मन माझे - 3 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मन माझे - 3

भाग ३

इथे सगळे टेन्शन मध्ये आणि तिकडे प्रथम मात्र निवांत तयार होऊन ऑफिस ला यायला निघाला असतो.

तेवढ्यात बॉस ची एन्ट्री होते, आता मात्र कादंबरी आणि शिंदे सरांना टेन्शन आले कारण ते आले म्हणजे यांना प्रेसेंटेशन द्याव लागणार. आणि मिस्टर शिंदे तर घामाने भरले होते, आता मात्र काही खर नाही, तितक्यात आतून त्यांना बोलवण्याचा आवाज आला.

दोघांकडे काहीच पर्याय नव्हता दोघे निघाले, आत प्रेसेंटेशन सुरु होणार तितक्यात हिरोने एन्ट्री मारली आणि मिस. कादंबरी shall we start ???? अस म्हणून सुरुवात देखील केली, कादंबरी काही सेकंद स्तब्थ झाली प्रथम च्या आवाजाने ती जागेवर आली आणि प्रेसेंटेशन सुरु झाले. त्याचा तो confidence, attitude आणि हजरजबाबी पणा पाहून सगळे खूप impress झाले. कादंबरी ला तर शॉक लागायचा बाकी होता, हा तोच आहे का ज्याला आपण त्याच्या राहणीमानावरून बोललो. या सर्वात शिंदे सर मात्र खूप खुश होते, त्यांच्या वरच खूप मोठ टेन्शन गेले होते. समोरील पार्टी पण खूप खुश होती आणि बॉस शी बोलून ऑर्डर पण फायनल झाली होती. हे बाहेर कळताच सर्व स्टाफ प्रथम ला अभिनंदन करू लागले. एका बाजूला शिंदे सर खुश होते कि ते एका मोठ्या problem मधून बाहेर पडले आणि इकडे कादंबरी- काय म्हणावं या माणसाला पहिले सगळ्यांना त्रास दिला आणि आता सगळ्यांकडून स्वतःची व्हाव्हाई करून घेतो आहे. इथे सगळे किती टेन्शन मध्ये असतील याचा विचार देखील केला नाही हे म्हणत ती तिच्या जागेवर बसून आपापल्या कामाला लागली. राग तर खूप होता कारण खरी मेहनत तर तिने केली होती, आणि मेवा प्रथम ला मिळत होता.

थोड्या वेळात तिच्या टेबल जवळ प्रथम आला. मोठा श्वास घेऊन हेलो मिस. कादंबरी, shall we go for coffee ? because I really want say thank you to you……… आणि दात काढून हसला 😁 😁 😁 😁

कादंबरी मात्र दोन मिनिटे आवक होऊन त्याच्या कडे पाहू लागली...... आणि त्याने तिची तंद्री भंग केली shall we म्हणत ..........

खरतर कादंबरी ला नाही म्हणायचे होते पण तितक्यात तिथे शिंदे सर आले, आणि स्वतःच ठरवून रिकामे झाले... अरे का नाही आपण कॉफी तर नक्कीच घेऊ शकतो.... हो कि नाही कादंबरी ?????? आता मात्र तिला खूप राग आला होता पण manager म्हणतो म्हणाल्यावर नाही कस म्हणायचं................

म्हणून तिघेहि cafeteria मध्ये गेले, तिघांनी कॉफी मागवली. इथे या दोघांच्या छान गप्पा चालू होत्या आणि कादंबरी ला राग येत होता.

जर यांनाच बोलायचं होत तर मला का घेऊन आले ?????? आले तर आले एकदा साधे thank you पण नाही म्हणालेत, जर प्रेसेंन्टेशन बनवलच नसत तर present काय केल असत !!!!!!!!!!!

तितक्यात शिंदे सरांना फोन आला म्हणून ते बाजूला गेले, आणि प्रथम ने आपला मोर्चा कादंबरी कडे वळवला, हे हाय कादंबरी सॉरी हा आल्यापासून खूप गोंधळ चालू आहे सो तुला thank you म्हणताच नाही आल. तू खूप छान तयारी केली होती सो आपल्याला present करताना अजिबात टेन्शन नाही आल, आणि सगळ कस व्यवस्थित झाल. You are just amazing अस म्हणून त्याने हाय फाय करायला हाथ पुढे केला.

पण उलट झाल कादंबरी जि इतक्यावेळ शांत आपला राग आत दाबून ठेऊन होती तो बाहेर निघाला.......................... काय just amazing हा तुला काही कळत कि नाही आज किती मोठ्या प्रोब्लेम मध्ये होतो आम्ही माहित आहे तुला जर वेळेवर नसतास आला तर शिंदे सर काय बोलले असते मीटिंग रूम मध्ये.............. ते सोड जर बॉस ला कळल असत तर आज शिंदे सर कायमचे घरी गेले असते. Job म्हणजे एकट्याने काम करण नसत आपल्या सोबत आपली टीम पण असते, प्रत्येकाचा विचार करायचा असतो...............

हे सर्व बोलून तिला दम लागला तर हा शहाणा तिला पाण्याचा ग्लास ऑफर करतो ----------------- आता मात्र काही खर नाही ..................