स्थलांतर - 1 Kavi Sagar chavan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

स्थलांतर - 1

स्थलांतर,,..

राहुल एक हुशार, चंचल, मुलागा काहीच दिवसापासून शहरात आला. गावाकडे काहीच मन लागेल असं काम मिळेना त्यामुळे त्याने विचार केला आपण शहरात जाऊन काम करावे.. जेमतेम बारवी पास केली. पुढे शिकण्यासारखे खूप होते. पण घरची परिस्थिती बेताची त्यामुळे घरात मदत हवी.. गावाकडं काम म्हणजे मोलमजुरी करणे त्यात तेही कधी लागायचं तर कधी नाही. तालुक्यात एका ठिकाणी मेडिकल मध्ये जॉब करायचा परंतु पगार खूप कमी.. तिथे पूर्णवेळ करावं तर त्यातही भागणार नव्हतं. घरची लोक सारखी टोमणे मारत बस आता बारवी झाली. नाशिक, पुणे, कुठेही कंपनीत काम बघ.. इथे राहिला तर कोणी पोरगी देणार नाही. गावात असच फिरण्यात वेळ वाया घालू नको. तुझे मित्र कपंनीमध्ये लागले. बघ जरा शिक त्यांच्याकडून किती दिवस असं फिरणार तू. नातेवाईक विचारतात काय करतो.. तुमचा मुलागा ? काय सांगायचं आम्ही.! गावभर हिंडत असतो. असं सांगू. काहीतरी मनावर घे.
सकाळी सकाळी आईने हाजरी घेतली त्यामुळं.. दुखावल्या गेला. संताप करत घरच्या बाहेर पाय काढलं. काय करावं कुठे जावं काहीच सुचत नव्हतं. पण आपण बाहेर जायचं निश्चित केलं. गावच्या बाहेर पारावर येऊन बसला. सकळ पासून तो तिथेच बसला होता. दुपार झाली तरीही घरी जावस वाटत नव्हतं. घरी गेलो तर परत डोक्याला ताप.. त्यापेक्षा नाही गेलं तेच बर हाय. आता पुढे करायचे काय हा मोठा प्रश्न होता. मागच्या वेळी घेतलेला एका मित्राचा नंबर आठवला आणि लगेच त्याला कॉल केला.
..हॅलो सुम्या राहुल बोलतोय मित्रा कुठे आहेस. पुण्यात अबे मला माहीत आहे ते आता कुठे आहेस ते सांग.. कामावर आहे कपंनीत होईल सुट्टी अर्ध्या तासात. बर मला जरा बोलायचं तुझ्याशी. मला कॉल कर. ठीक हाय.
फोन कट झाला. मात्र राहुल ला रस्ता मिळाला आता पुढे काय करायचे ते.
तडकन उठून उभा राहिला तस घरच्या दिशेने निघाला. आई बाहेर बसली होती. तिच्याशी न बोलताच तो आत गेला. कपड्याची आवराआवर सुरु केली. आई बाहेरून आवाज देत होती. सकाळ पासून बाहेर गेलास जेवला नाही.मी कव्हा धरण तुझी वाट पाहते. आता येशील मग येशील.. तू आता आलास व्हय. पण राहुलच आई कडे लक्ष नव्हतं. तो त्याची ब्याग भरण्यात मग्न होता. राहुल पुण्याला जायच्या तयारीत होता...आईकडे पैसे मागावे असं वाटत होत. पण तरीही नाहीच घ्यायचे असं ठरवून राहुलने जुनी पेटी उघडली काही दिवसापासून तो त्यामध्ये एका डब्यात काही पैसं जमवत होता. कधीतरी ते पैसे कामत येतीलच हे राहुलला माहित होत. काहीवेळ आई बडबड करत राहिली आणि बाहेर जाऊन बसली. राहुलने बघितलं आई बाहेर गेली आहे.आता आपण किती पैसे जमवून ठेवले. बघूया. हळूच डब्बा घेऊन पैश्याची जोडणी करू लागलं. राहुलकडे 2200 rs जमा झाले होते. त्याला बर वाटल. चला आपली गावी जाण्याची सोय झाली.
मनात आंनदाचे तरंग उमटू लागले. पैसे खिशात घेतले. फ्रेश होऊन बाहेर जाऊन मित्राला पुन्हा कॉल केला.
बोलणं संपलं आणि पुणे जायचं निश्चित झालं. आईला जाऊन सांगून टाकलं कि मी आता पुण्याला कंपनीत कामासाठी जात आहे. व रात्रीच्या गाडीने निघत आहे. आईला अच्छर्य वाटले. सकाळी झालेला वाद आठवला इतकं मनावर कस घेतलं याने जायचं. आईला दुःख ही झालं पण जातोच आहे तर जाऊदे सुधरेल तिथं गेल्यावर. म्हणून काही एक न बोलता. आईने खाण्यासाठी म्हणून चपाती लोणचं शेंगदाण्याची चटणी बांधून दिली .डब्बा देताना तिचं मन गहिवरल होतं ."डोळ्यात अश्रू होते ..माणसाला परिस्थितीला उत्तर देणच कठीण असतं .
राहुल ने आईकडे न बघता डब्बा हातात घेऊन बॅगमध्ये ठेवला ..अबोला मात्र खूपकाही बोलू पाहत असताना ..शब्द मात्र कंठात दाटून राहिले ...राहुल त्याच्या प्रवासाला निघाला आई हुंदके देत अश्रू वाहत तू नजरेआड होइपर्यंत पाहत होती ..."

क्रमशः