नवरा बायकोचे रुसवे-फुगवे..६ शब्द बिंधास्त..Mk द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे..६

भाग पाच मध्ये तुम्ही पाहिलं रितुची आई घरी येते, रितू तिच्या आईला चहा करून देते तर तर चहामध्ये साखर नसते आणि पालक ची भाजी बनवते तर पालकच्या भाजी मध्ये मीठ नसते. वरून रितुची धमकी ते पण किचनमध्ये बोलवून.

बायको आहे शेवटी काय करणार, ऐकावं तर लागनारच.☹️

_________________________________________

आता त्यापुढे......😁

मामी : बाई तू माझ्या जावायला असच खाऊ घालत असेल..... " असे मामी दुसऱ्यांदा बोलते "
मी काही बोलेल म्हणून या आधीच रितू माझ्याकडे डोळे फाढून बघते आणि मला गप्प करते.

बाबा काय कराव. तिच्या नजरेकडे नजरच नाही टिकली माझी, शेवटी काय करणार मान खाली घालावी लागली. असो बायको आहे.☹️

"हो ना मामी, बघा ना; ही असंच करते" हे वाक्य दुसऱ्यांदा बोलून दाखवाच होत परंतू पुन्हा मला धमकी नकोशी वाटत होती म्हणून गप्पच राहिलो बाबा...☹️

तुम्हाला काय सांगू....
बायकोच सगळं काही ऐकून घेण्यात इतकी मज्जा आहे ना..😊 तुम्ही जाऊच द्या... 😜
"जो बायकोच ऐकेल त्या घरात आनंदच आनंद"
😜😜 हे खरं आहे का..?

"लग्न झालेल्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा"😆😆
***
मामीच जेवण वगैरे आटोपून , रितू आणि तिची आई गप्पा मारत बसतात.

आई : अगं...! रितु, मामाच्या मुलाचं साखरपुडा आहे पुढच्या महिन्यात, त्याचं पक्क झालं, मुलगी पण छान भेटली.. पण तुझे मामा आजारी आहे ना त्यासाठी लग्न थोडं लेट करत आहे..

रितु : आई मामाला काय झालं ग...!!!
तब्येत तर ठीक आहे ना..? आणि मला सांगितलं पण नाही तू.! आता मामांना बघूनच यावे लागेल..
****

रितू आवाज देत......
अहो ऐकताय काय..! माझ्या मामाची तब्येत ठीक नाहीये. चला आपण बघून येउ त्यांना संध्याकाळी आणि जाता जाता आईला पण सोडून देऊ घरी.

"मी नाक मुरडत तच" अग हो रे रितु ठीक आहे जाऊ आपण.... 😕

मस्तपैकी संध्याकाळी निघायची वेळ होते, तयारी वगैरे करून रितु माझ्या सासूबाई आणि मि निघतो.

शेवटी मामाकडे येऊन पोहोचतो. मामाची तब्येत बरी नाही म्हणून रितु नारळपाणी देत मामाला म्हणते "तब्येतीची काळजी घेत जावा मामा" काय ते काम काम काम रोज रोज... थोडा आराम पण करत जा, धाव धावच करतोस नेहमी.

मामा : हो ग माझी रितूड्या, घेईल मी काळजी.
आणि का ग....! तुला माहिती आहे का..? प्रियंकाला मुलगा झाला... आज सकाळीच ऐकून छानच वाटलं..😊😊

रितु: अरे... मामा काय सांगतोय..! प्रियंकाला मुलगा झाला. खूपच छान झालं आता मी उद्या तिला बघायला जाईल. छोटसं शोनू, बाबू , गोंडू कसा सुंदर पिल्लू किती छान असेल ना मामा...

तर....!!

आज मामाकडे,

उद्या प्रियंका कडे,

दोन-चार दिवसात. मावशी चा कॉल, अग रितु साखरपुडा आहे राणीचा ‌.... ये बरं जावईबापूंना घेऊन...

लगेच एक दोन दिवसात.. अमक्याच लग्न,

अजून दोन-चार दिवसात, गुड्डी चा वाढदिवस,

लगेच.. रितु च्या भाऊला पाहुणे बघायला येतात, चाललो तिथं..

लगेच आजी ची तब्येत खराब होते. आजी आठवण करते माझ्या रितुला मला एकदा बघायचं शेवटचं, तर चाललो आजीला बघायला.

या फिरण्या फिरण्या मध्ये महिन्यातले बरेच दिवस कामावर सुट्ट्या पडतात आणि येते पेमेंट कमी, पेमेंट कमी आले की तंगी चालू काय कराव कळतच नाही.
शेवटी बायको आहे तिच्या नातेवाइकाडे जाव म्हणजे जावच लागते.

""काय लग्न झालेली मंडळी बरोबर ना"""..😜😜

आणि जायचं नाही म्हटलं कुठे तिच्या नातेवाईकांमध्ये तर तिच्या नाकावर मोठा राग..
लगेच तीच बोलण..
माझे नातेवाईक टुचता तुम्हाला, तुम्ही कसे घेऊन जाणार मला...! तुमचे थोडी न रक्ताचे नाते आहेत ते,
ते सर्व माझे रक्ताचे नाते म्हणून मला ओढ लागते तुम्हाला त्याचं काय फरक पडेल..! असं बोलून बसते गुपचूप कोपऱ्या मध्ये जाऊन, ते सुद्धा रुसून.😜😜





क्रमश...

(शब्द बिंधास्त..mk)
किरण सुरेश मगरे
जळगाव