Maria books and stories free download online pdf in Marathi

मारिया

       हि कथा आहे मारिया नावाच्या ‘भाटगाव' येथे राहणाऱ्या एका कॅथॉलिक स्त्रीची, वय वर्ष ४९ असून ती एक विधवा आहे, २ मुले पदरात टाकून तिचा नवरा गेला. आज त्याला जाऊन तब्बल १० वर्ष झालेत, नावाला का म्हणा पण थोडी फार इस्टेट आहे तिच्या नवऱ्याची, त्यातूनच मिलणाऱ्या उत्पनावर तिचा आणि तिच्या मुलांचा उदरनिर्वाह चालत होता परंतु आज दोन्ही मुले तिच्यापासून विभक्त राहतात. तिचा मोठा मुलगा रॉकी आहे,  ह्याने महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्या वर सोडून एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करतो आहे. रॉकी ची सॅन्ड्रा नावाची एक मैत्रीण आहे व तो तिच्याशीच लग्न करणार आहे. आणि दुसरा मुलगा आहे रॉनी,  हा पनवेल इथे त्याच्या मामाकडे म्हणजेच मायकल अंकल कडे राहतो तिथेच तो त्याच शिक्षण हि करतोय. अशी आहे मारियाची कौटुंबिक पार्शवभूमी.
 

                   स्वतःच्या एकटेपणाला कंटाळून मारियाला मद्यपान करायची सवय लागली, मुले  हि आपल्या आईच्या ह्या रोजच्या त्रासाला कंटाळून तिच्यापासून वेगळे झालेत व कधीकाळी वर्ष अखेरीस ते तिला काय तेवढे भेटून जातात.

                   मारिया ची एक भाडेकरू आहे सुनीता. सुनीता एक सुशिक्षित घटस्फोटित तरुणी आहे. आपल्या नवऱ्यापासून वेगळी झाली तेव्हापासून ती मारिया ऑंटी कडे भाडेकरू तत्वावर राहते. दोघी समदुःखी असल्यामुळे त्यांच्यात जरा जास्त जवळीक आहे. मारिया ऑंटी हि तिला आपल्या मुलीप्रमाणे समजते. 

                   मारिया ऑंटीचे एक जवळचे स्नेही आहेत दिनकर भाऊ. हे एक मोठे बागायतदार शेतकरी आहेत व मारिया ऑंटी च्या नवऱ्याचे जुने मित्र सुद्धा आहेत म्हणून ते तिच्याशी जरा जवळीक साधुन आहेत.

                   आज संडे आहे आणि त्यात आज मारिया ऑंटी चा ५० वा बर्थडे सुद्धा आहे, त्यामुळे आज तिची दोन्ही मुले, तिचे भाऊ, इतर मित्रगण, दिनकर भाऊ अशी हि मंडळी संध्याळपर्यंत येणार आहेत. मारिया आज खूप खुश आहे.

                   इथे रॉकी हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला आहे, खूप दिवसाने आपल्या घरी जात असल्यामुळे तोही खूप आंनदात आहे. तो आपल्या भावाला फोने करून एका ठिकाणी भेटायला सांगतो आणि तिथून पुढचा प्रवास आपण सगळे एकत्र करू असं ठरत, रोनीला हि त्याच म्हणणे पटते वा ते त्या प्रमाणे भेटायचं ठरवतात.

                   इथे मारिया ऑंटी आणि सुनीता दोघी येणाऱ्या पाहुण्ण्याची वाट बघत बसल्या आहेत, दिनकर भाऊ सुद्धा आपल्या कुटुंबासोबत आपल्या कार मधून येत आहेत. थोड्याच वेळात सर्व मंडळी घरी पोहचतात वा मारिया ऑंटी पंख्याला लटकलेली बघतात. सुनीता हि आपल्या खोली मध्ये नसते.

                   अचानक घडलेल्या घटनेमुळे सगळे खूप दुखी झालेत. मायकल अंकल लगेच पोलिसांना कळवायला सांगतात. त्याप्रमाणे ते जवळचे पोलीस स्टेशन गाठतात. पोलीस हि घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करतात आणि सर्वांची चौकशी सुरु करतात. प्रथमदर्शी पोलिसांना हा चोरीचा प्रकार वाटतो पण घरातील काहीच चोरी न झाल्यामुळे हा घातपाताचा प्रकार आहे असा त्यांचा समज तयार होतो.

                   पोलिसांना सुनीता बेपत्ता असल्याचं दिनकर कडून कळते ते लगेच तिचा शोध सुरु करतात. इथे घरातील सर्वजण मारियाचा अंत्यविधी उरकतात. आज तिच्या मुलांना आपल्या आईच जाणं खूप जिव्हारी लागलेलं आहे. जुन्या आठवणी त्यांच्या नजरे समोरून जाताच नाही.

                   रात्रीच्या वेळी जेव्हा भयाण शांतता असते तेव्हा एका गावात (रांजणगाव) एक व्यक्ती सायकलहुन जात आहे व त्याला एका बंगल्यातून कसलातरी आवाज येतोय म्हणून तो भिऊन तेथून पळून जातो. परत दुसऱ्या दिवशी तोच आवाज, असं  सतत होत असल्या मुले तो व्यक्ती हिम्मत करून आत जायचा प्रयत्न करतो परंतु तो अपयशी ठरतो व त्याचा असा समाज तयार होतो कि इथे कुणी भूत नसून आत कुणीतरी व्यक्ती आहे अशी त्याची खात्री होते.

                   सुनीता चा शोध घेत पोलीस तिच्या जुन्या घरी म्हणजेच राकेश (सुनीताचा पूर्व पती) ह्याच्या घरी पोहचतात. राकेश हा दिसायला जरी देखणा असला तरी डोक्याने तेवढाच विकृत आहे. आपल्या अंगी असणाऱ्या धर सोड वृत्ती मुले तो कधी कुठे ६ महिण्यापेक्ष जास्त काळ नोकरी टिकवू शकला नाही म्हणून सुनीता हि त्याला कंटाळली होती व त्याच्यापासून वेगळी झाली.

                   रांजणगाव पोलीस स्टेशन चा फोने वाजतो, तो फोने असतो एका अज्ञात व्यक्तीचा तो पोलिसांना सांगतो कि त्याच्या घरा जवळील एका फार्म हाऊस वर कुणीतरी खूप दिवसांपासून बंदिस्त आहे म्हणून, पोलीस लगेच तिथे पोहचतात व त्या व्यक्तीला तिथून सोडवतात, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून ती असते सुनीता. हि माहिती रांजणगाव पोलीस इतर पोलीस स्टेशनला कळवतात. माहिती भेटल्यावर भाटगाव पोलीस रांजणगावला  जाऊन सुनीताला आपल्या ताब्यात घेतात.

                   पोलीस मारियाच्या कुटुंबियांना तिथे बोलावितात व सुनीताची ओळख करायला सांगतात पण प्रत्यक्ष कधी न भेटल्यामुळे ते तिला ओळखत नाहीत परंतु सुनीता मारियाच्या मुलांना ओळखते कारण तिने त्याचे फोटो पाहिलेले असतात.

                   सुनीता पोलिसांना घडला प्रकार सांगायला लागते. कि जेव्हा ती आणि मारिया ऑंटी मुलांची वाट बघत बसल्या होत्या तेव्हा दिनकर तिथे काही लोकांसोबत आले होते. दिनकर मारियाला घेऊन आतल्या खोली मध्ये गेले तिथे त्यांच्यात भांडण झाल व दिनकर खूप घाबरल्या अवस्थेत बाहेर आले आणि आपल्या सोबत आलेल्या माणसांना काही सांगून सुनीताला तिथून बळजबरीने घेऊन गेले. मग लगेच पोलीस दिनकरच्या घरी निघाले तिथे दिनकरचा घर बंद होत. आता पोलिसान समोर मोठं आवाहन होत त्याला शोधून जेर बंद करणे कारण तो स्वतःहून गायब झाला होता.

                   दिनकर आपल्या कुटुंबाला एका सुरक्षित ठिकाणी सोडून स्वतः पसार होतो. घराचा तपास करताना पोलिसांना एक ब्रेसलेट सापडते, व ते ब्रेसलेट दोघीं पैकी कुणाचंच नसल्यामुळे त्याबद्दल पोलिसांचा संशय वाढतो. ते एक जेन्टस ब्रेसलेट असल्यामुळे सरळ संशय हा दिनकर वरच बसतो. त्याप्रमाणे पोलीस दिनकरच्या शोध कार्याला लागतात. दिनकरचा कुटुंब हि बेपत्ता आहे.

                   पोलीस दिनकरचा भातगावातील घर उघडतात व घराची चौकशी करायला लागतात. चौकशी दरम्यान त्यांना एक बॅग सापडते, त्या बॅग मध्ये काही फाइल्स असतात त्यात दिनकरच्या इतर  संपत्तीबद्दल पण माहिती असते, त्याने ह्या आधीहि अनेकांना फसवून त्यांच्या जागा आपल्या नावावर केल्या होत्या. त्या फाइल्समध्ये असलेल्या पात्यांवर पोलीस जातात व एका ठिकाणी दिनकर आपल्या मित्राच्या घरी लपून असल्याची माहिती मिळते. त्याप्रमाणे पोलीस सापळा रचून त्याला तिथून अटक करून भाटगावला आणतात.

                  त्याने मारियाची हत्या का केली असे विचारतात, तेव्हा दिनकर सांगतो कि ती त्याला पोलिसांना पकडून देणार म्हणून धमकावत होती. कारण तिला त्याच्या जमिनीच्या गैर व्यवहारांबद्दल माहित झाल होत. त्या दिवशी तो फक्त तिला समजावयाला गेला होता पण ती काही केल्या ऐकत नव्हती व त्याच्याशी हाणामारी करू लागली, त्या झटापटी मध्ये दिनकरच्या हातात एक मेणबत्तीचा स्टॅन्ड आला व रागाच्या भरात त्याने तो तिच्या डोक्यावर मारला. त्याच भीतीत तो गडबडून बाहेर आला आपल्या सोबत आलेल्या माणसांना मारियाला पंख्याला लटकवायला सांगितले जेणेकरून ती एक आत्महत्या वाटेल व स्वतः सुनीता ला घेऊन गेला कारण ती एकच प्रमुख साक्षीदार होती.

इतर रसदार पर्याय