नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...५ शब्द बिंधास्त..Mk द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...५

आपण भाग चार पाहिला आता पाचवा बघू...👍🏼👇

रितू संतापून, बघा, बघा हे...! बघा डोळे फाडून फाडून बघा..! काय म्हटली ती.

मी मेसेज तर पाहिले पण डोळ्यावर विश्वासच नाही बसला....😞

"डोळे चोळत.. msg"
चक्क...😳
"तुम्ही काल साडी खूपच छान घेतली" खूप आवडली मला ती साडी...

मनात विचार केला कोणते पाप केलं रे देवा मी,
कि, हि मितु इतकं खोटं बोलते तर...!!😭😭😭
कुठला सुड काढतेच कुणास ठाऊक...😭

अग रितु डार्लिंग तू शांत बस ना...! अग हि खोटं बोलतेय..

अग अग लागेल मला...😏😏

परंतु रितू काही आज ऐकत नाही. तिचा संताप अजूनच वाढत जातो..

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते... ट्रिंग ट्रिंग ट्रिंग.....

रितु मोबाईल कडे लक्ष देते.. बघते तर काय मीतु चा काॅल.. ती अजून संतापते आणि दुसऱ्या सेकंदाला शांत होते आणि मनात विचार करते...🤔

( आता बघूच स्पीकर ऑन करते, आणि ती काय बोलते अगोदर तेच बघते मग सांगते यांना अजून..😠)

"काॅल रिसीव्ह करण्याच्या अगोदर... एक धमकी देत...!!
कॉल चालू असतांना तुम्ही जर एक शब्दही तुमच्या तोंडातून निघाला तर तुम्ही विचार करून ठेवा..! काय..? कळलं ना...!😠

ति तर एक खतरनाक धमकी देऊन मला शांतच बसवते...

"आणि करणार तरी काय बसावच लागतं बाबा शांत, शेवटी बायको ती बायको असते... नाईलाज आहे शेवटी"

"अन् काय करणार बाबा करावं लागतं सहन चुकी नसतांना ही"

रितू कॉल रिसीव करते...न् मला इशारा करते तोंडावर बोट ठेवत..🤫
आणि मीतू काय बोलणार हेच गप्प बसून 5/7 सेकंद ऐकत असते...

मीतू कॉल वरून..... अगं ताई पाहुण्यांनी (जिजु) तुला किती भारी साडी घेतली आहे. मला तर खूप आवडली ती साडी..😊
ऐक... ना..! मला एक दिवस देशील का साडी? मला लग्नाला जायचं आहे. अन् ऐक ना...!!!
ज्या दिवशी मी जाईल लग्नाला त्या दिवशी मला ती साडी हवी आहे.
देशील ना ग रितु ताई मला ती साडी एक दिवस वापरायला...?

हे असं ऐकून मी ताडकन उठतो... एकदम वाघासारखा बिंधास्त न घाबरता उभा असतो आणि रितु कडे मोठे मोठे डोळे करून बघतो.. (मी मनातल्या मनात तू फक्त कॉल कट कर मग बघतो तुला)

माझा असा भयानक न् खिजालेला चेहरा आणि डोळे बघून.. रितुचा चेहरा छोटासा होवून जातो.

कॉल कट होतो आणि रितू तिकडे डाटा ऑन करते न् मीतुचा व्हाट्सअप ला अजून इकडे एक मेसेज येतो..

("काल तुम्ही साडी खूपच छान घेतली" खूप आवडली मला ती साडी...)
या मेसेज नंतर चा मेसेज..
"पाहुण तुम्ही माझ्या रितू ताईला किती छान छान साड्या घेतात मला खूपच आवडली ती साडी. माझ्या पण नवऱ्याला मी हीच साडी घ्यायला सांगेल"

हा दुसरा मेसेज बघून तर रितु गप्पच बसते..🤐

रितू बायकोचा असा चेहरा बघून,
मग आपण काय...😜 सरकार आपलंच 😎. बघ बघ डोळे फाडून फाडून बघ आता..!!

तू केव्हाही असंच करत असते. जा आता ...😏 तुला कांदा, मिरची, भाजी कापूनच देणारच नाही. आतापर्यंत मसाला काढून देण, मेथीची भाजी निवडणे पालक ची भाजी कापण, घराला झाडू ‌ मारणं, पाणी भरणं, फ्रिजमध्ये पाण्याने बाटल्या भरून ठेवण, अथरुन उचलून घेणे, घड्या वगैरे करून व्यवस्थित लावणे, यापैकी एकही काम करणार नाही आजपासून....😏😏

रितु... अहो ऐका ना तुम्ही, मी सगळी काम करेन पण तुम्ही असं नाराज नका होउ न... प्लीज, 😞, मला तुमचा हसरा चेहरा आवडतो बघायला. पण तुम्ही असं नाराज नका होऊ प्लीज..
कान पकडून सॉरी ना...😒

रितुच असं बोलणं ऐकून मी मनातल्या मनात...(😝😝 वाचलो बाबा आज कामापासून)

बर बर ठीक आहे...!! हसतो मी..... आणि हसतच राहील.. तेवढ्यात माझ्या मामीचा म्हणजे रितुच्या आईचा फोन येतो...

मी मोबाईल कडे बघून...
" घे तुझ्या आईचा फोन आहे."

कॉल रिसीव करून....
रितूची आई : रितु मला आज रिकी ची खुप आठवण येत आहे ग...! मी आज येते रे बाळा त्याला भेटायला.

रितु खुश होऊन...
हो आई लवकर ये, 😊😊😊 मी स्वयंपाक करून ठेवते...

कॉल ठेवते..
आणि अहो ऐका ना बाजारात जाऊन तेवढं पालक ची भाजी घेऊन या ना...!
माझ्या आईला खूप आवडते ती पालक ची भाजी. "पालकच बनवेल माझ्या आईला"

बाजारात जाऊन मी पालक वगैरे घेऊन येतो..
आणि घरी येताच...

रितू: अहो ती भाजी चिरून घ्या लवकर.. माझी आई विस मिनिटांमध्ये येणार आहे.. लवकर करा.. पटपट

मी मनातल्या मनात विचार करतो (अरे यार आता वीस मिनिटे अगोदर मला ही बोलली की मी सर्व काम करेल आणि आता लगेच मला काम सांगते काय राव जाऊद्या तुम्ही,
आता तुम्हाला काय सांगू बायको करून पचतावलो, आणि नाही म्हटलं पालक ची भाजी चिरून द्यायची तर, आधीच तिची आई आता येतेय. येईल नाकावर फुगा आणि भांडण करेल आणि जाईल निघून तिच्या माहेराला. त्यापेक्षा पालक ची भाजी निवडुन काटुन देण्यास योग्य बाबा...😅
(शेवटी बायको असते ती... ऐकाव तर लागणारच)

आणि तेवढ्यात तिची आई येते..
आई येताच.. आईला एक कप चहा करून देते..
आई त्या चहाकडे बघते आणि रितुच्या तोंडाकडे बघते. कसं तरी नाक मुरडत आई चहा पिऊन घेते..

आता तो पर्यंत स्वयंपाक वगैरे सर्व काही बनवून तयार असतो,

रितु आईला बोलत... ..
बघ आई तुझे जावाई आत्ताच गेले आणि पालक ची भाजी घेऊन आले तुझ्यासाठी... बघ तुझी आवडती पालक ची भाजी बनवली मी..
बस तिथं मी वाढून आणते तुला.. आई हात धुवून येते आणि जेवणाला बसते.. जेवणाची प्लेट समोर येताच आई ची आवडती भाजी मग आई काय गप्प बसेल.. आई पटकन चपाती घेते आणि खायला सुरुवात करते. तर भाजीमध्ये मीठच नसते...😅🤣

आईकडून आता काही राहवत नाही..
आई रितुला जोरातच.... अग बाई तुला कळत नाही का....!! चहामध्ये साखर नाही, भाजी मध्ये मीठ नाही, लक्ष असते तरी तुझं कुठे...?? आणि पाठीत एक धबाका देते..

रितुच्या पाठीमध्ये धबाका बसून... एवढा माझ्या हृदयाला छान वाटतं ना...!! हं हा ह हा... आता तुम्हाला काय सांगू मित्रांनो....😅😅🤣🤣🙈 आणि रीतु कडे एक तिरपी नजर टाकून हसुनच घेत घराबाहेर निघून जातो...🤣😅

"बया माझ्या जावयाला तू असंच खाऊ घालत असेल बिचारे माझे जावई...

हे ऐकुन मी बाहेरून ... " हो ना मामी, बघा ना ही असंच करते...😜

रितू मला खुणीने किचनमध्ये बोलवुन ... एकदम धिरे आवाजात रागावून, संतापून.....😠

गप्प बसायचं, जर का माझ्या आईला असं तसं सांगितलं तुमचा विचार तुम्ही करायचा कळल...! ना..?
जा आणि बसा गुपचूप कॉटवर...

बायको बाबा शेवटी ऐकावं लागतं....😏



क्रमशः




शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव