देव जागा आहे... - 1 vidya,s world द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देव जागा आहे... - 1

भाग १

दुपार च कडक उन्ह.गाडीत एसी सुरू असून ही अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या त्यात मुंबई च ट्रॅफिक जाम..सुजल रुमालाने घाम पुसून पुसून वैतागून गेला होता. इतक्यात गाडीच्या काचेवर टकटक ऐकू आली.सुजल ने गाडीची काच थोडी खाली घेतली तर एक बारा, तेरा वर्षाचा मुलगा हातात प्लॅस्टिक चे बॉल घेऊन उभा होता. त्याचे कपडे थोडे मळकट दिसत होते. केस विस्कटून कपाळावर आले होते.घामा चे हलके हलके थेंब त्याच्या कपाळावर दिसून येत होते.

" दादा एक बॉल घ्या ना.." तो मुलगा कपाळावरचा घाम आपल्या शर्टच्या बाही ने पुसत हातातला बॉल सुजल पुढे करत बोलला.

" नको...पुढे जा " सुजल ने एक कटाक्ष त्याच्या कडे टाकत वैतागून सांगितलं व काच बंद करू लागला.

" दादा..दादा..एक तरी घ्या ना..अहो..सकाळ पासून एक पणं विकला नाही मी..." तो मुलगा काचेवर हात अडवा धरत बोलला.

" अरे बाबा काय करू घेऊन ? घरी कोणीच छोट नाही माझ्या.." हे वाक्य बोलताना मात्र सुजल च्या डोळ्यात दुःख दाटून आलं.

श्रेया आणि सुजल ने लव्ह मॅरेज केलं होत.अगदी घरच्यांच्या विरोधात जाऊन..नंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांच नात मान्य केलं पणं लग्न होऊन चार वर्ष झाली तरी घरात पाळना हलला नाही हे पाहून सुजल ची आई दररोज किर किर करायची.श्रेया ही खूप उदास राहायची.आई आणि बायको मध्ये मात्र सुजल भरडत चालला होता. दररोज घरी वाद सुरूच असायचे.

" दादा नसल तर येईल ना कोणी तरी छोट त्याच्या साठी घ्या...ना...." तो मुलगा पुन्हा विंनवनीच्या स्वरात बोलला तस्स सुजल ची तंद्री तुटली.

" नको रे तू पुढे जाऊन विचार कोणाला तरी " सुजल वैतागत बोलला.

" दादा एक बॉल घ्या ओ.. माझ्या साठी नाही निदान माझ्या छोट्या बहिणी साठी तरी घ्या..तिने सकाळ पासून काहीच खाल्ल नाही..देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल दादा..तुम्ही गरीबाची मदत केली तर.." अगदी मोठ्या माणसा न सारखं त्या मुलाने सुजल ला जणू आशीर्वाद च दिला..सुजल ने तो मुलगा पाहत होता त्या दिशेला पाहिलं तिथे एक सहा -सात वर्षाची छोटी मुलगी मळकटलेले कपडे घालून रस्त्याच्या कडेला बसली होती.तिच्या बाजूला गाठोळ होत..थोडे फार बॉल ही होते.त्या मुली ला पाहून न जाणे सुजल च मन हेलावल.

" बर दे एक दे " सुजल पॉकेट मधून पैसे काढत त्या मुला कडे नजर टाकत बोलला तस्स त्या मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला.त्याने पटकन हातातील एक बॉल सुजल समोर धरला. सुजल ने त्याच्या हातावर वीस रुपये टेकवले आणि त्याच्या कडून बॉल घेऊन बाजूच्या सिट वर ठेवला.तो मुलगा खुशीत तिथून पुढे निघून गेला.सुजल ला ही त्या मुला ला मदत केल्याचं थोड आत्मिक समाधान मिळालं.

ट्रॅफिक कमी झालं तस्स सुजल ने आपली गाडी पुढे नेली.

घरी पोहचला तेव्हा त्याला बाजूच्या सिट वर च्या बॉल ची आठवण झाली त्याने तो हातात घेतला व घरात आला.आई घरात दिसत नव्हती.सुजल सरळ आपल्या रूम मध्ये गेला.

त्याच्या हातातील बॉल पाहून श्रेया मात्र चवताळली,"

कशाला घेऊन आलास बॉल ? माझ्या जखमेवर मीठ चोळायला? तुझी आई काय कमी करते का ? जे आता तू ही सुरू झालास ?" बोलता बोलता श्रेया चे डोळे पाणावले.

" श्रेया काही ही काय बोलते ? वेडी आहेस का ? अग रस्त्यात एक गरीब मुलगा विकत होता बॉल खूप रिक्वेस्ट केली त्याने म्हणून घेतला मी बॉल..." सुजल श्रेया जवळ जात तिला समजावत बोलला.

" राहू दे काहीच बोलू नकोस " श्रेया गाल फुगवून च बोलली तिचं मन अस्वस्थ झालं होत तो बॉल पाहून.

सुजल ने ही तो हातातील बॉल तिथेच बाजूला फेकून दिला.

क्रमशः