नकळत सारे घडले (भाग ३) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नकळत सारे घडले (भाग ३)





अजय संध्याकाळी घरी येतो, फ्रेश होतो आई त्याच्या हातात चहाचा कप देते..अजयचा चहा पिऊन झाल्यावर अजय अश्विनी कडे जाणार असतो.. तो बाहेर पडणारच की तेवढ्यात ...

"अजय ,थांब मला बोलायचं आहे तुझ्याशी"आई..

"हो बोल न आई"अजय...

" आज तुझं कपाट आवरलं मी" आई

"अच्छा ,मग" अजय

" मग काय अजय, मला तुझे आणि अश्विनी चे पत्र,ग्रीटिंग मिळाले..काय सुरू आहे हे तुमच,इतके दिवस झाले आणि आम्हाला याचा जराही थांगपत्ता लागु नाही दिला तुम्ही ,विश्वासघात केला आहेस तू, याचे काय परिणाम होणार आहे याची कल्पना तरी आहे का तुला" आई..

"आई माफ कर ग,मी नाही विश्वासघात केलाय तुझा,आमचं खरं प्रेम आहे एकमेकांवर ,ही गोष्ट यासाठी नाही सांगितली कारण अजून अश्विनी च शिक्षण पूर्ण व्हायचं आहे,मला अजून चांगल्या पगाराची नोकरी नाही आहे,एकदा सगळी घडी नीट बसल्यावर आम्ही सगळं सांगणार होतो, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर" अजय ...

" अजय तुला कळतंय का ,अरे अश्विनीच्या घरी माहिती झाल्यावर काय होणार आहे ते,तिचे आई वडील अजिबात मान्य करणार नाही तुमचं नातं" आई..

"अग, पण का नाही मान्य करणार ,काय वाईट आहे माझ्यात, फक्त आर्थिक परिस्थिती मुळे आपण त्यांच्या पेक्षा कमी आहे...पण ..आई मेहनत करतोय न आणि मला लवकरच यश मिळेल विश्वास आहे माझा, आणि आई तू सांग तुला हे नातं मान्य नाही का? तूच तर म्हणतेस न की अश्विनी खूप चांगली मुलगी जिथे जाईल ते घर नशीबवान असेल, मग आता अशी का चिडते आहे" अजय ..

"कसं समजावू आता तुला ,एक वेळेस मी अन तुझे बाबा तुमच्या लग्नाला परवानगी देऊन देऊ,पण अश्विनी चे आई वडील नाही देणार,त्यांना त्यांचाच तोलामोलाचा मुलगा हवा आहे अश्विनी साठी, त्यात ते प्रतिष्ठित व्यक्ती आहे गावातले त्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा ते येऊ देणार नाही,त्या करिता ते कोणत्याही थराला जातील, उगाच विषाची परीक्षा घेऊ नको ,तुला काही झालं त आम्ही काय करायचं ,म्हणून म्हणते की अश्विनी चा नाद सोड, विसरून जा तिला' आई..

" अग पण आई तू असा का विचार करते आहे,देतील तिचे बाबा परवानगी ,मी स्वतः ल तितकं लायक बनवेल ,पण तू तरी हो म्हण ,तू तरी स्वीकार कर आमच्या नात्याचा,तुझा आधार असेल तर मला सगळं सोप्प जाईल आई,तुझी गरज आहे मला" अजय...

"बाळा,मी तर आहेच तुझ्यासोबत ,पण .."

" पण काय आई" अजय

" भीती वाटते रे अजू ,उगाच भलतंच काही होऊन बसायचं,तिच्या आई वडिलांचे खूप उपकार आहेत आपल्या वर,अडत्या वेळी मदत करतात नेहमी,डोळे झाकून विश्वास करतात तुझ्यावर आणि हे सगळं माहिती झाल्यावर काय वाटेल त्यांना, दोन घराच मैत्रीच नातं नको संपायला,त्यात अश्विनी च्या बाबांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे, उगाच त्यांच्या तब्बेतीवर याचा परिणाम नको व्हायला..तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे हे सगळं.." आई

"आम्ही काही गुन्हा किंवा पाप नाही केलय आई,ज्याची शिक्षा आम्हाला तुम्ही देणारं आहात"अजय...

"अजय तुझ्या बहिणींचा विचार कर,तू जर अस केलंस तर तुझ्या बहिणींसोबत कोण लग्न करेल,घरची अब्रू जाईल, माझ्या मागे कमी टेन्शन आहेत का की तू ही भर टाकतो आहे,घरासाठी काढलेल्या कर्जाचे हफ्ते देणं होत नाही आहे, तुझ्या बाबांच्या आजारपणात होता नव्हता सगळा पैसा गेला,तुझं शिक्षण झालं,आता या दोघींच्या शिक्षणासाठी पैसे लागत आहे,पुढच्या वर्षी स्वाती च लग्न करायचं आहे कुठून आणू मी पैसे, कर्जाचे हप्ते फेडले नाही तर जप्ती येईल घरावर" आई

" आई मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय, फेडू आपण कर्ज घराचे ,स्वाती ,नीता च लग्न ही होईल नको काळजी करु, आई तुला आमचं नातं मान्य आहे की ते तरी सांग"अजय

"मला त अश्विनी आवडते रे ,पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता नको वाटतं हे"आई

" तुला मान्य आहे न बस तर मग ,बाकी गोष्टी आता माझ्यावर सोड तू" अजय

" अजू, मला हे सगळं रेखाताई च्या कानावर घालावं लागेल ,त्यांना इकडून तिकडून माहिती झाल्यापेक्षा मी त्यांना सांगून देते" अजय

"नको आई प्लिज तिच्या आईला आत्ता च काही नको सांगू,त्या तुझ्यासारख समजून घेतिल की नाही माहीत नाही, सगळ नीट होऊ दे मग सांग" अजय

" पण त्यांचा विश्वास तोडल्या सारख होईल, ते काय म्हणतील तुम्हाला सगळं माहिती असून ही आमच्या पासून लपवून ठेवलं" आई

"काकू.." अश्विनी

" आशु ,तू" अजय

" हो अजय ,मी सगळं ऐकलंय, काकू आम्हाला माफ करा हे सगळं आम्ही तुमच्या पासून लपवून ठेवलं ,पण अजयने जे काही सांगितलं ते खरं आहे,आम्ही मुद्दाम नाही केलं आहे, काकू तुम्हाला एक विनंती करते माझ्या आईला सद्या यातलं काही नका सांगू ,ती तुमच्या सारखं नाही समजून घेणार , प्लिज " अश्विनी सीमाताई समोर हात जोडून उभी राहते तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात... तिला असं पाहून सीमाताईंचं मन कळवळते त्या तिच्या जवळ जातात...

" वेडी आहेस का अश्विनी असे काय जोडतेस, रडू नको बाळा ,नाही सांगणार मी कोणाला शांत हो ,पण तुम्ही एक वचन द्या मला कोणालाही दुखावून तुम्ही काही करणार नाही आणि लवकरात लवकर तुझ्या घरी सांगाल" आई...

"हो ,काकू तुम्ही जे सांगाल ते ऐकू आम्ही" अश्विनी

सीमाताई अजय आणि अश्विनी ला प्रेमाने जवळ घेते,हे बघून अजयच्या वडिलांना आणि स्वाती ,नीता ला आनंद होतो... ही गोष्ट घडून काही दिवस होतात , अजय चांगल्या नोकरीच्या शोधात असतो त्याकरिता तो खूप मेहनत घेत असतो त्याचे मित्र त्याला मदत करीत असतात पण यश काही मिळत नसते..एकीकडे घर कर्ज वाढत असते..दिवसेंदिवस काळजी वाढत असते, त्याच्या घरच्यांचा आणि अश्विनी चा तो काय आधार त्याला असतो..अजयच्या यशासाठी अश्विनी देवाकडे प्रार्थना करीत राहते..आणि एके ठिकाणी अजयला पाहिले पेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळते,ही आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी तो अश्विनीला कॉल करतो...

"हॅलो आशु,एक आनंदाची बातमी आहे ,मला ही नोकरी मिळाली आहे, उद्या पासून जॉईन व्हायचं आहे"अजय..

" ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे,अभिनंदन अजू" अश्विनी

" थँक्स डिअर, बघ आता सगळं नीट होणार आणि मी लवकरच तुझ्या घरच्यांना आपल्या बद्दल सांगणार" अजय...

" हो मी त्या दिवसाची वाट पाहिलं,पण अजू तुला लवकरात लवकर आपल्या लग्नाविषयी बोलावं लागेल,कारण की घरी माझ्या लग्नाबद्दल सारखी चर्चा होत असते,आणि काकू म्हंटल्या त्याप्रमाणे जर कुठून बाहेरून कळलं न आपल्या बद्दल तर फार वाईट होईल म्हणून म्हणते आहे की तू बोल .....आ आ आई तू, कधी आलीस" घाबरून अश्विनी फोन कट करते.. इकडे अजय काळजीत पडतो नक्कीच तिच्या आईने ऐकले असा अंदाज लावतो आणि घरी यायला निघतो.. रेखाताई खूप रागारागाने अश्विनी जवळ येतात तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतात, कॉल लिस्ट मध्ये नाव बघतात तर ते अजयच ...त्याचे नाव बघून खूप धक्का बसतो ...

"अजय सोबत कोणाच्या लग्नाविषयी बोलत होती " खूप रागाने तिची आई बोलते

" नाही कोणा बद्दल नाही,ते आम्ही आमच्या मैत्रीण बद्दल बोलत होतो" अश्विनी घाबरत उत्तर देते..

"अश्विनी मुस्काट फोडेल आता ,मी ऐकलं आहे सगळं पण तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे,खरं खरं सांग " खूप चिडून रेखाताई बोलतात ... आता अश्विनी ला खरं सांगण्यापासून पर्याय नसतो..

"आई माझं आणि अजय च एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे" अश्विनी ही गोष्ट खुप आत्मविश्वासाने सांगते.. हे ऐकून तिची आई सुन्न होते..

क्रमशः......