तांडव - भाग 2 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

तांडव - भाग 2

तांडव - भाग-2
तळगांव हे एक छोट गाव होत. गावात एकूण दोनच लाॅज होती.त्यातल्या त्यात एका बऱ्या लाॅजमध्ये मी एक रूम बुक केली. माझी बॅग मी रूममध्ये ठेवली पण बॅगेला दोन कुलपं लावून बॅग काॅटखाली ठेवली.हातपाय धुवून विश्रांती घेण्यासाठी मी बेडवर कंलडलो.मनात मी घडलेल्या घटनांची उजळणी करत होतो.
मी पंढरी रंगसूरला फोन लावला.ते त्या बांधकामाच्या ठिकाणी होते.मला त्यांनी तिथेच भेटायला बोलावलं.मी उतरलेल्या लाॅजकडून ती जागा पाच मिनिटांच्या अंतरावर होती.मी रूम बंद करून चावी देण्यासाठी काउंटरवर गेलो.
काउंटरवर पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा होता.मी सहज त्याला विचारले" सहा महिन्यांपूर्वी ज्या घराला आग लागलेली ते घर नेमकं कुठे आहे.?"
"जवळच आहे, मेन रोडला लागूनच आहे...आजूबाजूला घर नाहीत ... ते घर पण नाहिय ...पाडून टाकलय"
" बर, आग लागली तेव्हा घरात कुणी नव्हतं?"
त्याने क्षणभर माझ्याकडे बधितल व म्हणाला...
"गीताताई होत्या."
" मग ..त्या आता कुठे आहेत?"
तो गप्पच राहिला.
" काय झाल?" मी विचारले.
" त्या ...त्या...आगीत जळाल्या ....फार वाईट झाल....
.... गीताताईंचे ..!त्यांचा एका पायाला पोलीओ होता...त्या कुबडी घेवून चालायच्या...बहुतेक त्यांना पळता आल नसाव. छान स्वभाव होता त्यांचा! मी गणित शिकायला जायचो त्यांच्याकडे."
मला हे पंढरीने सांगितले नव्हते.
" गीताताईंचे नातेवाईक कूठे आहेत सध्या?"
" त्यांचे वडील आहेत.बहुतेक ते धरणाच्या पलिकडे त्यांची जमीन आहे तेथे राहतात."
"त्यांच नाव माहित आहे."
" मेजर दळवी....मिलिटरीत होते."
मी त्याचे आभार मानले व पंढरी रंगसूर यांच्याकडे म्हणजेच जळालेल्या घराच्या ठिकाणी गेलो. पंढरी मला बघताच समोर आला.
" साहेब काय झाल? " तो थोडा घाबरलेला व गोंधळलेला दिसला.
" सहज आलो...अजून काही इथे आढळल काय? "
"नाही. तस महत्वाचे काही नाही. "
मी आजूबाजूच निरीक्षण करत होतो.सुमारे दहा गुंठ्याचा परीसर होता.रस्त्याला लागून होता पण नजीक वस्ती दिसत नव्हती. घाटी संपते तिथेच ही जागा होती.का कोण जाणे मला अस वाटायला लागल की इथे काहीतरी आहे....एखादी अदृश्य शक्ती...इथे वावरतेय अस मला वाटल.अचानक माझ लक्ष कुंपणाला लागून असलेल्या एका छोट्या डेरेदार वृक्षाकडे गेले. तिथे ... सातविणाच झाड होत. माझ्या मनात अनेक विचार चमकून गेले.अचानक वारा सुरू झाला.सातविणाच्या पानांची सळसळ सुरू झाली. मला ती सळसळ उगाचच कुजबूज असल्यासारखी वाटली.
मी पंढरीचा निरोप घेऊन धरणाच्या दिशेने गेलो. अर्ध्यातासातच मी धरण परीसरात पोहचलो. वाटेत एक धनगरदादा दिसले त्यांनी मला मेजर दळवींच्या फार्म हाऊसवर कस जायचं ते सांगितले. तिथे पोहचल्यावर मी गाडी गेटच्या बाहेर लावली व हाॅर्न वाजवला. मेजर आपल्या बागेत काम करत होते.हाॅर्न ऐकून ते समोर आले.साधारण पंचावन्न वर्षे वय असेल...करारी चेहरा ... छोटी मिशी....ताठ चालणे... सैनिकी शिस्त त्यांच्या व्यक्तीमत्वात दिसत होती.
" कोण तूम्ही ? काय काम आहे?" आवाज अतिशय कोरडा होता.
" सर,मी इतिहास संशोधक आहे...मला तुमच्याशी थोड बोलायचंय."
काही वेळ ते गप्प राहिले.मग त्यांनी गेट उघडले. मध्ये रस्ता व दोन्ही बाजूला बाग व समोर एक छोट घर होत.
मी त्यांच्या मागून पाच एक मिनिटे चालत समोरच्या अंगणात पोहचलो. तिथे काही खुर्च्या ठेवलेल्या होत्या .
" बोला ...." ते म्हणाले.
कुठून सुरूवात करावी ते मला समजत नव्हते. मनात शब्दांची जुळवाजुळव करत मी म्हणालो....
" सहा महिन्यांपूर्वी..तुमच घर जळाल...."
मला मध्येच थांबवत ते म्हणाले..
"त्याचा इतिहास संशोधनाशी काय संबध?"
" म्हणाल तर आहे ..म्हणाल तर नाही...नेमकं काय ते सांगेनच....पण मला एक सांगा ती आग नेमकी कशी लागली?....तुमची मुलगी...गीताताई...त्या आगीत.."
मी थांबलो.त्याच्यां डोळ्यात मला वेदना दिसल्या ....त्यांनी डोळे मिटले होते.
" होय ...माझी गीता...त्या आगीत होरपळून गेली...तीला पळता आल नाही...तिने मदतीसाठी किती हाका मारल्या असतील.....बाबा..बाबा म्हणत तिने टाहो फोडला असेल...मी काहीच करू शकलो नाही. "
ते अक्षरशः रडू लागले.मी गप्प राहिलो.त्यांच मन मोकळे होवू दिले.काही वेळाने त्यांनी स्वतःला सावरलं.
" मी त्या दिवशी पुण्याला माझ्या दुसऱ्या मुलीकडे गेलो होतो....गीता घरात एकटी होती. शाॅर्ट सर्किटने आग लागली असा निष्कर्ष पोलीसांनी काढला. ती..ती जिवंतपणी पूर्ण जळून गेली होती...सगळं घर जळाल होत. गीता अपंग असली तरी सगळं काम करायची.बी.एस.एस्सी झाली होती .हार्मोनियम छान वाजवायची...आवाजही गोड होता.एका रात्रीत सार संपलं."
" बर तुमच्या घरातली दोन खेळणी माझ्याकडे वस्तूसंग्रहालयात आलीत. वसुदेव पेला व ससाणा खांद्यावर असलेली पितळी मूर्ती..!"
"होय,...गीता लहानपणापासून त्या मूर्तीशी खेळायची...ती मूर्ती सजीव असल्यासारखी तिच्याशी बोलायची.."
" पण ती मूर्ती तुमच्याकडे कशी आली ." मी विचारले.
"माझे वडिलही सैनिक होते...१९६१च्या चीन- भारत युध्दावेळी ते तिबेटच्या सीमेवर असताना एक लामा साधू त्यांना जंगलात भेटला...त्या साधूने त्यांना त्या दोन वस्तू दिल्या होत्या.तो साधू तंत्रविद्येत पारंगत होता. माझ्या वडिलांनाही गूढ विद्युत रस होता. या वस्तू जवळ आल्यावर वडील अनेक संकटातून आश्चर्यकाररित्या वाचले. तेव्हापासून त्या दोन वस्तू आमच्या घरात आहेत."
"पण त्यावर तारीख १९३२ ची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती मूर्ती नेमकी कशाची आहे." मी विचारले.
" ती तारीख कदाचित ज्याने कुणी ती तयार केली किंवा खरेदी केली तेव्हाची असेल....कूणीतरी ती मूर्ती लामा साधूला दिली होती. वडिलांनी मला अस सांगितलेलं की ती मूर्ती हिमालयातल्या एका यक्षाची प्रतिकृती आहे .जो आजही हिमालयातील लोकांना दिसतो म्हणे."
मी हे सगळं ऐकून आवाक झालो. माझ्याजवळ असलेली मूर्ती साधीसुधी नसून काहीतरी अलौकिक शक्ती असलेली आहे हे माझ्या लक्षात आले.
" सर , तुमच्या वस्तू तुम्हाला परत पाहिजेत काय?"
"नको,ती खेळणी बघितली की गीताची आठवण येत राहिल." त्यांचा आवाज कातर झाला.
मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. धूसर अस एक चित्र माझ्या डोळ्यासमोर तयार झाल होत.माझी खात्री झाली होती की मेजर दळवींच्या घराला आग लागली नव्हती तर लावली गेली.पण कुणी व का? हे स्पष्ट होत नव्हते.त्या रात्री काहितरी घडल होत...पण नेमकं काय ? त्या घटनेचा या दोन खेळण्यांशी संबध काय ते कळत नव्हत.मी माझी शंका मेजरना बोलून दाखवली नाही. त्यांना त्याचा त्रास झाला असता.
मी सरळ लाॅजवर आलो.विश्रांती घेता-घेता मी सगळ्या घटना जुळवण्याचा प्रयत्न करत होतो.मी सहज म्हणून इन्स्पेक्टर वारंगाना फोन लावला व मृता पैकी कुणाची ओळख पटली का ते विचारले.वारंग म्हणाले सी.आय.डी.ने चारपैकी दोन तरुणांची ओळख पटवली आहे पण त्यांचे नातेवाईक अजूनही त्याबाबत साशंक आहेत. मी दुसर्या दिवशी पोलीस स्टेशनला येतो अस सांगून फोन बंद केला.
त्या रात्री मी लाॅजमध्येच मुक्काम केला.अनोळखी ठिकाण असल्याने मला झोप येत नव्हती.मी डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. अचानक रूमला असलेली एकमेव खिडकी खाडकन उघडली.मी खिडकिच्या सरकत्या काचा ओढून खिडकी बंद केली होती.मग काच सरकली कशी हे मला कळेना. वाऱ्याची एक झुळूक आत आली.सोबत पांढऱ्या धुक्याच आवरण खोलीत पसरलं. त्या धुक्यात एक विरळ अशी आकृती खोलीत फिरताना दिसली.ती धुक्याची आकृती खोलीत काहीतरी शोधत असावी अस मला वाटल.
मी डोळे किलकिले करून सार बघत होतो.उठण्याच धाडस माझ्यात नव्हते.कुणीतरी संमोहित केल्याप्रमाणे मी फक्त बघत होतो.काय होत ते? कशाचा शोध घेत होत? ती आकृती माझ्या बेडकडे आली. खाली वाकून बेडखाली ठेवलेल्या सूटकेसला पाहू लागली.ती आकृती खोलीतले माझ अस्तित्व गृहितच धरत नव्हती. ती आकृती मानवी देहासारखी दिसत होती पण तिला चेहरा नव्हता हे माझ्या लक्षात आल.त्या थंड वातावरणातही मला दरदरून घाम फुटला. सूटकेसला दोन- दोन कुलुपे होती. एक मंद असा निराशेचा सुस्कारा मला ऐकू आला.
त्या पाठोपाठ कुणीतरी त्रागा करून हातपाय आपटतात तसा आवाज आला.ती आकृतीत सरळ माझ्या बाजूला बेडवर बसली.आपल्या पांढुरक्या हाताचा स्पर्श तिने माझ्या पाठिवर केला.अतिशय थंडगार स्पर्श होता तो!
"ऊठ,---हेमराजला बाहेर काढ."
कुजबुजल्या सारख्या आवाजात तिने मला आज्ञा केली.
" कोण ...कोण आहेस तू.? हेमराज कोण.? मी भित भित
विचारलं.
" मी कोण हे महत्त्वाचे नाही. तूझ्या सूटकेस मध्ये " हेमराज" आहे .मला त्याच्याशी बोलायचंय."
"म्हणजे...ती यक्ष मूर्तीच ना....आणि ...आणि तू ..तू.गीता तर नाहीस .?"
ती आकृती झटकन उभी राहिली. हवेचा एक भोवरा गरगरत खोलीत घुमू लागला.हवेची जोरदार कंपन मला जाणवू लागली.
" होय ...मीच गीता..काय माहीत आहे तूला गीताबद्दल?"
" सहा महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत ती ..जळाली?"
अचानक ती आकृती भेसूर हसू लागली....हसता...हसता...रडू लागली.
" जळाली नाही ...जाळली तिला...सात नराधमांनी...!तिच्या अस्पर्शीत...सुकुमार देहाचे लचके तोडले त्यांनी...!ती धाय मोकलून रडत...होती....विनवणी करत होती...पण ते नराधम नशेत...खदाखदा हसत होते. तीच्या देहावरची...वस्त्र त्यांनी...ओरबाडून काढली. अपंग असलेली ती पळू शकत नव्हती. ..."
" नेमके काय घडल त्या रात्री?" मी विचारले.
" कशाला जाणून घ्यायचाय तुला?" आसुड ओढल्यासारखा आवाज आला.
" मी ...मी मदत करेन .. तुला."
" तू मदत करणार अन् मला? हेमराज असताना मला कुणाच्या मदतीची गरज नाही. आतापर्यंत चार जणांना मी शिक्षा दिलीय...पाणी..पाणी करत ते तडफडून मेले...पाण्याचा थेंबही त्यांच्या ओठांपर्यंत पोहचला नाही..त्या माझ्या खेळण्यातल्या माणसासारखा ."
त्या आकृतीने स्वतः भोवती एक गिरकी घेतली.हवेत गरगरणारा भोवरा अधिक तीव्र झाला.....कंपने..वाढली.हवेचे स्तंभ एकमेंकावर आदळू लागले....विजा चमकाव्यात तसा आवाज आणि प्रकाश खोलीत चमकू लागला.माझ्या जागी दूसरा कुणी असता तर कधीच गार झाला असता. मी यापूर्वीही अश्या प्रसंगातून गेलो होतो. पण यावेळी समोरची आकृती प्रचंड तांडव करत होती.
" मी ..मी त्या दिवशी हार्मोनियमवर ' दिसते मजला सूखचित्र नवे ..' हे गीत गात बसले होते.अचानक दारावरची बेल वाजली.कुबडी घेत मी उठले. दार उघडले...समोर पंचविशीतला तरूण होता.
" काय काम आहे?"
" आमच्या कारच्या रेडिएटर मधील पाणी संपले ..गाडी बंद पडलीये..पाणी मिळेल?" तो मला न्याहाळत म्हणाला.
" या..त्या बाथरूममध्ये बादली भरलेली आहे...ती घेवून जा."
तो बादली घेवून बाहेर गेला. पाणी भरून तो परत आला.
"ताई , थोड खायला मिळेल? एकूण सातजण आहोत ..उपकार होतील." तो म्हणाला.
त्याने मला ताई अशी हाक मारली पण मला त्याच्या डोळ्यातली वासना दिसली नाही. माझ्या अब्रूचे लचके तोडण्यात तोच पुढे होता.एकूण सातजण होते ते ! सारे नशेत होते.मी झटपट त्यांच्यासाठी खाऊ तयार केला...पण घरात मी एकटी ...त्यातही अपंग हे बघून...त्यांनी ...नाही नाही... ! नाही सांगवत मला.....त्या अत्याचारामुळे मी ..मरणासन्न झाले..बेशुध्दीच्या सीमारेषेवर असताना मला जाणवल की त्यांनी त्या अवस्थेत मला बेडवर टाकले...आजूबाजूला झटकन पेट घेतील अश्या वस्तू ठेवल्या..त्यातल्या एकाने पिनच्या वायर्स खोलल्या व एकमेकांना स्पर्श करत ठिणग्या पाडल्या... ओरडण्याएवडही त्राण माझ्यात नव्हते."

हे सारे ऐकून मी विलक्षण लज्जित झालो.माणूस किती हैवान बनू शकतो.त्याच हे उदाहरण होत.एका अपंग..असहाय्य तरूणींच्या अब्रूचे धिंडवडे काढणार्या त्या तरुणांचा मला प्रचंड संताप आला.गीताच्या आत्म्याच तांडव योग्य होत.त्या उरलेल्या तरूणांनाही त्यांच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे यात कोणतीच शंका नव्हती.
"मी हेमराजला...म्हणजे त्या यक्षमूर्तीला बाहेर काढतो..पण पण ते तिघे कुठे सापडतील?" मी विचारले.

" मी त्यांना शोधून काढलय...त्यांना संमोहित करून मी त्यांना तळगावात आणेन..मग हेमराजच्या मदतिने त्यांना तडफडवून मारेन.यापूर्वी ही मी तेच केलय. आताही त्यातला एक तळगांवात येतोय...इथ येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्याजवळ ज्याने शाॅर्ट सर्किट कलेले तोच आहे तो! .काही वेळातच तो घाटी उतरेल.
मला हेमराज पाहिजे ..चल उठ...सूटकेसला उघड."
मी यंत्रवत उठलो व सूटकेस उघडली. ती यक्षमूर्ती बाहेर काढली. त्या आकृतीने ती मूर्ती ओढून घेतली अन छातीशी धरली. त्यानंतर जे घडल ते माझ्या कल्पने पलीकडचे होते. त्या पांढऱ्या आकृतीशेजारी एक विलक्षण दिव्य पुरूष उभा होता.गव्हाळ वर्ण...डोक्यावर मुकुट...कानात सुवर्ण कुंडल...लांब केस...जांभळ पितांबर..उजव्या हातात तो पंचशूल....डाव्या खांद्यावर एक मोठा जीवंत जंगली ससाणा...व डाव्या हातात सातविणाची डहाळी.
माझ्या घश्याला कोरड पडली...त्या यक्षाने माझ्याकडे बघून हात हलवला.
"नाही,त्याचा काही संबध नाही....आपल्याला बाहेर जायचंय...आपली पाचवी शिकार येतेय.. दुष्टांचा संहार झालाच पाहिजे ...चल."
ती धूसर आकृती म्हणाली.तो यक्ष माझ्याकडे बघून हसला. माझ सार शरीर जड झाल...माझ्या मेंदूवर दुसर्या कुणीतरी ताबा मिळवलाय अस वाटू लागल.मी उठवण्याचा प्रयत्न केला ..पण माझ्या हातापायातली शक्ती संपली होती मी तिथेच बेडवर कोसळलो....!
त्याक्षणी दोन आकृत्या झेप घेत खिडकीबाहेर झेपावल्या...खिडकीची काच आपोआप सरकत बंद झाली.
----------*-----------*------------*------------------*-------
भाग दोन समाप्त