Kavitacha Sangrah - 1 books and stories free download online pdf in Marathi

कवितांचा संग्रह....️ - 1


का मन उदास झाले......😔

नाविन्याचा शोध घेता
न भान स्व: चे राहिले
नेहमीच पैशांनी तोलले जाणारे
अस्तित्व हे आज हरले...

स्व: चे स्वप्न जपता
मन आज हरवून गेले
काळजीने दुसऱ्यांच्या
परत ते भानावर आले...

परिस्थिती वाईट आली
त्यात मी गोंधळले
स्वतःस एकटं बघूनी
मी माझ्याच स्वप्नांत अडखळले...

नव्हते कशाचेच लोभ
पण, ते ही आज बोचले
आपल्याच माणसांनी
आज अस्तित्वाला प्रश्न केले...

मी भविष्यात रमताना
वास्तवात तर चुकत नाही ना!
हे प्रश्न आज मी स्वतःस केले
उत्तर म्हणून काही न गवसले...

मन हताश झाले
आपले असणारे हात परके झाले
ते नव्हतेच कधी आपले
मन ही सांगून गेले...

"मिच का?" हा एकच प्रश्न
पुनरावृत्ती त्याची मन करू लागले
विचाराशेवटी तू "दळभद्री"
सभोवतालचे वातावरण सांगुनी गेले...

सहनशीलता संपली
वाटलं संपवून टाकावे तन - मन
का आज इतके
दुःख अनुभवते आहे मन...

शेवट न दु:खांचा कधीच लाभला
पण, आयुष्याचा शेवट मज दिसू लागला
खंबीर मनाचे स्व:त्व
अखेर शरीर संपवू लागला...

प्रतिकूल परिस्थितीत
कसे राहावे आनंदी
कारण, उत्तर कधीच न मिळाले
का मन आज उदास झाले...
का मन आज उदास झाले...


✍️ खुशी ढोके.


सुचलेले काही...✍️



__________________________________________________________________________________________


रिमझिम पाऊस....🌧️


ही शंकरपाळी आकाराची असल्याने, हिला "शंकरपाळी काव्य रचना" म्हणतात..... शंकरपाळीचा आकार जरी, बिघडला तरी स्वाद परिपूर्ण येईल.... "रिमझीम पावसावर" शंकरपाळी काव्य रचना...... वाचा...... आणि नक्की कळवा...



सरी
ग ये सरी
ये ग लवकर
माझ्या तू घरी
आलीस की
करून जा
मला
बरी
🌧️

तो
मदमस्त
करणारा
मनाला हुरहूर
हृदयाला सुखद स्पर्शून
काहूर उठवून
मदमस्त
करणारा
तो
🌧️

माझ्या
सख्या रे
परतशील ना रे
या रिमझिम सरिंना
उत्तर उरेल ना रे
सख्या रे
माझ्या
🌧️

अशी
रिमझिम
त्या पावसाची
उधळते अंतर्मन जशी
विसर स्वतःचा
पडता गुमसून
असा मी
तुझाच....
🌧️

सखे
पावसासम
नितळ निर्मळ
मन तुझे बसले हृदयी
खुलता कमळ
जसा ओठी
तुझ्या.....
🌧️

सांज वेळी
बसता निवांत
व्हावे मनी गोंधळ
चाहूल जशी
तुझी मला
रिमझिम
पावसा
सम.....
🌧️



🌧️ खुशी ढोके


__________________________________________________________________________________________


ती सांज आणि घालवलेले काही क्षण..😇


"सांज" हा असा क्षण जेव्हा, तो पाहताक्षणी आपण भान हरपून जातो..... हीच सांज माझ्या शब्दात मांडून, त्या सांजेसोबत घालवलेले काही क्षण मी कॅप्चर केलेत ते येथे शेअर करते.....😍😍


वेडावणारी एक सांज
मन खुलावणारी अशी ती...

मनमोहनारी मनमोहिनी जशी
निःस्वार्थ भाव सांगणारी ती....

दडून,अलगद सुखावणारी
चिंता सगळी हरणारी ती....

वेगळीच ऊर्जा देणारी
अन् उत्साह वाहणारी ती...

भान हरपून पहावे तिला
न येवो त्या वेळी मनात कोणी....

नसाव्या भावना स्वार्थी परी
असावा एकांत या सांजक्षणी ...💕


खुशी ढोके


__________________________________________________________________________________________



अपेक्षांना पूर्णविराम......🚫

हा - तो न जाणे कोण - कोण
दुखावून जाऊ नये कोणी
कधी तरी ठेवल्या होत्या
क्वचितच आशा मी माझ्या मनी....

नाही पचनी पडले माझे सुख
अपेक्षा भंगून, वाईट वागून
नको ते अपशब्द वापरुन
गेले ते माझे सर्वस्व ओरबडून....

काय वाटले असेल मज मनी
निःस्वार्थ करुनी काम
ठेवले ज्यांना प्राथमिक स्थानी
नकार न ऐकवला कधीच ज्यांच्या कानी....

व्यर्थ प्रयत्न सारे शेवटी
मानसिक कुचंबणा गिळूनी
घेतला मोकळा श्वास तो
अपेक्षांना पूर्णविराम लावुनी....


✍️ खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


अलिप्त जरा जगायचं होतं...🤐

डोक्यात विचार
डोळ्यात बोलके भाव
असून देखील
अलिप्त जरा जगायचं होतं...

लोकांच्या त्या
जीवघेण्या स्पर्धेला
जरा बाजूला सारून,
अलिप्त जरा जगायचं होतं...

मनातल्या त्या
असंख्य प्रश्नांची
उत्तरं अपूर्ण ठेऊन,
अलिप्त जरा जगायचं होतं...

मतभेदापेक्षा, मनभेद
जेव्हा वाढू लागले
आपल्याच लोकांना दूर करत,
अलिप्त जरा जगायचं होतं...

लोकांच्या क्लृप्त्या
माझ्या युक्त्यांवर
वरचढ ठरताना बघून,
अलिप्त जरा जगायचं होतं...

आयुष्याच्या प्रवासात
संघर्ष करतेवेळी
टोचणारे शब्द ऐकून,
अलिप्त जरा जगायचं होतं...

अलिप्त - अलिप्त - अलिप्त
कधीपर्यंत असं दडतंच
विचार थांबवणार म्हणून,
लोकांना उत्तर द्यायचं होतं....

नाही होत अलिप्त जगणं
हे मनाला सांगायचं होतं
मन परत म्हणाले,
लोकं हसतील विचारांवर तुझ्या
म्हणून, परत एकदा
अलिप्त जरा जगायचं होतं...


✍️ खुशी ढोके


__________________________________________________________________________________________



पर्वा न कशाची करावी....😇



रांगत - रांगत चालणे
चालत - चालत पळणे
पळत - पळत पडणे
पडून उठत नव्या जोमाने
अपेक्षा कोणाचीच न करावी
अडथळे येतील प्रवासात
पण,
पर्वा न कशाची करावी....

धुडकावून दूषित विचार
ठणकावून स्व:घोषित
वाल्यांना वारंवार
मांडावे स्वतंत्र स्व: विचार
करुनी कुविचारांना आरपार
घुसावे जन - मनाच्या
कोपऱ्यात होऊनी झुंझार
अडवतील ते तुझे विचार
पण,
पर्वा न कशाची करावी....

💥💥🔥🔥💥💥


खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


कठीण असं काही नसतं...!




सुरूवात नवी म्हणून, गळून पडायचं नसतं
सतत प्रयत्नाने हवं ते मिळवायचं असतं
यशोमार्गातील अडथळ्यांना धैर्याने गिरवायचं असतं
सतत येणाऱ्या अडचणींना मागे हटायचं नसतं
लोकांच्या नजरेत पडण्याच्या भीतीने खचून जायचं नसतं
इतर करतात म्हणून, स्वतःही तसंच करायचं नसतं
ध्येय पुढे ठेऊन, प्रयत्नरत रहायचं असतं
वाटेत लागला दगड म्हणून, लगेच पडायचं नसतं
हात दिला कोणी म्हणून, आधार घ्यायचं नसतं
स्वतः उठून, परत मार्ग गाठायचं असतं
थकलो म्हणून कोलमडून पडायचं नसतं
इतरांच्या व्यंगाला लगेच उत्तरायचं नसतं
योग्य वेळी संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचं असतं
अपयश आलं म्हणून, रडत बसायचं नसतं
उठून परत ठरवलेल्या ध्येयाच्या मार्गावर चालायचं असतं
यशस्वी होऊनी परत सतत प्रयत्नरत रहायचं असतं
कारण, प्रयत्नातूनचं सर्व काही मिळवायचं असतं
आणि त्याच पराकाष्ठेमुळे कठीण असं काही नसतं..!


✍️ खुशी ढोके

__________________________________________________________________________________________

तू नसता


गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी
जेव्हा नकळत तुझ्या स्पर्शाने
मन प्रसन्न व्हायचे

का इतका हवा होतास तू
न कळले मनी कधी
भेट होता आपुली
बोलके व्हायचे डोळे आधी
प्रेमळ स्पर्श तुझा हृदयी उर्मी देई
तुझ्या डोळ्यां समोर बसुनी
हळूच डोळे अबोल होई

प्रवास हा कधीच संपला
मनी दुःखाचा डोंगर ठाकला
आठवणींची नेहमी सोबत होती
जरी नसला तू सोबती

पुर्ण करेल इच्छा मी तुझी
इच्छा होती जी माझी नी तुझी
इतरांना जावे लागू नये दूर
जिवलग राहोत ते नेहमी सोबती
तुझे हे स्वप्न न होतील क्षणभंगुर
बनेल मी त्यांना ऊर्जा देणारी
त्यांची विचारांकुर...💕💔

😇❣️ .....सहज सुचलेले काही.....❣️😇


💕 खुशी ढोके 💕

__________________________________________________________________________________________








सहन केलं होतं


त्या दुराव्यात
तुझं न दिसणं
कधी न हसणं
मी सहन केलं होतं...

तुझ्या आठवण,
तुझ्या त्या विचारांमुळे
रात्रीचं ते पूर्णवेळ जागरण
मी सहन केलं होतं...

वर्षे गेली असतील
त्या निराश दिवसांत
हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख
मी सहन केलं होतं...

तुच माझा सखा
म्हणण्याच्या धाडसामुळे
घरच्यांचं ते रागात बघणं
मी सहन केलं होतं...

आपलं प्रेम फुलावं
ते फुलवण्यासाठी
स्वतः मन मारून जळणं
मी सहन केलं होतं...

जळल्यावर झाली जी राख
त्या राखेच्या निर्मितीवर
तुझं काळीज हेलावणारं बोलणं
मी सहन केलं होतं...

त्या निर्मितीला
परत जाळण्यासाठीचं
तुझं क्रूर वागणं
मी सहन केलं होतं...

तुझ्या त्या क्रूर वागणुकीवर
अंतःकरणाचा आवाजऐकताच
मातृत्व सुख हिरावून घेणं
मी सहन केलं होतं...

इतकं सहन करून देखील
परत शरीराच्या चिंध्या
मन मारून करू देणं
मी सहन केलं होतं....


📌 खुशी ढोके

__________________________________________________________________________________________



कधी तरी कंटाळा येतो



हो येतो ना

कधी तरी कंटाळा!

काय मग सगळं बंद

जगणं होतं मंद...


हो येतो ना

कधी तरी कंटाळा!

माणूस आहे मी

मग राग तर येईलच की...


हो येतो ना

कधी तरी कंटाळा!

त्या बडबडीचा

नको त्या हडबडीचा....


हो येतो ना

कधी तरी कंटाळा!

कोणाकडून सततची स्तुती

आपल्याविरोधात इतरांची युती...


हो येतो ना

कधी तरी कंटाळा!

इतरांना खुश करणे

त्यांच्यापुढे कारण नसता हरणे...


हो येतो ना

कधी तरी कंटाळा!

नेहमी ठरवून आपल्यालाच चूक

इतरांच्या चुकांवर आपलंही राहूनी मूक...


हो येतो ना

कधी तरी कंटाळा!

करून अभ्यासपूर्ण वार

योग्य मुद्द्यांसाठी होती हद्दपार...


हो येतो ना

नेहमीच येतो कंटाळा!

कोणी नाहीच आपलं हे माहीत आहे म्हणणारे

दोन शब्द चांगले ऐकून सर्वस्व बहाल करणारे...


ह्या आणि अशा वागणुकीचा येतो मज कंटाळा!


📌 खुशी ढोके


__________________________________________________________________________________________



खूप काही सांगून जातं

त्या एकांत राती
तुझं अपेक्षा नसता
प्रेमानं बोलणं
खूप काही सांगून जातं...

एकटं असणं
मी मान्य करता
तुझं ते नाकारणं
खूप काही सांगून जातं...

सतत काळजी,
भरभरून मैत्रीपूर्ण प्रेम
तुझं ते हळूच बघणं
खूप काही सांगून जातं...

अनुभव हे प्रेमळ
फक्त हक्काचे माझ्या
त्यात दुसऱ्याचं मधी येणं
खूप काही सांगून जातं...

दुसरा मधी येताच
तुझं बदलणं
माझं हळूच नाहीसं होणं
खूप काही सांगून जातं...

हळू - हळू तुझं टाळत जाणं
माझं स्वतःच्या मनाला मारणं
तुझं ते वचन मोडणं
खूप काही सांगून जातं...

किती तरी दिवसांनी
तुझ्या भेटीसाठी येता
तुझं ते दुसऱ्याच्या बहुपाशात असणं
खूप काही सांगून जातं...


📌 खुशी ढोके

__________________________________________________________________________________________



थोडा वेळ देऊन पहावे..

प्रेमात पडण्यासाठी
स्वप्नांत हरवून जाण्यासाठी
स्वप्नातच जगण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...

प्रेमात पुढच्याला
सर्वस्व बहाल करण्यासाठी
त्याच्याकडून प्रेम मिळवण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...

अपेक्षापूर्ती करण्यासाठी
नेहमी सुखात ठेवण्यासाठी
हवं ते करण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...

निःस्वार्थ भावाने
सर्वकाही केल्यावर
भ्रमनिरास झालाच तर
एकट्यात रडून परत उठण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...


📌 खुशी ढोके

__________________________________________________________________________________________



मर्जी तुझी सांभाळली..

प्रेम केलं निर्बंध तोडून
सुख मुठीत होतं सारं
निर्बंध लादले असते जर
प्रेम झालं असतं? सांग बरं!

समजलं होतं सार काही
अनुभवले होते सुख मी ते
विश्वास होता प्रेमावर
सफल झाले प्रेम ही ते

आत्मा स्पर्शून गेला तू
मन माझे त्यात हरवले
हरवून त्यात जाण्यासाठी
प्रयत्न तू ही केले

प्रेमात चूर मी झाले होते
क्षणात तू ही साथ दिली
सैरभैर झाले मन माझे
थाप प्रेमाची तू दिली


📌 खुशी ढोके

__________________________________________________________________________________________



नाव : खुशाली ढोके (खुशी)

हायकू : सरी प्रेमाच्या 💝




••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सरी प्रेमाच्या
बरसती स्वच्छंद
देती आनंद

मन उधाण
प्रेमात बेभान ते
फक्त तुझ्या रे

इच्छा मनाच्या
सरी बरसता त्या
निःस्वार्थ होत्या

सरी प्रेमाच्या
बरसती स्वच्छंद
देती आनंद

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED