मन माझे - 4 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मन माझे - 4

भाग ४

आता मात्र हद्द झाली होती, ती एवढी चिडलेली असून हा मात्र एकदम कूल......................

तिच्या रागाचा पारा वाढत चालला होता, इतका कि हातातला कॉफी फुटायचा बाकी राहिला होता 😤😤😤😤😤😤.

हे शिंदे सरांनी पाहिलं आणि त्यांचा मोर्चा त्या दोघांकडे वळवला, कारण आता या दोघांमध्ये वाद नाही तर युद्ध होऊ शकते हे त्यांना कळून चुकले होते.

या दोघांनी हा एक प्रोजेक्ट जरी एकत्र केला तरी त्यांच्या साठी खूप होत, हाच तर मोठा प्रोजेक्ट बॉस ने त्यांना दिला होता.

शिंदे सर तिथे आल्यावर कादंबरी ने त्या दोघांना इग्नोर करून तिथून निघून गेली, कारण तिला तिचा दिवस खराब नव्हता करायचा. पण ती विचारात गुंगली हा माणूस असा अस्थाव्यस्थ पण कामा साठी उभा राहिला कि, मात्र भल्या भल्या ला गप्प करेल अस स्कील. नक्की आहे काय हा या विचारात ती पडली 🤔🤔🤔🤔🤔🤔 .

आणि सगळे विचार बाजूला सारून ती कामाला लागली. सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे तिच्या अगदी समोरचा डेस्क हा प्रथम चा नाही म्हणल तरी रोज सामोरे जाऊ लागणार होत. तिला त्याची काम करण्याची पद्धत फार आवडली होती एकदम presentable but इतर बाबतीत कठीण 😜😜😜😜.

हा सर्व विचार बाजूला सारून तिने तिचे काम आटोपले आणि घरी जायला निघाली. खाली येऊन ऑटो शोधात होती तर हा कार घेऊन तिच्या समोर उभा राहिला, आणि तिला लिफ्ट साठी ऑफर दिली. तिला खरतर त्याला नाही म्हणायचं होत, पण आधीच उशीर झाला आणि त्यात इतक्या उशिरा तिला ऑटो देखील मिळत नव्हती, म्हणून नाईलाज म्हणून तिने त्याची ऑफर accept केली.

तिला तर भीती होती आता गाडी अस्थाव्यस्थ नसली म्हणजे बास. पण आत बसताच फ्रेश स्मेल सुंदर अस इंटेरिअर, मन प्रसन्न झाल. गाडीत छान music .......... अनपेक्षित होत सगळ तिच्यासाठी पण तिला खूप छान वाटल हा जसा राहतो तसा तो actual नव्हत.

ती त्या गाण्याच्या स्वरांमध्ये गुंगली होती, आणि त्याने तिला आवाज दिला........

प्रथम- हे !! कादंबरी तुझा address ?????

कादंबरी- थोडा वेळ शांत राहून..... तू काही विचारलस का ????? मी ऐकल नाही गाण्यात गुंगले होते....

प्रथम- ओह्ह्ह no issue, मी विचारल कि तुझा address काय आहे घरी जायचं आहे कि, असच आज शहरात फिरत राहायचं ?????

बघ म्हणजे मला चालेल मी असाच फिरत असतो. कारण असच रात्री मोकळ्या रस्तावर मला फिरायला आवडत. हि शांतता कोणत्याही गाड्यांचा गोंगाट नाही कि कोणत प्रदुर्षण नाही. एकदम छान वातावरण, थंड हवा, कोणाचा कोणताही disturbance नाही कि कोणत काम नाही. तुला काय वाटत ?????

कादंबरी २ मीनट चाकं होऊन त्याच्या कडे पाहत होती.....

कादंबरी- मी अस कधीच केल नाही........ ती काही हि न विचार करता पटकन बोलून गेली............. आणि बोलल्यानंतर समजल कि काही तरी अस बोलून गेलो जे तिला प्रथम सोबत बोलायचं नव्हत............

प्रथम थोडा शांत झाला त्याला काय बोलाव हे सुचलंच नाही. आणि त्याने गाडी थांबवली. त्याने गाडी थांबली तशी कादंबरी घाबरली तिला प्रश्न पडला याने अचानक गाडी का थांबवली ????? तिच्या चेहऱ्यावर त्याला ते साफ दिसल... तू एक स्माईल देऊन 😉 😉 😉 😉 अग तुझ घर आल म्हणून गाडी थांबवली.... म्हणजे बघ तुला घरी नसेल जायचं तर अजून रात्रभर आपण फिरू शकतो तिची खिल्ली उडवत तो बोलू लागला.....

आणि हि इकडे गाडी चा डोर ओपन करून निघून गेली !!!!!!!!!!!!!!!!

प्रथम- अरे हि काय मुलगी आहे हिला घरा पर्यंत पोहोचवलं साध thank you देखील नाही म्हणाली, मी तर गमंत करत होतो मला तर जाम कंटाळा आला होता आता गाडी चालवायचा मी थोडीच आता घेऊन जाणार होतो ??????????????