Mission : Fouji Wife - 1 books and stories free download online pdf in Marathi

मिशन :फौजी वाईफ️ - भाग 1

सगळ्यांच्या मनात अगदी अचानक स्मशान शांतता पसरली होती.पुढे काय होतय?एवढेच विचार मनात येत होते.समोर आत्ता जरी 'सगळं व्यवस्थित सुरू आहे' असं वाटत असलं तरी देखील ते तस नक्कीच नव्हतं.हे सगळ्यांना ठाऊक होतं.

"हॉटेल ब्लु डायमंड देहली (दिल्ली).."

"सेव्हन स्टार हॉटेल..सर्व सोयीसुविधायुक्त अस आणि आत्ता या रात्रीच्या रंगीबेरंगी झगमगाटात लखाखत असणार हॉटेल ब्लु डायमंड..."

हॉटेल ब्लु डायमंड....!दिल्ली मधील एक प्रसिद्ध सेव्हन;स्टार हॉटेल...!अगदी चकचकीत,झगमगीत...!अनेक लाईट्स,लायटिंग माळा,बल्स,कलरफुल छोट्या ट्युबस....अशा अनेक प्रकारच्या प्रकाशित साधनांनी ते हॉटेल झगमगत होत....!आत्ता च्या या रात्रीच्या दिखाव्याला तर ते आजूनच शोभा देत होत...!

आत्ता सेव्हन स्टार हॉटेल म्हणलं म्हणजे?नक्कीच तिथे गडगंज श्रीमंत असणारे लोक येणार?त्यांचीच उठबस तिथे असणार...!हो नक्कीच...!

पण याच श्रीमंती सोन्यात अनेक काळे कट रचले जातात...!हे कोणाला माहीत असत?कोणालाच नाही...ही..ही...ही..ही...!त्यालाच तर असुर म्हणतात...!आजच्या या कलियुगातील असुर...! नाही नाही...!कलियुगातील नाही कलकीयुगातील...!एक भयानक असुर...!ज्याचं डोकं रात्री अगदी घोड्याच्या वेगात अन् उटांच्या चालीत चालत अन् वजीर होऊन अलगद चेकमेट देण्याच्या तयारीत लागत...!म्हणून तर ह्याला भयानक असुर म्हणतात...!

हॉटेल डायमंड मध्ये सगळे श्रीमंत,गर्विष्ठ तरुण तरुणी त्या डिस्को च्या लावलेल्या गाण्यांवर त्या रंगीबेरंगी लाईट्स मध्ये नशेत मदहोश होऊन आपल्याच धुंदीत नाचत होते.तोकडे कपडे घातलेल्या,चेहऱ्यावर भरमसाठ मेकअप थापलेल्या मुली अन् त्यांना आपल्या पुरुषीसौंदर्याची अन् गडगंज श्रीमंती ची भुरळ घालणारे ते तरुण....!त्या तरुणी जशा तरुणांकडे आकर्षित होत होत्या तसच त्या तरुणी काही कमी नव्हत्या.....!

आपल्या उजळत्या कांतीच्या अन् ऐन तारुण्यात भरत अन् बहरत चाललेल्या शरिराच्या मोहात आणि जाळ्यात त्या तरुणांना अगदी अलगद ओढत होत्या.त्या त्यांच्या तोकड्या कपड्यांमध्ये त्यांचे बहरदार अवयव अगदि उठून दिसत होते आणि त्याकडे तरुण आपसूक आकर्षक होत होते.जिभेला अन् त्या शरीराला असल्या वासनाधीनतेची चटक लागली होती....जी जाता जात नव्हती...!

त्या मदिरेच्या मदहोश नशेत तर ते आधीच मशगुल होते पण आत्ता त्यांच्या त्या डोळ्यांत अन् जिभेवर फक्त आपल्या कडून केल्या जाणाऱ्या वासनाक्रियेची नशा होती.एखाद सावज पाहून जंगली जनावराच्या डोळ्यात आकर्षण दिसावं अन् लाळ टपकावी तस त्यांच्या तोंडाला पाणी सुटल होत अन् डोळ्यात चमक आलो होती.सापाची जीभ कशी सावजासाठी वळवळते तस त्यांची जीभ एकमेकांच्या स्पर्शासाठी आसुसली होती....!

एकदा का चटक लागली की जीभ त्यापासून कधीच दूर होती नाही...!ही तर काम वासनेची चटक होती! ही अशीच थोडी सुटणार होती...!

आणि ह्या गर्भश्रीमंतीत ज्यांना ह्या वासनेची चटक नाही त्यांना स्वतःच्या वासना घृण दृश्य -अदृश्य खेळात नकळत सामील करून त्यांची राखरांगोळी करणार होते हे असुर...!

जिथे स्वतःच्या बाप जाद्याच्या इस्टेटीवर मज्जा मारणाऱ्या त्या टोणग्यांना तर आजच्या या कलकी युगात गर्भश्रीमंत म्हणतात...!अन् कष्टाने कमवून खाणाऱ्या पोरांना मात्र दर्ददरिद्री म्हणतात

हे चित्र असच स्थिर होत...!

पण या लालसी दुनियेत काहीतरी चांगलं घडणार होत...! ते काय? ते तर येणारी वेळ आणि येणारा काळच ठरवणार होती....!

लाईक....! ते म्हणजे,

"जस्ट वेट अँड वॉच....! " अशी स्थिती होती आत्ता...! एकदम निर्णायक...!

एकदम लॅविश आणि पॉश रूम....!अर्थात आत येणारी लोक ही तसेच...!एकदम लॅविश आणि पॉश...!

एक मोठा बेड, एकदम झगमगती गॅलरी, एकदम पॉश बाथरूम, बाजूला मोठा एल. इ. डी टीव्ही, त्या बाजूला सोफा, पुढे टीपॉय....!


रूम नंबर एकशे तेवीस बी.(123 B.) मध्ये एक माणूस बिअर चे घोट रिचवत बसला होता.

साधारण पन्नास किंवा साठ वर्षांचा तो इसम.गव्हाळ वर्ण,घुबडासारखे डोळे आणि त्या डोळयांत काजळ,गालावर एक चामकीळ,पान खाऊन खाऊन लाल झालेले ओठ,सुटलेलं पोट...त्याच तुलनेत हाता-पायांचा आकार...चेहऱ्यावर एक प्रकारचा मग्रुरीपणा....

आणि त्याच्या बाजूला अजून एक तसाच माणूस बसला होता.

सगळे त्याला बघून घाबरायचे.इतका भयानक होता तो...

इतक्यात,

"धडामsssssss!"

असा आवाज झाला आणि दोन मिनिट सगळेच हादरले.पण जेव्हा काय झालं? हे त्यांना समजलं तेव्हा मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर विजयी हास्याची लकेर उमटली होती.

कारण ही तसच होत.आज दहषदवादी अजगराच्या विळख्यात जाणारा आपला देश काही अंशी सुटला होता.

"धडामsssssssss!"

आवाज झाला आणि बरोबर पाच मिनिटांनी ते त्या खोलीत आले. पण समोरच दृश्य पाहून हक्का बक्कका पाहतच राहीले.


.

क्रमशः

कशी वाटली कथा? टायटल वाचून वेगळेपण जाणवलं असेलच ना? आपल्या देशावर थोडसं काहीतरी...!

©®आदिरा



इतर रसदार पर्याय