प्रेम एक तमाशा - 1 Amol patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम एक तमाशा - 1

या रात्री नांदगावत उत्कृष्ट असा तमाशा मंडळ आला होता . सर्व गावकरी मंडळी तमाशा बघण्यास मंदिरा कडे जाण्यास निघाले .
विशाल व त्याचे मित्र पण तमाशा बघण्यास जाण्यास निघाले . वाटेत ते चर्चा करू लागले की आपण सर्व जण पुढे अजून बसू व जबरस्तद राडा करू असे ते एकमेकाला सांगू लागले . विशाल बोला की यार अस काही मला आवडत नाही .
सर्व मित्र बोले काय यार विशाल तू प्रत्येक वेळस अस करतो भाई . तू नको करू मस्ती तू आमच्या सोबत तर बस .
विशाल ठीक आहे .
तमाशा चालू होतो गण ची सुरुवात होते (गण म्हणजे गणपतीला केले वंदन ) गण संपला हिंदी मराठी गाण्यांची सुरुवात होते मग आले त्याचा वाद विवाद चालु होतो.
मंचावर होणारे शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण होते रंगबाजी. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमासगीर असतील तर त्या रंगबाजीला संगीतबारी करता .
लावणी करायला येते सर्वात सुंदर , रूप तिचे नशत्रवणी अशी तिला पाहून कोणी ही तिच्या प्रेमात पडले . मंचा मागून तिचं नाव घेतो काजल बोलताच लोक उठून उभे राहतात तिला पाहण्यासाठी,
विशाल , ज्याला इंटरेस्ट नसतो . असा मुलगा सुध्दा तिला पाहतच राहतो .आणि त्यांची डोळ्यांची पापणी झुकली नाही .
तमाशा बंद होतो सर्व गावकरी घरी जाता .पण विशाल मात्र तिची एक झलक पाहण्यासाठी इथे उभा असतो . पहाटे चे सहा वाजता तेव्हा ती बाहेर निघते तेव्हा तिला पाहतो तर मेकअप नसताना सुद्धा सुंदर दिसतं होती विशाल तिच्या कडे एक टक लावुन तिला बघत होता. अचानक तिची नजर त्याचा कडे गेली . मग विशाल घरी जातो .
विशाल चे कुठेच मन लागत नाही होते .विशालचे मन काजल कडे अकर्शित गेले होते . विशाल तिच्या प्रेमात इतका वेळा झाला होता की तिचा कुठे पण तमाशा असो तो बघण्यासाठी जात होता ते पण एकटा तेचे जिवलग मित्रा पण सोबत घेत नसे .विशाल तमाशा बघायला जातो हे कोणाला पण माहिती नाही होते . काजलचा कोणता तमाशा सोडला नाही विशाल
पूर्ण पणे तिच्या प्रेमात मंद झालं होता
काजल ला कळलं मग काजल विशालला स्टेट वरून इशारा करते व त्याला आत येण्यास सांगते . विशाल आता जातो .
काजल - काय नाव तुमचे ,
विशाल बोलतो माझे नाव विशाल आहे
काजल तुम्ही माझ्या मागे का फिरत आहेत मी खूप वेळा मागितले की माझा जिथे तमाशा असतो तुम्ही तिथे असतात व माझ्या वर खूप पैसे फेकता ,
विशाल हो खरं आहे सर्व ,कारण मला तुम्ही खूप आवडतात आणि मी नांदगावत राहतो .
काजल हो! आमचा तिथे एक महिन्या पूर्वी तमाशा झालं होता.
विशाल हो बरोबर मी जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हा पासून मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला आठवण करत असतो .तुम्ही ची एक झलक पाहण्यासाठी साठी मी इतकं दूर येतो.
काजल कसं विशाल राव तुमच्या सारखे खूप जण मला रोज अस बोलता . प्रेम करता आणि पैसे लालच पण देता पण लोकांना वाटत की आम्ही जसं वेश्यां आहोत पण ,
विशाल नाही तुम्हाला माझ्या बदल गैरसमज झाला आहे मी तसा मुलगा नाही तसा नाही आहे मी खरचं प्रेम करतो काजल जी आणि मी तुम्हाला एक तमशागिरणी नाही तर कलाकार म्हणून बघतो .
काजल हो खरं आहे सर्व जण असं बोलता , आणि हो विशाल राव तुम्हाला माझ्या वर प्रेम आहे का माझ्या रुपावर
विशाल तुमच्या मनावर प्रेम आहे .काजल
विशाल राव आमचा नाद करू नका आम्ही शेवटी तमाशगिरणी
आहोत आज इथे तर उद्या तिथे, आमचं जगणं पण तमाशा मरण पण तमाशा आमचं सुखं दुखं तमाशा असतो.
मी तुम्हाला भेटणार नाही व तुम्ही मला ,कारण हा समजा माझ्या पेक्षा तुम्हाला शिव्या दिलं मी तर एक तमाशा वाली आहे. पण विशाल राव तुम्ही एक इज्जत दार आहात .
तुमचा आणि आमचा एक जीव एक दिलं नाही हू शकतं
आणि माझा नाद करून कशाला आयुष्य खराब करतायत.
जा घरी आणि आपल्या कामाला लागा जीवन सुखात जागा
आणि माझे वेळ लावून स्वतःला बरबाद करु नका .
माझी सुंदरता आज आहे तर उद्या नाही .
विशाल घरी जातो , आणि सर्व त्याच्या मित्रांना सगातो मन मोकळं करतो . आणि त्याला कळत की प्रेम हे मनाच्या सुंदरता वर केलं जातं , की शरीराच्या सुंदरता वर नाही .
लेखक -- अमोल पाटील.