कर्म Vaishnavi Meena Kiran Bhalerao द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कर्म

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर लोक तुमच्याशी कसे .वागतात हे त्याचे कर्म त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता, हे तुमचे कर्म .त्यामुळे आपण जे काही वाईट चांगले कोणतेही कर्म असू देत ,त्याची आपल्याला परत फेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा .कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. त्यामुळे जे द्याल तेच परत मिळेल ते इज्जत असो किंवा धोक हा निसर्गाचा नियम आहे .जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही मर्यादित आहेत. त्यामुळे जे पेराल तेच उगवेल. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावे लागेल ,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल .जर तुम्हाला इतकी भीती असेल तर जे तुमच्या बरोबर होऊ नये असे वाटत असेल तर ते इतरांसोबत करू नका .त्यामुळे इतरांच्या भल्यासाठी कर्म करा. ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल . कर्म हे रबरा सारखे असते तुम्ही त्याला ताणू शकता आणि जसे ताणल तसे ते तुमच्याकडे परत येईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतेच आणि हेही लक्षात ठेवा तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार .मनुष्य हा कर्माने महान ठरतो जन्माने नाही. असे मानले जाते की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे .जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म .उदाहरणार्थ एक गुरु शिष्यांची जोडी असते आणि त्यातील गुरु असतात ते वयाने मोठे असतात. शिष्य हेवयाने लहान असतात. गुरु खूप अनुभवी असतात. ते ध्यानाला बसले की दोन दोन दिवस ध्यान करायचे तेव्हा त्यांच्याकडील शक्तीने त्यांना आपल्या शिष्याचे सात दिवसांनी निधन होणार आहे हे कळते. तेव्हा ते त्याला त्याच्या घरी जा आणि घरच्यांसोबत राहून सात दिवसांनी परत ये असे सांगतात .घरी जायला निघतो तेव्हा तो नदीपार करत असताना त्याला मुंग्यांचे वारूळ दिसतं .त्यात काही मुंग्या ह्या एकमेकांना धडकून ये जा करत असतात. शिष्याच्या असे लक्षात येते की पाण्याचा प्रवाह वाढत आहे. आणि हे जर पाणी मुंग्यांपर्यंत आले तर त्या वाहून जातील. तेव्हा तो किनाऱ्यावर थोडा उंचवटा बनवतो आणि मुंग्यांना दुसरा रस्ता तयार करून देतो .आणि त्याच्या घरी जातो. तेव्हा शिष्य त्याच्या घरच्यांबरोबर सात दिवस खूप आनंदात घालवतो .परंतु त्याच्या लक्षात येते की आज सातवा दिवस आहे आणि आज गुरुजींनी आपल्याला परत यायला सांगितले आहे .तेव्हा परत आश्रमात जाण्यास निघतो. तेव्हा त्याला उशीर होतो इकडे गुरुजी त्याची काळजी करत असतात. त्याला उशीर झालेला असतो तेव्हा गुरुजींना वाटतं की त्याचे बरे वाईट तर झाले नाही ना तेवढ्यात त्यांना अंधारात एक व्यक्ती येताना दिसते. त्याला जिवंत पाहून खूप खुश होतात. गुरुजींच्या लक्षात येते की आपला शिष्य हा सुखरूप आहे. जिवंत आहे तेव्हा गुरुजींना आनंद होतो खूप आनंद होतो. गुरुजी त्याला विचारतात येथून गेल्यानंतर तू काय काय कामे केलीस ,तेव्हा गुरुजींना शिष्य सर्व हकीकत सांगतो. तेव्हा शिष्य नदीकिनाऱ्यावरील प्रसंग सांगतो .गुरुजींच्या लक्षात येते की मुंग्यांना जीवदान दिले म्हणून त्यालाही जीवदान मिळाले. म्हणून लक्षात ठेवा की जसे आपले कर्म तसे फळ मिळते. तुमचे नशीब तुमचे भविष्य सांगते पण तुमचे कर्म तुमचे भविष्य घडवते .म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक कृती ही बिजासारखी असते आणि तुम्ही जसे बी पेराल तसेच फळ तुम्हाला मिळेल. विश्वास की प्रत्येक रचना आपले कर्म नीट करत आहे परंतु जर तुम्ही तुमचे कर्म नीट करत नसाल तर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जात आहात ज्यामुळे सर्व नाश होतो .यामुळे हे नक्की आहे की चांगल्या कर्माच्या फळांची बीजे उशिरा उगवतात .पण त्याचे फळ खूप पिकलेले आणि गोड असते. त्यामुळे कितीही संकट आले तरी प्रत्येक टप्प्यावर घाबरून बसू नका फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा नशीब तुम्हाला संकटातून बाहेर काढत नाही, तर फक्त तुमच्या कर्मात असे करण्याचे सामर्थ्य आहे. जी व्यक्ती चांगले कर्म करण्यात सक्षम आहे ती प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करेल. जर कर्म एखाद्याच्या भल्यासाठी केले जात असेल तर त्याचा परिणाम ही कधी वाईट होऊ शकत नाही .म्हणून हे नेहमी करा जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचा तुमच्या कर्माची चिंता करावी लागेल फळाची नाही. त्यामुळे कोणतीही कर्म करताना विचार करून पाऊल उचलावे. आपण जर आपले कर्म जर वाहत्या पाण्यासारखे चांगले ठेवले तर वाईट कर्म हे आपोआपच बाहेर फेकले जातात. त्यामुळे तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्म जबाबदार आहे .हे एक दिवस तुम्हाला नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगावे लागतात. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळतात.