अद्भुत मूर्ती - भाग 1 Hrushikesh Gaikwad द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अद्भुत मूर्ती - भाग 1

ईशान आपल्या मित्रांबरोबर एका सरोवरावर पर्यटन करायला गेला होता. आज ईशान प्रचंड खुश होता. नुकतेच बी. टेक फूड टेक्नोलॉजी चे शेवटच्या वर्षाचे पेपर संपले होते. पेपरच्या दिवसात दिवस रात्र अभ्यास करून खूप थकवा आला होता. त्यामुळे ईशानने पर्यटन करायचे ठरवले होते.
ट्रिप चा प्लॅन तीन महिने अगोदरच ठरला होता. प्लॅन नुसार सोनगिरी गावातील सरोवरावर एक दिवस खूप धमाल करायची आणि मुक्काम ही करायचा. त्यासाठी त्याच्या सहा मित्रांनी पैसे गोळा केले होते. भरपूर पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी ते पैसे ईशान कडे दिले. नुकतीच प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झालेली होती. तरी ईशान आणि त्याचेे मित्र यांनी अभ्यास करून रात्री एक भयानक चित्रपट पाहिला होता. ईशान आणि त्याचे मित्र यांची कॉलेजमध्ये खूप प्रसिद्धी होती.
ईशान, अरुण, दीपक, सोमा, मुकेश, उमेश आणि शुभम यांची गट्टी म्हणजे समुद्राचे जसे किनाऱ्याशी नाते असते, तसे घट्ट
नाते होते. आता पर्यटन करायला ईशान आणि त्याचे मित्र सरोवरावर जमले होते. सकाळचे 10 वाजले होते. किनाऱ्यावर एका पाळण्यामध्ये सर्वांनी एन्जॉय केले. पण मुकेश ला चक्कर येऊ लागले. त्यामुळे सर्वांनी तेथून उतरण्याचा निर्णय घेतला.जवळच एका हॉस्पिटल मध्ये मुकेशला इलाजासाठी नेले. सुदैवाने मुकेश लवकर बरा झाला. हॉस्पिटल मध्ये खूप वेळ गेला होता.
आता संध्याकाळ सुरु झाली होती. संध्याकाळ अशी एक नैसर्गिक घटना असते, जेथे मानवी मन प्रफुल्लित होते. लाल सूर्य आकाशात जमिनीला टेकत होता. त्याचे प्रतिबिंब पाण्यामध्ये उमटले होते. जणू लाल चाफा पाण्याने भिजून गेला आहे असे ते पाण्यातील दृश्य दिसत होते. संध्याकाळ ची गार हवा आल्हाद दायक वाटत होती. गावामध्ये संध्याकाळी हे दृश्य कायमचे असते. पण उमेश हा मूळचा शहरात राहत असल्यामुळे त्याने तो क्षण टिपण्यासाठी कॅमेरा हाती घेतला. संध्याकाळी करकोचे, कावळे यांचे थवे च्या थवे सूर्यासमोरून जात होते. पक्ष्यांचा थवा एक माळच माळ बनवत होता.
आता 8 वाजत आले होते. आकाश निळ्याचे काळे बनत होते. चंद्र नुकताच उगवत होता. क्षितिजावर असल्यामुळे पिवळसर रंगात तो न्हाऊन निघाला होता. तेवढ्यात गाईड ने सरोवर सोडण्याचा लोकांना आदेश दिला.ईशान आणि त्याचे मित्र यांना ऍडव्हेंचर ची भारी हौस. ते सरोवराशेजारीच असलेल्या एका पडक्या घरात गेले. सरोवरापासून वसाहत जवळजवळ 6 किलोमीटर दूर होती.
पडक्या घरात सगळ्या वस्तू होत्या. कपाट,पलंग, फॅन, कपडे, फुलदाणी तसेच टीव्ही, फ्रिज पण बंद. कित्येक दिवसांपासून त्या घरात वीज नव्हती . घर दोनमजली होते.टॉर्चच्या उजेडात त्या सर्वांनी घरात प्रवेश केला. पण एक आश्चर्य कारक गोष्ट त्यांच्या लक्षात आली ती म्हणजे घर कोणीतरी झाडलेले दिसत होते. आता मात्र ह्या गोष्टीने सगळेजण भांबावले. कारण येथे येण्याअगोदर ईशान आणि त्याच्या मित्रांनी सरोवरावरील पानठेल्या वाल्याला या घराविषयी विचारले होते. त्याने जुन्या पडक्या घरांविषयी बाकीचे लोक जे सांगतात ते सांगितले.
पानठेला वाला म्हणाला कि, "मित्रांनो, साधारणतः 6 वर्षांपूर्वी या घरामध्ये एक बागायत दार राहत होता. त्याचे बाकीचे कुटुंब दुसऱ्या गावात राहत होते.पण कोणाचाही त्रास नसल्याने त्याने या जागेवर राहायचे ठरवले होते. बाकीचे कुटुंब येथे येत नव्हते. तो बागायतदार वृद्ध असल्यामुळे काठीने चढत उतरत असे.बरोबर एक नोकर होता. त्या नोकराने एकदा त्या वृद्धाला एका खोलीत काहीतरी पूजा करत असताना पाहिले आणि तो हैराण झाला. त्याने दुसऱ्या दिवशी तो बंगला सोडला. तो लोकांना सांगत होता कि तो वृद्ध एक अश्या मूर्तीची पूजा करत होता, जी कोणालाही माहित नव्हती. ती मूर्ती पूजा झाल्यावर आपोआप नाहीशी होई पण दुसऱ्या दिवशी त्या खोलीमध्ये सकाळी सकाळी अचानक प्रकट होई.तिला अचानक प्रकट होताना नोकराने पाहिले होते. त्यामुळे नोकराने तो बंगला सोडला. एका दिवशी अचानक एक जण त्या बंगल्यात शिरला तर तेथे कोणीही नव्हते. तो मालकही नव्हता".एवढे बोलून पानठेला वाला थांबला होता. एवढे सगळे ऐकूनही ईशान आणि त्याच्या मित्रांनी त्या बंगल्यातच राहायचे ठरवले.