अश्रुतपूर्व - 2 Supriya Joshi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

अश्रुतपूर्व - 2

घरीच खूप मोठा दिवाणखाना असल्याने तिथेच सगळ्यांचे साखरपुडा व बारसे झाले होते अर्थात माझे बारसेपण तिथेच होणार होते.  आता बारशाच्या दिवशी काय नाव ठेवायचे हे ठरवल्यानंतर जेवणाचा बेत, अजून कुठली तयारी करायची, कोण काय काम करणार  हे सगळे ठरवणे सुरु झाले होते. आपापल्या कामाची प्रत्येकाने यादी करून जेवण करून सगळे घरी परतले.

 

घरी माझ्या पिढीत शेवटचेच बारसे असल्याने जोरदार तयारी केली होती. जवळपास २००-२५० जण  बारश्यासाठी आले होते. सगळीकडे उत्साह पसरला होता. मला काकू व मावशीने खूप छान तयार केले होते. नीलूआत्या माझे नाव ठेवणार होती. एक नाव ठरलेले असल्याने बाकीची ४ नावे आईने सुचवली होती तेव्हा तिने आईला,”तू तीन नावं सांग ग. एक नावं मी माझ्या आवडीचे ठेवणार” म्हणून सांगितल्यावर मग आईने स्वरा आणि प्रणाली ही दोन नावं मला आवडली आहेत आणि  पत्रिकेप्रमाणे हिचे 'हे' अक्षर आले आहे तेव्हा कुठले नावं ठेवायचे ह्याचा अजून मी  विचार केला नाहीये.  तेव्हा  आत्याने लगेच  सांगितले अग मी हिचे नावं हेमालीच ठेवणार होते. आज्जी लगेच म्हणाली मग पत्रिकेत हेमाली ठेवू. तेव्हा आईला तिसरे नावं सुचवायला सांगितले. आईने मग तिसरे नावं मृण्मयी म्हणून सांगितले.

 

बाकीची सगळी सोपस्कर होऊन आत्या नाव ठेवायला म्हणून माझ्या कानाजवळ झुकली तेव्हा बाबांनी सांगितले माझ्या परीचे तुम्ही काहीही नाव ठेवा पण मी तिला 'मानसी' म्हणूनच हाक मारणार. आत्याने परत एक एक नाव सांग म्हणून सांगितले तेव्हा आईने हेमाली, स्वरा, प्रणाली, सई आणि मानसी अशी नावे सांगितली.  सगळ्यांनी आत्याला इतक्या  गुद्द्या मारल्या की तिला सरळ होतानापण खूप त्रास झाला. सगळ्या काकू व आत्याने एक. सगळ्या मावश्यांनी व मामींनी एक, दोन आज्जींनी मिळून एक असे तीन पाळणे गायले. आणि उरलेली २ तिथे जमलेल्या बाकीच्या नातेवाईक व मैत्रिणींनी गायले. बाबांनी 'मानसी' हे नाव लिहून सगळ्यांना द्यायला छोटे छोटे बॉक्स तयार करून त्यात बर्फी घातली होती. त्यावेळी बाबांनी मागे लागून ही जबाबदारी स्वतःवर का घेतली हे सगळ्यांना आत्ता समजले. जेवणाचा बेत पण छान केला होता. मुलगी झाली म्हणून जिलेबी आणि बाकीचा सगळा महाराष्ट्रीयन स्वयंपाक केला होता. सगळेचजण आम्ही केलेले आदरातिथ्य आणि आमच्यातली एकी बघून खुश होऊन आशीर्वाद देऊन घरी परत गेले.

 

थोडे दिवस सगळेजण मला ‘सई’ व बाबा ‘मानसी’ म्हणून हाक मारायचे पण सगळ्यांना मानसी हेच नाव जास्त आवडू लागल्याने सगळ्यांनी मला मानसी म्हणून हाक मारायला कधी सुरुवात केली हे त्यांनापण कळले नाही. आणि माझे एकच नाव झाले. 

 

सगळ्यांचे शेंडेफळ असल्याने मी भरपूर लाडावले होते. आईबाबा रोज  सकाळी मला आज्जीकडे सोडून तन्मयला शाळेत सोडून ऑफिसला जायचे. मला व तन्मयला सांभाळण्यासाठी आणि घरातली थोडीफार कामे करण्यासाठी लताताई रोज यायची पण ती थोडी उशिरा येत असल्याने तोपर्यंत माझा मुक्काम आज्जीकडे असायचा. बऱ्याचदा लताताई आली तरीही आज्जी तिला बाकीची कामे उरकून मग घेऊन जा म्हणून सांगून तोपर्यंत आज्जीआजोबा आणि पणजोबा माझी काळजी घायचे. नंतरसुद्धा बरेचदा काकू, ताई किंवा दादा ह्यापैकी कोणीतरी एक मला घेऊनच जायचे. मी सगळ्या घरभर हिंडायचे. अगदी जेवायलासुद्धा मी रोज कुठल्यातरी काकूबरोबर असायची. सगळ्यांची मुलं मोठी झाल्याने मी अगदी ७-८ वर्षाची होईपर्यंत सगळेजण अगदी लाडाने भरवायचे. मला जे आवडायचे नाही तेपण अजिबात वाढायचे नाहीत मग रात्रीपण मी स्वतःच्या हाताने जेवायची नाही, नावडता पदार्थ केला की खायला रडायची तेव्हा मग आई ओरडायची आणि सगळे खाल्लेच पाहिजे म्हणून अजून वाढायची. तेव्हा आईचा खूप राग यायचा, बाकी सगळेजण चांगले आहेत आणि आपली आईच खूप वाईट आहे असा समज करून घेतला होता मी. हळूहळू आजीच्या हे लक्षात आल्यावर मात्र तिने सगळ्यांना दटावलेच आणि निक्षून सांगितले की मानसीला कोणीही झाडावर चढवायचे नाहीये. जे तुम्ही घरी केले आहे ते तिने खाल्लेच पाहिजे. अतिलाडावून ठेवून तुम्ही सगळे तिचे नुकसान करत आहात. त्याचा सगळ्यात जास्त त्रास तिच्या आईला होत आहे. सईला तिच्या मनाप्रमाणे वाढवता येत नाहीये. हे ऐकून मात्र सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम असल्याने त्यांचे वागणे सुधारले. मी चुकले की मला सांगायला आणि ओरडायला सुरुवात केली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांचे डोळे उघडल्याने आणि मी बिघडू नये म्हणून सगळ्यांना आता माझ्या चुका दिसून त्यांनी ओरडायला आणि चुका दाखवायला सुरुवात केल्यामुळे तर मी खूपच बिथरले. त्यामुळे मी सुधारण्याच्या ऐवजी उद्धट झाले होते.                                                                                                                                                                                                                                                                                 

क्रमशः