तिसरा भाग - लकी कि अनलकी
आदित्य च्या घरी आनंद पसरलेला कारण सगळयांना मेघना आवडली होती आणि मुख्य म्हणजे आदित्यला आदित्य हि खूप खुश होता अशाच एके दिवशी आदित्य एकटाच बसलेला आणि गालातल्या गालात हसत होता त्याची हि चेहऱ्याची चोरी त्याच्या चुलत भावाने नंदन ने पकडली तो हि हसत हसत त्याच्या जवळ आला आणि त्याला पाहत म्हणाला
"काय आदित्य आता काय बाबा तुझी सोबत येणार मग आम्हला विसणार "
"नंदन ला आदित्य प्रेमाने भाऊ म्हणे "भाऊ तसं काही नाही आहे हा ती आली म्हूणन तुला विसरणार अशक्य आहे "
"हो का पाहूया "
तेव्हड्यात नंदन ची बायको तिथे आली "काय पाहतात मला पण सांगा "?
"अगं काही नाही नंदिनी मी ह्याला म्हणत होतो कि तू मेघना आली कि आम्हला विसरशील वैगेरे तर नाही म्हणतो "
"जाऊ द्या हो कसली मस्करी करतात पण खरंच मेघना खूप चांगली आहे आणि दोघांचा जोडा हि शोभून दिसेल आणि तुम्ही इथे बसून गप्पा नका मारू लग्नाचे घर आहे चला कामाला लागा "
असेच दिवस जात होते मेघना आणि आदित्यचे गुड मॉर्निंग पासून सुरु झालेले मेसेज रात्री गुड नाइट पर्यंत चालायचे मध्येच बोलणे हि व्ह्याचे मेघना ला आपल्या बदल असलेले प्रेम आदित्य ला जाणवत होते अश्याच एका संध्यकाळी त्यांनी भेटण्याचे ठरवले ते हि गुपचूप आदित्य ने कामावर उशीर होईल म्हणून सांगितले होते पण मेघना तशी बिंदास त्यामुळे ती नि घरी सांगितले होते
आदित्य लवकर काम आटपून कॅफे बिट मध्ये पोहोचला संध्यकाळी ५ वाजता ची भेटण्याची वेळ होती त्याने तिथे लवकर जाऊन एक सुंदर अशी बसण्यासाठी जागा निवडली आणि तो मेघना ची वाट पाहत होता एवढ्यात मेघना येताना दिसली
"अरे तू पोहचलास मला उशीर तर नाही ना झाला "?
"नाही नाही बस "तशी मेघना बसली
"बरं मेघना कॉफी कुठली ऑर्डर करू "?
"कुठलीही चालेल "
"बरं चॉकलेट विथ कॅपचिनो चालेल "?
"हो ती तर माझी आवडती आहे "
"काय माझी पण "असे म्हणत दोघेही हसू लागले गप्पा हि रंगात आल्या मेघना दिलखूलास आदित्यशी बोलत होती
"आदित्य खरंच मी खूप लकी आहे कि तुझ्या सारखा लाईफ पार्टनर मला मिळाला "
"नाही नाही एवढे माझं कौतुक नको करुस "
"नाही आदित्य खरंच पहा ना माझं मुख्य म्हणजे नाव नाही बदलणार दुसरा कोणी असला तर नाही म्हणाला असता पण तुझे विचार खूप वेगळे आहेत "
हे ऐकून आदित्यला मनातल्या मनात भीती वाटत होती कारण त्याच्या घरची परंपरा त्याला माहित होती जी तो बदलण्यास तयार झाला होता पण तो बदलू शकेल का ?
*****************