LIFELESS books and stories free download online pdf in Marathi

निष्प्राण


     "हेलो कुठ आहे? आणखी किती वेळ लागणार ?"
मोबाईल कानाला लावतच समोरून येणाऱ्या उत्तराची वाट बघत बसलेली ' ति' थोडी रागातच बोलत होती.

      "फक्त दहाच मिनिटे गं, बॅगेत पाण्याची बाटली आईने बनवलेलं काही खायला घ्यायचं राहून गेलं होत."

समोरून येणाऱ्या उत्तराने ' ति ' समोर बोलू लागली

      "थोड लवकर गं , ११:३० ची शेवटची ST आहे ती चुकवू नकोस म्हणजे झालं. वाट बघतेय लवकर ये, ठेवते फोन."
          बोलतच कानाला लावलेला मोबाईल डोळ्याच्या समोर आणून सुरू असलेला कॉल कट केला. मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या काचेत डाव्या बाजूला नजर फिरवली तर १०:४५ ची वेळ झालेली तिच्या लक्ष्यात आलं. आजूबाजूला नजर फिरवत आपल्या हातात असलेला मोबाईल बंद केलं. एका मागासलेल्या गावाच्या वेशीबाहेर बांधलेल्या ST STAND च्या ५ फूट उंच भिंतीच्या अमोरासमोर येजा करणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून बनवलेल्या लाकडी खूर्शिवर बसून ' ती ' आपल्या मैत्रिणीची वाट बघत बसलेली.
                  गाव मागासलेला असल्याने लोकांची येजा करणारी वर्दळ खूप मंदावलेली. कॉलेजमधून सुट्टी काढून ३ दिवसा आधीच गावी परतलेली ' निमा ' व तिची मैत्रीण शहरातील कॉलेजमध्ये शेवटचा पेपर असल्याकारणामुळे रात्रीचा प्रवास करून कॉलेजच्या परतीच्या मार्गाने जाणे हे तिला भाग ठरलं होत. रात्र बरीच झाली होती. दिवसभर गप्पा मारता मारता दिवस कसा क्षितिजाकडे निघून गेला काही कळलंच नाही. आता रात्री अपरात्री मैत्रिणीबरोबर प्रवास करणे हे तिच्यासाठी काही नवीन नव्हते. कॉलेजची सुट्टी सायं व्हायची म्हणून रात्रीचे प्रवास करून घरी परतायचे. गाव मागासलेला असल्याकारणाने ST च्या बसेस सुद्धा तिथून फार कमी प्रवास करायच्या. आपल्या मैत्रिणीला यायला उशीर होणार लक्षात येताच तिला आपल्या मैत्रिणीची वाट बघण्या व्यतिरिक्त दुसरं कोणताच पर्याय नव्हता. लाकडी खुर्शिवर वाट बघत बसलेली ' ती ' आता आपल्या आजूबाजूचा परिसर न्याहाळत लागली. उजव्या बाजूला नजर फिरवली तर रात्रीच्या अंधाराची गती थोडी कमी करत अंधारातच उभा असलेला काळ्या रंगाच्या खांबावरचा बल्ब बल्बची अवस्था दुरावल्याने फार कमी प्रकाश शिपंडत होता, त्या फिक्कट नारंगी रंगाच्या उजेडात तिच्यापासून 30 ते 40 पावलांच्या अंतरावर एक भलंमोठं ' उमरीच ' झाड आपल्या निरनिराळ्या हवेच्या झोक्यासरशी हेलकावे घेत असलेल्या फांद्याना पसरवत उभा होता, झाडाच्या खाली नजर गेली तर झाडाच्या बुंद्यावर एक गोलकर बसण्यासाठी कट्टा तयार केलेला, त्या गोलकार भागाच्या एका बाजूचे भाग अक्षरशः तुटून कट्टयासाठी लागणारा मालमत्ता ( सिमेंट, रेती, दगडाचे तुटलेले काही भाग ) इतरेतर पसरलेले होते. तेव्हढ्यात रस्त्याच्या डाव्या बाजूने येणारी एक चारचाकी वाहन सामान्य वेगात कर्णकर्कश हॉर्न वाजवत तिथून निघून गेली . तस तिच्या मनात एक विचार चमकून गेला. तशी ती थोडी अस्वथ झाली. मनात किंचित भीती दाटून येऊ लागली. तोच तिची नजर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आपल्या समोरच दृश्य न्याहाळू लागली. समोर काळोखाने माखलेल्या काळ्याकुट्ट निर्जन डांबरी रस्त्याच्य्या पलीकडे एक काळ्या रंगाची काळीभोर मांजर आपल्या किलकिल्या डोळ्यांनी एकटक तिच्याकडे पाहत होती. तिचे लाल तांबूस रंगाचे डोळे त्या भयान काळोखात आणखीनच गळद व भयाण वाटत होते. समोर तिला बघताच तिची किंचित असलेली भीती आता थोडी गळद होत चाललेली. तिच्या नजरेसह नजरानजर होताच तिची भीतीची गती आणखी जोर पकडू लागली. तिची नजर आता तिला साथ देत नव्हती. काळीज जोरजोरात धडधडत होत. साथ न देणारी नजर मंजरिकडे दुर्लक्ष करून डाव्या बाजूच्या दिशेने वळवली, तस तीच काळजाचं ठोकाच चुकला. मनात घर करून बसलेली भीती आता चेहऱ्यावर दाटून येऊ लागली. समोरच दृश्य बघून ' ती ' भीतीने पांढरी पडली होती. समोर एक काळीकुट्ट आकृती तिच्याकडे धावत येत असल्याचं तिला जाणवल तोच डोळ्याचं पात लावत न लावत ती आकृती क्षणात कूठेतरी नाहिशी झाली . तसं कसल्याश्या आवाजाने तीच लक्ष वेधून घेतलं ती थोडी भानावर आली. आवाज... कुणीतरी जोरात आपल्या दिशेने चालत येण्याचा आवाज... तशी ती आवाजच वेध घेऊ लागली, मनात नको नको ते विचार येत होते. तशी तिला आवाजाची चाहूल लागली,  आवाज तिच्या मागच्या बाजूने येत असल्याचं जाणवंल. तस ती आवाजाच्या दिशेने वळली तर एक भयाण काळ्या रंगाची आकृती तिच्या दिशेने धावत येताना दिसली तस डोळे बंद करून उघडले तर ती आकृती एक भयाण प्रकाराने तिच्यावर झेपावली तशी ती जागेवर उठून बसली. अंग पूर्त घामानं भिजलं होत. हातात असलेला मोबाईल खाली जमिनीवर पडला. मोबाइलच्या पांढरा स्क्रीनवर नजर गेली ११:३० वाजून गेलेले तिच्या लक्ष्यात आल. गावाच्या वेशीबाहेरचया रस्त्यावर नजर गेली तर तिची मैत्रीण तिथं आलेली नव्हती. एक अनामिक भीती तिच्या मनात घर करून जात होती. तशी ती आपल्या जागेवरून उठून खाली मोबाईल उचलण्यासाठी उभ उठून खाली वाकली तशी समोरच दृश्य बघत पुन्हा घुडघ्यांच्या आधार घेत खाली जमिनीवर बसली व पुन्हा गावाच्या वेशिवरच्या रस्त्यावर लक्ष गेलं.... पण तीच निष्प्राण झालेलं शरीर कुठेतरी शून्यात पाहत होत................

 

 

समाप्त

 

कथेचे © सर्व लेखकाच्या स्वाधीन

मित्रांनो ही माझी पहिली कथा आहे. कथेत काही सूचना असतील तर नक्की कळवा.🙏🙏

संपर्क :- bhaskarankit157@gmail.com

कथा कशी वाटली याचीही माहिती द्या. दर वेळी काही नवीन थरार लिहण्याची प्रयत्न करेन.जास्त काही विचार न करता आपण कथेचा आनंद घ्यावा.😊

धन्यवाद🙏

इतर रसदार पर्याय