भाग १
हाय फ्रेंड्स
आज मी एक नवीन कथा घेऊन आले आहे.
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे दिसतात पण मन हे एक अस अवयव आहे जे दिसत तर नाही पण आपल्या कडून अश्या गोष्टी करून घेत ज्याची आपण अपेक्षा देखील केलेली नसते. अस म्हणतात कि प्रेमात आणि युद्धात सगळे काही साम्य असते, पण ज्या व्यक्तीला कायम युद्ध करून जिंकण्याची सवय झाली असेल तर प्रेमाने जिंकणे किती कठीण असते कि सोप्पे हे जाणणे कठीण. अशीच एक कथा आहे कादंबरीची.
अचानक मागे १ वर्षात काय घडून गेले हे आठवून कादंबरीला स्वतःचेच हसू आले. आणि क्षणार्धात ती मागे १ वर्ष गेली. आज हि तो दिवस आठवतो त्यांची पहिली भेट, भेट कसली !!!!!!! युद्धच 😂😂😂😂😂. जर तेव्हा ते शिंदे सर मध्ये नसते आले तर एकमेकांचे केस ओठ्ले असते यांनी.
कादंबरी तिला जसे हवे तशी वागणारी आणि प्रथम मन धावेल तश्या दिशेने धावणारा आज असा तर उद्या तसा. आणि या दोघांची भांडणं का झाली तर प्रथम मुलाखत देण्यासाठी साध्या कपड्यात आला अजिबात शिस्त नाही कि टापटीप पणा नाही. आणि या उलट कादंबरी अगदी चौकात जरी जायचे असले तरी नीट व्यवस्थित कपडे खालून थोडीफार आवरून जाणारी. लिफ्ट मध्ये त्याचा अवतार पाहून तिला राग आला पण जेव्हा प्रथम शिंदे सरांशी बोलत होता तेव्हा तिला समजले कि हा तर माझ्या सोबतच्या पोस्ट साठी मुलाखत देण्या साठी आला आहे तेव्हा मात्र तिची तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्यांचे जोरात भांडण सुरु झाले.
या सर्व गोष्टीत अडकले ते म्हणजे शिंदे सर, त्यांना समजतच नव्हते कोणाची बाजू घ्यावी कारण प्रथम च्या मते कोणी कस रहाव हा त्याचा ववयक्तिक प्रश्न आहे आणि त्या मुळे जर त्याला हि नोकरी नाही मिळणार तर यात कादंबरी चा काही एक संबंध नाही. म्हणून तिने कोणतीही टिपणी देऊ नये. आणि कादंबरी च देखील म्हणन योग्य होत माणसाची पहिली ओळख हि त्याचे राहणीमान असते, तर कमीत कमी मुलखाती साठी तरी नीट तयार होऊन आल पाहिजे. शिंदे सर तर पूर्णपणे अडकले, कसाबसा हा गुंता सोडून दोघांना आपापल्या कामाला त्यांनी पाठवल. पण त्यांना अजून एक मोठ टेन्शन समोर दिसल ते म्हणजे प्रथमच तर सिलेक्शन पहिलच झाल आहे आज त्याला फक्त फायनल मीटिंग साठी बोलवल आहे आणि हे दोघे माझ्या सोबत एकाच प्रोजेक्ट वर काम करणार !!!!!! काम करणार कि भांडण 😨😨😨😨.
कादंबरी हि आपल्या कथेतील हिरोईन, जी स्वावलंबी, निडर, खंबीर, स्वतःच्या कामाशी एक निष्ठ आणि हुशार, पहिल्या पासून वडिलांच्या व्यवसायात थोडा देखील रस नाही म्हणून कोल्हापूर सोडून पुण्यात नोकरी करणारी.
आणि प्रथम एकदम हुशार बड्या बड्या कंपनीच्या ऑफर ठुकराउन लावणारा का तर मी जसा आहे तसा राहणार. का तर व्यवस्थित राहिलो तर काम सुचत नाही आणि कामात लक्ष लागत नाही अस तो सर्वाना सांगायचा. दोघे एका वेगळ्या टोकाचे पण कामात मात्र हुशार म्हणूनच तर येणाऱ्या त्या मोठ्या प्रोजेक्ट वर कंपनीला ते दोघे एकत्र हवे होते.
आणि त्यांना लीड करायची जबादारी होती ती शिंदे सरांची, जबाबदारी कसली भले मोठे संकट होते ते, ज्याचा अंदाज त्यांना लिफ्ट मधेच आला होता. आणि त्यात दोन दिवसात प्रथम जॉईन करणार. कादंबरीला पेन देखील जागच हलेल चालत नाही आणि हा कधी स्वतःची कपडे नीट घालत नाही तर स्वतःचे टेबल काय नीट ठेवणार. शिंदे सरांना तरतरुण घाम फुटला. कारण ह्या दोघात वाद म्हणजे कंपनीचे नुकसान 😒 😒 😒 😒....