शाळा म्हणल की लहानपणीचे गावातील शाळेतील दिवस आणि 8, 9 वि व 10वि तील लासीना येथील विद्यालयातील दिवस . मजा - मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम (पण कधी न व्यक्त झालेलं), मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे, पेपरला केलेली कॉपी, तास चालू असताना केलेली बडबड, आवडत्या मुलीकडे चोरून बघणे, सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळेचे ते दिवस आठवले की उगीचच मोठ झाल्या सारख वाटत शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण भाग आहे.
शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून संपला ना तेव्हां कळतो अणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य
नावाच पुस्तक घडते.📓📔📒📘📗
शाळा आठवली की सगळे flashback
डोळ्यासमोर येतात ती मस्ती, ती मजा, तो शिक्षकांचा खाल्लेला मार मित्र-मैत्रिणींनीसोबत केलेली धमाल सगळ आठवलं की टचकन डोळ्यातून पाणी येत , अस वाटत लहान होतो तेचबर होत पण कधीतरी मोठं व्हावच लागत ना यार..
सर्व काही भेटत या जगात पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही!
👭मुलं आणि मुली 👫 हा विषयच मुळात मुलांचा आवडता पण आज पण याबद्दल बोलताना मुल असो व मुली कचरतात . कारण त्यावेळेस मोबाइल आणि ऑनलाईन या गोष्टी गावात तरी नव्हत्या. शाळेत असताना मुलांना बऱ्याच वेळी मुली सोबत बोलावस वाटत पण कामाशिवाय कोणी बोलत नसत. त्यात भीती सुद्धा होती म्हणा, कारण मुली आपल्या सोबत बोलतील काय, नाही बोलल्यास मूल चिडवतील आणी बरेच गैरसमज असत, किशोरवयात असच होतं असत . कारण हे वयच अस असत , आजपण आम्ही कॉलेज मध्ये जेव्हा मुल मुलींना सोबत बघतो तेव्हा आमचंच आम्हाला हसू येत आणि आजपण कॉलेज मध्ये सुद्धा मुलीसोबत बोलायची हिम्मत होत नाही. तेवढंच काय कोणी classmate मुली आजपण कुठे दिसली तरी बोलायची हिम्मत होत नाही. असो अस आमच्यात सोबत नाही तर मुलीसोबत सुद्धा होत , त्यांना पण बोलावसं वाटत असेल बहुतेक पण त्यांची कारण वेगळी असू शकतात . ते एखादी मुलगीच सांगू शकते. शाळेत नकळत मुलीबाबत आकर्षण असायचं पण ते भीतीयुक्त, मुलीकडे बघायच पण लपून छपून पण खरी मजा त्यातच होती, आजकाल तर पाचवीतली मूलपन म्हणतात मला प्रेम झालं म्हणून. तो नगराळे सरांचा क्लास सर्वाना भीती की सर आज काय विचारणार कारण सर प्रश्न विचारणार विज्ञान सारख्या कठीण विषयाचे, आणि उत्तर नाही आलं तर मार खावं लागणार तेपण सर्वा समोर आणि त्यामुळेच भीतीने का नसो पण मूल अभ्यास करायची, वर्गात मजा यायची कोण मार खातो हे बघण्यात आणि भीती वाटायची आपला नंबर मार खाणार्यात नसावा या गोष्टीची. तस आमच्या वर्गात बरीच हुशार मूल आणि मुली होत्या, कारण 7-8 गावाची मूल म्हटल्यावर त्यात बरेच हुशार असणार , आणि यामुळेच विद्यार्थ्यात स्पर्धा असायची पण यातच खरी मजा होती. तशीच मजा सोनार सर यांच्या पण क्लास मध्ये येत कारण विषयच गणित असल्यावर आणि आधीपासूनच गावतील मोठी मूल सांगत की सर खूप कडक आहे म्हणून खुप भीती वाटायची सरांची . आम्हीसुद्धा बऱ्याचवेळा सरांचा मार खालेला , आणि वर्गात अस कोणीच नव्हतं की त्याने सराचा कधी मार खाल्ला नसेल. पण त्यामुळेच कोणत्याही tution शिवाय आम्ही आजपण गणितात साधारण हुशार आहोत.
🎤🎤 गॅदरिंग 🎤🎤
हा सर्वात आवडता आणि प्रत्येक मुलांच्या आठवणीतले न विसरणारे क्षण. 1 महिन्या अगोदर गॅदरिंग ची तयारी सुरू व्हायची तो डिसेंबर चा संपूर्ण महिना हा एका वेगळ्याच वातावरणात जात असत . मय्या यशोदा, चुडी जो खणके हात मैं , देश रंगीला अशी काही गाणी आजपण वाजली तरी गॅदरिंग च्या त्या आठवणी डोळ्यासमोरून क्षनात सर्व आठवणी सरकुन जाते. शाळा म्हणजे एक वेगळेच जग असते , ना कोणते टेंशन , फक्त आणि फक्त मज्जा आणि धमाल. आम्ही पण गॅदरिंग मध्ये सहभागी होत असत, नाटक बसवणे त्यांची पात्र बसवून देने, 1 महिन्यापासून त्याची प्रॅक्टिस करणे आणि शेवटी स्टेजवर सादर करणे. पण एवढं सार असताना कधी भीती वाटली नाही . कारण ते दिवसच वेगळे असतात.
🤼♀️🤸♂️⛹🏽♀️
मैदानावर खूप मज्जा यायची कारण
सर्वात जास्त मस्ती तिथेच करायला भेटायची. खेळण्याची मजा , मोठ मैदान असल्यामुळे मैदानावर खेळताना खूप मजा येत असत. 2 वाजताच्या सुट्टीमध्ये एकत्र बसून खाल्लेले डबे , results च्या दिवशी
भीती , 10 वि ची board , परीक्षा, sandoff चा कार्यक्रम त्या वेळेस
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आलेलं अश्रू, कारण यात आठवणी असतात त्या 3 वर्षाच्या, या 3 वर्षात मुक्त मनाने जगलेल्या जीवनाचे आणि हेच आठवण जीवनभर माणसाला समृद्ध करते ..सगळ्यात कठीण असतो तो शेवटचा दिवस सगळ्यांचे डोळे जड झालेले आणि पाणावलेले आणि शिक्षकांच्या डोळयात सुद्धा आनंद अश्रू होते . आणि अश्याप्रकारे दिवस शेवटचा होता पण आठवणी कायम सोबत राहिल्या...
एक अशी जागा जिथे जायला कंटाळा यायचा पण ती संपल्यावर आठवण पण खूप आली..
आपला नम्र ........
✒️देवदत्त राठोड✒️