रक्त पिशाच्छ - भाग 16 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

  • गोळ्याचे सांबार

    🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच...

श्रेणी
शेयर करा

रक्त पिशाच्छ - भाग 16

॥ रक्त पिशाच्छ ॥ भाग 16

छोठी मधु म.रा ताराबाईंच्या खोलीतुन बाहेर पडली , उड्या मारत- तर कधी स्वत:च्या हाताची बोट मोजत ती पुढे-पुढे जात होती. मधुच्या दोन्ही तर्फे खोल्या लागत होत्या- खोल्यांच्या दारांना वेग-वेगळ्या रंगाची काच बसवली होती. आणी सर्व दार बंद होती..त्या प्रत्येक दाराबाहेर एक गोल स्टूल ठेवला होता..स्टूलवर कुठे फुलदानी ठेवलेली,तर कुठे काचेच्या महागड्या वस्तू होत्या. खाली काळ्या-सफेद डिझाइनची विशिष्ट प्रकारची फरशी होती. त्यावरुन लहानगी मधु आपल्याच तंद्रीत चाललेली. की तेवढ्यातच तिच्या कानांवर एक ओळखीची हाक ऐकु आली.

"..मधु..! "

मधुने आवाजाच्या दिशेने पाहिल समोर यु:रुपवती होती.

" रुपाताई!" मधु जराशी गाळात हसली.

" काय ग ! आईसाहेबांच्या खोलीत गेली होतीस का?" यु:रुपवतींच्या ह्या वाक्यावर मधुला म.रा:ताराबाईंनी सांगितलेली ती गोष्ट आठ्वली.की माझ्याबदल कोणीही काही विचारल की -आम्ही आराम करत आहोत असं सांग!

" हा आहेत ना ? पन आईसाहेब विश्रांती घेत आहेत.!"

लहान मुल मोठयांनी सांगितलेल शब्द कसे बरोबर बोलतात नाही! म्हंणजेच आता हे पाहा ना ! महाराणींनी मधुला अस सांगितल होत की कोणीही आमच्याबदल विचारणा केली! तर आम्ही विश्रांती घेत आहोत अस सांग - परंतु हे वाक्य त्यांनी मेघावतीसमवेत काही गुप्त चर्चा करायची आहे त्या चर्चेत काही व्यत्य यायला नको म्हणुन म्हंटल होतं. आणी हे मला व तुम्हाला ठावुक आहे. परंतु हे मधुला ठावुक नव्हत की आपण खोट बोलत आहोत-नाहीतर आपण खोट बोलत आहोत हे पाहुन तिच्या चेह-यावरचे भाव बदलले नसते का? असो बस्स पुढे वाचा.

" काय? आईसाहेब झोपल्या आहेत ! " यु:रुपवती...म्हणाल्या.

मधुने फक्त मान हलवली.

" दुपार झालीये तरी आईसाहेब झोपल्या आहेत ? त्यांना बर तर वाटत नसेल ना? काय झाल असेल ? ठीके आपण आईसाहेबांची भेटच घेऊयात ! आणि जर त्यांना बर वाटत असेल तर दादा साहेबांच्या लग्नाच विषय ही काढू!"

यु:रुपवतींनी स्व्त:लाच मनोमन विचारल.

"बर मधु...!" यु:रुपवतींनी तिच्याकडे पाहील व पुढे म्हणाल्या.

" बाळ....ए तु आता!" रुपवतीच्या ह्या वाक्यावर मधु हळकेच तिचे ते सव्वीस सत्तावीस दात दाखवत हसली व पुन्हा आपल्याच तंद्रीत उड्या मारत पुढे निघुन गेली. तश्या यु:सुद्धा म:रा ताराबाईंच्या खोलीच्या दिशेने निघाल्या.

□□□□□□□□□□□□□□

" काय र मामा राहाजगड मंधी येऊन अस काय घडल ? की भस्म्यारावांच्या पुर्ण इद्येत घोळ झाला "लंक्याने आपल्या दोन्ही भुवया आकसल्या., एकटक संत्याकडे पाहू लागला.

" लंक्या, तुला आठ्वतय का? त्यो कृतांत मांत्रीक शेवटला काय म्हणाला व्हता.?"लंक्याने संत्याच्या ह्या वाक्यावर् आपले दोन्हीडोळे डावीकडून उजवीकडे फिरवले काहीवेळाने पटकन म्हणाला

" हा.. हा..हा..आठ्वल की! त्यो म्हणाला व्हता की पिरिम करु नको!"

" हा बराबर , आण तीच चुक भस्माराव करुन बसले. " अस म्हंणतच

संत्याने पुढे सांगायला सुरुवात केली.

" भस्माराव इथ राहाजगड मध्ये आले, इथ येऊन त्यांनी अजुन एका पोरीशी लगीन केला , जिच नाव व्हत शांतीनी..!

शांतीनी ही त्या कृष्णाच्या देवळातल्या पुजा-याची एकुलती एक पोर व्हती- तीचा बा म्हंजी त्या दगडाच्या मूर्तीचा ले मोठा भक्त व्हता..!

बाप पुजारी असल्याने पोरीच्यात बी बापाच गुण आलत..!

शांतीनी म्हंजी - रुपान एकदम अप्सरावानी..आण स्वभावान बी प्रेमळ , मनमिळाऊ,कधीही कोणाला उलट न बोलणारी! अश्या ह्य शांतीनीशी

भस्म्यारावांनी लगीण केल..! आण हळू हळू जस दिस जाऊ लागल..तस भस्म्याराव तिच्या स्वभावान मोहीत व्हऊ लागले...आपल्या

चांगल्या स्वभावाच पडका ती भसम्यारावांच्या बी स्वभावावर पाडू लागली..आण भस्म्याराव तिच्या पिरमात बुडून गेले.दिवसाचे आठवडे

झाले, आठवड्याचे मयने झाले - अशातच वर्षाची शेवटची तारीख बी कवा निघुन गेली..ह्याचा बी सुदीक पत्ता त्यांना लागला नाय. मंग कृतांत मांत्रीकान सांगितल्या प्रमाण भस्म्यारावांसमवेत ले इचीत्र वाईट परकार घडू लागले. " त्यांच्या सपनात नरक तर कधी पाताळ दिसु लागला.नरकातल्या लोकांच्या किंकाळ्या-ते इचीत्र भयाण मरणारी मांणस.तर पाताळातल देव त्यांची चाटणारी पाताळेश्वर सैनिक.त्यांच्या सपनात येऊन त्यांना " बळी दे-बळी दे.!माझ्या मालकाला शेवटचा बळी दे..! " अस घोग-या आवाजात म्हंणू लागली.

रोज-रोज येणा-या त्या सपनांन मुळ भस्मारावांना ले त्रास व्हऊ लागला..

दिवसभर ते कसल्यातरी चिंतेत बुडालेले असायचे, शांतीनीबाईंनी काय इचारल तर काय बी सांगत नव्हते.आण अशातच एका लाल चंद्राच्या आमुश्याच्या रातिला..भस्माराव अचानक वाड्यातुनअशे काही बेपत्ता झाले..! की कवा बी दिसले नाय !"

" आर बापरे मंग !" लंक्या विस्फारलेल्या डोळ्यांनीच उच्चारला , जणु त्याला पुढेही जाणून घ्यायच हॉट.

" पुढ जाऊन बी हा परकार थांबला न्हाई! भस्म्यारावांकडून शांतीनीला दिवस गेले व्हते- तिच्या पोटात भस्म्यारावांचा वंश व्हता. त्यांच रगत व्हत. लंक्या सैतान कधीच आपल काम अधुर ठेवत नसतु!" संत्याने एक गार कटाक्ष लंक्यावर टाकला व पुढे म्हणाले.

" बघता-बघता नऊ महिने उलटले व्हते..एकेदिवशी शांतीनीच्या पोटात कळा येऊ लागल्या..! उन्हाळचा महिना व्हता तो, पन आकासात हे ढग दाटून आलत. सोसाट्याचा वारा..जसा एक चार पायांच जनावर भक्ष्य दिसल की त्याच्याकड जीव तोडुन धावतय तसा वारा वाहत व्हता. आकासात पसरलेल्या काळ्या ढगांच्यात मयतात वाजणा-या फटाक-यांसारख्या इजा चमकत व्हत्या. जणु सैतानच पृथ्वीवर येतोय..

जन्म घ्याला आण तसंच झाल."

" तसंच झाल..म्हंजी..!" लंक्या न समजुन म्हणाला.

बोलताना त्याचे डोळे तोंड मोठे झाले होते..घसा एका अनामिक भीतीच्या छायेने सुखला होता.

लंक्याच्या ह्या वाक्यावर लुकडा संत्या आपल्या सुरकुतलेल्या चेह-यावरच्या कालपट ओठांवर कुत्सिक हास्य आणत म्हणाला.

" कारण शांतीनीन ज्या पोराला जन्म दिला व्हता, तो कोणी साधा पोर नव्हता..तर खुद्द सैतान व्हता सैतान..आण जसा त्या पोराचा जन्म झाला...! तस ती शांतीनी जास्त रक्ततस्त्रावा मुळ मेली. आण ती मरताच सैतानाला शेवटचा राहिलेला बळी मिळाला ज्यान त्याची इद्या..पूरी झाली..! पुढ जाऊन त्या मुलाच्या रुपात जन्म घेतलेल्या सैतानान.. ! अनिष्ठा देवतांना पुजणारी टोळी ऊभी केली.! आण जस काळ सरत गेला, सैतानाची फौज वाढतच गेली.बाप मेला की पोर पुढे तो वारसा सांभाळायचा अशातच जो तो स्वत:च्या वंशाचा दिवा पुढे सरकवु लागला...सैतानाची मदत करु लागला. "

लंकेशने एकटक सर्व गोष्टी ऐकून घेतल्या होत्या.. आणी त्या सर्व ऐकलेल्या गोष्टींमधल्या भयानक घटनांची चित्रफित कल्पनाशक्तिने डोळ्यांसमोर सादर होऊन जात सर्वअंगावरुन भयाचा उत्साहवर्धक सर-सरता काटा उभा राहत होता.

" ए लंक्या?..ए लंक्याऊ...?" लंकेश आपल्या विचारांत इतका गहाण बुडाला होता, की संत्या त्याला आवाज देत आहे हे सुद्धा ऐकू जात नव्हत.संत्याने लंक्याला एक दोन वेळा हाका दिल्या, परंतु तो हा नाही की हुं नाही! एका स्टेच्युसारखा जागेवरच थिजला होता तो.संत्याने हळूच त्याच्याकडे पाहत एक हात पुढे वाढवुन त्याच्या हाताचा चिमटा काढला..

" आहा..स्स्स्स! " लंक्याची तंद्री भंग पावली, तो आपला हात चोळू लागला.

" काय हाई मामा ?" लंक्या जरा खेकसुनच म्हणाला.

" आर पोहचलु की आपन! चल उतर!"

संत्याच्या ह्या वाक्यावर लंक्याने हलूच आजूबाजूला पाहिल. काहीवेळा अगोदर वेगाने धावणारी घोडागाडी..त्यासमवेतच घोडागाडीच्या मागे-पुढे लहान मुलांसारखी धावणारी झाड आता सर्वकाही थांबल होत. संत्या-लंकेश दोघांपुढे दहा-बारा पावलांवर कालजल नदी दिसुन येत होती.नदीत उतरल्यावर पाण्यातुन दहा-पंधरा पावळ थोड पुढे चालुन गेल्यावर नदीच दुसर टोक लागत होत. पुढे मोठ-मोठाली गर्द झाडी होती.त्या गर्द आणि मोठाल्या झाडांमुळे जमिनिवर सुर्याचा प्रकाश काही पोहचत नव्हता. ज्यानेपुढ़चा भाग कसा अंधारलेला श्रापीत वाटत होता.

" लंक्या..! "

" हं..!" संत्यामामाच्या वाक्यावर लंक्याने न समजुन हुंकार भरला

"आता जास्त येळ घालून चालणार न्हाई..! चल"

संत्याने लंक्याकडे पाहील व म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर लंक्याने फक्त आवंढा गिळुन हो असा इशारा करत मान हलवली-दोघेही पुढे जाऊ लागले.

□□□□□□□□□□□□□□□

एक -एक पाऊल पुढे सरसावर यु.रा:रुपवती आपल्या आईसाहेबांच्या खोलीच्या दिशेने निघालेली. खोलीचा दार म्हणायला बंदच होत.

यु.रा: दरवाज्यापाशी पोहचली, दारावर टक-टक करण्यासाठी तीने

आपला हात पुढे सरसावला होता. की तेवढ्यातच आतुन आवाज आला.

"शलाका आम्ही युवराजांच्या लग्नासाठी एक चांगली मुलगी शोधत आहोत.पन आम्हाला हवी तशी मुलगी मिळतच नाहीये "

" आम्ही समजलो नाही महाराणी!" शलाका न समजुन म्हणाली.

" आम्हाला.अस म्हंणायचय की तुमच्यात ते सर्वगुण आहेत जे आम्हाला आमच्या सुनेत दिसायला हवे आहेत. तुमच, बोलण, वागन , सर्वकाही."

यु.रा:रुपवतींनी आतुन आलेला हा आवाज ऐकुन स्व्त:चा हात जागेवरच थांबवला, हे शब्द ऐकुन त्यांना थोडासा धक्का ही बसला होता.रुपवती तिच्या दादासाहेबांच्या प्रेमविवाह बदल सांगण्यासाठी आल्या होत्या..परंतु इथे येऊन काही वेगळच चालल होत.

" परंतु महाराणी तुम्ही एकदा युवराजांना तर विचारा! त्यांच म्हंणन काय आहे!" युरा: रुपवतींनी आपला कान अजुन पुढे सरकवला.

" त्याची आवश्यकता नाही शलाका! आमची मुल आमच्या

शब्दांबाहेर नाहीत! आम्ही आमच्या युवराजाना ओळखतो. त्यांच कोणत्याही मुलीबरोबर बाहेर प्रेम वगेरे असण, अशक्य आहे ! "म.रा: काहिवेळ थांबून पुढे म्हणाल्या.

"मग काय म्हंणन आहे तुझ ? बनणार का आमची सुन ! "

महाराणींच्या वाक्यावर शलाकाच्या गालांवर लाली पसरली, लाजेने चुर चूर झालेली तीची मान खाली गेली होती.आणी हाच तीचा होकार होता! महाराणी हळुच तिच्या दिशेने पुढे सरसावल्या तिच डोक वर केल...गोरेपान गाल लालसर झाले होते. ओठांवर मंद हसु पसरल..होत हातांच्या बोटांशी चाला चालला होता...डोळे-डाविकडुम उजवीकडे फिरत होते.

" काय ग ! लाजलीस का काय? " म.रा :ताराबाई हसतच म्हणाल्या.तसे त्यांच्या ह्या वाक्यावर शलाकाने त्यांना थेट मिठीच मारली.

"शलाका -पोरी." म.रा: ताराबाईंनी हलकेच शलाकाच्या डोक्यारुन हात फिरवला." तुम्ही आता घरी जा! आणि आम्ही जे काही बोललो आहोत..ते तुम्ही एकदा आपल्या वडिलांनाही सांगा!"

शलाकाने फक्त होकारर्थी मान हलवली...खाली वाकुन पुन्हा म.रा: ताराबाईंचा आशिवार्द घेतला-हस-या चेह-यानेच दरवाज्याबाहेर पडल्या.

शलाका बाहेर येत आहे हे समजताच , दरवाज्याबाहेर असलेल्या युज्ञी: बाजुलाच एका स्टूलमागे लपून बसल्या.शलाका थेट आजूबाजूला न पाहत निघुन गेली. तिच्या चेह-यावर जो आनंद पसरला होता तो अद्यापही झळकत होता. आणि का नाही झळकणार? राजघराण्यात सुन होण्याच सुख जे तिला मिळणार होत. शलाका निघुन जाताच

युज्ञी रुपवती बाहेर आल्या, त्यांच्या चेह-यावर चिंतेची छ्टा ऊठून दिसत होती.आपल्या दादासाहेबांना दिलेल वचन त्या पाळणार होत्या का?

मेघावती यु.रा:सुरज ह्या दोघांच प्रेम जुळणार होत का? त्यांच्या बाळाच काय होणार? न्याय मिळेल का त्याला? युज्ञी: रुपवतींच्या कानांत राहून-राहुन तिच्या दादासाहेबांच एकच वाक्य घुमत होत.

" जर आमच लग्न मेघावती समवेत झाल नाही तर आम्ही आयुष्यभर लग्न करणार नाही !"

" नाही ! आम्हाला आईसाहेबांशी बोलायलाचं हव!" स्व्त:च्या मनाशी अस म्हंणतच रुपावतींनी निर्धार केला.त्या म.रा:ताराबाईंच्या उघड्या दरवाज्यातु खोलीत आल्या. युज्ञी:रुपवतींना पाहून लागलीच महाराणी म्हणाल्या.

" या युवराज्ञी बर झाल तुम्हीच आलात. ते आम्ही तुमची भेट घेण्यासाठी येणारच होतो.आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे!"

" आम्हाला ठावुक आहे आईसाहेब तुम्हाला आमच्याशी काय बोलायचं आहे! " परंतु त्या अगोदर आमच संभाषण ऐकुन घ्या." महाराणींच्या चेह-यावर जरा गंभीर भाव पसरले व त्यांनी मानेनेच होकार दर्शवला.

तसे युवराज्ञींनी तोंडावाटे एक मोठा श्वास आत भरला व तो बाहेर सोडुन बोलु लागल्या.

□□□□□□□□□□□□□□

राहाजगडच्या सीमेवर एकुण पंन्नास सैनिक उभे होते. त्यांच्या पाच रंगा बनवल्या होत्या -म्हंणजेच एका एका रांगेत एकुण दहा सैनिक हातात भाले ,तलवार अंगाला-चिळ्खत-लावुन उभे होते.सैनिकांपुढे एक घोडागाडी ऊभी होती...त्या घोडागाडीत महाराज..त्यांच्या बाजुला रघुबाबा-आणि घोडागाडीचा चालक बनुन संत्या बसला होता.घोडागाडी बाजुला दोन घोडे उभे होते.एक काळा दुसरा तपकीरी.काळ्या घोड्यावर यार्वशी प्रधान बसले होते...आणी दुस-या तपकीरी घोड्यावर कोंडूबा बसला होता.

" महाराज निघायच म्हंतु म्या जास्त येळ घालून चालणार न्हाई..! आपल्याला सूर्य अस्ताला जायच्या अगोदर त्या तळघरात पोहचायच हाई !आण आत जाऊन ती पेटी बी बाहेर काढायची! " रघु बाबा आपल्या धार-धार आवाजात म्हणाले. " ठिक आहे !" महाराजांनी प्रधानजींकडे पाहील व म्हणाले.

" सैनिक तैयार आहेत?"

" व्हय महाराज, तैयारच आहेत की !" विचारल प्रधानजींना होत..परंतु म्हणाला कोंडूबा होता. त्यांच्या ह्या वाक्यावर यार्वशी प्रधानजीं न चिडता फक्त होकार्थी हसले.तसे इकडे एका सैनिकाने हातात तुतारी घेतली.. तिला तोंड लावुन छाती फुगवुन श्वास घेतला..आणी सोडत रनशिंगासारखी तुतारी फुंकली. एकापाठोपाठ पन्नास सैनिकांनी हातातला-भाला जमिनीवर आपटला-तलवारी आकाशाच्या दिशेने वर उचल्ल्या - आणि इकडे संत्याने घोड्याच्या पाठिवर एक हाताचा हलकासा फटका बसवला तसा तो घोडा खिंखाळतच जंगलाच्या दिशेने निघाला, त्याच्या मागोमाग - यार्वशी -कोंडूबा आणि मागुन सैनिक धावत येऊ लागली.

□□□□□□□□□□□ʼ□ʼʼ

संत्या मामा त्याचा भाचा लंकेश, दोघांनीही अखेर ती गुहा शोधली होती ज्यात तो द्रोहकाल रक्तपिपासु सैतान आपल्या गह-या निद्रेत झोपला होता. गुहा शोधून ते दोघे आत आले.

" इच्यामायला ! बाहेर न गुहा आण आत तळघर !" लंक्या आश्चर्यकारकपणे पुढे पाहत म्हणाला. त्याच्या डोळ्यासमोर एक तळघर दिसुन येत होत. तळघराला आधार असलेल्या दगडांच्या गोल -चौकोनी खांबांवर खुप सा-या पेटत्या मशाली अडकवलेल्या होत्या. जेमतेम वीस-तीस मशाली होत्या त्या. त्या तांबड्या मशालींच्या उजेडात खाली तळघरात गुढघ्यांन इतक पसरललेल धुक दिसत होत. बाहेर गरम आणि आत तळघरात मात्र हाड गोठावणारी थंडी पहुडली होती.

तळघरात खाली उतरण्यासाठी दगडांच्या एकूण वीस पाय-या होत्या.

पुढे लंकेश -त्याच्या मागे संत्या मामा अस करुन ते दोघे त्या पाय-या उतरुन खाली आले.

" जाम थंडी हाय रे मामा!" लंक्याने आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळले.बोलताना त्याच्या तोंडातुन वाफा निघत होत्या.

" शुश्श्श्श..! " संत्या मामाने तोडावर बोट ठेवल." ती कबर शोध ?"

संत्या मामा इतकेच म्हणाला.हे वाक्य उच्चारताना त्याच्या चेह-यावरचे भाव जरासे विलक्षण भीतीदायक होते. संत्या अस म्हंणतच दोघांनाही ती कबर शोधायला सुरुवात केली. त्या दोघांच्याही नजरेस फक्त पांढरट धुक दिसत होत..बस्स! आजूबाजूला काही झाड-वेली होती...त्या वेल्यांनी बाजुला असलेल्या मोठ्या दगडांना आपल्या बाहुपाशात गुंडाळल होत. संत्या मामा लंक्या दोघेही मशालींच्या तांबड्या उजेडात तळघरात त्या कबरीचा शोध घेत होते. परंतु धुक, मोठ-मोठाल्या दगडां व्यतिरिक्त तिथे काहीही नव्हत.

" आर ए मामा ! कुठ हाई ती देवाची कबर ? आबानी सांगीतलेलीच गुहा हाई ना ही? " लंक्याने संत्या मामाकडे पाहतच हे वाक्य उच्चारल.

" गुहा तर तीच हाई ! पर दाजींनी सांगितल्या परमान, देवाची कबर मात्र हित न्हाई !" संत्या धुक्यात आजूबाजूला पाहत म्हणाला.

" अरे मामा !" लंक्या काहीतरी आठवल्यासारखा उच्चारला.

" आर आबा कोणत्या तरी भटाबदल बोलत व्हते बघ? ज्याच्यापासन

देवास्नी धोका हाई -काय नाव त्याच ?" लंक्या संत्या दोघेही आठवु लागले -की तेवढ्यातच त्या तळघराल्या वरच्या अंधारातुन एक थंड घोगरा आवाज आला.

" रघु भट्ट का ? "

□□□□□□□□□□□□□□□

महाराज-महाराणींच्या खोलीतल्या खिडकीत युवराज्ञी रुपवती पाठमो-या उभ्या होत्या.दोन्ही हात खिडकीच्या चौकटीवरठेवले होते. बाहेरुन येणा-या गरम हवेने डोक्यावरचे काळे केस मागे उडत होते. त्यातच चेह-यावर जरासे गंभीर भाव होते. त्यांच्या मागे पलंगावर महाराणी बसल्या होत्या.काहीतरी दुखी कहाणी ऐकल्यासारख त्यांच तोंड मळुल होऊन पडल होत.

युवराज्ञीने एक गिरकी घेतली , आपल्या आईसाहेबां शेजारी येऊन हळुच पलंगावर बसल्या !

" आईसाहेब..! हे सर्व ऐकुन तुम्हाला वाईट वाटलं असेल तर आम्हाला क्षमा करा! परंतु हेच सत्य आहे! की दादासाहेबांच त्या मुलीवर खुप प्रेम आहे. "

" परंतु हे अस प्रेम असत का ! लग्नाअगोदरच ती गरोदर असावी ?ह्याला प्रेम नसुन वासना म्हंणतात " महाराणी ताराबाईंचा स्वर जरासा चढला होता.

" हे पाहा आईसाहेब ! रागावुन काहीही साध्य होणार नाहीये ! त्याउलट आपल्याला ह्या समस्यावर काहीतरी तोडगा काढायला नको का"

" काढला असता ना तोडका ! एकवेळ तिचे वडील काय काम करतात हे विसरून, महाराजांनी तिच्यासमवेत युवराजांच लग्न लावुन ही दिल असत ! परंतु लग्ना अगोदरच ती गरोदर आहे , ह्यावरुन त्या मुलीच स्वभाव -संस्कार कळतं की ती कशी असावी- !" महारानी पुन्हा रागातच म्हणाल्या व हळुच पलंगावरुण उठल्या दोन तीन पावल चालून खिडकीच्या दिशेने गेल्या.

"आम्हाला कळतंय आईसाहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. " युवराज्ञी सुद्धा पलंगावरुन उठल्या एक कटाक्ष त्यांनी म.रा: ताराबाईंच्या दिशेने टाकला पुढे म्हणाल्या. " आईसाहेब ! तुम्ही जेवढ त्या मुलीला दोष देत आहात ना !तेवढच त्यात दादासाहेबांच दोष नाही का? जर त्या दोघांनी एकमेकांवर लहानपणापासुन प्रेम केलय तर ते वयात आल्यावर आणखीणच बहरणार नाही का? मुळातच प्रेम म्हंणजे एक सुप्त आकर्षणहिंत भावना आहे -प्रेमात जर वासनांच नसेल , तर ते प्रेम फक्त नावापुरत असतं-जेव्हा दोन शरीरांच मिळण होत-तेव्हा ते प्रेम एकमेकांना वाटणारा आपुलकीचा सहवास, ती भावना, सर्वकाही द्विगुणीत होतं वाढत जातंन !" युवराज्ञी रुपवतींच्या प्रश्णांच उत्तर महाराणींकडे नव्हतच -त्यासवेतच युवराज्ञींचे मोलाचे विचार ऐकुन त्यांचे डोळे उघडले जात होते.

" आईसाहेब ! मला एक सांगा ? " युवराज्ञी म्हणाल्या. परंतु म.रा:ताराबाईंच लक्ष मात्र पुढेच होत.

" तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात ना ? मग कोणतीही स्त्री आपल शरीर एका परपुरुषाच्या स्वाधीन असंच करेल का? नाही ना ! " युवराज्ञींच्या वाक्यावर म.रा:ताराबाईंनी वळुन त्यांच्याकडे पाहील."आईसाहेब ! प्रत्येक स्त्री आपल शरीर त्याच पुरुषाला समर्पित करत असते! ज्या पुरषावर तिच अतोनात प्रेम ,अतुट..कधीही न तुटणारा विश्वास असेल.आणी तेच त्या मुलीने केल.कारण तिचा आमच्या दादासाहेबांवर विश्वास होता. आणी तुमच्या मते जर का ह्या सर्व घटनेत तुम्ही त्या एकट्या मुलीलाच दोषी ठरवले असेल! तर तो दोष चुकीचा आहे...कारण टाळी कधीच एक हाताने वाजत नसते तसंच ह्या बाबतीत आहे.जर दोष कोणाचा असेल तर त्या दोघांचा आहे. स्वभाव अश्लील, वासनेने , नढलेला असेल तर तो दोघांचा आहे.समाजात नेहमी स्त्रीलाच वाईट म्हणून संबोधल जात तीची चुकी काढली जाते तिला नाव ठेवली जातात "

" बस्स युवराज्ञी बस्स!" महाराणींनी आपली मान खाली घातली -त्यांचा तो चढलेला क्रोधिहिंत स्वर आता मावळला होता.

" माफ करा आईसाहेब ! आम्ही जरा जास्तच बोल्लो !"

युवराज्ञी जरा हळक्याच स्वरात म्हणाल्या. माघारी वळुन दरवाज्यातून खोलीबाहेर जायला निघाल्या.

" थांबा युवराज्ञी !" मागुन म.रा:ताराबाईंचा आवाज आला. आवाजासरशी युवराज्ञी जागेवरच थांबल्या , त्यांनी महाराणींकडे वळुन पाहील.

" तुमच्या विचारांनी आमच्या अहंकाराला -रागाला आमच्यापासुन दुर हिबाळले आहे! आणि तुमच्या प्रश्णांनी आम्हाला अस काही वठनीवर आणल आहे , की ते प्रश्न नसुन नाही त्यांच उत्तर आमच्याकडे आहे, परंतु काहीक्षण आम्हाला ते प्रश्ण एक मोलाचा सल्ला वाटु लागला आहे.

खरच आम्ही अहंकाराने जरा जास्तच बोल्लो ! माफ करा आम्हाला.!"

महाराणींनी अस म्हंणतच आपले हात जोडले.

" नाही आईसाहेब ह्यात तुम्ही माफी मागु नका! " युवराज्ञींनी पुढे होऊन

आपल्या आईसाहेबांचे हात पकड़ले. " अहो चुकी कोणाकडून होत नसते, साक्षात भगवंत ही चुकतो-मग आपन तर मणुष्य आहोत."

क्षणात महाराणींच्या मेंदूची एक नस छेडली गेली.त्यांना हेच वाक्य कोठेतरी ऐकल्यासारख वाटल आणि पुढच्याक्षणाला ते आठवल ही.

ज्यावेळेस ते इंग्रज पाव्हणे महालात येणार होते हे महाराणी विसरल्या होत्या -त्याचवेळेस महाराज असे म्हणाले होते. एकक्षण म.रा:ताराबाईं अस वाटलं की आपण महाराजांशीच बोलत आहोत.आणी हे कटु सत्य होत की युवराज्ञींचा स्वभाव आपल्या पित्यावर गेला होता.त्यांचे ,गुण- बोलण, विचार करण्याची पद्धत सर्वकाही. फक्त युवराजांचा स्वभाव महाराजां वर न जाता आपल्या आईसाहेबांवर गेला होता बस्स.

" मग आता पुढे काय करायचं! " म.रा: ताराबाई म्हणाल्या.

" सर्वप्रथम आपल्याला शलाकाची भेट घ्यावी लागेल!" युवराज्ञी म्हणाल्या.

□□□□□□□□□□□□□□□

रामु सावकाराच्या वाड्यात आज जरा जास्तच आनंदाचा पाऊस पडला जात होता. शलाकाने घरी आल्या -आल्याच आपल्या बापाला म्हंणजेच रामु सावकाराला ही आनंदाची गोष्ट कळवली होती. रामु सावकार

ती ऐकुन तर जाम खुश झाला होता -हे त्याच्या चेह-यावर पसरलेल्या हास्याने समजुन येत होत.

" वा...वा..शालुबाई!..म्हंजी तुम्ही राणी होणार बघा राहाजगडच्या.

पाहिलत का ढमाबाई- आमची लेक सुन व्हणार राहाजगडच्या राजघराण्याची.!" झोपाळ्यावर बसलेल्या रामु सावकाराच्या वाक्यावर बाजुला उभ्या ढमाबाईने हळकेच तोंडात एक पान कोंबला , मचाव -मचाव करत लाल दात दाखवत आवाज न करता हसु लागली.

"म्या काई म्हंतु शालूबाई ! आता तुम्ही राझघराण्याच्या सुनबाई व्हणार

म्हंजी तुम्हाला लग्णाला दाग-दागिन लागतील- आण माझ्या नातवंडाना."

"आबासाहेब , तुम्ही जरा जास्तच पुढच विचार करताय!"

शलाकाच्या गालावर पुन्हा लाली पसरली, कपालावर आलेले एक-दोन केस तीने हळुच बाजुला सारले.

" अहो ढमाबाई- बघा की कोणतरी लाजतय म्हंणायच!"

रामु सावकाराने पुन्हा एकवेळ मचाव मचाव करत पान खाणा-या ढमाबाईंकडे पाहिल. शलाकाने एकवेळ गोब-या गालांवर आलेल्या त्या

लाले लाल लज्जास्पद स्मित हास्यानेच आपल्या आई-वडिलांकडे पाहिल,व थेट लाजतच जिन्यावरुन दुडु-दुडु धावत पायांतल्या पैजणांचा छम-छम आवाज करत खोलीत निघुन गेली.

□□□□□□□□□□□□□□□

त्या तळघरातल पसरलेल्या मळकट पांढरट धुक्याच्या झुळकांच्या थंड स्पर्शांसहित तो घोगरा आवाज त्या दोघांच्या कानांत घुसला.एकसेकंद जसा तो आवाज आला , त्याचक्षणी अगदी जलद गतीने ही पुढील घटना घडली...! लंक्या संत्या मामा दोघेही आवाज कोठुन आला ह्याचा कानोसा घेत जागेवर उभे होते , आणी त्या दोघांच्याही डोक्यावर तळघरातला अंधारा भाग होता... एक दोन सेकंद त्या अंधारात कसलीही हालचाल झाली नाही , पन तिस-या सेक्ंदाला... अचानक दोन हिरवट जहरी-पाश्वी डोळे त्या अंधारात चमकले -आणि ज्यासरशी ते डोळे चमकले त्याचक्षणी वरुन अंधारातुन एक सहा -सात फुट चौकलेटी रंगाची कबर वेगाने त्या दोघांच्याही पुढ्यात येऊन जमिनीवरचा पाला-पाचोला धुळ उडवत मोठ्या अवाजासहीत आदळली.

" अय्यो ! "

संत्या मामाने थेट लंक्याच्या कडेवरच एका लहान मुला प्रमाणे उडी घेतली, त्याच्या खांद्यालाच बिलगून राहिला. झालेल्या प्रकाराने दोघेही घाबरले होते.चेह-यावर त्या एन थंडीत सुद्धा घाम पसरला होता जो की त्या मशालीच्या तांबड्या उजेडात चांदीसारखा चमकत दिसुन येत होता.

" म..म...मामा ! आ...आ..आर..ही पेटी वरुन कशी काय पडली र? "

तोंडाची समंध शरीराची वाचा बसलेल्या मोडक्या तोडक्या शब्दांत का असेना लंक्याने आपले मत मांडले होते.

" काय माहीत लंक्याऊ ! पन पेटी भेटली ना , ते बर झालं ! चल लवकर पेटी घेऊन बाहेर पडू!"

लंक्याच्या कडेवर बसलेला संत्यामामा म्हणाला. त्याच्या वाक्यावर त्याला कडेवर घेऊनच लंक्या पुढे-पुढे जाऊ लागला.एक दोन-पावल चालली तसा त्याला खांद्यावरच भार जाणवु लागल.

" ए मामा !" लंक्याने अस म्हंणत संत्या मामा कडे पाहील. " चम्पा पायजे -चौकलेट पायजे बाळाला!" एका लहान मुलाशी बोबडा बोलण्याप्रमाणे.. लंक्याच्या ह्या वाक्यावर संत्या मामा

दात विचकत हसला -आणि डोक हो असा इशारा करत हलवणार की तोच लंक्याने त्याला खांद्यावरुन निआधार करत खाली सोडल-धप्प आवाज होत संत्या मामा जमिनीदोस्त झाला.

" आलाय मोठा चाकलेट, खाला !"

लंक्या स्व्त:शीच पुटपुटला, पुढे कबरीच्या दिशेने जाऊ लागला.मागे संत्या मामा पाठ चोलतच जमिनिवरुन उठला व लंक्याच्या क्रियेच जागेवर उभ राहुनच निदर्शन करु लागला.

एक -एक पाऊल वाढवत लंक्या कबरीच्या दिशेने पोहचला -तिच निरिक्षण करु लागला. चौकलेटी रंगाची अगदी पॉलिश केलेली लाकडी कबर होती ती-

" ईच्यामायला ही कबर येवढ्या वरणखाली पडली , तरीबी हीला काय झाल कस नाय? ना खालची माती चिकटलीया , नाही लाकूडफाट्याचा

दगा झालाया ?" लंक्याने स्व्त:लाच प्रश्ण केले.

" ए मामा उघडून पाहायची का पेटी?" लंक्याने मागे वळुन पाहिल , आणी ज्यासरशी त्याने आपली मान मागे वळवली त्याचक्षणी वरुन अंधारातुन काहीतरी खालच्या दिशेने झेपावल-खाली जमिनीला ते जे काही होत त्याच्या पावलांचा स्पर्श होताच धप्पकन आवाज झाला.

लंक्याने तो आवाज ऐकला होता लक्ष मात्र संत्या मामाकडे होत,मागे जे काही उभ होत..त्याच्या आकारापासुन चेह-यापासुन जिवंत आहे , की मृत आहे ह्या सर्वांपासुन लंक्या अजाण होता...परंतु संत्यामामाच काय ?शेवटी लंक्याच सर्व लक्ष संत्या मामाकडेच होत.त्याच्या बदलणा-या चेह-यावरच्या भावनेच्या छटांवरुन तो काहीतरी तर्क लावु शकत होता ना? कारण संत्यामामाच लक्ष तर पुढे होत.

संत्यामामाच चेहरा भीतीने अक्षरक्ष कालवंडला होता. स्टेच्युसारख शरीर जागेवर थिजल होतं.जबडा असा काही आ वासलेला की गंज लागल्या प्रमाणे त्याची हालचाल होत नव्हती. डोळ्यांतल्या विस्फारलेल्या त्या पांढरट बुभळांत काहीतरी हालचाल आकार दिसत होता. लंक्या तो आकार पाहु शकत होता.पुर्णत राखाडी रंगाच उघड शरीर - खाली दोन झापांच पांढरट धोतर. डोक्यावर लुसलुशीत एक ही केस नसलेल टक्कल-जी की मशालींच्या उजेडात चमकत होती. नजर खाली जमिनिकडे टक लावुन पाहत आहे. ज्याने चेहराकाही दिसुन येत नव्हता. पांढरट मृत मेलेल्या प्रेतासारखी त्वचा, आणी ते हात शरीराला चिकटले होते.सावधान पवित्र्याप्रमाणे. तळघरातल्या वातवारणात कडाक्याची शांतता पसरली होती- कधीही न अनुभवलेली शांतता.

तरंगा-तरंगांनी पांढरट धुक्याचे पुंजके मुद्दामुन आपली हजेरी त्या ध्याना पुढे लावत होते.तळघरात असलेल्या वेलींवर बसलेला तो तपकीरी रंगाचा व काळ्या डोळ्यांचा सर्प -क्षणा-क्षणाला जीभ बाहेर काढुन पुढील त्या तीन आकृतींकडे पाहत होता. त्यातली शेवटची आकृती म्हंणजेच संत्या जो की पुढे पाहत होता.आणी त्याच्या पुढे असलेली आकृती म्हंणजेच लंक्या. त्याच्या शरीराची हालचाल होत-होती.कमरेपासुनच शरीर मागे वळण घ्यायला सुरुवात करत होत-अगदी मंद गतीने.

लंक्याने एकदाच वळुन समोर पाहील. पाताळातला क्रूर वेताळ देव कस दिसावा ! सेन हुबेहुब तसंच होत ते पिशाच्च ! फक्त फरक येवढ़च होत , की डोक्यावर पांढरट वाढलेले केस नसुन , टक्कल होती.

" को..को..कोण हाईस तु!" लंक्याने त्या विचित्र पिशाच्चाला प्रश्ण केला. तसा त्या प्रश्णावर त्या पिशाच्च ध्यानाने हळकेच आपली मान-वर घ्यायला सुरुवात केली , त्याच्या होणा-या ह्या हालचालीसरशी मानेतला मनका कट-कट आवाज करत वाजु लागला. जणु एका मुर्द्यासारखी हाड गोठली होती की काय? एक मोठा हाड तुटावा तसे(कट ) आवाज झाला , त्या विचित्र पिशाच्चाने आपल्या हिरवट डोळ्यांनी लंक्यावर एक कटाक्ष टाकला -जबडा विचकुन त्यातले ते काळपट-पिवळे मसेरी लावल्यासारखे दात दाखवत , हात तोंडावर ठेवत फ़िदिफ़िदि येड्यावाणी हसु लागला.

" मालकास्नी घ्याला आलाव का ? मंग मला पन घेऊन जावा की, इथन लेय उकडतुया आतमंधी ,फिफिफीफीफी!"

तो घोगरा आवाज त्या दोघांच्याही कानांत घुमला - भीतीने लठ-लठ काफर भरायला सुरुवात झाली.

इकडे बाजुलाच इतकावेळ वेलीवर बसुन तमाशा पाहत बसलेला तो सर्प हालचाल करत वाकडे-तिकडे वळन घेत त्या तिघांच्याही मधोमध समोर आला ! लवचिक शरीराची विशिष्ट प्रकारे हालचाल करत डोकवर केल.

" ए म्हाता-या ! पळ-पळ इथन..! तुझ्या आxxxला तुझ्या !"

अमानविय शक्तिच काय अविश्वसनीय चमकत्कार म्हणावा ह्याला. त्या सरपटणा-या सर्पाच रुप घेऊन बसलेल व त्याच बारीकचस तोंड विशिष्ट पद्धतीने हळवत त्यातुन किन्नरी आवाज बाहेर पडत ते पिशाच्च बोलत होत.

" फ्स्स !" पुढच्याक्षणाला त्या सर्पाने आपल डोक त्या म्हाता-याच्या पायावर डसण्यासाठी आपटळ.. तसा तो म्हातारा पिशाच्च तोंडावर पाचही बोट मारत एका खुळ्यासरखा बोंबळत अंधारात पळाला, पळताना त्याच ते पांढर धोतर सुटल तेच तो हातात घेऊन एका गदळ्याखुळ्या सारखा धावत अंधारात गडप झाला.

तो म्हातारा पिशाच्च जाताच , त्या सर्पाभोवती लहान-लहान चमकीली लाल सूक्ष्मकण घिरट्या घालु लागली, त्या सूक्ष्मलहरींनी पाहता -पाहता एका मानवाच्या काये इतपत वरहात आपल घिरट्या घालन चालुच ठेवल. संत्या-लंक्या दोघांनीही आजता-गायत आपल्या उभ्या आयुष्यात असा प्रकार पाहिला नव्हता.ते फक्त ऐकुन होते.सैतानाबाबत ऐकुन होते..कल्पनाशक्तिने त्याच रुप घडवल होत तेच ते जाणुन होते.

पन ख-या आयुष्यात काय? मानवाच जग हे मानवा पुरतच मर्यादित आहे का? ह्या अखंड पृथ्वीवरच्या शेवटचा जमिनीचा भाग जेव्हा संपेल अंत पावेल ! तेव्हा पुढे कशाची सुरुवात होईल? सूर्य असताला गेल्यावर

जो अंधार ह्या पृथ्वीतलावर एका काळभोर पटलासारखा वावरायला सुरवात करतो - त्या अंधारात न जाणे कित्येक गुढ कित्येक हजारो लाखों वर्षांपासून आस्तित्वात आहेत त्याची प्रचिती मानवाला आहे का?

लंक्याने स्वत:च्या पित्याला वाड्यात न जाने कित्येकवेळा जादूटोणा करताना पाहिल होतं...त्याच्या मते ती पुजा ती विधी येवढच काय ते एका सैतानी समर्थकाला कराव लागत अशणार अस नेहमी वाटत आल होतं. म्हणुनच तो स्व्त:ला एका सैतानाच समर्थक मानत होता! परंतु त्या सैतानाला त्याने अजुन पाहिल नव्हत -त्याची खरी चाकरी अजुन सुरु केली नव्हती -एकप्रकारे तो अज्ञानात होता असंच समजा. परंतु आज आता ह्याक्षणी त्याने जे दृष्य उभ्या डोळ्यांनी पाहिल..त्यावरुन त्याला त्या अमानविय तिमीर शक्तिची प्रचिती आली.ह्या मानवी जीवनापल्याड जे काही अंधारात वावरत असत, ज्याला ना स्व्त:च रुप आहे ठाव...जिथे मिळेल तिथे ते आपल ठाव बसतान मांडत.वर्षानुर्ष त्या जागेत एका कोंदट हवेसारखा अंधा-या कोप-यात सावजाच्या लालसेने घुटमळत राहत.

" मालकास्नी न्ह्याला ! आलाव का स्स्सस्स्स्स!"

त्या लाल रंगाच्या धूलीकणांच आता जागेवर एक सहा फुट गोल भवंडर भिंगत होत. तो साप आता तिथे दिसत नव्हता -दिसत होतं ते फक्त ते गोल-गोल भिंगणार लाल भवंडर -आण त्या भवंडर मधुन जसा किन्नरी आवाज बाहेर पडत होता तसा तो लाल रंग अजुनच प्रकाश प्रजवलित करत बाहेर फेकत होता. तो वा-यासारखा आलेला हुकमी स्वर , त्या दोघांनीही ऐकला -कमालीची जरब होती त्या आवाजात. की मागे थर-थर कापत बसलेला संत्यामामा ही दचकुन " हो-हो " करत मान हलवु लागला.

" कालच. एका समर्थकाच...! निरोप आला होता..की तुम्ही येणार आहात !स्स्सस्स्स्स " पुन्हा त्या गोल-गोल भिंगणा-या लाल रंगाच्या भवंड रतुन एक वा-यासारखा घों-घों करणाराकिन्नरी आवाज आला. त्या हुकमी आवाजावर दोघांनीही फक्त होकारार्थी मान हलवली , एक चकार शब्द बाहेर काढला नाही.जणु तोंड उघडतच नव्हत बोलण्यासाठी.

" जास्त वेळ घालवु नका कालोखाच्या सैनिकांनो ! मालकाला घेऊन लागलीच बाहेर पडा.. ! कारण तो रघुभट्ट राहाजगडच्या सीमेवरुन ह्या गुहेत येण्यासाठी निघाला आहे! कोणत्याही क्षणी तो पोहचेल घाई करा ! मालकाची कबर घ्या , बाहेर पडा..!"

ज्याप्रकारे एक मोठा आवाज होत फटाका फुटला जातो- आणि फुटताच विशिष्ट प्रकारे एक गोल वर्तुळ हवेत वर-वर जाताना दिसतो, सेमहुबेहुब त्याचप्रकारे त्या लाल भवंडारचा एक स्फोट झाला , ती लाल चमकीली धुळीकण तप्त निखा-यांसारखी हवेत विव्स्त्रपणे पसरली, आणी एक लाल गोल वर्तुळ वर-वर जाताना त्या दोघांच्याही नजरेस दिसला.

" ए मामा !" लंक्याने मागे पाहत संत्यामामाला हाक दिली. एका हाकेन्या त्या महाभित्र्या मांणसाला आवाज जाईल तर नवलच म्हणाव लागेल.दोन तीन वेळा हाका आल्यावर शेवटी तंद्रीभंग पावल्यासारख्या संत्यामामाने लंक्याकडे पाहिल-त्याच्या सुरकुतलेल्या चेह-यावर बारा वाजले होते..मोठ-मोठ्या बाता मारणारा संत्यामामा असा निघेल ह्याची कल्पनाही हास्यस्पद होती.

दोघांनीही पावले वाढवुन ती सातफुट पेटी कशीतरी उचलली.

आत काहीतरी..होत.. कोणितरी झोपल असाव असं. कारण आतुन श्वास घेतल्याचव सोडल्याच आवाज येत होत.काहीवेळा अगोदर लंक्याच्या मनात जो पेटी उघडन्याचा विचार आला होता...आणी त्या नंतर जे काही विलक्षण घडल होतं. ते पाहुन त्या पेटीतल्या सैतानाची फौजच मनात धडकी भरवणारी होती तर तो सैतान कसा असेल? भयंकर विचार मनाला न शिवणारा!

ती कबर घेऊन कस-बस त्या तळघराच्या वीस पाय-या चढल्या! शेवटच्या पायरीला ते दोघे कपाळावरचा घाम पुसायला थांबले.

" ए पोरा मला पन घेऊन चल ना ! लेय उकडतोय ना इथ ! फिफीफिफिफ.."

मागुन खाली तळघरातुन ते टक्कल असलेल म्हातार पिशाच्च पुन्हा प्रगट झाल होत.धुक्यात उभ राहत -त्याच्या त्या हिरवट डोळ्यांनी दोघांकडे घोग-या आवाजात बोलत होत.

" ए मामा ! हे येड बेन काय येताळासारख वाटु राहिले बे मला ! उचल ही पेटी? न्हाई तर डोचक्याव बिचक्याचव बसायच हे येड!"

लंक्या म्हणाला. तसे दोघांनीही ती पेटी उचलली आणि लागलीच तळघरातुन बाहेर पडले.

 

क्रमश: