सोनचाफ्याची फुले Kadambari द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सोनचाफ्याची फुले

आज ऑफिस मधून जरा लवकरच सुट्टी झाली.... म्हणून विचार केला कि बरेच दिवस झाले तालावपाली ला काही गेलोच नाही..... ऑफिस चे काम चं एवढे असायचे कि वेळच मिळत नव्हता. आज वेळ आहे तर जावं. मस्त संध्याकाळची वेळ होती त्यामुळे थोडा अंधार पडलेला...... सगळीकडे दिव्याची रोषणाई....... आणी हलका वारा सुटलेला..... किती मस्त वाटत होतं... मी एका बाकावर जाऊन बसलो.... तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारच्या बाकावर बसलेल्या त्या दोन मुलींकडे गेलं.... एक म्हातारी बाई त्या मुलींना सोनचाफ्याचा गजरा घ्या म्हणून विनवणी करत होती.... त्या मुली..... " अहो आज्जी आजकाल कोण माळत नाही हे गजरे... वगरे.... आणी जीन्स वर कोण लावतं गजरा..... शी..... " असे बोलून टाळत होत्या.
मला जरा वाईट वाटले.... मी विचार केला आपणच विकत घ्यावा गजरा... घरी गेल्यावर आईला देऊ.., नाहीतर देवीच्या मंदिरात चढवू.... म्हणून मी आजींना हाक मारली,
ओ आज्जी.... मला 2 गजरे द्या.. मी गजरे विकत घेतले आणी त्या गजाऱ्याकडे पाहत होतो तेवढ्यात मला कोणी आठवलं......
"श्यामल "..........
हो... श्यामल.......
मग मी नकळतच माझ्या शालेय जीवनात जाऊन पोहचलो....
इयत्ता 10वी..... च्या वर्गात होतो मी.... आणी श्यामल इयत्ता 9वी... च्या वर्गात तिला मी पाहिल्यांदा शिक्षक दिनाच्या दिवशी पाहिलं.
माझा आवडता विषय म्हणजे गणित.... त्यामुळे मी गणिताचा शिक्षक बनलेलो.... आणी माझा तास इयत्ता 9वी च्या वर्गात लागला....
पहिलाच तास असल्यामुळे हजेरी घेण्याचे काम हीं माझ्याकडेच होते.....
नावाप्रमांणे हजेरी चालू होती..... मी एकामागोमाग एक असे नाव घेऊन हजेरी लावत होतो,
तेवढ्यात एक नाव वाचले.......
"श्यामल रघुवीर परब "
नाव वाचून मला थोडे हसू आले... एवढे जुने नाव कोण ठेवते.... म्हणून मी माझी मान वर केली
समोर एक मुलगी हाताची घडी घालून उभी होती....... मी तिचे नाव घेताच ती हजर!!! म्हणून बाकावर बसली...
पण मी तिलाच बघत होतो...... गौरवर्नाची..... बोलके डोळे....... दाट भुवया..... आणी त्या भुव्यांच्या मधोमध लाल रंगाचा गंध...... चेहऱ्यावर हुशारीचे ते तेज.... कानात सोन्याच्या रिंगा..... आणी ते निरागस स्मित हास्य लांबसडक केसांच्या दोन वेण्या..... आणी लाल रंगाची रेबीन ने बांधलेले रेबिंचेच फुले..... आणी त्यातल्या एका वेणीला माळलेला तो चाफ्याच्या फुलांचा गजरा.....किती सुंदर आहे ही....... असा विचार करत असतानाच
ओ गुरुजी....... माझी हजेरी राहिलीये अजून....... असे ओरडत एक मुलगा उभा राहिला.... मी थोडा घाबरलोच..... शिक्षक असलो तरी फक्त त्या दिवसाकरिता... नंतर उगाच कोणी नाव मोठ्या प्राध्यापक ना सांगितले तर माझे काही खरे नाही......मी म्हटले अरे ते नाव नीट कळत नव्हते...
त्या दिवसापासून श्यामल चा चेहरा माझ्या मनात जणू घर करून गेला.
मी रोज शाळा सुटल्यावर तिच्या मागे मागे जाऊ लागलो... पण तिच्या नकळत.... माझा नित्यक्रम चं झाले होते तिच्या मागे जाणे..... श्यामल खुप शांत होती..... म्हणजे इतर मुलींप्रमाणे कधी बडबड नाही.... जोरजोरात हसणे नाही.... अगदीच मोजके बोलणे.... ते पण हळू.... म्हणूनच कि काय.... तिला एकच मैत्रीण होती.... असे वाटते
कारण रोज शाळेत जाताना आणी येताना एकच मुलीसोबत असायची..... कदाचित तिची जिवलग मैत्रीण असावी...
मी रोज तिच्याशी बोलू असा विचार करायचो... पण कधी बोललोच नाही.... हिम्मतच झाली नाही ..... दिवसांमागून दिवस जातं होते..... तशी श्यामल मला अजूनच आवडू लागली....... आज आमचे सेंड ऑफ होते.....
मनाशी पक्का विचार केला कि आज काहीही झाले तरी तिच्याशी बोलायचे....
कारण परीक्षा झाल्यावर पुन्हा कधी बोलणे काय कधी दिसेल हे पण माहित नाही...
आमचा सेंड ऑफ चा कार्यक्रम कधी होतो असे झालेले....
पण सगळे मित्र भेटत होते..... आता पुढे कोण कोणत्या कॉलेज ला जाणार.... कुठे असणार ह्या विषयावर सगळे बोलत होते....... माझ्या डोक्यात मात्र फक्त श्यामल होती....
कसे तरी मित्रांना टाळून मी वर्गातून बाहेर पडलो.... आणी खुप हिम्मत करून श्यामल जवळ जाऊन बोलणार तोच मागून आवाज आला..... श्यामल..... मी पण आवाजाच्या दिशेने पहिले.... तिचे बाबा आले होते.....
मी पुरता घाबरलो......मला वाटले मी रोज श्यामल च्या मागे जातो..... हे कदाचित तिने तिच्या बाबांना सांगितले असणार...... देवा!!! वाचव मला..... माझे पाय लटलट कापत होते...... तिचे बाबा जसे जवळ येत होते तसें माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते...... तिचे बाबा...... "अग श्यामल शाळा सोडल्याचा दाखला घेतलास का गुरुजींकडून... चल लवकर गाडी उभी आहे घराजवळ आपल्याला जायला उशीर होतोय.......श्यामल.."हो बाबा.... मी निघतच होते... चला......"
मला तर काहीच कळले नाही......2 मिनिटासाठी मी एकदम सुन्न पडलो....... ही शाळा सोडून जातेय......?????
नाही...... प्लिज थांब... ना..... मला बोलू तरी दिले असते....... असे स्वतःशी बोलत असतानाच श्यामल तिच्या मैत्रिणीला बाय बोलून..... गेली सुद्धा........
मी त्या बाकावर डोळे बंद करून डोके टेकवून माझ्या भूतकाळात श्यामल च्या आठवणीत रमलेलो असताना........ अचानक माझ्या कानी... लता मंगेशकर यांनी गायलेलं " चाफा बोलेना..... चाफा चालेना..... चाफा खंत करी काही केल्या फुलेना...... " ह्या गाण्याच्या ओळी माझ्या कानी...पडल्या आणी मी पुन्हा वर्तमानातं आलो......
स्वतःशीच हसत "खरंच..... माझा चाफा कधी माझ्याशी.... बोलला नाही...... आणी माझ्या पण नं बोलण्याने आमचे प्रेम कधी फुललेच नाही....."त्यामुळे माझ्या मनातली "ती " खंत कधीच जाणार नाही.....
त्यानंतर श्यामल मला कधी दिसलीच नाही....
कधीच नाही....... आणी आमच्या अबोल प्रेमाचा चाफा कधी फुलालाच नाही.