PAHILA GULAB - 2 books and stories free download online pdf in Marathi

पहिलं गुलाब - 2

अतिदक्षता विभागातील निरव शांतता त्याला अजून अस्वस्थ करीत होती.... औषधे, इंजेक्शन इत्यादींचा उग्र वास त्यात कोरोनामुळे श्वास घेण्यात होणार त्रास यामुळे तो अक्षरशः मरणाची भीक मागत होता ….. इतक्यात एक थंडगार हवेची झुळूक त्याला स्पर्श करून गेली..... वातावरणात अचानक सुगंधित वाटू लागले...
त्याने डोळे हळुवारपणे उघडत पाहण्याचा प्रयत्न केला..... ती त्याच्या नजरेस पडली.... दरवाजातून लडिवारपणे स्मितहास्य करीत ती त्याच्या जवळ आली.... तिला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.... ती त्याच्या बाजूला येऊन बसली.... त्याच्या केसांतून हात फिरवत तिने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला..... त्याला तिच्याशी खूप काही बोलायचे होते.... परंतु तोंडावर ऑक्सिजनचा मास्क असल्याने शब्द उमटत नव्हते.... त्याच्या मनाची घालमेल तिने अचूक हेरली.... आणि नजरेनेच त्याला शांत राहण्यास सांगितले......
“हो हो... समजतंय मला तुला काय म्हणायचंय ते”
“ह्म्म्म .... म...म....मग... इतका उशीर का केला यायला”
“अरे तुझ्या चांगल्यासाठीच सर्व काही चाललं होत.... आणि आता मी आली आहे ना.... आता सर्व नीट होईल बघ.....”
“ह्म्म्म.... खूप त्रास होतोय ग मला.....”
“आणि मी कुठे गेलो पण नव्हतो.... तरी पण कसा या रोगाचा शिकार झालो काही समजलंच नाही....”
“माहित आहे मला माझ्या राजा.... मी कुठे काही म्हटलं का तुला..... आणि आधी तू शांत हो बघू..... तू असा रडत राहिलास तर बाहेर आईंना आणि प्रिशाला किती त्रास होईल याचा जरा तरी विचार केलास का....??? तू इकडे आल्यापासून एकही दिवस धड गेला नाहीय त्यांचा..... आणि असाच जर वागत राहिलास तर मी निघून जाईन.....”

तिने थोडसं रागावल्यावर तो शांत झाला..... ती पुन्हा त्याच्याशी गप्पा मारू लागली....
“बाबा भेटले होते.... खरंच खूप सुखात आहेत ते..... आयुष्यातील सर्व सुखे अनुभवून मी मुक्त झालो असं म्हणत होते.... तुझ्यावर खूप जीव होता त्यांचा..... फक्त कधी व्यक्त करू शकले नाहीत......”
“त्यांची खूप आठवण येते ग…..”
“त्यांना देखील तुमची खूप आठवण येते.... मी हर प्रसंगी त्यांच्या मागे भक्कम उभा राहीन असे ते सदैव मला सांगत असतात.....”
"प्रिशु आणि आई कशी आहे....??"
"खरं सांगू..... दोघीपण खूप दुखी आहेत.... त्यांना तुझा हा त्रास पाहवत नाही.... आई तश्या खंबीर आहेतच.... पण प्रिशाकडे पाहिलं ना आज तर मलाच कळलं नाही कि हि इतकी मोठी कधी झाली..... फक्त पाच वर्षाची आहे रे ती....... तरीपण इतका समजूतदारपणा कसा असू शकेल तिच्यात याचा मला उलगडाच होत नाहीय...."
"असणारच...... मुलगी कोणाची आहे शेवटी....."
"हो समजलं..... अजून टोमणे मारायची सवय गेली नाही तुझी...."
"मग काय.....हा हा हा हा" (यानिमित्ताने त्याच्या चेहऱ्यावर काहीस हसू आलं होत.... तिने इकडे तिकडे बघत घड्याळावर नजर फिरवली...... पहाटेचे तीन वाजले होते...... तिचा चेहरा काहीसा गंभीर झाला)
“काय गं... काय झालं अचानक.... अशी गप्प का झालीस......????"
"तुला खरं सांगू......????"
"हो.... बोल ना..."
"तुला माहित आहे मी आत्ता यावेळी इथे का आली....????"
"नाही..... पण बोल तू काय झालं..... सर्व काही ठीक आहे ना.....????"
"तू शांत हो...... सर्व सांगते...... ज्यादिवशी तुझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यादिवसापासून तुझी तब्येत दिवसेंदिवस खालावत होती....औषध परिणाम करीत नव्हती..... आपल्यावर नेहमी प्रेम करणारा बाबा असा आजारी झालेला त्या लहानग्या जीवाला बघवत नव्हता.... शेवटी न राहून तिने देवाला आणि मला प्रार्थना केली कि तुला यातून मुक्त करावं..... ती कोणताही हट्ट करणार नाही..... हा एक शेवटचा हट्ट बाप्पाने पूर्ण करावा अशी तिची इच्छा होती.... निरागस मन तीच.... पण ज्या खंबीरपणे तिने आईंना साथ दिली त्यावर मला अभिमान आहे ती आपली मुलगी असल्याचा....."

"पण यातून तुला काय सांगायचंय ते नाही समजलं मला..... नीट सोप्या भाषेत सांगशील का जरा....?"
"तुला आता माझ्यासोबत यावं लागेल....."
"काय...... वेडी आहेस का तू....?
"हे खरं आहे माझ्या सोन्या..... तुझा इकडचा प्रवास इतकाच होता..... तुला माझ्यासोबत यावंच लागेल....?"
"नाही हे शक्य नाही.....नाही हे शक्य नाही.....नाही हे शक्य नाही....."
तो जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागला.... पण तोंडातून आवाज निघत नव्हता...... शरीराची हालचाल मंदावत होती...... व्हेंटिलेटरचा आवाज तिकडची शांतता भंग करीत होती..... त्याची अवस्था पाहून डॉक्टर नर्स धावत त्याच्या जवळ आल्या..... वाचवण्याचे सर्व उपाय सुरु झाले...... ती बाजूला उभी राहून सर्व पाहत होती.... सर्वांचे प्रयत्न त्या चिमुकलीच्या प्रार्थनेपुढे निष्फळ ठरत होते..... अखेर सर्व शांत झालं.....
खिन्न मनाने डॉक्टर बाहेर आले..... त्याच्या घरी फोन करून लवकरात लवकर हॉस्पिटलला येण्यास सांगितले..... एकंदरीत बोलण्यावरून काहीतरी अघटित घडले असावे असा अंदाज त्याच्या घरच्यांना आला..... त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ हॉस्पिटल गाठले.... डॉक्टरांनी त्याच्या आईला सत्य परिस्थिती सांगितल्यावर त्या माउलीला अश्रू अनावर झाले.... आजी आणि नात दोघी एकमेकींचे सांत्वन करीत होत्या..... प्रिशाने डॉक्टरांना विचारले....
"काका मी बाबांना बघू शकते का...???? दुरूनच बघेन जवळ नाही जाणार..... प्रॉमिस......"
डॉक्टरांना तिचा बालहट्ट टाळता येत नव्हता.... पण तेथील परिस्थिती पाहता त्यांनी आपल्या केबिन मध्ये सीसीटीव्ही वर तिला तिच्या वडिलांचे अंतिम दर्शन घडविले..... तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या...... थरथरत्या हाताने तिने तिच्या जवळची बॅग उघडली..... त्यातून तिने घरातून आणलेली वडिलांची डायरी काढली..... त्यातील सुकलेले गुलाब तिने डॉक्टरांना दिले आणि सांगितलं....."काका..... हे गुलाब माझ्या पप्पाजवळ ठेवा..... ते जेव्हा मम्मीला भेटतील तेव्हा तिला द्यायला मिळेल....." त्या निरागस मुलीचं हे वाक्य ऐकून डॉक्टर सुद्धा गहिवरले..... त्यांनी तात्काळ ते गुलाब त्याच्या देहाजवळ ठेवले.....
सर्व तयारी झाली..... तो आणि ती एकत्र उभे राहून सर्व पाहत होते.... सायरनचा आवाज करीत रुग्णवाहिका स्मशानाच्या दिशेने निघाली....... देह सरणावर ठेवून अग्नी देण्यात आला..... त्याच्या सोबत ते पहिलं गुलाब आज अनंतात विलीन होत होत.........


समाप्त.....

इतर रसदार पर्याय