स्थलांतर - 2 Kavi Sagar chavan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्थलांतर - 2

स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . मोजक्या ठिकाणीं स्टॉप घेणारी सुपर फास्ट ट्रेन आत्ताच थांबली असल्याचं दृश्य दिसत होतं "त्यातून बऱयाच प्रमाणात प्रवासी उतरले असणार यांचा एक अंदाज राहुल ला लागला . स्टेशनच्या डाव्या साईटला रेल्वे पोलीस काही प्रवाश्यांना आपले बॅग , सुटकेस चेक करत असल्याचं दिसत होतं ; प्लॅटफॉर्म वर संपत असलेला दोन नंबरचा दादरा प्रवाश्यांनि गचचं भरला तेहूनच एक एंट्री जी ऑटो रिक्षा च्या दिशेने जाणारी त्या कडेला दोन काळे कोट घातलेले टी सी तिकीट चेक करत होते . रेल्वे मध्ये बहुदा बरेंच प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले जातात साईडला काही प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले होते . ते सुटका करून घेण्यासाठी विनवणी करतं असताना पाहून राहुल अपराधी वाटत होतं . त्या संपूर्ण परिसरात गोंगाट , अलौन्समेंट सुरू असल्याने गोंधळ होतं होता . बाजूलाच गरम वडापाव चा आवाज त्याच्या कानांवर पडला तसं त्याला आठवण झाली .आईने दिलेला डब्बा " शहानिशा करन्याकरिता बॅग चेक करवी ! समोर बोरडावर लाल अक्षारत काहीतरी स्क्रोल होत असलेल बघून गाडी केव्हा सुटणार हे बघण्यासाठी पुढे गेला . रात्री साडेअकरा ला सुटणारी गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस तेव्हडी एकच गाडी होती " की ज्यामुळे दुपारी पोहचवू शकेल त्यामुळे त्या गाडीला मोठ्या प्रमाणत गर्दी असते असं मित्राने आधीच सांगितलेलं अरे "! आपण अजून तिकीट घेतलं नाही ?धावत जाऊन रांगेत उभं राहताना वडापाव चा खमंग वास नाकाजवळ येऊन पोटात असले कावळे ओरडण्यास कारणीभूत ठरत होता . लाईन मध्ये अजूनही बरीच माणसे तिकीटासाठी वेटिंगला होती . पोटात चाललेला भुकेचा भूकंप वाढतं चालला ..." तिकीट नाही मिळालं आणि टी सी ने पकडलं तर आपलं काय होणार या भीतीने मात्र शरीराची गाळण झाली "! नको त्यापेक्षा आधी आपण तिकीट घेऊन मगच जेवणाच बघु " गर्दी थोड्या अधिक प्रमाणात कमी झाली की पुन्हा वाढत .."हा एक नित्य क्रम होतं" दिवसात आणि रात्रीत कितीतरी प्रवासी प्रवास करून आपल्या वाटेला जात असत .त्या प्रवासात मोजकेच प्रवासी असतील जे कुणाच्या आठवणीत राहतं असतील तर काहींना ? कोणाला रहातं असतील किंवा नसतील हीं प्रत्येकच जीवन त्यांच्या सीमा वेगळया मग प्रत्येक मनुष्य दिनचर्या त व्यस्त .." भैय्या ""आगे चलो आवाजाने आपण तिकीट घराजवळ असल्याची जाणीव झाली ..; कसंबसं तिकिटं घेऊन तो बाहेर आला . किती गर्दी बापारे ""! (सुटकेचा निश्वास सोडत) "आता गाडीत जागा मिळाली म्हणजे झालं . बापरे"" या शब्द जास्तच जवळचं वाटलं आपण संतापाच्या तोऱ्यात घरून आलो घरची लोकं काळजीत असतील काय करावं तेंही रोजचं किरकिर करत असतात .आता गावात नाहीं काही करण्या सारख तर काय करणार " माझा विचार कुठं असतो त्यांना ?! उरलेला राग माझ्या मित्रावर काढायचं त्यांचा काय दोष ? तरी ऐकून घेतात ना तें " दोस्ती चं तशी आहे आपली "! गावांत असणार वातावरण चं तस होतं उणें दुणे कमीपणा काही ठिकाणीं अनुभवायला मिळायचा त्यात यांचा मुलगा असा गावात फिरत असतो कामधंदा नाहीं वैगरे दुपारच्या वेळी गावातील चंगळण्या चे विषय असतं . त्यामुळे की काय "आईला वाईट वाटत असावे शेजरच्या शकू आत्याचा मुलगा मुंबईला काम करायचा बांधकाम मिस्त्री मुंबईला हजरी चांगली होती सातशे ते हजार रुपये त्यामुळे चारचौघात बोलतांना शकू आत्या आवर्जून सांगत माझा मुलगा मुंबईला आहे . तो गावच्या यात्रेला आला की चमचमीत कपडे बूट घालून गावभर हिंडायचा आणि मी घरच्यांच्या शिव्या खात ऱ्हचो " बघ बरोबरीचा पोरगा कसा सुधारला या विषयावर दिवसात चार ते पाच वेळा भाषण ऐकावे लागतं
क्रमशः