स्ट्रगल - भाग-3 dhanashri kaje द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

स्ट्रगल - भाग-3

दुसऱ्या दिवशी सकाळी....
वेळ 7 वाजताची...
विक्रमच्या खोलीत...
विक्रम नुकताच उठलेला होता. आणि आपल आवरून गजानन महाराजांची पोथी वाचत होता. तेवढ्यात त्याला भेटायला खोलीत दुर्गाबाई येतात.
"येऊ का खोलीत? (दार उघडत), पोथी वाचतोय व्हय. चालू दे चालू दे मी नंतर येते."
दुर्गाबाई बोलून निघणारच असतात तेवढ्यात पोथी ठेवत विक्रम बोलतो.
"आजी अहो, थांबा की काही काम होत का? या न झालीच आहे माझी पोथी. ते काय आहे ना लहानपणा पासूनची सवय आहे पोथी वाचण्याची बोला काय म्हणता."
पोथीला नमस्कार करून पोथी जागेवर ठेवत विक्रम विचारतो.
तेवढ्यात दुर्गाबाई खोलीत येऊन पलंगावर बसत बोलू लागतात.
(खोलीवरून नजर फिरवत) "बाकी खोली छान ठेवली आहेस बर का ही पण लहानपणा पासून ची सवय वाटत. असो आम्ही तुझ्याकडे काही काम असेल तरच भेटायचं का तुला? कामा शिवाय तुला आम्ही भेटू शकत नाही का?"
आवरता आवरताच एक स्मित हास्य करत विक्रम म्हणतो.
"तस नाही हो आजी. हे घर तुमचच आहे ही खोलीसुद्धा तुमचीच आहे आणि मी सुद्धा तुमचाच आहे. तुम्ही मला भेटायला कधी ही येऊ शकता. पण या आधी इतक्या सकाळी कधी आला नाहीत न म्हणून विचारलं इतकच."
थोडस हसत दुर्गाबाई म्हणतात.
"मी तुझी चेष्टा केली रे, म्हणल या शहरात तु नवीन आहेस आणि घरच्यांची देखील तुला आठवण येत असेल म्हणून भेटावं एकदा जाऊन. गणपत सुद्धा काल म्हणत होता तु काळजीत आहेस म्हणून. म्हणून आले विचारायला."
विक्रमला दुर्गाबाईंची विचारपूस करण चांगल वाटत तो दुर्गाबाईंना म्हणतो.
"हो, आजी काळजी तर वाटत आहे मला. मी चित्रपट सृष्टीत नाव कमवायला आलो आहे आणि तसे माझे प्रयत्न देखील सुरू आहेत आणि मला या गोष्टींची ही जाणीव आहे की कुठलं ही काम करायचं असेल तर त्याला वेळ व पैसा दोन्ही खर्च करावेच लागतात आणि नेमक या दोन्ही गोष्टीच माझ्याकडे नाहीत बाबांची इच्छा आहे मी गावाकडे राहून शिक्षकी पेश्यातली नोकरी करावी आणि मला मुंबईतच रहायच आहे. एक वर्षाची मुदत दिली आहे बाबांनी आणि इथे तर आत्ताच पैशाची चणचण वाटू लागली आहे. काय करावं तेच समजत नाही मला. बघू काय होतय पुढे."
दुर्गाबाईंना त्याची कळकळ समजते. त्या त्याला समजावतात.
"हे बघ बाळ, मी अडाणी बाई आहे मला तुझ्या कामा बद्दल काहीच माहीत नाही. पण मी इतक नक्कीच सांगेन कुठल ही काम असो ते हताश न होता कर आणि धडाडीने प्रामाणिक पणे पुढे जा तुला नक्की यश मिळेल. बाकी आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोतच."
दुर्गाबाईंचे प्रेमळ शब्द ऐकून विक्रमच्या डोळ्यात पाणी येत तो आपले डोळे पुसत बोलतो.
"हो आजी, नक्कीच मी आपला प्रामाणिकपणा कधीच सोडणार नाही आहे आणि मेहनातीनेच पुढे जाईन. खूप बर वाटल तुमच्याशी बोलून."
दोघांच्या गप्पाच सुरू असतात तेवढ्यात दुर्गाबाईंना बोलवत गणपत विक्रमच्या खोलीत येतो.
"तु इथे आहेस? किती शोधायचं तुला. बर नाश्ता तयार असेल तर मला दे पटकन. मला आज धिरजच्या ऑफिसमध्ये जाऊन यायच आहे. जरा बघतो न होत का काही याच काम. तो ही मला म्हणाला होता कुणी असेल तर सांग. चल झाल असेल तर दे मला."
विक्रम सगळ ऐकत असतो तो लगेच विचारतो.
"दादा, पण काम काय असेल?"
गणपत म्हणतो.
"अरे, मला ही माहीत नाही मी जाऊन येतो मग तुला कळवतो हं."
तिघ हॉलमध्ये येतात व नाश्ता करतात.
काही वेळा नंतर...
गणपत धिरजकडे निघून जातो आणि विक्रम ही लगेच त्याच्या पाठोपाठ बाहेर पडतो. आज त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो कारण पंधरा दिवसाच्या अथक परिश्रमा नंतर कुणीतरी त्याला बोलावलेल असत. खर तर दोघे ही आपापल्या परीने प्रयत्न करत असतात आणि त्याचाच निकाल आज लागणार असतो.
विक्रमचा स्वभाव खूप साधा होता. म्हणून गणपतला नेहमी वाटायच आपण त्याला मदत करावी म्हणून तो त्याला जमेल तस मदत करत असे.
आज विक्रमला ही एका दिग्दर्शकाने बोलावल होत म्हणून तो बाहेर पडला होता.
एक तासा नंतर...
हॉटेल ब्लुरोज मध्ये...
विक्रम हॉटेलमध्ये पोहोचतो आज त्याची पहिली मिटींग असते. ते ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विराज जोशी यांच्या बरोबर. विराज जोशींनी बऱ्याच निर्मात्यांबरोबर काम केलेल असत आणि आज त्यांच्या बरोबर विक्रमची पहिली मिटींग असते. त्याने यासाठी खूप तयारी केलेली असते आणि आज तो क्षण आता त्याच्या समोर असतो.
विक्रमला आज आपल काम नक्की होणार हा मनात एक विश्वास असतो आणि त्याचा आनंद ही. तो त्याच आनंदात त्यांना भेटायला जातो.
टेबल नं 12 जवळ पोहोचताच...
विराज त्याची वाट बघत बसलेलेच असतात. तो विराजला विचारतो.
"नमस्कार तुम्ही विराज जोशी न?"
"हो, मीच विराज जोशी तुम्ही विक्रम सरदेसाई बरोबर."
हात मिळवत विराज विचारतो.
"हो, मी विक्रम सरदेसाई मी बसू शकतो का?"
विराज म्हणतो.
"हो, बसा की"
दोघ बसतात आणि त्यांची मिटींग सुरू होते.
"तुम्ही तुमची स्क्रिप्ट आणली आहे का?"
पाणी पीत विराज विचारतो. लगेच विक्रम स्क्रिप्ट ची फाईल काढून देतो आणि म्हणतो.
"हो, ही घ्या आणली आहे ना."
विक्रम विराजला फाईल देतो आणि विराज स्क्रिप्ट वाचू लागतो.
काही वेळा नंतर...
"हं, तुमची स्क्रिप्ट तर एकदम छान आहे. पण काय आहे न आपल्याकडे कथेला लागतील अशी इक्विपमेंट्स नाही आहेत. म्हणजे बघा स्पेशल इफेक्ट्स साठी लागणारे सॉफ्टवेअर्स परत एखाद्या व्यक्तीला आपण बघतो न उंचावरून उडवलं जात तश्या टेक्नॉलॉजी ते ही नाहीयेत ह्यात जे मी बघितलंय सगळ ऍडव्हान्स आहे. शिवाय लोकेशन्स चा ही प्रॉब्लेम वाटतोय. तसेच हे कथानक ही मी कुठेतरी वाचल्या सारख वाटतय. तुम्ही हॉलीवूड मुव्हीज खूप बघता का?"
हे ऐकून विक्रमचा पाराच चढतो. तो एकदम बोलतो.
"सर, सरळ सांगा न जमत नाही म्हणून आढे वेढे का घेताय? आणि राहिला प्रश्न या कथेचा तर ही कथा माझी स्वलिखित आहे. मला कॉपी जमत नाही. उद्या लोक माझी कॉपी करतील."
विक्रम विराजच बोलण ऐकून उठू लागतो आणि उठता उठताच विराजला बोलतो. ते बघून त्याचा राग शांत करत विराज त्याला म्हणतो.
"अरे, तुम्ही तर रागावलात बसा... बसा... माझा हेतू तुमचं मन दुखावण्याचा नव्हता. बर सॉरी आपण बोलूत यावर. बसा प्लिज. अं दोन मिनीट हं. मी एक फोन करून येतो."
विक्रम परत आपल्या जागेवर बसतो आणि विराज फोन करायला बाहेर निघून जातो.
(विराज आनंद मेहतांना फोन करतो)
"हॅलो, मै मेहताजीं से बात कर सकता हु?"
"यस, बोल रहा हु आप कौन?"
सर, मै विराज बात कर रहा हु मैने आपके साथ एक मूवी की थी. विराज जोशी याद आया?"
(थोडस थांबून) "ओह, यस.. यस.. बोलीये क्या काम था?"
"सर, एक लाडका है अपनी कहानी लेकर आया है. विक्रम नाम है उसका. लेकीन मुझे लग रहा है इंडस्ट्री के बारे मै उसे कुछ पता नही है. पर हा उसने कहानी बहोत अछी लिखी है. वो कहानी अगर हमारे नाम हो जाती है, तो हम करोडो मै खेलेंगे. ओर उसका क्या है देख लेंगे बाद मे आप बस एकबार वो कहानी अपने नाम कर लो बस."
(थोडस चिडून) "क्या बात कर रहे हो पागल तो नही हो गए हो तुम, कुछ लोचा होगया तो. सॉरी मै कोई रिस्क नही ले सकता."
"बस क्या सर. क्या मै आपको जानता नही क्या? मुझे पता नही है, ऐसे झोल झाल हमने कितने बार किये है. मै आपके साथ काम कर चुका हु सर. देखो सौदा फायदे मंद है, अगर कहानी परदे पर आयी तो तेहेलका मचा सकती है. ओर हम जो भी करेंगे वो लिगली होगा न तो कोई कुछ हमारा बिगाड भी नही पाएगा. ओर रहा सवाल कहानी रजिस्ट्रेशन का तो मुझे नही लगता उसे कुछ सेन्सॉरबोर्ड के बारे मै कुछ पता भी होगा. आप एक बार कहानी पढ लो फिर देखना क्या कर सकते है."
"ठीक है, तुम्हे इतना लग रहा है तो लेकर आओ कल उसे मेरे पास मै देख लेता हु."
"जी बस वो थोडा मेरे बारे मै भी सोचना हं. आप समज गये न मुझे क्या केहेना है."
"हा... हा.. बिलकुल. लेकीन देखो तुमने जीस तरह से मुझे बताया है मुझे उसमे कुछ दम लगा तो ही मै तुम्हारे बारे मै सोचुंगा ओके."
"जी.. जी.. बिलकुल."
दोघ फोन ठेवतात.
इकडे...
मेहता प्रोडक्शन्स मध्ये...
आनंद मेहता फोन खाली ठेऊन विचारमग्न होतात. तर विराज आपला फोन ठेवत परत आपल्या जागी येतो.

नोट: बाप रे, पहिलीच संधी मिळाली आणि चक्क फ्रॉड? आता पुढे काय होणार ही कथा चोरीला जाईल? की अजून काही वाढून ठेवलय विक्रम पुढे बघूत पुढील भागात.