The Author Saru फॉलो करा Current Read The day we met... - 1 By Saru मराठी प्रेम कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books नियती - भाग 56 भाग 56आता अंधार पडायला आला होता... दोघीही तेथून निघाल्या....... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 22 हे ऐकून रोनितने मागून तिचे केस पकडले त्यामुळे श्रेया किंचाळल... पतंग खेळच बंद करावा पतंग खेळच बंद करावा? *अलिकडील काळात पतंगानं गळे... तू हवीशी मला ....... भाग 2 (प्रिया बद्दलच्या गोष्टी )कबिरची काळी suv कपूर मेन्शन समोर थ... अभ्यास कसा करायचा ? अभ्यास कसा करायचा?️... सातत्याने पडणारा प्रश्न, ज्या प्रश्ना... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Saru द्वारा मराठी प्रेम कथा एकूण भाग : 1 शेयर करा The day we met... - 1 2.4k 6.9k भाग १ आज तो परत दिसला . खर तर त्याचं दिसणं या दोन दिवसात जरा जास्त होत होत . तोच शांत चेहरा , त्याची एका हिरो ला पण लाजवेल अशी style . तीच नजर आज परत माझ्याकडेच पाहत राहिली होती. तीच माझी अवस्था त्याला पाहतच राहिले होते मी .त्याचे ते बोलके डोळे पुन्हा मला काही तरी सांगत होते पण मला ते आज वाचता येत नव्हते . तो म्हणजे माझ पहिलं प्रेम सौरभ. काही कारण नसताना पण नात्यात दुरावा येवू शकतो हे मला आज कळत होत . काही हि कारण नसताना आम्ही बोलण भेटणं सगळच अचानकच बंद केल होत . त्याचे दिसणे ही हळु हळू कमी होत होते . ते त्याला ही जाणवत होते पण ना तो बोला ना मी बोले . या दोन दिवसात त्याच अस अचानक येण खर या वेळी आवडत नव्हत . त्याची ती नजर ही मला आता त्रास देत होती . तो पहिलाही असाच घरा जवळच्या रस्त्यावरुन त्याची आवडती बुलेट घेऊन यायचा . त्यावेळेस त्या बुलेटच्या आवाजानेच हृदयात धडधड होत असे पण आज मात्र त्या आवजाचा प्रचंड राग येत होता . हे सगळ काय होतय हे मला कळत नव्हते . काही कामानिमित्त तो आला असेल अशी मी मनाची समजुत घातली . पण त्याच आजही त्याच वेळेला दिसण मन बैचेन करणार होत . आमच्या या दुराव्याला ३ वर्षे झाली . या ३ वर्षात तो एकदाही हि दिसला नाही . तो कुठे आहे काय करतो हे ही कोणालाच माहीत नव्हत . आमच्या नात्यातल्या अश्या दुराव्यामुळे मी पुरतीच खचले होते . काय कारण असेल आमच्या या दुराव्याच याच विचारात मी रात्र रात्र जागून काढत होते . या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या जीवनात खूप झाला . ते वयही नव्हतं माझ स्वतः ला सावरण्याच . खर तर ते वय प्रेम करण्याचही नव्हत . मी तनिष्का घरातील एकलुती एक मुलगी म्हणजे मला एक भाऊ आहे पण आमच्या घराण्यातील एकमेव मुलगी . काकांना दोनीही मुलच होती आणि आत्यालाही मुलचं . त्यामुळे माझे खुप लाड होत असे .शाळेत प्रथम क्रमांक पटकावण माझ्या नसातच भिडल होत . मुलांनपेक्षा हुशार आहेस असा डंका घरात नेहमी असायचा . अश्या या लाडावून ठेकलेल्या घरात मी वाढले .या सगळ्या विचारात मी माझी ती डायरी कधी हातात घेतली हे ही कळले नाही . वाऱ्यामुळे त्या डायरीची पान फडफडू लागली त्या आवजान मी विचारांच्या गर्दीतून बाहेर आले . हातातील डायरीच पहिल पान मी हळुच पलटल . तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशीच संपत माझ हे जग फक्त तुझ्या अवती -भोवतीच फिरतपहिल्याच पानावरच्या या चार ओळीतच मी भूतकाळात डोकाऊ लागले . या ओळी वाचल्या कि मला आमच्या दोघांची ती पहिली नजरानजर आठवली . मी आठवीत असताना शाळा बदलून त्याच्या शाळेत प्रवेश घेतला होता . नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनच स्वागत केल जात होत . या स्वागत कार्यक्रमाची सुत्र सगळी तो संभाळत होता . त्याच ते शेवटच वर्ष होत त्या शाळेतल म्हणजे तो दहावीला होता त्यानंतरच शिक्षणही होत तिथ तरीही त्याच ते शेवटच वर्ष होत . पांढरा कुर्ता परिधान करून तो आला होता . हातात काळ्या बेलट असलेल वॉच . पायात बुट , भली मोठी पण त्याला शोभेल अशी गोड स्माईल . पाहताच क्षणी त्याचा प्रेमात पडेल अशी त्याची style . झाल ही तसच मी त्यालाच बघत होते त्याच लक्ष नसावे अस मला वाटल म्हणून मी तसच त्याच्याकडे पाहत बसले . नवीन आलेल्या विद्यार्थ्यानाच स्वागत कॅडबरी आणि एक पेन देऊन केल जात होत . हे सगळा कार्यक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केल्यामुळे पेन , कॅडबरी पण त्यातील मुलच देत होती . हे समजल्यावर माझी आता देवाकडे प्रार्थना चालु झाली होती . प्लीज बाप्पा मला त्याच्या हातूनच कॅडबरी हवी आहे प्लीज प्लीज प्लीज ....आता माझा नंबर जवळ येत होता तस माझी प्रार्थनेचा वेगही वाढला होता . माझा नंबर आला पण तो तिथ नव्हताच तो दुसऱ्या कामात व्यस्त होता . माझा मूड सगळा खराब झाला पण त्या दिवशी बाप्पा ची साथ होती वाटत . माझ्या समोर असलेल्या मुलाने त्याला हाक मारली .सौरभ ये सौरभ हा पुढच्यां राहिलेल्या विद्यार्थ्याना तु दे ना - तो मुलगाहो आलो - सौरभआता मला चक्कर येऊन पडायच राहील होत आज बाप्पा साथ देत आहेत बघून मला वाटयला लागल वाह! देव पण आपल्याच बाजूने आहे .त्याच्या हातून कॅडबरी , पेन घेऊन मी माझ्या वर्गात जाऊन बसले . या सगळ्या विचारात मी एक गोष्ट विसरलेच त्याच नाव मला कळल होत . सौरभ भारी नाव आहे आणि तो ही . मी या सगळ्या गोष्टीत इतक हरवून गेले की मला हे सुद्धा आठवल नाही की मी माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत शाळेत आले आहे . विचारांच्या तंद्रीत असताना मागून मला कोणी तरी डोक्यात टपली मारली . मागे वळून पाहिल तर ती खोडकर शयतान जिवभावाची मैत्रीण .काय गं किती जोरात मारल . लागल ना मला - मी अरे येवढ्या जोरात मारल म्हणून तर तु विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलीस ना - सारामी आणि विचार करत होते काय पण काय बोलतेय - मी ( काही झालच नाही अस चेहरा करून विचारत होते )मॅडम , तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला - साराहो का मग सांग कोणत्या विचारात होते - मी( थोडे घाबरलेल्या आवाजात . )आपण पकडले तर गेले नाही ना . अरे मस्करी केली . एवढी का घाबरली - सारा अरे काय नाही असंच - मीमी मनात - हुश्श हि ला काय कळल नाही . तुलाच बघयाच होत ना बघ आता हिला कळल असत तर काय हालत केली असती हिन जरा जपुन रहा ना . पहिला तरी दिवस झालय , का नवीन शाळेत येऊन लगेच suspend होण्याची इच्छा आहे का . अचानकच आवाज झाला मी भूतकाळातून बाहेर पडले पाहिलं तर ती डायरी हातातून खाली पडली होती ....क्रमशः कस फुलतय प्रेम . साराला कधी कळत माझ्या मनात काय चालूय ते . तो उद्या पण त्याच वेळेस येईल का ? का येत असेल तो ?सगळ्या गोष्टी हळू हळू समजतील तुम्हाला असे च वाचत रहा आणि असाच support करत रहा कमेंट्स आणि स्टिकरद्वारे सपोर्ट करायला विसरू नका.. धन्यवाद 🙏🙏🙏 Download Our App