करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 8 - अंतिम भाग Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 8 - अंतिम भाग

प्रार्थना आपल्या वडिलांचा गुन्हा जो की, त्यांनी तिलाच तिच्या आई - वडीलांपासून इतके वर्ष दूर ठेऊन केला असतो 😢 त्याची शिक्षा द्यायला एक प्लॅन करते.... ती घरी एक पार्टी अरेंज करते आणि इन्व्हीटेशन आपल्या खऱ्या आई - वडिलांना सुद्धा देते.....

सगळे पार्टी साठी जमतात...... तिचे प्पा अँड मॉम ही आले असतात..... थोड्या वेळाने एन्ट्री होते ती प्रसाद म्हणजेच तिच्या खऱ्या बाबांची....! त्यांना बघून तिच्या प्पाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात..... ते प्रार्थनाकडे रागातच बघतात...... प्रार्थना मात्र आता न घबरता त्यांच्या डोळ्यांत इतक्या रागात बघताना बघून, त्यांचा राग अनावर होतो..... ते रागातच तिच्याजवळ येतात......

प्पा : "व्हॉट्स धिस कियारा.....??😠"

प्रार्थना : "प्पा...... हे आपले आजचे चीफ गेस्ट..... मिस्टर अँड मिसेस यादव.....☺️"

प्पा : "सिक्योरीटी....... यांना बाहेर काढा.....😠"

दोन सिक्योरीटी गार्ड्स धावतच आत येत, त्यांना हात लावणार तोच......

प्रार्थना : "वेट मिस्टर अडवाणी...... घाई कसली आहे..... आता तर, प्रोग्रॅम सुरु झालाय......😏"

प्पी : "कियारा.....😠"

प्रार्थना : "प्रार्थना....... नॉट कियारा...... अंडरस्टँड अँड ओरडू नका......😠 मी शांत आहे तोवर शांत राहू देत..... मी भडकले ना तुम्हाला परवडणार नाही मिस्टर अडवाणी.....😠 आजवर हेच केलंय ना तुम्ही.... एका पाळीव कुत्र्याला माझ्या अंगावर सोडून, मला गप करत गेलात आणि इतकेच नाही तर, मी तुमच्या कंट्रोलमध्ये राहावी म्हणून, आयुष्यातल्या चांगल्या फिलिंग्जची वाट लावलीत....😠😡"

आता मात्र गेस्ट सोबतच तिचे सो कॉल्ड प्पा अँड मॉम डोळे फाळून तिच्याकडे बघतच बसतात......😲😲

मॉम : "कियारा.....😡 व्हॉट्स धिज....😡 ह्या ड्राम्यासाठी बोलवून घेतलंस.....😡😡😡"

प्रार्थना : "प्रार्थना...... कॉल मी प्रार्थना...... अँड ओह्ह..... माय ग्रेट मॉम...... तुम्हीच होता ना त्यादिवशी मी रुमच्या बाहेर आले नाही तर, गुरू सारख्या चीप माणसाला माझ्या रुममध्ये पाठवून देणाऱ्या..... हीच असते का आई.... सांगा ना मॉम..... हीच असते....😭"

तिला रडताना बघून, आर्या कासावीस होतो......

आर्या : "बेबी...... डोन्ट क्राय....😢 आज काय ते क्लिअर करूनच टाक....😡"

प्रार्थना : "मिस्टर उपाध्याय कम हिअर....😡"

उपाध्याय : "येस मॅडम......😟😟"

प्रार्थना : "मिस्टर आडवाणींवर तुम्ही एक केस फाईल करा...... त्यात माझे ऑब्जेक्शन आहेत...... यांनी मला बालपण ते आज पर्यंत स्वतःच्या दबावाखाली मेंटल स्लेव बनवून ठेवले..... माझा फक्त आणि फक्त मेंटली ट्रौचर केलं गेलं...... ह्या क्राईमचे साक्षीदार स्वतः मिस्टर अँड मिसेस आडवाणी आहेत....😡 अँड दॅट चिप गुरू..... आय वॉन्ट टू फाईल रेप केस अगेन्स्ट हिम..... आज कोणालाही सोडणार नाही मी... त्याचबरोबर मिस्टर प्रसाद यादव यांच्या बाजूने एक केस फाईल करा..... डीफामेशनची.....😡 मिस्टर अडवाणी यांच्या कडून त्यांच्या इतके वर्ष झालेल्या मानहानीची....... राईट मिस्टर अडवाणी.....😡 आणि हे कुठल्या कठोर कायद्याच्या चौकटीत बसेल त्याची चांगलीच व्यवस्था करा....😡"

तिचे प्पा टेन्शनमध्ये येतात.....😓😓

प्पा : "वाटलं नव्हतं मुकाट्याने ऐकून घेणारी गाय उद्या मारकी म्हस बनेल....😡😡😡"

प्रार्थना : "वेळ पडली तर पार्वती सारखी शांत मूर्ती सुद्धा दुर्गेचे रूप घेते हे विसरू नका मिस्टर आडवाणी...... शिक्षा तर होणारच.....! एका मुलीला तिच्या आई - वडिलांपासून इतके वर्ष दूर ठेवताना लाज कशी वाटली नाही......😡😡 इन्स्पेक्टर, घेऊन जा यांना माझ्या समोरून आणि मिस्टर उपाध्याय काय ती कार्यवाही लवकरात - लवकर करा.....😡"

प्पा : "उपाध्याय तुम्ही पार्टी कधी बदलली.....😡😡"

कियारा : "ते गरजेचं नाही मिस्टर आडवाणी..... तुम्ही आता पुढे स्वतःचा बचाव कसा करणार हा विचार करा.....😡"

कॉन्स्टेबल त्यांना तिथून घेऊन जातात.....

प्रार्थना सगळ्या तयारीनिशी आज तिच्या प्पांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा करते..... कोर्ट प्रोसेस तर होत राहील पण, खरी शिक्षा ही त्यांच्या भाषेत मिळणं गरजेचं होतं.....😡 जे प्रार्थनाने चोख प्रत्युत्तर देऊन बजावलं....😎💥

इथून पुढे प्रार्थना अशा मुलींसाठी एक सेंटर ओपन करते जिथे, घरच्यांच्या दबावाखाली असलेल्या मुलींवर मेंटल ट्रीटमेंट करून, त्यांना फ्रीली जगता येईल यासाठी ती काम करणार असते आणि यात तिला फॅमिली सपोर्ट ही असतोच.....☺️



सदर कथेत कियारा उर्फ प्रार्थना हिच्या प्पाने तिची लाईफ तिच्याच थॉट प्रोसेस वर कंट्रोल मिळवून, करप्ट केल्याचं समजते.... जर, तिला तिच्या लाईफ मध्ये आर्या नसता भेटला तर?????? तिच्या खऱ्या पॅरेंट्सने तिला सगळं खरं नसतं सांगितलं तर???????? काय कियारा कधी पोहचू शकली असती तिच्या आभासी पॅरेंट्सच्या खोट्या मुखवट्या पर्यंत?????

वास्तविक जगात सुद्धा अशा किती तरी प्रार्थना स्वतःची मानसिक कुचंबणा सहन करत, कोणासाठी तरी कियारा बनून जिवंत आहेत.... केवळ या आशेवर की, कोणी आर्या येईल त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढायला....!😓😢


समाप्त........

✍️ खुशी ढोके