गावा गावाची आशा Chandrakant Pawar द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गावा गावाची आशा

सकाळी उठल्यावर पूजाआशा अंगणवाडीत गेली. अंगणवाडी मध्ये गेल्यावर तिकडे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस हजर होत्या. तिला बघून दोघीही हर्षभरित झाल्या. पूजा कशाला बघून त्यांना हायसे वाटले. पूजाला सुद्धा त्या दोघींना बघून हायसे वाटले.
दुरूनच पूजाने दोघींना हात हलवून इशारा केला.

त्या दोघींनी सुद्धा तिला हात हलवून प्रतिसाद दिला. पूजाने अबोली रंगाची साडी परिधान केली होती . त्या दोघींनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.त्या साड्यांचे ते रंंग म्हणजे त्यांच्याा नोकरीचे ड्रेस कोड होते. ती त्यांच्या दिशेने भराभर चालत जात होती.
बरोबर चालत ती त्यांच्या दिशेने गेली त्यांच्या जवळपास पोहोचतात आणि तिच्या पायाला ठेच लागली आणि तोल जाऊन ती त्यांच्या अंगावर पडली मात्र त्या दोघींनी पटकन तिला सावरली. अंगणवाडीसेविका तिला म्हणाली. एवढे घाईपण कशाला करतेस . आता पडली असतीसक्षच ना .आम्ही होतो म्हणून तुला सावरलं नाहीतरतर तोंडावर आपटली असतीस. त्यावर पूजा हसली. मात्र काही बोलली नाही.

पूजाला चालताना खूपच त्रास व्हायचा .मात्र ती नीट पुणे चालण्याचा प्रयत्न करत असायची आणि तिचे काम इमानेइतबारे करत होती तिला जे काम मिळाले होते. आशा वर्करचे काम ती प्रामाणिकपणे करत होती.

तिला आठवत होते की याच्या आधी पल्स पोलिओ मोहिमत काम करत असताना सुद्धा ती पल्स पोलिओ मोहिमत स्वयंसेविकेचे काम आनंदाने करायची आणि गावामध्ये 0 ते 5 वर्षे मुलांना पोलिओचे डोस पाजायची
त्या वेळेचा आनंद तिचा आजही तसाच दिसून येतो आहे.
घरोघरी फिरून लहान लहान मुलांना शोधून त्यांच्या तोंडामध्ये पोलिओ लसीचे दोन थेंब टाकताना तिला किती आनंद व्हायचा आणि तिचे काम बघून सुद्धा गावातील स्त्रिया महिला तिला आनंदाने पोलिओताई पोलिओताई अशा हाका मारायच्या. ते ऐकून तिला खूपच बरे वाटायचे.

मात्र आता तिला आशा ताई अशीच हाक मारली़ जात होती आणि त्याच नावाने तिला ओळखले जात होते.तिच्या अंगावरची अबोली रंगाची साडी आणि तिला असलेली गडद अबोली रंगाची किनार ती तिच्या जीवनाचा भाग बनली होती. आशा वर्कर ला पगार खूपच कमी होता .तरीही ती आनंदाने त्यामध्ये काम करत होती तिची काहीच कुरकूर नव्हती किंवा तिला तशी जास्त पैसे मिळण्याची इच्छा नव्हती लोकांची सेवा करायची हेच तिने ठरवले होते आणि त्यामुळे ती खूपच आनंदात होती.

स्वतःच्या गावात तिला ते काम मिळाले होते. तिचे घर गावाच्या बाहेर एक दूरवर होते. तरीपण तिथून ती आडवाटेने चालत यायची . झाडांची सावली घेत घेत ती वाडीवर पाड्यावर जात होती. तिथल्या गरीब मुला-मुलींना आरोग्यसेवेच्या मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य ती खूपच जोमाने करत होती आणि तिच्या जोडीला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस होत्या.

गावामध्ये त्या तिघींची जोडी खूपच प्रसिद्ध होती. प्रतिनिधीक स्वरूपात एकत्र पणे तीघीही कामे करायच्या आणि दवाखान्यातून येणाऱ्या एन एम म्हणजेच सिस्टर लाही त्या आरोग्याच्या कामांमध्ये मदत करायच्या. लहान मुलांचे वजन घेणे. लहान मुलांना इंजेक्शन साठी धरून ठेवने. त्यांच्या आईला किंवा सोबत आलेल्या महिलेला इतर गोष्टी समजावून सांगणे यासारखी छोटी-मोठी कामे त्या करत असायच्या.

लहान मुलांची काळजी कशी घ्यायची. त्यांना पूरक आहार कसा द्यायचा. कशी माहिती ते लहान मुलांच्या आईला द्यायच्या. त्याचप्रमाणे अंगणवाडीची स्वच्छता सुद्धा याकडे ते लक्ष द्यायचे तिथली स्वच्छता डोळ्यात भरण्यासारखी होती तिथल्या टापटीप पणा बघून गावातल्या महिला तिथे हमखास यायच्या आणि त्यांची नावे सुद्धा काढायचे. त्यामुळे त्या तिघींना काम करण्यास आणखीन हूरूप यायचा.

खरंतर त्यातही एकमेकीच्या जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणून झाल्या होत्या. असेच त्यांना वाटत होते. मातृ तिघींचा जॉब चार्ट वेगवेगळा असला तरी त्या मिळून मिसळून काम करायच्या बालकांच्या व गरोदर मातेच्या नोंदणी घेणे नोंदणी ठेवणे. अशी कामे त्या आवडीने करायच्या...