काहे दिया परदेस - 1 सागर भालेकर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काहे दिया परदेस - 1

भाग - १ 


अचानक साक्षी खडबडून जागी झाली. पहाटेचे ६ वाजले होते. साक्षीची आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची मीटिंग होती. बाहेरून साहेब येणार होते, आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा होता. परंतु साक्षीला कालच्या जागरणामुळे पुन्हा झोपावेसे वाटत होते. ती स्वतःशी पुटपुटली आणि म्हणाली, "फक्त १० मिनिटे झोपते", तितक्यात साक्षी ची आई आली.

(वंदना जोशी म्हणजे साक्षीची आई.. खूप साधी, सरळ आणि उच्च विचारांची. नवरा मिलटरी सर्विस मध्ये असल्याकारणाने साक्षीचे एकटीने पालनपोषण केले.आपला नवरा मिलिटरी मध्ये होता म्हणून त्यांच्याबद्दल खूप अभिमान.)

वंदना - अगं, साक्षी उठ लवकर, तुला जायचं नाही आहे का ऑफिसला??? बघ वाजले किती. आज ऑफिसमध्ये महत्वाचा दिवस आहे ना तुझा???

साक्षी - हो, उठते.. कालच्या जागरणामुळे कदाचित आज मला अंथरुणातच खिळावसे  वाटते आहे.

(साक्षीला मात्र उठावेसे वाटतच नव्हते, पण नाईलाज आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा होता. दोन महिन्यांपासून तिने ह्या प्रॉजेक्टवर खूप मेहनत घेतली होती.आज जर का तिच प्रोजेक्ट साहेबांना आवडलं तर तिला प्रोमोशन मिळणार होत.)

साक्षी - चल, आई येते मी…..

वंदना - हो, सावकाश जा आणि काय ते तुमच्या भाषेत काय बोलतात ते "best of luck".

साक्षीचे बाबा - साक्षी बेटा, सांभाळून.

साक्षी - हो बाबा, आई थँक्स!

वंदना - सावकाश जा! (स्वतःशीच पुटपुटत) ह्या पोरीची मला खूपच काळजी वाटत असते. एखादी गोष्ट नाही मिळाली की, मनाला खूप लावून घेते.

साक्षीचे बाबा - तू नको एवढी तिची काळजी करत जाऊस. माझी मुलगी बाहेरच्या अडथळ्यांना सामोरं जायला सक्षम आहे. साक्षी तिच्या बाबांवर गेली आहे.

(प्रकाश जोशी म्हणजे साक्षीचे बाबा. खूप मनमिळावू, प्रेमळ आणि आपल्या मुलींवर जीवापाड प्रेम करणारा. मिलिटरी सर्विस मध्ये असल्याकारणाने साक्षीकडे जास्त लक्ष देऊ न शकणाऱ्या बापाला आपल्या मुलीची तळमळ दिसत होती.)

वंदना - हो हो, ठीक आहे.

( काही तासानंतर साक्षी ऑफिसमध्येप पोहचते.)

अमृता - काय गं! किती उशीर. आज माहिती आहे ना. बाहेरचे मोठे साहेब येणार आहेत ते. आणि झालं तुझ presentation.

साक्षी - हो. आल्याआल्या किती तुझे ते प्रश्न??

अमृता - समीरकडे बघ, किती हॅन्डसम दिसतो आहे ना तो???

साक्षी - झालं तुझं बोलून…..

शिपाई काका - साक्षी मॅडम, तुम्हाला घोरपडे साहेबांनी प्रोजेक्ट घेऊन तुम्हाला आतमध्ये बोलवलं आहे.

साक्षी - हा बॉस पण ना. आल्याआल्या काम, जरा दम खाऊन पण देत नाही.

शिपाई काका - काय बोललात….

साक्षी - येते…..

(साक्षी बॉसच्या केबिन मध्ये जाते.)

साक्षी - मी, आत येऊ का सर…

महेंद्र कामत - हो, या. मी सांगितलेले सर्व लक्षात आहे ना तुमच्या….

साक्षी - हो, सर.

महेंद्र कामत- साक्षी. तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे माझा. तू प्रोजेक्ट केलं आहेस ते नक्कीच बरोबर आहे.

साक्षी - सर, पण एकदा तुम्हीसुद्धा बघून घेतलं तर बरं होईल…

महेंद्र कामत - मी आताच तुला म्हणालो, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर.. तू आता जाऊ शकतेस….

साक्षी - पण सर, एकदा???

महेंद्र कामत- साक्षी???

साक्षी - ठीक आहे, सर.

(साक्षी पुन्हा आपल्या जागेवर येते.)

अमृता - काय झालं. अशी घाबरलेली का आहेस एवढी.सर काही बोलले का???

साक्षी - नाही गं. मला थोडी भीती वाटते आहे.

अमृता - कसली??

साक्षी - प्रोजेक्टची.

अमृता - त्यात काय घाबरायचं..आम्ही आहोत सर्व तुझ्या पाठीशी….

साक्षी - तुम्ही, आहातच पाठीशी…

(काही तासांनी एक उच्च, गोरापान, देखणा पुरुष कंपनीमध्ये येतो. सगळे त्याला सलाम करतात.)

महेंद्र कामत- साहेब, तुम्ही. मोठे साहेब नाही आले का तुमच्याबरोबर.

गौरव - येणार होते. पण त्यांची अचानक एक महत्वाची मीटिंग असल्याकारणाने त्यांना येण्यास जमले नाही.

महेंद्र कामत - ओके, चालेल सर....

अमृता - हा, किती हॅन्डसम दिसतो बघ ना. किती गोरापान. अगदी छीला हुआ अंड्यासारखा.

साक्षी - गप्प राहा…

(तेवढ्यताच गौरवची नजर जाते साक्षी वर, पण तितक्यातच साक्षीची नजर खाली जाते.)

नजरेला नजर भिडली असताना,

अचानक तुझी नजर का झुकावी….

संवादाद मग्न असताना,

शब्दांनी तुझी साथ का सोडावी….

आताच का त्या बेभान वाऱ्याला कळ यावी…

की त्याने ती केसांची लट,

तुझ्या चेहऱयावर अलगद लहरावी…

(मात्र लगेचच गौरवला काहीशे विचित्र वाटते आणि तो आपली नजर दुसरीकडे वळवतो.)

गौरव - मी, गौरव देशपांडे… देशपांडे ग्रुप ऑफ कंपनीचा "Chief Executive Officer". मी खूप वर्षानंतर मुंबई मध्ये आलो आहे. मी दुबईला असतो. ऑफिसमध्ये सगळं काही ठीक चाललं आहे ना. कोणाची काही तक्रार..

सगळे - नाही सर… 

गौरव - आज खरंतर देशपांडे साहेबच येणार होते. पण अचानक त्यांना काही कामानिम्मत बाहेरगावी जावे लागले. कामत त्या प्रोजेक्ट करणाऱ्या मॅडम आल्या आहेत ना.

महेंद्र कामत - हो, सर. ह्या काय इकडेच आहे.

शब्द मुके होतात तेव्हा 

नजर तुझी बोलते….

शब्दांची घागर भरते अन 

मनातले राज खोलते…..

गौरव - अच्छा, तुम्हीच का त्या मॅडम…. नाव काय आपलं.

साक्षी - साक्षी…

गौरव - साक्षी. कामत तुम्ही आणि साक्षी थोड्यावेळाने माझ्या केबिन मध्ये या.

महेंद्र कामत - हो, सर…

(गौरव तिथून निघून जातो.)

महेंद्र कामत - साक्षी प्रोजेक्ट व्यस्थित बनवलं आहेस ना. नाहीतर आपली काही खैर नाही.

साक्षी - सर, मगाशी तुम्हाला बघा बोले प्रोजेक्ट. तेव्हा तुम्ही म्हणालात, राहू द्या म्हणून….

महेंद्र कामत - ठीक आहे. (एवढं बोलून महेंद्र सर तिथून निघून जातात.)

अमृता - साक्षी काय झालं आहे. इतकी घाबरून जाऊ नकोस.आम्ही आहोत पाठीशी.

साक्षी -मी हे प्रोजेक्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि जर गौरव सरना आवडलं नाहीतर…मी ह्या प्रोजेक्ट वर केलेली पूर्ण मेहनत वाया जाईल. माझं प्रोमोशन नाही होणार. माझ्या आई वडिलांचा खूप विश्वास आहे गं माझ्यावर. त्या दोघांनाही मला नाराज करायचं नाही आहे.

अमृता - अगं! वेडी आहेस का तू… इतका विचार नको करुस. तू एवढी मेहनतीने बनवलं आहेस. बाकी सर्व नशिबावर सोड. तू तुझ्या परीने मेहनत केली आहेस ना. मग देव नक्कीच तुझं ऐकणार… 

साक्षी - (हे, ऐकून साक्षीला खूपच धीर येतो.) थँक्स, अमृता….

(आणि दोघेही परत कामाला लागतात.)

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, मला नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा.चला मग भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार….