छेडल्या तारा हृदयाच्या - 3 - अंतिम भाग vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

छेडल्या तारा हृदयाच्या - 3 - अंतिम भाग

भाग ...३

वेलेंनटाईन डे दिवशी पूर्ण के डी कॉलेज गजबजून गेल होत.उघड उघड पने नाही पणं लपून छपून सगळेच हा डे उत्साहात साजरा करत होते.अमेय नी ही जबरदस्ती अखिल ला तयार केलं होत.एक टपोर लाल भडक गुलाबाच फुल,एक मोठीशि डेअरी मिल्क कॅडबरी आणि एक आय लव यू च ग्रीटिंग कार्ड घेऊन अखिल अस्मिता चा लेक्चर संपण्याची वाट पाहत होता.मनातून खूप घाबरला होता की अस्मिता कशी रिॲक्ट करेल..जशी अस्मिता च्या लेक्चर संपण्याची बेल झाली .अखिल ला घाम च फुटला.तो अमेय कडे पाहून अडखळत च बोलला," आम्या आज राहू दे मी पुन्हा कधी तरी बोलेन तिला."

अमेय पणं त्याला रागात पुढे ढकलत बोलला," आक्या पुन्हा नाही की उद्या नाही ..चल आजच ..होईल ते होईल..फार फार तर रागवेल दुसरं काही करणार नाही ना ? पणं तू किती दिवस असा झुरत बसणार न सांगता."

अमेय ने जवळ जवळ ढकलत च अखिल ला अस्मिता जवळ आणल .अस्मिता पायऱ्या उतरून खालच्या फ्लोअर ला चालली होती की अखिल ने तिला त्या टर्न ला च अडवल ..तो घाबरून पुन्हा एकदा अमेय कडे पाहू लागला ..अमेय ने ही त्याला एक रागीट लूक देत बोल तिच्या सोबत म्हटलं तस्स तो ही एक आवंढा गिळत तिच्या समोर आला व अडखळत च बोलला," अस्मि...ता ते ..थोड बोलायचं होत.."

अस्मिता ने त्याच्या कडे पाहिलं व एकदम शांत पने बोलली," हा बोल ना.."

अखिल च्या तोंडून शब्द च फुटत नव्हते ..कस बोलावं समजत नव्हत ..तो तसाच हाताची चुळबुळ करत उभा होता हे पाहून अस्मिता परत त्याच्या कडे व आपल्या हातातील घड्याळा मध्ये पाहत बोलली," अरे अखिल बोल लवकर बस चुकेल वेळ झालाय."

अखिल थोडी हिंमत एकवटून बोलला," अस्मिता ..अस्मिता ते मला तू खूप आवडते..I love you..."

त्याने हातातील फूल,ग्रीटिंग आणि कॅडबरी तिच्या समोर धरत डोळे बंद करून एका दमात बोलून टाकलं.बराच वेळ अस्मिता चा काहीच रिप्लाय आला नाही म्हणून त्याने डोळे उघडुन पाहिलं तर अस्मिता केव्हाच तिथून गेली होती ...त्याने रागात अमेय कडे पाहिलं व हातातलं सर्व तिथेच टाकून अस्मिता च्या मागे पळाला तर व तिला अडवत बोलला," अस्मिता ऐक ना.."

अस्मिता त्याच्या कडे थोड रागात पाहत बोलली," अखिल प्लीज मला जाऊ दे मला तुझ्या सोबत काहीच बोलायचं नाही."

अखिल थोड दुखी होत व गडबडीत बोलला,"अस्मिता मी बोललो ते सर्व विसरून जा.. आपण फ्रेन्ड आहे आणि नेहमी फ्रेण्ड्स राहू..मी तुला अजिबात कसला ही त्रास देणार नाही प्लीज तू मला चुकीचं समजू नको..मी ..मी खरच या पुढे कधीच अस काही बोलणार नाही प्लीज अस्मिता.."

अस्मिता तरी ही त्याचं काहीच ऐकून न घेता निघून गेली.अस्मिता गेल्यावर अखिल मात्र अमेय वर फार च चिडला.त्या दिवसा पासून अस्मिता अखिल सोबत बोलत नव्हती आणि अखिल ही मुद्दाम तिच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करत नव्हता उगाच आपल्या जबरदस्ती करण्या मुळे अस्मिता जास्तच दूर जाईल याची भीती वाटत होती त्याला त्यामुळे तो ही अंतर ठेऊन च राहत होता..पणं आज ही तो ती काही ही न बोलता तिची प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचा.

कॉलेज सुटल्यावर घरी जाताना बस मध्ये फार च गर्दी होती त्यात अस्मिता जिथे उभी होती तिथे च एक माणूस ही अगदी तिच्या जवळ उभा होता पणं मुद्दाम अस्मिता च्या जवळ जाण्याचा तिच्या हातावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.सविता ला ही त्या माणसाचा खूप राग येत होता पणं बस मध्ये खूप गर्दी होती उगाच बस मध्ये तमशा नको म्हणून ती ही गप्प होती पणं अखिल ला अस्मिता चा अवघडले पना जाणवला व तो त्या माणसा ला बाजूला सारून तिच्या समोर जाऊन उभा राहिला पणं त्याने एकदा ही तिच्या कडे पाहिलं नाही..आणि ही गोष्ट अस्मिता च्या ही लक्षात आलं..अलीकडे त्यात झालेला बदल अस्मिता ला ही जाणवत होता..पाहिल्या सारखं तो क्लास रूम मध्ये तिच्या कडे पाहत बसायचा नाही..सारखं तिच्या मागे पुढे करायचा नाही आणि या गोष्टी मुळे अस्मिता मात्र अस्वस्थ होऊ लागली होती पणं तिचं तिला कळत नव्हत की तिला अस अखिल च दूर राहणं का इतकं त्रास देतय.अस्मिता आणि सविता दोघी ही बस मधून उतरल्या तस्स सविता अस्मिता सोबत घरी जाता जाता बोलली," आशू अग जो व्यक्ती तू ओठांनी न बोलता ही तुझ्या अडचणी समजू शकतो त्याच्या इतकं प्रेम तुला कोण करू शकेल ? आशू एकदा तरी अखिल चा विचार कर."

अस्मिता मात्र काहीच बोलली नाही आणि तशीच घरी निघून गेली.

आज अस्मिता च जॉग्रॉफी ची ओरल होती.ओरल घेण्यासाठी बाहेर च्या कॉलेज चे प्राध्यापक येणार होते..पणं ते थोडे उशीरा ने च आले ..कॉलेज सुटून बराच वेळ झाला होता आणि सविता बराच वेळ तिच्या साठी थांबली होती ..पणं उशीर होणार होता म्हणून अस्मिता ने तिला घरी जायला सांगितलं आणि सविता ही मग घरी निघून गेली .अखिल आणि अमेय पणं निघून गेले .अस्मिता आता फक्त त्यांच्या गावची एकटी च राहिली होती.

प्राध्यापक आले आले आणि त्यांनी ओरल ला सुरवात केली अस्मिता चा नंबर अगदी शेवटी होता त्यामुळे तिला बराच वेळ वाट पाहावी लागली..जसा तिचा नंबर जवळ येऊ लागला बाहेर पावसाने हजेरी लावली होती..बघता बघता पावसाचा जोर इतका वाढला की सर्वत्र पाणीच पाणी झाल होत ..ओरल होईल तस्स प्राध्यापकांनी ही मग मुलांना घरी जायला सांगितल ..आता कॉलेज मध्ये फक्त तीन चार मुल अस्मिता आणि प्राध्यापक उरले होते..कॉलेज बाहेर पूर्ण अंधार दिसत होता..बाहेर सुरू असणारा पाऊस आणि अंधार झालेला पाहून अस्मिता भीतीने गोठून गेली होती.घड्याळात रात्री चे सात वाजले होते ..आता घरी कस जायचं ?बस असेल का आता ? आणि हा पाऊस थांबायचं नाव नाही घेत..आपण घरी व्यवस्थित तरी पोहचू की नाही ? आई आणि प्रतीक चा चेहरा तिच्या नजरे समोर तरळू लागला होता..त्या पावसात ही ती कॉलेज बाहेर पडली पणं समोर चा अंधार पाहून तिचं पाऊल पुढे ही पडत नव्हत.. कपडे भिजून ओले चिंब झाले होते...पावसा बरोबर डोळ्यातलं पाणी झर झर वाहू लागलं होत ..मनात ती हजारदा देवाच्या धावा करत होती..भित भित च तिने एक एक पाऊल पुढे टाकल...आणि कॉलेज चा गेट कसा बसा पार केला ..कॉलेज च्या गेट बाहेर च एक भल मोठ चिंचेचं झाड होत..त्या झाडा खाली तिला कोणी तरी उभ असलेलं दिसलं ..त्याचं अंग पावसाने ओल चिंब झालं होत...तो थंडीने कुडकुडत होता ..अस्मिता थोड घाबरून च त्या व्यक्ती कडे पाहत होती पणं तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता..अचानक वीज कडाडली आणि तिला त्या प्रकाशा त समोरच्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसला तो अखिल होता.अखिल ..अखिल ला समोर पाहताच अस्मिता च अस्वस्थ मन एकदम आनंदाने भरून आलं...ती तिच्या ही नकळत पळत जाऊन अखिल ला बिलगली आणि मोठ्याने रडायला लागली.अखिल तिला अस रडताना पाहून घाबरला..प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत तो ही घाबरून तिला विचारू लागला," अस्मिता काय झालं ? तू रडतेय का ? कोणी काही बोलल का तुला ? "

अस्मिता ने स्वतः ला थोड सावरलं व ती अखिल कडे पाहत बोलली," तू इथे काय करतोय ?"

अखिल खाली मान घालत बोलला," सॉरी प्लीज रागावू नको..तू एकटी होती म्हणून मला काळजी वाटली म्हणून मी थांबलो पणं कॉलेज चा गेट बंद झाला आणि मला आत ही सोडत नव्हते वॉचमन काका म्हणून मला इथेच थांबव लागलं..मी थांबलो याचा तुला राग आला असेल तर खरचं सॉरी अस्मिता.."

अस्मिता ने तर त्याच बोलणं ऐकून डोळे च मोठे केले म्हणजे सलग दोन तास तो या धो धो कोसळणार्या पावसात तिच्या साठी थांबला होता..त्याचं अंग पूर्ण गारठून गेलं होत कपडे भिजून पूर्ण अंगाला चिटकले होते..हात पाय थंडी ने कापत होते..आणि अशा अवस्थमध्ये ही तो तिलाच सॉरी बोलत होता तिला वाईट वाटलं असेल म्हणून..अस्मिता च मन त्याच्या प्रेमाच्या पावसात भिजून गेलं ..तिच्या त्या दगडा सारख्या हृदया च्या ही तारा त्या प्रेमाच्या पावसाने छेडून टाकल्या आणि त्यातून फक्त अखिल अखिल हेच संगीत वाजू लागलं..तिने पुन्हा रडत अखिल ला मिठी मारली..पावसा सोबत तिचे ही डोळे वाहत होते..आणि तो घाबरून अजून ही वेड्या सारखा तिला विचारत होता," अस्मिता काय झालं सांग ना ग ? कोणी काही बोललं का ? "

तरी ही ती त्याच्या मिठीत रडत च होती..रडता रडता अचानक तिने त्याच्या कडे पाहिलं व हसत बोलली," हो माझं मन बोललं ..अखिल अखिल..झालं ..प्रेम झालं अखिल..या तुझ्या प्रेमाच्या पावसाने माझ्या ही हृदयाच्या तारा छेडल्या अखिल..अखिल I love you.."

ती पुन्हा त्याला बिलगली.अखिल ला मात्र ती जे बोलली त्यावर विश्वास च बसत नव्हता त्याने एकदम तिला स्वतः पासून दूर केलं व चकित होऊन तिला विचारल," आशू खरचं ?"

अस्मिता ने लाजून हसत मान डोलावली तस्स अखिल ने आनंदाने पुन्हा पटकन तिला आपल्या मिठीत लपवली..थोड्या वेळा पूर्वी दोघांना ही नकोसा वाटणारा पाऊस अचानक त्यांना खूप हवा हवासा वाटू लागला होता..त्या पावसाने दोन प्रेमी जीव एकत्र आणले होते.

समाप्त