Village Village Hope - Part 4 books and stories free download online pdf in Marathi

गावा गावाची आशा - भाग ४

पीएचसीला मासिक मीटिंग उरकून पूजा आणि अंकिता दोघी सोबत घरी चालल्या होत्या. चालता चालता त्यांना एक ओळखीची अंगणवाडी सेविका भेटली. तिच्याशी बोलून झाल्यावर त्या दोघी पुन्हा रस्ता चालू लागल्या.
थोडे फार पुढे चालून गेल्यावर त्यांना गावातली एक बाई भेटली. ती म्हणाली.ही पूजा कधी चालणार हळूहळू. मी जाते बाई पटापट निघून..तू रहा बाई हिच्या सोबत चालत . तुला बरं होईल.या पूजाच्या पायामध्ये जोरच नाही .ती बाई बोलली.
. मी जाते. ती बाई निघून गेली.
ते ऐकल्यावर पूजाचा चेहरा फारच केविलवाणा झाला.
पूजा त्या बाईच्या बोलण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस.ती बाई आहेच तशी फटकळ तोंडाची. तु चाल सवडीने... काय टेन्शन नाही .अंकिता तिला बोलली. पूजा यावर काही बोलली नाही. ती फक्त चालत राहिली.
.
इतक्यात मागून भरभर चालत शांभवी त्या दोघीं जवळ आली.
ती बोलली .अंकिते तू ये पुजाला सावकाश घेऊन. मी जाते पुढे. माझी दोन लहान मुले वाट बघत असतील .नवरा सुद्धा वाट बघत असेल. त्याने मला सांगितलेय लवकर यायला. मी जर लवकर घरी गेली नाही तर तो माझ्याशी भांडण करेल.मी जाते चालत पटाफट. मी जाऊ ना...

तु जा सांभवी.... जा. पटाफट पटाफट...आम्ही दोघी येऊ मागून चालत . उगीच तुला उशीर होईल आणि मग तुझा नवरा तुला बडबड करेल तुझा थांबू नकोस अजिबात. पटापट शब्दा ऐवजी प अक्षराच्या जागी फ अक्षर वापरून अंकिता तिला चिडवत बोलली. फटापट...

तेच ना... माझा नवरा कसा आहे तुला माहिती आहे. नाहीतर मी तुमच्यासोबत आले असते, हळूहळू चालत.पुन्हा शांभवी म्हणाली.
तुझा नवरा काय काम करतो ग... अंकिताने न राहूवून सांभवीला विचारले.
लॉकडॉऊनच्या आधी एका चांगल्या कंपनीत कामाला होता. पण मध्येच कंपनी बंद झाली. त्यामुळे ... आता आहे घरी बसलाय... सांभवी अपराधी स्वरात बोलली.

समजलं बाई. तुझे दुःख समजले आम्हाला... तु जा. खरंच जा. पूजा काळजीच्या स्वरात म्हणाली... त्याबरोबर मागून चालत आलेली शांभवी त्या दोघींना मागे टाकून पुढे निघून गेली . त्या दोघी हळूहळू चालत होत्या. पिवळा अंकित पूजाला म्हणाली या मुलीचा नवरा दादा रिक्षा ड्रायव्हर आहेत पण त्याचा धंदा होत नाही. हल्ली रिक्षा किती वाढल्या आहेत ना.
हो ना... हो ना .पुजा दोनदा तेच तेच म्हणाली..

अंकिता भराभर चालत तिच्या घरी गेली असती. परंतु ती पूजा साठी हळूहळू चालत होती. त्यांच्यामागून अनेक आशा वर्कर चालत त्यांना मागे टाकून पुढे गेल्या होत्या. मात्र पूजा आणि अंकिताला त्याबद्दल काही वाटत नव्हते. कारण त्यांना माहित होते कि आपले चालणे हळूवार आहे. ते तसे असल्यामुळे सहाजिकच आहे की इतरजणी आपल्याला मागे टाकून पुढे निघून जाणार आहेत. पण कासवाची चाल ही सशाच्या धावेपेक्षा सरस असते . अंकिता तिला म्हणाली.
होना.. पूजा म्हणाली.

अंकिता आणि पूजाची मैत्री ही जानी दोस्ती होती. भले त्यांची मैत्री नोकरीला लागल्यावर झाली होती. परंतु त्या एकमेकाच्या साठी खास मैत्रिणी होत्या. अंकिताचा नवरा त्याबाबत एक-दोनदा अंकितला सुद्धा बोलला होता. त्या पूजाच्या नादाला लागू नकोस. तुझा वेळ फुकट जातो. तिच्या मागे मागे आणि तिच्या सोबत फिरत राहू नकोस. तुला दुसरे काम धंदे नाहीत का.ती जाईल तिच्या घरी एकटी. तुला कशाला पाहिजे तिला सोडायला तिच्या घरापर्यंत.

मी तिच्या घरापर्यंत तीला सोडायला जात नाही. फक्त रस्त्यापर्यंत आम्ही एकमेकी सोबत असतो. आपलं घर आलं की मी घरी येते.ती जाते तिच्या घरामध्ये... तिला घरापर्यंत सोडायला ती काय कूकुळ्ळ बाळ आहे...?

बरं जाऊ दे... तुझ्या मैत्रिणी बद्दल जरासं काही मी बोललो तर तुला लगेच राग येतो... अंकिताचा नवरा तिला म्हणाला.

आणि मी कुठे जाते लांब तिच्यासोबत. गावातल्या गावात आम्ही असतो फिरत. तेही कामासाठी... नोकरीच्या साठी... आणि लोकांची सेवा करतो . भले आम्हाला त्याचा पगार मिळतअसेल थोडा फार. परंतु तो काय आम्हाला पुरत नाही... तुम्हाला तर माहित आहे ही गोष्ट...
बरं बाई समजलं समजलं... तुमची मैत्री खूपच कट्टर आहे. मला आता चांगलं समजलं . जाऊ दे सोडून दे गोष्ट .तुम्ही दोघी फिरा तुमच्या कामासाठी माझं काही म्हणणं नाही...

आता कसं शहाण्या माणसासारखा तुम्ही बोललात. अंकिता हसून बोलली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED