लघु कथा संग्रह.... - 1 Khushi Dhoke..️️️ द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लघु कथा संग्रह.... - 1

नाव : खुशाली ढोके (खुशी)

जन्म दिनांक : २१

कथा प्रकार : भयकथा

कथा शीर्षक : ती एक रात्र...🥶

____________________________________________

खूप दिवसांपासून मी वरादे स्क्वेअरच्या रस्त्याने गेलो नव्हतो. तिथल्या चाट वाल्या काकांना सुद्धा तीन महिने झाले भेटलो नाही या विचारानेच आपोआप तिकडे वळलो. थोड्याच वेळात तिथे पोहचलो. वेळ होती, रात्रीचे दहा! नेहमी गर्दी असणारं ते ठिकाण आज निर्मनुष्य वाटत होतं. दुरूनच काका नजरेस पडले. पण, नेहमी हसतमुख असणारे काका आज वेगळेच भयावह वाटत होते. जवळ जाऊन नेहमीप्रमाणे ऑर्डर केलं, "काका एक मस्तपैकी चाट, एक्स्ट्रा तिखी" त्यांनी वर न बघताच एका भांड्यात काही तरी खटपट केली आणि एक प्लेट माझ्या समोर धरत ते बोलले, "ये चाट बहुतही बढिया लगेगी बिटवा" माझी नजर त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याला शोधत असताच, भयावह दृश्य डोळ्यास पडले! त्यांच्या चेहऱ्यावर किळसवाण हसू, डोळ्यातून रक्ताच्या धारा, जबडा बाहेर लोंबत तर, शरीर म्हणून फक्त सांगाडा! प्लेट मध्ये बघितलं तर मासाचे तुकडे! मी पळत सुटलो. दूरवर कुठे तरी एकाला धडकलो जो, कधी तरी चाट खाताना सोबत असायचा. त्याच्याकडून समजलं काकांचा महिनाभर आधीच एक मोठा अपघात झाला होता. ज्यात, ते जागीच ठार झाले होते. ऐकून अजुनच भीती दाटून आली आणि मी पळत सुटलो. रात्री तीन वाजता घामाघूम घरी पोहचलो कारण, मला रस्त्यावर सगळीकडे अपघाताचे दृश्य आणि ते काकाच दिसत होते!

____________________________________________


प्रेमळ मैत्रीतील गोंधळ....💔


आज तोच दिवस जेव्हा पहिल्यांदाच तुझ्याशी बोलण्याचं धाडस केलं होतं मी... का? माहीत नाही... पण, पहिल्याच क्षणी तू आवडली होतीस.... पण, ते म्हणतात ना! जास्त घाई खड्ड्यात नेई... म्हणून, म्हणूनच अग लांब होतो... घाबरत होतो की, तुला बघण्याचा ही हक्क मी गमावून तर बसणार नाही ना!!... मला परवडण्यासारखी गोष्ट नव्हतीच म्हणा ती!... माझे दिवस असेच, त्या बस स्थानकाच्या खुर्चीत बसून, तुझ्या त्या बोलक्या डोळ्यांची स्वतः कडे बघण्याची वाट पाहण्यात जात होते... तू मात्र मला टाळायची आणि हे मला सुद्धा तेव्हाच जाणवलं होतं... पण, तो अनुभव मला त्या वेळी हवासा वाटत होता... का पण, तुझ्या त्या सौंदर्याला लांबूनच अनुभवण्यात कमालीची उत्स्फूर्तता असायची... तुझ्या त्या प्रेमळ रागात, तुझ्या त्या चेहऱ्यावरच्या गोड हावभावात नेहमी मला तुझ्या आत असलेली निस्वार्थ व्यक्ती दिसायची, ज्याचं अस्तित्व तुझ्यात आहे किंबहुना तुझं व्यक्तिमत्व खूप सकारात्मक आहे... हे तू कधी मान्यच केलं नसावं आणि म्हणून तू इतरांशी जवळीक साधण्यात स्वतःला गुंतू द्यायची नाहीस... पण, मला हे पटत नसल्याने, न राहवून एकदा तुझ्याशी बोलण्याचे धाडस करणारा मी आज खरच खूप नशीबवान समजतो स्वतःला... कारण, तू आज मैत्रिणीच्या रूपात माझ्या सोबत आहेस... भविष्यात तू असशील - नसशील... पण, तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला मी जपून ठेवेन...
सहज तुझा फोटो बघून, आज मागचं घडलेलं सगळं आठवत बसलो आणि मनात एक प्रश्न परत धिंगाणा घालू लागला...
"तुला मनातलं सांगितलं तर, मी आपली मैत्री तर गमावून बसणार नाही ना!?🥺"
आणि परत विचारांना पूर्ण विराम देत, समोर बघितलं तर बस तिथेच थांबली होती, वेळही तीच होती मात्र, आज त्या प्रवासात गंमतशीर बोलायला तू सोबत नव्हतीस...🙃
लवकरच येतोय तुला भेटायला हा विचार मनात येताच परत प्रश्न पडतो...
"भेटशील ना मला?🥺"✍️ खुशी ढोके

_____________________________________________


नाव : खुशाली ढोके. (खुशी ढोके)

रस : बीभत्स रस 🙆

कथा शीर्षक : माझे बालपण - अविस्मरणीय..!

"किती गोड हसते ना ती….."

मनातच विचार करत, नेत्रा बागेत एकटीच बसून होती…. समोर खेळणाऱ्या एका तेरा वर्षाच्या मुलीच्या गोंडस हसण्याकडे बघून ती कमालीची सुखावली…… थोडा वेळ गेला असेल….. लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले…. ती रडवेली झाली….. आजूबाजूला कोणी तिच्याकडे बघत तर नाही ना! हे तपासून डोळे आपल्या उजव्या हाताने पुसत कुठल्यातरी विचारात हरवली असता, थेट ती तिच्या भूतकाळात तब्बल बारा वर्षे मागे जाऊन स्वतःचं बालपण आठवू लागली…..

"मी, हो मी नेत्रा….. किती खोडकर होते ना मी….. अशीच ह्या चिमुकली सारखी मी सुद्धा माझ्या जगात खुश होते…… खुश होते मी माझ्या गरिबीत…… खुश होते मी माझ्या मातृत्वाच्या छायेच्या अनुपस्थितीत…. पण,......!!!"

मोठा श्वास घेत नेत्रा थांबली……

काय घडले होते तिच्यासोबत बारा वर्षांपूर्वी???? का नेत्रा आज त्या चिमुकलीच्या गोंडस हसण्याने आधी सुखावली मात्र, लगेच काही तरी आठवून ती अस्वस्थ झाली होती……?????

बारा वर्षापूर्वीची नेत्रा……

अतिशय हुशार, देखणी, बोलायला एखाद्या महान व्यक्तिमत्वाची आठवण करून देणारी….. म्हणून, एकदा तिला स्वतंत्र दिनी वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला…. इतकी खुश रहायची ना ती….. की, बस….. नेहमी शाळेत ती कुठल्याही स्पर्धेत पुढे असायची….. पण, घरची गरिबी कधी - तरी तिच्यामधील गुणांना टाळण्याचे कारण बनायची…. तेव्हा नेत्रा दुःखी व्हायची….. करणार काय??? मग दिवस तिचा असाच दुखात जायचा….. आई नव्हती ना तिला…. बसून रात्र - रात्र रडायची….. बाबा???? होते ना….. ते होते म्हणून तर आज तिच्या डोळ्यात नकळत अश्रूंनी येण्याचं धाडस केलं होतं!

आईविना ती पोर….. घरी दारुडा बाप…..! सगळी परिस्थती प्रतिकूल….! मात्र, त्यातही खुश रहायचा मूलमंत्र ती जन्मतःच घेऊन आलेली….. नेहमी हसतमुख….. शाळेत चुळबुळ मात्र घरी शांत….. होती एकुलती - एक मात्र, हवं तितकं प्रेम करणारं कोणी नव्हतं…. त्यामागे कारण ही होतेच ना! तिचे बाबा सकाळी एका कंपनीत कामावर जायचे आणि रात्री पिऊन घरी यायचे…. खर्चाला लागतील तेवढेच पैसे तिला मिळायचे…. त्यात तिला घरचा, सोबतच शाळेतला खर्च ही कसरत होतीच….!

फक्त जिवंत होती ती…..

एक दिवस दूरचा एक नातेवाईक त्यांच्या घरी आला….. तिने त्यांना ओळखलं नाही मात्र तिचे बाबा आज इतक्या दिवसांतून पिऊन न आल्याने तिला आश्चर्य वाटले होते…. कोणी तरी घरी आले आहे म्हणून त्यांनी घेतली नसेल असा विचार करत ती कामाला लागली….. रात्री सगळ्यांची जेवणं आटोपली….. नेत्रा तिचा अभ्यास करत बाहेरच्या खोलीत बसली होती….. तेव्हा अचानक तिचे बाबा बाहेर जाताना तिला दिसले…. तिचं काही विचारण्याच्या आतच त्यांनी बाहेरून दार बंद करून घेतला….. नेत्रा घाबरली….. असं हा माणूस घरात असल्यावर बाबांनी का दार बंद करून घेतला हे तिला समजण्यात मात्र, उशीर झाला होता…. आतून तो माणूस बाहेरच्या खोलीत आला…. त्याने नेत्रावर झेप टाकली….. तिला आत नेऊन त्याने पलंगावर फेकून दिले….. ती खूप रडत होती….. तिच्या त्या अवस्थेचा त्याला काही एक फरक पडत नव्हता….. तिने घरात नजर फिरवली आणि तिला कळून चुकले…. घरात तिच्या बाबांची एकही वस्तू नव्हती….. ज्यात गावी जाताना कधी - तरी सगळ्या वस्तू घेऊन जायचे त्या बॅग्स….! त्या सुद्धा तिथे नव्हत्या….! ती गोंधळून त्या माणसाच्या चेहऱ्याकडे केविलवाणी बघू लागली……

तिला काही कळण्याच्या आतच त्याने तिच्या शरीराचा ताबा घेतला…..

तब्बल दीड तास तो तिच्या शरीराचे लचके तोडत राहिला…. ती प्रतिकार करत होती माञ, त्या नराधमाच्या भुकेल्या नजरेसमोर तिची प्रतिकार क्षमता तोकडी ठरली….

त्याने तिच्या अभ्रूच्या चिंध्या केल्या….. दीड तासाने जेव्हा तो बाजूला झाला तेव्हा, नेत्रा शुद्धीवर नव्हती….!

तीन तासांनी ती शुद्धीवर आली तेव्हा, तो नराधम तिच्या समोर बसलेला बघून ती घाबरून मागे हटली….. त्यानंतर तिच्या कानावर जे पडले ते ऐकून, तिला स्वतःची लाज वाटू लागली…. त्याच्या सांगण्यानुसार, काही पैशांच्या मोहापाही तिला तिच्या बाबांनी त्याच्या स्वाधीन केले होते…..!

रक्कम होती मात्र दहा हजार रुपये….!

आज त्या पाच अंकी रकमेने तिचे बालपण तिच्यापासून हिरावून घेतले होते….. ती निःशब्द होती….. तिला बोलायचे होते मात्र, ऐकून घेणारं तिला दूरवर कोणीही दिसत नव्हतं…..

किंचाळणार की, परत तिच्या अंगावर झेप घेतलेली तिला जाणवली आणि शेवटची स्त्रित्वाची शक्ती एकवटून तिने त्याला दूर लोटले….. ती हरली नव्हती…. फक्त तिला भान नव्हते…. लगेच उठून तिने जवळ ठेवलेला लोखंडी पाईप त्याच्या डोक्यात घातला आणि त्याच रक्ताने माखलेल्या पायांनी बाहेर सैरभैर पडू लागली….. दूरवर कोणाच्या तरी कारपुढे जाऊन धडकली…..!

आज इतक्या वर्षांनी हे सर्व आठवून तिच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले….. पुरुषी स्पर्शाची तिच्या मनात एक वेगळीच चीड निर्माण झाली होती….. कोणी तिच्याकडे बघितलं तरी तिच्या आत एक वेगळाच किळसवाणा भाव दाटून येई….

असंच एकदा जेव्हा बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क आला…. तेव्हा अधून - मधून असे किती तरी अनुभव तिला आले…. ज्यात तिला असे किळसवाणे स्पर्श जाणवायचे….. रस्त्याने चालत असता एखादा पुरुष जर का शेजारून गेलाच…. तरी, ती घाबरून मागे हटायची…..! या आणि अशाच किती तरी घटना आजवर तिच्या बाबतीत घडल्या होत्या…..

सगळं आठवून ती ओक्षिबोक्षी रडू लागली….. तेव्हा एक हात तिच्या खांद्यावर तिला जाणवला….. तशीच ती जागेवरून उठून उभी राहिली.... त्या व्यक्तीकडे न बघताच स्वतःचा खांदा किळसवाण्या हावभावाने झटकू लागली..... तिची अवस्था बघून, त्या व्यक्तीने तिचे दोन्ही खांदे पकडत तिला भानावर आणले.....

नंतर त्या व्यक्तीकडे बघताक्षणी, ती त्यांच्या कुशीत शिरत अजुनच रडायला लागली…… काही वेळा नंतर त्यांच्या मिठीत ती शांत झाली…..

ह्या व्यक्ती दुसऱ्या - तिसऱ्या कोणी नसून, त्याच होत्या…. ज्यांच्या गाडीवर ती बारा वर्षांआधी धडकली होती…. त्या होत्या…. मानवाधिकार कार्यकर्त्या तसेच विशेषतः महिलांच्या हितास्त्वव लढणाऱ्या श्रीमती देविका राणी बंग….. त्यांच्या कामगिरीतून त्यांनी किती तरी महिलांचे आयुष्य सावरले होते…. आज नेत्रा सुद्धा त्यांच्या सोबत मिळून अशाच महीलांसाठी काम करत होती…..

समाप्त….🙂

_____________________________________________


कलाटणी....


सुरुवात कुठून करावी....?? विचार करत असताच एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, आयुष्याला कलाटणी देणारी एकच घटना असू शकते का? तर, नक्कीच नाही.... आयुष्य जगताना, मानसिकरित्या परिपक्व झाल्यावर म्हणजेच, प्रत्येक गोष्ट आपण समजण्याईतपत वयाचा पल्ला गाठल्यावर असे किती तरी प्रसंग घडतच असतात....

मला आठवतं वय वर्षे सोळा माझा मैत्रिवरून विश्वास पूर्णपणे उठला... त्यांनतर मला स्वार्थाची खऱ्या अर्थाने जाणीव झाली... त्याचा नुकसान म्हणता येणार नाही उलट फायदाच झाला.... फायदा असा की, नव्याने कोणात गुंतून स्वतःचा वेळ वाया घालवू नये ही आयुष्याच्या त्या वळणावर कलाटणी देणारी पहिली घटना ठरली....

मैत्रीवरून विश्वास उठला होता मात्र अजूनही बाकीच्या भावना माझ्यात होत्याच त्यातलीच एक म्हणजे, "प्रेम"...... वयात आल्यावर कोणी तरी आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला स्पेशल वाटण्यासाठी खूप काही करावं असं वाटायचं.... नंतर - नंतर प्रपोजही येत होते पण, हळू - हळू प्रत्येकाच्या शारीरिक सुखाच्या हव्यासापाई (अर्थात मी हे ज्यांच्या विषयी लिहिलंय ते माझ्या व्यक्तिगत जीवनाशी निघडीत आहेत कोणीही मनाला लावून घेऊ नये) प्रेमावरुन विश्वास उठत गेला.... परत ही घटना आयुष्याला एक कलाटणी देणारी ठरली...... कलाटणी ही की, कोणी आपल्या आयुष्यात विनाकारणच येत नसतो.... त्यांना काही तरी हवं असतं..... पण, खूप लोकं काही देऊनही जातात हे मात्र क्वचितच घडतं.....

त्यानंतर, एक महत्वाची कलाटणी देणारी घटना जिच्यामुळे माझं पूर्ण व्यक्तिमत्व घडवून आणण्यास मदत झाली आणि होतच आहे इतकेच नाही तर, कालांतराने ती सुरूच राहील....... ती म्हणजे, माझ्याच माणसांकडून माझी लायकी काढली गेली..... माझ्या भाषाज्ञानावर प्रश्न चिन्ह उभं राहिलं.... मी किती अपयशी हेच सतत दाखवलं गेलं..... या सगळ्या गोष्टींमुळे मी हळू - हळू नैराश्यात जात होते.... रात्र रडून काढायचे.... नको ते विचार मनात डोकावत होते.... सगळं सोडून द्यावं का? अपयश मलाच येत असेल का?

हे आणि असे काही नकारात्मक प्रश्न माझ्या डोक्यात आणण्यासाठी अप्रत्यक्षपणे आपलीच माणसं जबाबदार आहेत हे स्वीकार करायला सुद्धा मन तयार नव्हते..... कारण अजुन तरी त्यांच्यावरील माझा विश्वास कायम होता किंबहुना मलाच त्याला तडा जाऊ देणे योग्य वाटत नव्हते..... म्हणून, कोणालाही दोष न देत बसता, कुठलंही भांडवल न गुंतवता लिखाणाला सुरुवात केली.... माझे विचार ऐकून घेतले जात नव्हते.... ऐकून घेतले जात नाही म्हणून काय झाले.... माझे विचार वाचले जावेत यासाठी रोज धडपडत राहायचं ठरलं.... आणि एक दिवस मला तो प्लॅटफॉर्म प्रतीलिपीच्या रूपात गवसला सुद्धा..... आज वयाच्या ठराविक वेळी मनात स्वतःविषयी कुठलेच प्रश्न डोकावत नाहीत..... सतत जिद्द असते काहीतरी लिहिण्याची.... त्यातून काही तरी सकारात्मक संदेश देण्याची.... अर्थात यात इतकं स्व: सुख अनुभवते मी ते फक्त मलाच माहीत.....

मला नेहमीच आपले विचार मांडण्याची उत्सुकता लागून असायची पण, कोणीच ते ऐकत नसल्याने नकारात्मक भावना ही मनात यायच्या...... पण, आता लिहायला सुरुवात केल्यापासून स्वतःच्या मनातलं मी इथे मांडते.....

एकूणच आपल्या माणसांकडून होणाऱ्या टीका आणि मिळणारी बोलणी माझ्या जीवनाला कलाटणी देऊन आयुष्य जगणं सोप्पं करून गेली.... असं म्हणलं तरी ते वावगे ठरणार नाही....😊


खुशी ढोके...

_____________________________________________