण्याने होणारी चिडचिड तो अगदी वैतागला होता.

'ऋजु वेदसोबत इथे असेल' आपण इथे थांबायला नको एवढच त्याचा डोक्यात पक्क होतं.

जरा अंधारून आलं तसा तो तयार होऊन बाहेर आला.
डिनरची गडबड चालू होती.एजन्सीची टीम मोठी असल्याने त्यांचा सगळीकडे गोंधळ चालू होता.त्याने एकट्यानेच डिनर घेणं पसंद केलं,जरावेळ तो एकटाच बसून होता.

उद्या निघून जाण्यापूर्वी ऋजुला एकदा भेटून,तिला डोळे भरून बघण्यासाठी,गप्पा मारण्यासाठी त्याचं मन त्याला खुणावत होतं.

डिनर एरियामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती,कबीरची नजर मात्र एवढ्या गर्दीत तिलाच शोधत होती.ऋजु दिसली नाही पण मोना आणि रिशी बोलत असलेले त्याला दिसले.
न राहवून तो तिथे गेला.

“हाय”

“ओहह ,हाय कबीर.”

“Mona Actually I am looking for rutuja”

“ती वॉक घ्यायला गेलीय.” तिने हाताने वॉकवेकडे इशारा केला.

“ओह्ह,thanks”

“By the way , meet rishi, he is rutuja’s mentor, guardian .”
मोनाने त्यांची ओळख करून दिली.

“Ohh yes दुपारी भेटलोय आम्ही.”

“Hello Kabir,ऋतूचा फ्रेंड तो आमचा फ्रेंड. थोड्यावेळाने आमचा कॅम्पफायर प्रोग्राम आहे,you are invited for all our campfire programs.please join us.”

“Sure , thank you.Nice to meet you rishi."
पुढे जाण्यापूर्वी मनात असलेला प्रश्न विचारण्याची तो थांबला-

"मोना वेद कुठे दिसत नाहीये,भेटायचं होतं.”

“कोण वेद?” मोना झटक्यात म्हणाली.

“वेद,ऋतुजाचा कलीग..” मोनाचे हावभाव पाहून फियोन्से शब्द मागे घेत तो आश्चर्याने म्हणाला.

“अरे मे बी तो पुणे ब्रांचला असेल,ही मुंबईची टीम आहे.गेले सहा महिने ती इथेच आहे.”

“हो का? अच्छा मला माहित नव्हतं.”

ऋजुची मैत्रीण असून मोनाला वेद माहित नाही हे ऐकून त्याला जरा आश्चर्यच वाटलं जराश्या साशंकतेनेच तो मोनाने दाखवलेल्या वॉकवेकडे निघाला.

*******************

वॉकवे पुढे बर्यापैकी शांत होता,तो बरंच पुढे गेला तरी ऋजु दिसत नव्हती.
अजून थोडं पुढे गेल्यावर लहानमुलांच्या हसण्याखिदळण्याचे आवाज येत होते.एका वळणानंतर रिसोर्टवर काम करणाऱ्या लोकांची घरं होती.शेजारी छोटसं मोकळं मैदान होतं.चारपाच प्रखर लाईट्सच्या प्रकाशात ऋजु काही छोट्या मुलांसोबत आंधळी कोशिंबीर खेळत होती.
मुलं तिच्या आजूबाजूला तिला टाळ्या पिटून ‘दीदी मी इथे आहे’चा गलका करत खिदळत होती.
साधासा शॉर्ट कुर्ता,लेगींन खांद्यावरून पुढे घेतलेली सैलसर वेणी. डोळ्यांवर स्कार्फ बांधलेला तरी ओठांमधून झळकत असलेलं हास्य आणि तिची धडपड सगळं इतकं मोहक वाटत होतं की तो तसाच तिच्याकडे बघत उभा राहिला.
त्याला आलेलं बघून मुलं जरा बुजली,एकमेकांकडे पाहत उभी राहिली.त्याने हातानेच त्यांना चूप बसायचा आणि खेळ सुरु ठेवण्याचा इशारा केला.
मुलं परत खिदळायला लागली.ऋतू मुलांच्या आवाजा कानोसा घेत धडपडत कबीरवर जाऊन आदळली,क्षणभर तोल सावरायला तिने तिच्या दोन्ही हातांनी त्याचा टी शर्ट समोरून घट्ट पकडला.

कबीरच्या सिग्नेचर परफ्युमचा वास तिच्या जाणीवेत,नेणीवेत इतका घट्ट बसला होता की तिने लागलीच ओळखलं तो कबीर आहे.
तिला काय करावं उमजेना.ती तशीच उभी राहिली.
त्याने तिचा स्कार्फ खाली केला.तिच्या अगदी नजरेला नजर देत तो समोर उभा होता.
जरावेळ काय बोलावं तिला कळलं नाही.
हातात त्याचा शर्ट तसाच.
मुलं मागे उभी राहून तोंडावर हात ठेवून हसत होती.

‘actually वॉक घेत होतो,तुला पाहिलं आणि थांबलो.तुझी हरकत नसेल तर जरावेळ बोलूया का?”

जरा सारवासारव करत तो म्हणाला.

त्याला इतक्या जवळ पाहून तिला काहीच सुचत नव्हतं,उगाच धडधड वाढल्यासारखी झाली होती.शब्द सापडत नव्हते, वेळ,काळ, जागा सगळ्यांचा विसर पडला होता.त्याच्या नावाचं डायरीतलं एक एक पान,विरह,हुरहूर,डायरीच्या शब्दांनी त्याचाशी बांधलेलं नातं ,तो समोर असूनही सगळं सगळं एकत्र आठवत होतं.

अजूनही श्वासात तो परफ्युमचा सुगंध आणि लहान मुलासारखं दोन्ही मुठीत त्याचा टीशर्ट तसाच..!

“अं...अं..हो,बोलूया ना.बोल..”

“हे असचं बोलायचं?”

त्याचा शर्ट गच्च पकडून ठेवला होता त्याकडे डोळ्यांनी इशारा करत जरा गोड हसत तो म्हणाला.

“ओह्ह...सॉरी..”
ती झटक्यात भानावर आली,ओशाळून तिने त्याचा शर्ट सोडला आणि बाजूला झाली.

#क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.