Navra baaykoche rusve-fugve - 4 books and stories free download online pdf in Marathi

नवरा बायकोचे रूसवे-फुगवे...४

आपन भाग ३ पाहिला आता भाग ४ पाहु..... पुढेरितुचे ते मोठे मोठे डोळे,👀 चेहऱ्यावर राग,😠 पदर कमरेला खोसत,
व्हाट्सअप ला चॅटिंग,
इथं घरी येणं,
मी घरी आहे, म्हणून असुन तिला मी घरी नाही सांगितलं,
घरी नसते तर...? बोला ना मि घरी नसती तर....????

भयंकर खिजालेल्या अवस्थेत तिचे ते रूप पाहून.. मला तर असं वाटू लागलं आता मला खाऊन टाकेल कि काय....🥺

आता काय करू काही सुचत नव्हते, डोक्यात टुप पेटेल न् मि वाचेल याच काहि चिन्ह दिसत नव्हते.

रितुची ट्रेन डायरेक्ट आता मला धडकणार तेवढ्यात आमच रिकि बाळ ऊठले... आणि रडायला लागल. रिकिच रडण बघुन रितुच्या ट्रेन ने ब्रेकच मारला आणि पटकन जाऊन रिकिला जवळ घेतले आणि मायेने डोक्यावरून तोंडावर हात फिरवत तिच्या पदराने रिकिचे अश्रु पुसत रिकिला शांत करत माझ्याकडे रागाने बघत.....
ति बोल्ली उठा आता माझ्या कडे काय बघता...!

रिकिला तहान लागली असेल पाणी ‌आणा माझ्या पिलुला...!😠

"मला जशी काय बाॅसची ऑर्डर भेटली" असंच वाटलं आणि मी ताडकन उठून फ्रीजमधून एक बाटली आणली. आणि रितूतु जवळ आणून ठेवली ..

तेवढ्यात रितु जोरातच ओरडली.
त्याला काय हे गार पाणी पाजणार का...? त्याचं गरम केलेलं पाणी माठा जवळ ठेवले बघा ते आणा....! काय नशीब माझं हा नवरा नशिबात आला...😠

***

बाबा आपण तर गपचित तिचं ऐकत राहिलो. कशाला उगाच बोलायचं बाबा ,त्यापेक्षा बर आहे गपचित.

"बोल बाबा, बोल किती बोलायचं.. ते बोलून घे"

आधीच ट्रेन धडकत होती त्यात आमच्या रिकी बाळने मला वाचवलं तेच खूप झालं. पण किती वेळ वाचवणार...? बाळ शांत झालं की मला ती बघेलच त्यात काही शंका नव्हती ...😏

तेवढ्यात मोबाईल ची रिंग वाजली. मि तडकन ऊठुन काॅल रिसिव्ह केला तिकडुन बाई बोलली. तुमचा रिचार्ज प्लॅन २९/०३ ला समाप्त होनार आहे. अखंडित सेवा चालू ठेवण्यासाठी त्वरित रिचार्ज करा. तेवढ्यात माझी टुप पेटली, आता रिकि शांत झाला. ही माझ्यावर ताव काढणार त्यासाठी आपण बाहेर गेलेले बरच...😜

काॅलवर मुद्दाम.... "अहो सर‌ आलोच 5 मिनिटांत"

मस्तपैकी ‌मि‌ हा असा खेळ रचत. मोचे आणि बुट काढले आणि पायात घालून, रितुला बोलत

"येतो रितु मि, सरांनी बोलावले मला तर येतोच मि हं..

दरवाजा बाहेर पाय टाकनार तेवढ्यात रितु जोरात ओरडत. काय माणुस हा....
अहो तो टोवेल आडवा लावुन जाताय का..? पॅन्ट तर घाला...!
काय करू या माणसाच कडतच नाही..😠

"तिचा हा आवाज ऐकुन मि खाली पाहिले....बुट पायात आणि टोवेल वर मि ...
अरे‌ देवा कस‌ हे... 😜😜"

काय कराव बायकोचा धाकच असा असतो....बरोबर ना...? 😜😜😁

पॅन्ट, बुट वगैरे घालून... मी निघतो न् योगेश आणि जगण ला कॉल करून दोघांना कॉन्फरन्स घेत... अरे या रे..! मि चौकामध्ये उभा आहे. पार्टी देतो तुम्हाला... मस्तपैकी हॉटेल मध्ये जेवायला जाऊ..😁😎
पार्टीचं नाव ऐकताच दोघे जन पाच मिनिटात चौकात हजर..😜😜😁

योगेश येताच चल कोणत्या हॉटेल मध्ये जायच आहे. अरे तुझ्या वहिनीने आज जेवणात कारले बनवलेय कोण खाईल ते कारले- बिरले... बरं झालं तू पार्टीची ऑफर दिली. "चल यार पटकन चल....तर"

मी ओरडतच... झांबल्या गप्प बस... इथं रुपया खिशात नाही आणि तो पार्टी म्हणतोय... चल भेळ वगैरे खाऊ...
मग काय ४५ रुपया मध्ये तिघ खुश...😜😎

तिघे जणांच्या गप्पा चालता-चालता रात्रीचे दहा वाजले.. आता घरी जायचं म्हणून योगेश आणि जगनला सांगत चला आता घरी जायच का...?

तेवढ्यात जगन... अरे थांबरे बाबा तुझ्या सोबत सेल्फी काढू दे.. तुझ्या वहिनीला दाखवायला बरं पडते. तुझ्या सोबत आलोय बाहेर म्हणून तिला सेल्फी म्हणून प्रूफ दाखवावा लागेल . तुझ्या सोबत आलो कि काही बोलत नाही ती.... बघा इकडे..
"हं आता हा फोटो दाखवावा लागेल बाबा तिला"

"बाबा बायकोचा एवढा धाक नको नको नको नको....😒😒

ओके मित्रानो चला बाय... जाऊ या घरी...!

घरी येताच रितु मोबाईल घेऊन बसुन मला बोलत.
तुम्ही खूप handsome दिसता आता.
"मी एकदमच 56 इंच ची छाती करून मग आहे मी handsome 😎 काय विषय आहे का त्यात...😊

त्यात दुसरा मेसेज येतो..

"तुम्ही काल साडी खूपच छान घेतली" खूप आवडली मला ती साडी...

आणि तेवढ्यात मितुचा मोबाईल स्विच ऑफ होतो..

रितु आता तर खूपच चिडली. 😠

तुम्ही मीतुला साडी घेतली,😠
मला कधी साधी लिपिस्टिक आणत नाही😠,
कधी बाहेर खायला घेऊन जात नाही. आणि त्या दिवशी तुम्ही तिच्यासोबत रस पिला आणि काल तिला साडी आणली. तुम्ही खरं सांगा तुमचं काय चाललंय..?😠
आज तुमची काही खैरच नाही. तुम्हाला बघतेच..😠 किचन मध्ये जाउन रितू लाटणंच घेऊन येते....😳

अग नको ना...! नको ना.!!! लागेल ग मला...! अग तुझा काही गैरसमज झालाय असं मी काही केलं नाही अग मी तिला कशाला साडी घेऊ...!

बघा, बघा हे...! बघा डोळे फाडून फाडून बघा..! काय म्हटली ती.

मी मेसेज पहिले डोळ्यावर विश्वासच नाही पटला..
डोळे चोळत.. msg
चक्क...😳 "तुम्ही काल साडी खूपच छान घेतली" खूप आवडली मला ती साडी...

मनात विचार केला कोणते पाप केलं रे देवा मी,
हि मितु इतकं खोटं बोलते तर...😭😭😭
कुठला सुड काढते कुणास ठाऊक...😭

अग रितु डार्लिंग तू शांत बस ना... अग हि खोटं बोलतेय..
अग अग लागेल मला...!😏😏


शब्द बिंधास्त..mk
किरण सुरेश मगरे
जळगाव

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED