स्ट्रगल - भाग-2 dhanashri kaje द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्ट्रगल - भाग-2

चहा घेतल्या नंतर मंगेश निघून जातो आणी विक्रम व गणपत गप्पा मारत मारत घरा कडे
परतात.

घरी पोहोचताच...

दुर्गाबाई दारात उभ्याच असतात त्यात परत विक्रमला बघताच दुर्गाबाईंचा पारा चढतो आणि
त्या त्याच्या वर परत चिडतात.

"तु? परत इथे, मी तुला सांगितल होत ना हे घर माझ आहे मी कुणालाच देणार नाही. मग इथे
कशाला आलास?"

खरा प्रॉब्लेम काय आहे हे एव्हाना विक्रमला समजल होत. तो शांतपणे सगळ ऐकून घेतो मग
दुर्गाबाईंना शांत करत समजावतो.

"आजी. झालात का तुम्ही शांत? अहो मी तुमचं घर तुमच्या कडून कसा बळकावेन मी तर
तुमच्या नातवा सारखा आहे न. मी इथे राहण्याचे तुम्हाला पैसे देईन तुमच हे मेहनतीन
उभ केलेल घर नाही घेणार. आता तर मी येऊ शकतो ना घरात?"

हे ऐकताच दुर्गाबाई शांत होतात त्यांना विक्रमच्या बोलण्याचं नवल वाटत. त्या त्याच
स्वरात त्याच्याशी बोलतात.

"अग बाई हो का ये.. ये... आत ये बाळ. अरे मग हे आधी का नाही सांगितलस मला वेडीला
कुठे समजत भाडेकरू वगैरे. तु घराच नाव काढलस मला वाटलं तु आमच घरच बळकावणार की काय
म्हणून एवढं बोलले हो जमाना वाईट आहे ना थोडी काळजी घ्यावी लागते. आणि हो तुझ सामान
मी नीट ठेवलय काळजी करू नकोस."

दोघ घरात येतात. विक्रम खुर्चीवर बसता बसता बोलू लागतो.

"आजी अहो, काळजी कसली त्यात फक्त तुम्ही हातात काठी घेऊन आलात न मागे म्हणून जरा
घाबरलो बस."

हे ऐकून सगळेच हसू लागतात. काही वेळा नंतर दुर्गाबाई चहा करायला किचनमध्ये निघून
जातात आणि इकडे गणपत त्याला खोली दाखवायला खोलीकडे घेऊन जातो.

"हे बघ ही आहे तुझी खोली. तु फ्रेश हो सामान लाव मी चहाच बघतो."

गणपत खोलीतून निघणारच असतात तेवढ्यात विक्रम आवाज देतो.

"दादा, जरा थांबा की, तुमचं भाड?"

गणपत हसून म्हणतो.

"आम्हाला माणस ओळखू येतात बर का, तु आणि पैसे कुठे पळून जाणार आहात राहू देत तुझ्या
जवळ आधी फ्रेश हो मग बघुत."

दोघ ही हसतात गणपत खोलीतून बाहेर पडतो आणि विक्रम आपलं सामान व्यवस्थित लावू लागतो.

काही वेळा नंतर...

विक्रम आपलं सामान लावून फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येतो. त्याला हॉलमध्ये आलेलं
बघताच दुर्गाबाई चहा घेऊन येतात.

"हे घे चहा, बर ऐक इथे राहण्यासाठी काही नियम आहेत बर का."

नियम म्हणताच दोघ एक मेकांकडे बघू लागतात.

बिचकतच विक्रम विचारतो.

"नियम?"

दुर्गाबाई म्हणतात.

"हो, बिचकायला के झालं त्यात? तुमच्याकडे नियम पाळत नाहीत का?"

दोघ परत एकमेकांकडे बघू लागतात.

विक्रम मनात विचार करतो.

"यांना भाडेकरू म्हणजे कोण हे माहीत नाही आणि नियमांचा विचार करत आहेत. असो."

भानावर येत विक्रम विचारतो.

"काय नियम आहेत तुमचे?"

थोडस हसून दुर्गाबाई म्हणतात.

"खूप नाही रे, हे मुंबई शहर आहे तु दुसऱ्याच पोर मी ही अशी म्हातारी बाई म्हणून
सांगते तुला. या घरात राहायचं असेल तर शिस्तीने रहायच तुझे मित्र मैत्रिणी ते बाहेर
या घरात नाही घरी वेळेवर यायचं काय? येतय का काही लक्षात? आणि हो तुझ्या घरच्यांचा
नंबर देखील देऊन ठेव ह मला कधी गरज पडली तर."

एक क्षण विक्रम बघतच रहातो. आणि भानावर येत विचारतो.

"अं, आजी झाले का तुमचे नियम? अहो मी तसा मुलगा नाही आहे तुम्ही काळजी करू नका
माझ्या कडून कुठलीही चूक होणार नाही."

दोघ चहा घेतात व दुर्गाबाई परत आपल्या खोलीत निघून जातात. चहा घेत घेत दोघ गप्पा
मारू लागतात.

"तु आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस हं, त्याच काय आहे न आईच आता वय झालं आहे
त्यामुळे तीला प्रत्येकाचीच काळजी वाटत असते. बाकी फोन नंबर च अगदी बरोबर म्हणाली
आहे आई तेवढं देऊन ठेव."

लगेच चहाचा कप ठेवत विक्रम म्हणतो.

"काय चुकीच बोलल्या त्या. त्यांना काळजी वाटण साहजिकच आहे. (खिशातून पेन पेपर
काढत). हा घ्या नंबर."

विक्रम गणपतना वडिलांचा आणि मोठ्या भावाचा नंबर देतो लगेच गणपत त्याला धन्यवाद
म्हणतो.

इकडे विक्रम विचार करतो.

"चला राहण्याचा बंदोबस्त तर झाला आता पैसे कसे कमवायचे हे बघावं लागेल."

विक्रमला जाणीव होती या इंडस्ट्रीत आपली कितीही चांगली स्क्रिप्ट असू दे आपलं लगेच
काम होणार नाही आणि आपली या इंडस्ट्रीत ओळख देखील नाही की त्यांना सांगितल की लगेच
कामाला सुरुवात करता येईल. त्यामुळे त्याने काम शोधण्याचा निर्णय घेतला.

सगळ्यात आधी त्याने मोठ्या मोठ्या निर्मात्यांचे मेल-आयडी गोळा करायला सुरुवात केली
आणि आयडी वर आपली स्क्रिप्ट पाठवू लागला. दररोज ठरवून पंधरा आयडी वर आपली स्क्रिप्ट
पाठवायची च असा त्याने आता चंगच बांधला होता.

तसेच न्यूज पेपर मधील अगदी लक्ष पूर्वक जाहिराती तो वाचू लागला कुठे कला शाखेच्या
संदर्भातील नोकरी मिळते का ते बघू लागला.

आणि अशातच त्याला मुंबईत येऊन पंधरा दिवस उलटतात.

आता मात्र त्याचा धीर सुटू लागतो. त्याला काळजी वाटू लागते. तो आपल्याच खोलीत
बसलेला असतो अगदी विचार मग्न.

"आज या शहरात मला येऊन पंधरा दिवस झाले आहेत. आणि आता माझ्या कडील पैसे ही संपत
आलेत. घरातून तर मोठ्या तोऱ्यात निघालो होतो करेल सगळ मॅनेज म्हणत पण कस? माझं नशीब
चांगलं म्हणून हे घर तरी मिळालं पण यांना भाड देखील द्यावं लागणारच कसा सगळा खर्च
भागणार."

विक्रम विचारमग्न असतो तेवढ्यात खोलीत गणपत येतो आणि त्याला भानावर आणत विचारतो.

"काय रे अजून नोकरीच काम झालं नाही का?"

"नाही दादा, अजून प्रयत्न सुरू आहेत बघू काय होतय ते."

काळजीतच विक्रम उत्तर देतो.

काही क्षण थांबून गणपत विक्रमला आधार देत विचारतो.

"आणि नोकरी नाहीच मिळाली तर? काय करणार आहेस? सोडून देणार आपलं स्वप्न? हट्ट करून
बाहेर पडलास न तु या माया नगरीत आलास असाच हार मानण्यासाठी ते ही पंधरा दिवसातच.
तुला एक सांगतो विक्रम. स्वप्न बघणं चुकीच नाही आणि त्यातून ही मोठी स्वप्न बघणं तर
आज्जीबातच चुकीच नाही. हं पण स्वप्न पूर्ण न करता पळ काढणं हे मात्र चुकीच आहे. तु
म्हणत असशील तर माझा एक मित्र आहे. मी तुझ्यासाठी त्याच्या कडे बोलू शकतो पण तुला
चालणार असेल तर."

हे ऐकताच त्याचे डोळे भरून येतात. तो गणपतला आलिंगन देत म्हणतो.

"दादा, तुमचे उपकार कसे फेडू मी तेच समजत नाहीये मला आधी घरासाठी मदत केलीत मग
भाड्यासाठी मदत केली आणि आता नोकरी. खूप बर होईल जर मला काम मिळाल तर मी तुम्हाला
शब्द देतो तुम्हाला निराश करणार नाही. प्लिज बोलून बघा न."

गणपत एक स्मित हास्य करतात आणि म्हणतात.

"ठीक आहे. बघतो बोलून मी मला तुझी काळजी समजत होती आणि तस ही एक व्यक्तीच दुसऱ्या
व्यक्तीच्या मदतीला येतो न तु काळजी करू नकोस मी सकाळी बोलून बघतो त्याला बस एक
गोष्ट लक्षात ठेव आपल्या कामावर निष्ठा ठेव प्रामाणिक पणे काम कर कारण कुठलही काम
ज्याने आपल्या गरजा भागणार आहेत ते काम छोटं नसत. मेहनत करशील तरच नाव कमावशील आणि
महत्वाच मदत केलेल्या कुठल्याही व्यक्तीला कधीच विसरायचं नाही काय चिंता करू नकोस
सगळं ठीक होईल."

हे ऐकून विक्रम देखील काळजी मुक्त होतो आणि लगेच त्याच्या ही चेहऱ्यावर एक हसू
उमटत.

नोट :- घर, नोकरी पैसा जर का सहज मिळत गेल तर त्याला महत्त्वच उरणार नाही. विक्रमला
घर मिळाल नोकरीही मिळाली पण पुढे अजून काय वाढून ठेवलय काय माहित. बघुत पुढील भागात