Poetry Collection.... - 2 books and stories free download online pdf in Marathi

कविता संग्रह.... - 2खंत....😓

न जावे गुंतूनी इतके कल्पनेत
विसरून वास्तविकतेची पायवाट
कल्पनेत भासवून आपुलकी
वास्तवात नव्हतीच बांधिलकी...

सुखद भाव अनुभवते सहवासात मन
एकांतात मात्र नेहमीच दुःखद राहीले क्षण
बाहेरून असते भक्कम पाठिंब्याची ग्वाही
आतून मात्र ख्याती बघवत नाही...

मैत्रीत भ्रमनिरास होऊनी
मन परत मैत्री हिमतीने करते
कुजबुज आवाज कानी पडताच
मैत्रीवरचा विश्वास धुळीस मिळते...

झाले गेले विसरून पुन्हा नव्याने जगावे
विचार येताच मनी, पुन्हा कोणी यावे
भ्रमनिरासतेचा कधीच नसणार का अंत
"मैत्रीत होणारा भ्रमनिरास" ही नेहमीच खंत...


✍️ खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


सखे....😇❤️

का ग सखे आज धीर तुझा सुटला!
तुझा विश्वास जिंकणारा मागे का हटला....?
आज तर तुझ्या अश्रूंचा बांधही फुटला!
मनातील ज्वालामुखी नकळत आज पेटला....!

तुझे अश्रू मला आतून बोचले!
एकच प्रश्न, तू ते कसे सोसले....?
का झालीय तू मानसिक परावलंबी!
निर्णायक होऊन बन तू स्वावलंबी....

नसेल पटत इतरांचे खोचक बोल!
तू माझ्याजवळ तरी, तुझे मन खोल....
किती सहनशील तु ग झालीस!
त्यांचे वर्चस्व नेहमीच वाहत आलीस....

सोड अबोला, कर तुझ्या प्रश्नांचे निरसन
करून खात्री, होणार नाही त्याची अडचण....
स्व:त्व जपून नेहमीच सखे तुझे
सार्थक करेल, नि:स्वार्थ प्रेम माझे....

😘❣️....Dear Asmi....❣️😘


खुशी ढोके


__________________________________________________________________________________________


एक दागिना असा ही.....❤️

रोज नटते मी ज्याच्यासाठी
असा तो माझा सखा
लागून असते नेहमीच ओढ ज्याची
सुखद विचारांचा माझा "तो" पाठीराखा

जवळ येऊन आपुलकी त्याची
काळजी त्याच्या डोळ्यांतील माझी
सांगून जाते त्याची ती अबोल भाषा
असणारी हृदयी त्याच्या काळजी माझी

दागिने परिधान करून जरी मी नटले
चेहऱ्यावरचे समाधान कधी ना मिटले
समाधान हे जर दागिन्यांमुळे असते
मग ते आपल्याकडे काहीच नसताना नसते

तुझ्याविना मौल्यवान न काही वाटले
आयुष्य हे तुझ्याविना अधुरेच वाटले
असेल ना साथ आपली अशीच सात जन्माची
जशी मुखड्याविना नसते शान मराठी दागिन्यांची


✍️ खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


राधा ही बावरी....😇❤️

का ग राधे अशी बघतेस लपून - छपून
ये ना मज समोर जाऊ दोघेही एकांतात हरवून
बासरी वाजवून घालेन तुझ्या मनाला भूरळ
मन होते निराश ऐकुनी तुझ्या हृदयाची तळमळ...

नको छळुस मन माझे सख्या रे
बैचेन होते तन - मन सारे
असशील तू नटखट माखनचोर
पण, चेहरा आहे माझा चंद्रकोर...

तुझ्या रुपासमान नाहीच सखे कोणी
विश्व सुंदरी साऱ्या भरतात तुज समोर पाणी
माझ्या मनातील प्रेम सांगेल का तुज कोणी
करून निःस्वार्थ प्रेम देऊ संदेश प्रत्येक मनी...

इतकं प्रेम करतोस का मज सख्या रे
प्रश्नार्थक होते आधी मन माझे हे बावरे
मन धुंद तुझ्या मधुर बासुरीच्या स्वराने
असाच नेहमी करशील ना वेडा तुझ्या प्रेमाने...

खुशी ढोके


__________________________________________________________________________________________


आई...

कधी आवाज वाढवला मी
त्याला घाबरतेस का ग आई
दिवसरात्र काम करून,
तू थकतेस का ग "बाई..."

काळजीपोटी रागवतेस मला
काळजी करतेस हे का ग सांगत नाहीस
राग असेल माझ्या मनात तुझा
पण, रागात सुद्धा उपाशी ठेवत नाहीस...

घरी यायला झाला उशीर
तर, फोन करतेस न राहवून
दारात येऊन बघतेस वाट
एकही घास न खावून...

रात्री कवटाळत बसता तुला
कुशीत तुझ्या वेगळेच सुख
प्रेमाने आई थोपट ना मला
पळून जातील सारे दुःख...


🤗 खुशी ढोके__________________________________________________________________________________________
आम्ही दोघी...

खूप लांब असूनही, एका वळणावरची भेट
घुसली मनी, दडली आत ही भयंकर थेट
प्रवास प्रेमळ मैत्रीचा, झाला मस्त सुरू
मन म्हणे, आता कसं स्वतःस आवरू...

दोघीही मनाने होत्या अगदीच जवळ
दोघींनी जपली एकमेकींची प्रत्येकच आवड
दोघीत तीसऱ्याचे येणे होते अवघड
कारण, गैरसमज नगण्य होता तो जड...

विश्वास होता दोघींचा निर्मळ
स्वभाव नसेल का मग प्रेमळ?
जुळवूनी ठेवत नेहमीच परस्पर संबंध
नातं निभावण्यात नव्हते कुठलेच निर्बंध...

प्रयत्न नाती खिळखिळी करण्याचा
मानस त्यांची मैत्री हाणून पाडण्याचा
झाला नाही सफल कुविचार हरवण्याचा
कारण, त्या दोघींच्या मैत्रीत होता अदृश्य धागा विश्वासाचा...

परत नसेल अविश्वास फक्त मैत्री असेल घट्ट
नेहमी हक्काने पुरवू एकमेकींना कुठलेही हट्ट
वाईट वृत्ती आणि जळणारे, झाले जळून खाक
जळताना ऐकलीच नाही, कोणी ती आकांत हाक...!

येतील किती पण, गवसणार नाही प्रवेश वाट
राहू दोघीच नेहमी सोबत, घालू नात्यात झिंगाट
तुझ्या नि माझ्या विश्वासावरच असते नेहमी सर्वांचे लक्ष
आपल्या नात्यातील निःस्वार्थी भावच देईल नेहमी मैत्रीची साक्ष...


डियर आस्मी...... धिस इज ओन्ली फॉर यू अँड युअर बेस्ट फ्रेंड......💕


💕 खुशी ढोके

__________________________________________________________________________________________
उगीच भास होतात....😇

का मनात काहूर माजले
माझे न मी राहीले
सोपवून मन माझे तुला
जणू मी तुझ्यात हरवले...

तू असतोस नेहमी
नकळत येणाऱ्या त्या
ओठांवरील हसण्यात
डोळ्यांतील अश्रू
जणू तुझीच साक्ष देतात....

वेड लावतो हा सहवास
पण, का मज खुलावते
तुझ्या येण्याची आस
दिवसरात्र होतात
तुझ्या असण्याचे भास....

स्वप्न, तू भासता
नसतात दुःखद
येऊनी खऱ्या आयुष्यात
करशील ना जीवन
माझे हे सुखद....

स्वप्नातून सत्यात उतरून
साथ आयुष्याची दे
निर्बंधापलिकडे करू प्रेम
निःशंक नाते तुझ्यासवे
सख्या ये सत्यात रे
उगीच नको भास हे....💔


✍️ खुशी ढोके

__________________________________________________________________________________________
फक्त तू....💕🤗

माझ्या आयुष्याच्या
एक छोटासा दिवा तू.....
काळोख्या या मनात
आशेचा एक किरण तू.....

जीवनाचा ध्यास तू
स्वतःवरील विश्वास तू.....
कधी जर हरवलो मी
मिळणारा मदतीचा हात तू.....


✍️ .......................

__________________________________________________________________________________________
तुझ्या प्रेमाचे ऋतू....💕


वसंत ऋतुत तुझे प्रेम कळाले...

ग्रीष्म ऋतुत ऊब देऊन ते आपले करून गेले...

वर्षा ऋतुत प्रेमाचा वर्षाव होतच राहिला...

शरद ऋतुत जन्माची साथ देण्याचे वचन तू दिलेस...

हेमंत ऋतुत एक होण्याआधीची घडी ती आली...

शिशिर ऋतुत प्रेमाच्या वर्षावात दोघेही नाहून गेलो.....


💕 खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


ते माझेच होते...!🤗

दूर होते ते जवळ आले
आदराचे रूपांतर रागात झाले...
आधी एक शब्द न बोलणारे
ओठ ते बोलके झाले...

सोबत होती एकमेकांची
पण, जाणीव जणू हरवली...
काळजी अबोल ती
गैरसमज वाढवत गेली...

दिवसामागून - दिवस ते गेले
पूर्वग्रदूषित विचार ना सरले...
लोकांनी ते परत हृदयी बिंबवले
मनाला ते न कधीच पटले...

जवळीक असून मनात होता दुरावा
ऋण वाढत गेले न झाला परतावा...
वेळ आली एकदाची
सरली इच्छा आशा - अकांक्षांची...

परत सौभाग्य सहवासाचे लाभले
जवळीक, प्रेम, काळजी हेच अबोल भाव अनुभवले...
न राहून मनाने ठरवले
ते कधीच परके नव्हते
ते माझेच होते...🤗


✍️खुशी ढोके

__________________________________________________________________________________________


रात्र...❤️


काय असते ही रात्र,
भान नसतो मलाच माझा काडीमात्र...

का होतो मी माझ्याच स्वप्नांत धूसर,
असतो नेमका हा कुणाचा असर?...

असेलही कदाचित कोणी येणारा,
पण, का थांबत नाही कधीच कोणी प्रेम करणारा...

का असतो मी असा बेभान,
की, समोरचा रस्ताही मला वाटत नाही सुमसान...

नसतो कोणी सोबती प्रवासात,
मग सांगा बघू कोण येईल माझ्या स्वप्नात...?

अशी माझी एकांत अवस्था या रात्रीने केली,
का ही रात्र अशी मनाला बोचू लागली...

😊खुशी ढोके😊


__________________________________________________________________________________________अनोळखी सुखाची वाट!


कळत जरी असले सर्व मला,
तरी नकळत मन तुझ्यात गुंतते......!
का, कुणास ठाऊक ओढ तुझीच लागते...?
भेटले मुद्दाम ही खंत होती मनाशी,
पण, तूही केला माझा सहवास पसंत सांगावे मी कुणाशी...?
वेळ जात होती अगदी तिला हवी तशी..
वर्ष झाले तुला ओळखते मी जशी...!

दिवस नसेल कोणता, ज्यात तुला मी नसेल शोधले..
तुला हव ते करण्यात मी अंतःकरण वेचले..
मन दुखावलं असे कदाचितच घडले..
कारण, तू माझे सर्व लाड पुरवले...
अनोळखी शब्द मी माझ्या शब्दावलीतून पुसले..
कारण, मला सख्या नेहमीच तुझे सहवास हवे से वाटले...

असेल तुझ्याही मनात काही शंका..!
नको करुस सख्या त्याच्या कुशंका..
मी आहे तशीच राहणार..! न मी बदलणार, न दूर जाणार...!
नाही केली सख्या कधीही कोणती अपेक्षा मी तुझ्याकडे...
दिलं सर्वस्व होत जे काही माझ्याकडे...
निसंदेह, तुला ते वाटले असेलही स्वार्थ!
पण, सख्या नव्हतं रे ते निरर्थ...
प्रत्येक भेट होती माझ्यासाठी एक आस..
कारण, सख्या मला हवा होता तुझाच सहवास......

कालांतराने वाटत असेल तुलाही वागणे माझे कंटाळवाणे....!
पण, अनोळखी सुखाची वाट शोधत होते मन माझे हे शहाणे....

वाट जरी अनोळखी असली! तरी, होती ती सुखाची..
जाऊन माझ्यापासून दूर, नको करुस सख्या ती दुःखाची...
तुझ्याविना जीवनाची कल्पना वाटते मला अपुरी..
नको जाऊस, सख्या दूर सोडून
अनोळखी सुखाची वाट ही अधुरी......!
अनोळखी सुखाची वाट ही अधुरी.............!

खुशी ढोके


__________________________________________________________________________________________

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED