जुळून येती रेशीमगाठी - भाग 4 Sheetal Raghav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळून येती रेशीमगाठी - भाग 4

रुद्राक्ष आपल्या स्टडी रूममध्ये बसून कोणाशीतरी बोलत होता पण ते बोलणं कमी असून ओरडन जास्त होत . बिचारा आता जर तो रुद्राक्षच्या समोर असता तर त्याच काही खरं नव्हतं .

"हाय ब्रो " क्या बात हे, आज चक्क घरी . मीरा समीरच्या बाजूला बसत त्याला बोलली .

"का! मी घरी नाही असू शकत " तसही दादा पण आहे ना घरी त्याला नाही बोलली असं .

दादा आणि घरी , तो फक्त नावाला घरी आहे बाकी त्याच स्टडी रूम दुसरं ऑफिसच आहे .

"दादा " मी काय म्हणते, तू आज घरी आहे तर.....

एक मिनिट तुझा काय विचार चालू आहे .....समीर तिला मध्येच तोडत बोलला . कारण मीरा अशी बोलत आहे म्हणजे तिच्या मनात काही तरी चालू आहे हे समीरला कळालं .

असं काही नाही काही मी तर असाच बोलत होती कि .... म्हणजे खूप दिवस झाले आपण एकत्र कुठे बाहेर नाही गेलो आहे तर आज तू पण घरी आहेस तर जाऊया ना कुठे तरी....

नाही हा मी कुठेच नाही जाणार आज मी घरीच राहणार आहे .

"अस काय करतोस , जवळच जाऊया........ प्लीज जाऊया ना... " मीरा लाडीगोडी लावत होती समीरला .

"नाही "

" मी शेवटच विचारते घेऊन जाणार आहेस कि नाही तू " ,

मी पण शेवटच सांगतो "नाही"

"ओके " मग मी दादूला सांगते काल तू जिंकलाच ते बाइक रेसिंग मध्ये . मीरा डेव्हिलवाली स्माईल देत बोलली .😈

तसा समीर ओरडतो " नको.....ss " मग घेऊन जाणार ना ...

ओके ...कुठे जाऊया . तशी मीरा खुश होत " शॉपिंग "

काय .. शॉपिंग ,नाही हा दुसर काही तरी बोल . तुझी शॉपिंग म्हणजे पूर्ण गाव फिरण्या सारखं आहे . समीर बोलत असतो कि मीरा त्याच्याकडे बारीक डोळे करून रागाने पाहत असते. तसा समीर हसत अंग मस्करी करत होतो , जा तू तयार हो मग निघूया नाही तर उशीर होईल .

कुठे जायचं चालू आहे . रुद्राक्ष जस्ट स्टडी रूम मधून आला होता त्याने फक्त लास्टच वाक्य ऐकल होत .

दादू ते आम्ही शॉपिंगला जात आहोत . तू पण चल ना .

नाही तुम्ही जा , मला काम आहे हवतर कार्ड घेऊन जा .

दादा चल ना रे ..........

"बच्चा" मला काम आहे हवतर कार्ड घेऊन जा .

नको मला तूच कार्ड , मला तू हवा आहेस शॉपिंगला पण तू तर नाही बोलत आहेस ना , जाऊदे मी माझ्या फ्रेंड्सला सांगत असते कि माझा दादा माझ्यासाठी काही पण करू शकतो पण तू तर एव्हडं पण नाही करत आहेस.आता त्यांना कळाल तर ते काय बोलतील मग मी माझ्या दादू बदल काय सांगू फ्रेंड्सला . मीरा नाटकीपणे आपले डोळे पुसत बोलली . इकडे समीर मीराची नोटकी पाहून मनातच डोक्याला हात मारला . 🤦🏻‍♂️

रुद्राक्ष कपाळावर दोन बोटं रफ करत " ओके " मी येतो शॉपिंगला .

थँक्यू .... थँक्यू दादू . तू येतोय . मीरा त्याला मिठी मारत बोलली .

"ब्लॅकमेलर" तो मीराच्या डोक्यात टपली मारत बोलला . "जा लवकर रेडी हो ". हो आलेच.


******

थोड्याच वेळात रुद्राक्ष , मीरा आणि समीर मॉलमध्ये येतात . मीरा मस्त दोन ते तीन तास शॉपिंग करते .तिच्या बरोबर समीर तिच्या बॅग घेऊन फिरत असतो . इकडे रुद्राक्ष अर्ध्या तासात त्याची शॉपिंग संपून मोबाइलमध्ये मेल चेक करत बसला असतो .


आज रविवार होता म्हणून पूर्ण वेळ ओवी कॅफेत होती . इतर दिवशी ऑफिस आणि क्लासेसमुळे जास्त लक्ष्य नाही दयायला जमायचं मग रविवारी सर्व पाहायची . ओवी छोटूशी काही तरी बोलत होती तेव्हड्यात कोणीतरी मागून तिच्या कानाजवळ जोरात " भो " असं केल तशी ओवी दचकते . मागे वळून पाहते तर सावी जोर जोरात हसत असते .

"वेडी आहेस का ग तू घाबरली ना मी ".

वो ... मेरी जान घाबरली . सावी तिला चिडवत बोलली . तसं ओवी रागाने तिच्या कडे पाहायला लागली .

"यार खूप मिस केल मी तुला " किती दिवस झाले आपण भेटलो पण नाही .सावी तिला मिठी मारत बोलली .

हो ना अंग मला नवीन प्रोजेक्टमुळे हेड ऑफीसला जावं लागत त्यामुळे दुसरी बस पकडावी लागते . बरं ते जाऊदे तू बस मी कॉफी आणते तुझ्यासाठी ...काय खाणार तू .

"नको फक्त कॉफी वो भी 'तेरी हात की" सावी डोळे मिचकावत बोलली. इकडे ओवी कॉफी बनवायला गेली .

"हॅलो भाई " कुठे आहेस तू ,आम्ही काउंटर जवळ आहोत '. "ओके मी येतो " . बिल पे करून ते तिघेही मॉल मधून निघतात.

"स्टॉप.... स्टॉप " रुद्राक्ष जोरात ब्रेक मारतो . काय झालं मीरा , अशी का मध्येच कार थांबवायला लावली .

दादा भूक लागली आहे , इथे एक मस्त कॅफे आहे , आपण जाऊया ना plzz ..

"इथे " रुद्राक्ष कॅफे कडे पाहत बोलला . "हो" दादा तू कॅफेत तर चल इकडची कॉफी खूप छान असते . मी फ्रेंड्स सोबत येते कधी कधी इथे . ती त्याला ओढतच कॅफेत घेऊन गेली . कॅफे लहान होतो पण मस्त आणि छान होता .

"छोटू " मीरा हाक मारते . तसा रुद्राक्ष मीराकडे पाहत "छोटू रिअली "

"दादा अरे त्याला छोटूचं बोलतात सर्वे " तो काही बोलणार तेव्हड्यात " दीदी काय आणूत तुम्हाला "

तीन कॉफी आणि सँडविच , मला ब्लॅक अँड शुगर फ्री स्ट्राँग कॉफी रुद्राक्ष मध्येच बोलला .

"दीदी तीन कॉफी पाहिजे आहेत दोन नॉर्मल आणि एक ब्लॅक अँड शुगर फ्री स्ट्राँग कॉफी . छोटू ओवीला बोलतो . बरं मी सावीसाठी कॉफी बनवतच आहे तर मीच बनवते असं बोलत ओवी कॉफी बनवायला लागते .

'छोटू कॉफी रेडी आहे तू घेऊन जा ,मी सावीसाठी घेऊन जात आहे . " ठीक आहे दीदी " ओवी कॉफी घेऊन बाहेर येते .

"मॅडम ही घ्या तुमची कॉफी " ओवी सावी समोर कॉफी ठेवत बोलली .

" थॅक्स " अंग तुला नाही आणलीस कॉफी . नको ग मला तू घे .

"एक्सक्यूचमी " बिल plzz ...बाजूच्या टेबलवर बसलेली व्यक्ती ओवीला बोलते . सावी मी आलेच तो पर्यंत तू कॉफी घे .

"ही इकडे काय करतेय , हिच्या कडे पाहून असं वाढतंय की हि इथे काम करतेय ". रुद्राक्ष तिच्या कडे पाहत मनातच बोलला .

"दादा काय झालं कसला विचार करत आहेस " . हं... कसला नाही ."

"माझ झालं तुमचं झालं का "

हो झालं आमचं पण निघूया का उशीर होईल नाही तर तुम्ही पुढे व्हा ,मी बिल पे करून येतो .समीर बोलला तसा रूद्राक्ष "नको मी करतो बिल पे " तेव्हड्यात रुद्राक्षचा फोन वाजतो . दादा तू हो पुढे , मी बिल पे करून येतो . कॉल इम्पॉर्टन्ट होता म्हणून तो सुद्धा" ओके "बोलत बाहेर गेला .

"हॅलो हा बोल ना , काय... अग काय बोलते आहेस मला काहीच ऐकू येत नाही आहे" . सावी तशीच मोबाइलवर बोलत टूर्न होते तर तिला समीरचा धक्का लागला आणि तीच मोबाईल खाली पडला . .....तो फोनवर बोलत चालला होता .....

" देवा ....!....ती मोबाईल उचलत त्याच्याकडे रागाने बघत होती .....

" I 'am sorry...."

"ये ... माकडा ....डोळे आहेत की नाही..... बघून नाही चालू शकत का ....माझा मोबाईल पडला ..."

"आता त्याला पण राग आला होता ...त्याने कॉल ठेऊन दिला .... "excuse me .... सॉरी म्हणालो ना मी .... आणि माकड कोणाला बोलतच तू ..."

"तुझ्या सॉरीच काय करू मी???... लोणचं घालू का ???... माझा मोबाईल गेला ना ...

" तू जास्त बोलतेस आता ......" तो तिला बोट दाखवून बोलला ... " तशी तुझी पण चूक होती समोर पाहायचं ना !"

"काय बोललाच माझी चूक ... ती सुद्धा आता त्याला बोट दाखवत बोलली . तेव्हड्यात ओवी तिथे येते.

" सॉरी ...... ती रागात आहे म्हणून ..... तिच्या कडून मी सॉरी बोलते .....सावी चल " ओवी तीला ओढत तीतून घेऊन जाते.

" तू का त्याला सॉरी बोललीच .... मला पण ओढत घेऊन आलीस ... मी तर त्याला चांगलाच सरळ गेलं असत ..." ती केस उडवत म्हणाली .

" खरचं. त्याच्या कडे पाहून तरी बोलायचं होत ."

" हा तर..?? हम भी कुछ कम नाही !

" तू त्याला सरळ करायला गेली असतीच ना तर त्यानेच तुला एका हाताने सरळ उचललं असत म्हणे चांगलाच सरळ गेलं असत. ओवी हसत म्हणाली .😁😁😁

" ओऊ ...sss 😡😡

" चल ice-cream खाऊ घालते तुला .....डोकं थंड होईल .

***

ओवी आपलं काम परफेक्ट करत होती .प्रोजेक्टच काम पण संपत आला होता . रुद्राक्षच ओवीवर लक्ष्य होतं पण तिला याची काहीच भनक नव्हती .

ओवी आपली मस्त फोनवर बोलत पायाने छोड्या दगडाला किक मारत चालत होती . आपल्याच धूंदीत ओवीने छोड्या दगडाला जोरात किक मारते तसा तो दगड समोर झोपलेल्या कुत्र्याला लागतो . कुत्रा झोपेतून उडून रागाने तिच्या कडे पाहत असतो आणि त्याला असं पाहून ओवी जाम घाबरते .

" ओवी पळ लवकर इथून नाही तर हा तुला सोडणार नाही " ओवी असं बोलत ओवी पळायला लागते. ते पाहून कुत्रापण भुंकत तिच्या मागे लागतो . तस ओवी अजून जोरात पळायला लागते .

" प्लीज... प्लीज वाचवा मला . ओवी अब्रामच्या मागे उभी राहत बोलली . अब्रामला तर काहीच कळलं नाही ती असं अचानक आल्यामुळे . ओवीचा आवाज ऐकून कॉलवर बोलत असलेला रुद्राक्ष मागे वळून पाहतो तर त्याचे डोळे मोठे होतात . ओवी अब्रामच्या मागे राहून त्याला वेडे घालत होती .तो कुत्रा पण तिच्या मागेमागे पळत अब्रामला वेडे घालत होता . " प्लीज... माझ्या मागे नको ना लागू ....मी तुला मुदामून नाही मारला दगड .... खरचं.. चुकून लागला".... बिचारा अब्राम ती त्याला वेडे घालत त्याला पण गोलगोल फिरवत होती .

तो कुत्रा अजून पण तिच्या भोवती फिरत होता . त्याने तिच्या ओढणीच टोक तोंडात पकडलं तशी ओवी अजूनच घाबरली ." "सोड.... सोड माझी ओढणी " ती ओढणी जोरात खेचतंच मागे मागे पळत असते तेव्हड्यात ती रुद्राक्षला धडकते. कुत्रा अजून जोरात तिची ओढणी खेचतो तशी ओवी रुद्राक्षला मिठी मारते . प्लीज... त्याला पळवा . रुद्राक्षला थोड्या वेळ काहीच काळत नाही .

"प्लीज.... प्लीज पाळवा त्याला..... माझी ओढणी पकडली आहे . प्लीज"- ओवी फक्त बोटाने ओढणीकडे इशारा करत बोलली.

"हो पळवतो " ऐ .....शू ...शू " रुद्राक्ष त्याला हाताने इशारा करत म्हणतो . तसा कुत्रा अजूनच भुंकायला लागतो .

" तुम्ही त्याला पळवत आहेत कि बोलावत आहेत "

"मग असं पळवू "

" एक काम करा त्याला तुमचा राग दाखवा ... तुमचा राग पाहून इथून काय शहरातून पण जाईल .

"काय??'' रुद्राक्ष तिच्याकडे पाहत बोलला इकडे अब्राम गोलगोल फिरून चक्कर येत होती त्यात तर हे सर्व पाहून खाली पडायचं बाकी होता .

"प्लीज... पळवा त्याला "-ओवी आता पूर्ण रडायला आली होती . रुद्राक्षने तिची ओढणी सोडवली ....कुत्र्याला पळवून लावलं

" गेला तो " रुद्राक्ष म्हणाला तसा ओवीने सुटकेचा निःश्वास सोडला . तिच्या लक्षात आलं कि आपण रुद्राक्षला मिठी मारली आहे तशी ती लगेच बाजूला होते .

खूप पाळल्यामुळे तिला दम लागला होता . ती मोठयाने श्वास घेत " सॉरी सर ...बोलली . त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नाही पाहून ती मनातच " बापरे ... याना राग आला का ... आता काय करू .. यांचा राग .ओवीने इतके दिवस त्याचा राग पाहिला होता ऑफिस मध्ये आणि प्रोजेक्टच्या बाबतीत ओरडा खाल्यावर तर दोन हात लांबच राहायला बघायची . कशाला उगीच वाघाच्या समोर जायचं . तिला विचारात पाहून रुद्राक्षने अब्रामला इशारा केला त्याने हि समजून मान डोलावली .

"हे... घे, त्याने पाण्याची बॉटल तिच्या समोर धरली . तिने एकदा बॉटलकडे आणि त्याच्याकडे पाहिलं . "पाणी पी " तसं तिने बॉटल घेऊन पाणी पिऊन बॉटल रुद्राक्ष समोर धरली तस त्याने तिला एक लूक दिला .

" सॉरी अँड थँक्स ... ती पटकन बॉटल मागे घेत बोलली . पळतच ऑफिस मध्ये जायला लागली . तिला असं जाताना पाहून रुद्राक्ष गालात हसत होता . अब्राम फक्त त्याच्याकडे पाहत होता हा आपलाचं बॉस आहे ना ...

अजून कोणीतरी होत जे हे सर्व पाहिलं होत आणि रुद्राक्षच्या चेहऱ्यावर हसू पाहून तिच्या डोळ्यात वेगळेच भाव होते ....

****

कोण असेल ती व्यक्ती ....साधं सरळ वाढणार ओवीच आयुष्य खरचं इतक साधं आहे का ?? .... पाहूया नेक्स्ट पार्ट मध्ये ...